Browse Results

Showing 35,951 through 35,975 of 36,125 results

Bhartiya Sanvidhanacha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Dr Minal Kshirsagar

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर-1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधान परिचय सत्र-1 पुस्तक आहे. भारतीय संविधान परिचय यावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे कार्य, भारतीय संविधानाची प्रस्तावना व त्यातील महत्त्वाची तत्त्वे यांची ओळख, भारतीय संविधानाची वैशिष्टये, मूलभूत अधिकार त्यांची तरतूद व मानवी हक्कांविषयी तोंडओळख होण्याबरोबरच मूलभूत कर्तव्ये व राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे प्राथमिक पातळीवर शिकणार आहोत. राज्या राज्यांमध्ये होणारे विविध संघर्ष, भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे बदल समजण्यासाठी तसेच भारतीय संघराज्याचे स्वरूप, वैशिष्टय त्याचबरोबर संविधान सुधारणांची संविधानामधील तरतूद, संविधान सुधारणा पद्धती, भारतीय संविधानातील मोठ्या संविधान सुधारणा व संविधानाची मूलभूत संरचना या नवीन प्रकरणांची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेणार आहोत.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagar

प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.

Samajshastracha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Prof. Dr. Sudhir Yevale

समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. सेठ/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्द्यांना या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कुटुंब, नातेसंबंध याचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा प्रयत्नही झाला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांना आकलन होईल अशा सोप्या व सरळ भाषेत हा अभ्यासक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वापरले जाणारे पर्यायी शब्दही दिले आहेत.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat Pragaitihasik Kaal Te Mauryakal FYBA First Semester - SPPU: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.

Prakrutik Bhugol FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी.च्या सूचनेनुसार जून 2019 पासून सेमिस्टर 1 करिता 'प्राकृतिक भूगोल' (Physical Geography) या भूगोलाच्या मूलभूत शाखेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा आखलेला आहे. प्राकृतिक भूगोल शाखेचा मुख्य उद्देश असा की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा परिचय आणि संलग्नित आव्हानाची ओळख होईल, त्यांना प्राकृतिक भूगोलातील जागतिक स्तरावरील सद्य घडामोडीसंबंधी जाणीव होईल. विशेषतः प्राकृतिक भूगोलामधील शिलावरण, वातावरण व जलावरणासारख्या आवरणावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

F.Y.B.A. Farajiyat Vishay Gujrati GUJ-COM Bhag 1 - BAOU: પ્રથમ વર્ષ બી.એ. ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ ૧

by Babasaheb Ambedkar Open University

આ પુસ્તકમાંની અભ્યાસ-સામગ્રી મૂળે મધ્યપ્રદેશ ભોજ ઓપન યુનિવર્સીટી, ભોપાલ દ્રારા તૈયાર કરવામાં આવી છે. જેમાં પ્રસ્તુત પુસ્તક પ્રથમ વર્ષ બી.એ.ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ 1નું છે.

F.Y.B.A. Farajiyat Vishay Gujrati GUJ-COM Bhag 2 - BAOU: પ્રથમ વર્ષ બી.એ. ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ ૨

by Babasaheb Ambedkar Open University

આ પુસ્તકમાંની અભ્યાસ-સામગ્રી મૂળે મધ્યપ્રદેશ ભોજ ઓપન યુનિવર્સીટી, ભોપાલ દ્રારા તૈયાર કરવામાં આવી છે. જેમાં પ્રસ્તુત પુસ્તક પ્રથમ વર્ષ બી.એ.ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ 2નું છે.

Samajik Sanstha Ani Badal FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि बदल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Vijay M. Jadhav

सामाजिक संस्था आणि बदल याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक सामाजिक मानसशास्त्रावर यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला विविध सामाजिक संस्था जसे की कुटुंब, नातेसंबंध, विवाह, राजतंत्र, अर्थव्यवस्था यांची सम्यक आणि मुद्देसूद चर्चा करण्यात आलेली असून समाज परिवर्तन आणि बदलत्या सामाजिक स्थितीनुसार त्यांच्यात झालेले बदल यांची देखील चर्चा विस्तृत स्वरूपात करण्यात आलेली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संस्थांचे मानवी जीवनातील आणि सामाजिक जीवनातील स्थान, महत्त्व इत्यादी स्पष्ट करण्यात आलेले आहे. धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे ही व्यक्तीच्या सामाजिक जीवनात महत्वाच्या भूमिका बजावून व्यक्तीच्या सामाजिक जीवनात ते मार्गदर्शन करतात, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे देण्यात आलेले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात सामाजिक बदल व या बदलांचे सहाय्यक घटक यांची सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून या प्रकरणात आधुनिकीकरणाचा विकास व जागतिकीकरण यांची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.

