श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism & Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा हा सढळ अनुवाद आहे. श्री. रॉय हे विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यांच्या विचारसरणीचा मराठी वाचकांना असावा तसा परिचय नाही. तो परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. उपरोक्त ग्रंथाचा हा प्रथम खंड आहे.