Manavi Bhugol FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. 'मानवी भूगोलाचा परिचय' या पहिल्या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा व त्यांचे महत्त्व यांचा आढावा घेतला आहे. 'लोकसंख्या' या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त व भारतीय लोकसंख्येची रचना अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच प्रकरण तीनमध्ये मानवी वसाहत, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, प्रारूप व आकृतिबंध तसेच भारतातील नागरीकरण व महाराष्ट्रातील नागरिकरणाचा समावेश केला आहे. याशिवाय शेवटच्या प्रकरणात कृषी, कृषीचे प्रकार, कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय कृषीच्या समस्या यांचा समावेश केलेला आहे.

Samajik Manasashastrachi Olakh FYBA Second Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे होते. या अभ्यास क्रमावर आधारित सामाजिक मानसशास्त्राची ओळख पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी खुपच उपयोगी ठरणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा बदल केला आहे तो म्हणजे दुसऱ्या सत्रात 'सामाजिक मानसशास्त्राची ओळख' या विषयाचा समावेश. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधील सामाजिक मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचे समाजनिष्ठ वर्तन समजून घेण्यासाठी तितकाच उपयुक्तसुद्धा आहे.

Samajik Sanstha Ani Parivartan FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि परिवर्तन एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Yevale Jyoti Suhas Gagangras

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता समाजशास्त्र विषयासाठी 'सामाजिक संस्था आणि परिवर्तन' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. सेमिस्टर (II) करिता या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. पुस्तक वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे निरसनही होईल. पुस्तकामध्ये नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Bhartiya Sanvidhanacha Parichay FYBA Second Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Prof. Haridas Arjun Jadhav

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर - 1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित 'भारतीय संविधानाचा परिचय' सत्र 2 हे पुस्तक आहे. भारतीय संविधानाचा परिचय या पुस्तकाच्या प्रकरण 1 मध्ये 'भारताचे कायदेमंडळ' म्हणजे संसद, त्याची संरचना, कायदेमंडळाचे अधिकार व कार्ये, राज्याचे विधानमंडळ, त्याची संरचना, अधिकार व कार्य तसेच संसद व विधानमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता, अपात्रता इ. प्रकरण 2 मध्ये ‘कार्यकारी मंडळ’ यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, भारताचा महान्यायवादी यांच्या नियुक्ती, कार्यकाळ, पदावनती अधिकार व कार्य तसेच घटकराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद व राज्याच्या महाधिवक्ता तसेच यांची नियुक्ती कार्यकाळ, पदावनती, कार्य व अधिकार हे पाहणार आहोत. प्रकरण 3 मध्ये 'न्यायव्यवस्था' यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची स्थापना, संरचना, न्यायाधिशांची नियुक्ती, पात्रता, शपथ, पदावनती/महाभियोग प्रक्रिया , सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे अधिकार व कार्ये, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन सक्रियता या संकल्पना पाहणार आहोत. प्रकरण 4 मध्ये 'निवडणूक व्यवस्था' यामध्ये निवडणूक आयोग त्याची निर्मिती, कार्य आणि भूमिका तसेच मुख्य निवडणूक आयुक्त व सध्या कळीचा मुद्दा/विषय असणारे निवडणूक सुधारणा या नवीन प्रकरणांची ओळख करून देणार आहोत.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA Second Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr Vijaykumar Wavale

प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहे.

Manavi Bhugol (Gg - 110 B) FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल (Gg - 110 B) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोव्हेंबर 2019 पासून सेमिस्टर-2 करिता 'मानवी भूगोल' (Gg - 110 B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. सर्वसामान्यपणे भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत. एक, प्राकृतिक भूगोल व दुसरे, मानवी भूगोल. पुणे विद्यापीठाने 'मानवी भूगोल' हा विषय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर-2 च्या भूगोल विषयाच्या अध्ययनासाठी निश्चित केला आहे. या नवीन अभ्यासक्रमात मानवी भूगोलाच्या एकंदर चार शाखा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणातील संज्ञा/व्याख्या, संकल्पना, पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. दर्जेदार वैज्ञानिक मांडणी करून मुद्द्यांचे सुलभतेने स्पष्टीकरण केले आहे. यामुळे संकल्पना स्पष्ट होतील.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat Uttar Mauryakal Te Rashtrakut Kaal FYBA Second Semester - SPPU: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Panorama SYBA Third Semester - SPPU

by Ashok Chaskar Sanjay Pagare Gautami Pawar Sharad Gadekar Veena Nare

Panorama: Values and Skills through Literature, a composite textbook for students at undergraduate level. This textbook is a combination of lessons in language and literature, designed to meet the requirements of students enrolled for second-year BA courses. The courses in humanities aim at contributing to the overall personality development of students. They have to be good human beings before anything else. This laudable aim involves instilling essential human values like tolerance, understanding, sympathy, respect for differences, ability to live in harmony with nature, protecting the environment, etc. These values were kept in mind while choosing the literary pieces for this volume.

Sukshma Arthashastra 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. D. Awhad Dr S. R. Javale Dr D. B. Pawar

द्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र स्पेशल - 1: सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या काढून विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Sthool Arthashastra 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. B. Kale Dr G. K. Sanap

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पेशल पेपर - 2 स्थूल अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या व तक्ते देऊन विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Pashchimatya Rajakiy Vichar 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: पाश्चिमात्य राजकीय विचार १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe

एस.वाय.बी.ए. राज्यशास्त्र विशेष स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या CBCS पॅटर्नच्या (DISCIPLINE SPECIFIC ELECTIUE COURSE) (DSE-1A(3)) म्हणून 'पाश्चात्य राजकीय विचार' चे सत्र - 3 साठी अध्यापन केले जाणार आहे. राजकीय विचारांचे अवकाश पाश्चात्य विचारांशिवाय अपूर्णच राहते. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांनी राजशास्त्राला अनेक राजकीय संकल्पनांची, सिद्धान्तांची, विचारप्रणालीची देणगी दिली आहे. त्यांनी सामाजिक-राजकीय समस्या सोडविण्यासाठी मांडलेले विचार आजही जगभरात अभ्यासले जातात. या अभ्यासक्रमाच्या सत्र तीनमध्ये आपण चार विचारवंत अभ्यासणार आहोत. त्यात प्रथम प्लेटो हा ग्रीक विचारवंत आहे. याच्या आदर्श राज्य, शिक्षणाचा दृष्टिकोन व न्यायाचा सिद्धान्त या तीन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. दुसरा, ॲरिस्टॉटल हा सुद्धा ग्रीक विचारवंत आहे. याच्या ‘राज्यांचे वर्गीकरण', 'गुलामगिरी विषयक विचार' व क्रांतीच्या सिद्धान्ताचा अभ्यास करणार आहोत. तिसरा मॅकियाटहेली हा इटलीचा पंधराव्या शतकातील विचारवंत असून याच्या मानवी स्वभाव, धर्म आणि नैतिकतेसंबंधी विचार व राज्यविषयक विचारांचा अभ्यास करणार आहोत. चौथा, जॉन लॉक हा सतराव्या शतकातील इंग्लंडचा विचारवंत असून याच्या ‘राज्याचे स्वरूप', 'नैसर्गिक हक्क' व 'सामाजिक कराराचा सिद्धान्त' यांचा अभ्यास/अध्ययन करणार आहोत.

Paryavaraniy Bhugol SYBA Third Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester - III साठी (जून 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल' विषय अभ्यासाकरिता आहे. एक प्रकारे सर्वत्र पर्यावरणाचा सातत्याने विचार मांडलेला असतो. चर्चा चालू असते. पर्यावरण आणि भूगोल हे दोन्ही एकमेकांशी अतिशय निगडित आहेत. या दृष्टीने याची माहिती होणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि काळाची गरजही आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. या दृष्टीने आपण या सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय भूगोलाचा परिचय (2) परिसंस्था (3) जैवविविधता आणि संवर्धन (4) पर्यावरणीय प्रदूषण या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.

Paryavaraniy Bhugol 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat Dr Rajendra Bhausaheb Jholekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गासाठी सामान्य स्तरावर 'पर्यावरणीय भूगोल' हा विषय सुरू केला आहे. दिवसेंदिवस वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक प्राणी व वनस्पतींच्या समूळ जाती नष्ट होत असून ते आपल्या दृष्टीने खूपच घातक आहे. यातूनच 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते. 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. विषय तसा नवीन असला तरी त्याचा दररोजच्या जीवनात प्रत्येकाचा संबध त्याच्याशी येत असल्याने हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा बनला आहे.

Rajkiya Vicharpranalicha Parichay SYBA Third Semester - SPPU: राजकीय विचारप्रणालीचा परिचय एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Pradeep Deshpande Prof. Pramod Rajendra Tambe

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course म्हणून 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र 3 साठी शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रमातील सत्र तीनमध्ये आपण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'विचारप्रणाली' असून यात विचारप्रणालीचा उगम, अर्थ, व्याख्या, विचारप्रणालीचे स्वरूप व व्याप्ती या उपघटकांशिवाय 'विचारप्रणालीची भूमिका' आणि 'विचारप्रणालीचा अंत' हे दोन घटक आपण शिकणार आहोत. प्रकरण दुसरे 'राष्ट्रवाद' असून यात आपण राष्ट्रवादाचा अर्थ, निर्मिती व विकास, राष्ट्रवादाच्या व्याख्या व स्वरूप, राष्ट्रवादाचे घटक, पुरोगामी राष्ट्रवाद, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण तिसरे ‘लोकशाही समाजवाद' या विचारप्रणाली अंतर्गत लोकशाही समाजवादाचा अर्थ, स्वरूप, वैशिष्टये याचप्रमाणे लोकशाही समाजवादाची यशप्राप्ती व मर्यादा, समाजवादी राज्य, समाजवादाचे मुख्य विचारप्रवाह व प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चौथे ‘फॅसिझम' या विचारप्रणाली अंतर्गत आपण फॅसिझमचा अर्थ, व्याख्या, तत्त्वज्ञान, फॅसिझमच्या उदयाची कारणे या संकल्पना शिकणार आहोत.

Refine Search

Showing 35,951 through 35,975 of 36,125 results