Browse Results

Showing 36,001 through 36,025 of 36,194 results

Core Social Sciences class 9 - Meghalaya Board

by Meghalaya Board of School Education

Core Social Sciences for Class IX is based on the recommendations of the NCF 2005 guidelines and the syllabus designed by the MBOSE. The textbook unfolds to the students the four basic branches of Social Sciences-History, Geography, Civics, and Economics.

Core Social Science class 10 - Meghalaya Board

by Meghalaya Board of School Education

Core Social Sciences for Class X is based on the recommendations of the NCF 2005 guidelines and the syllabus designed by the MBOSE. The textbook unfolds to the students the four basic branches of Social Sciences-History, Geography, Civics, and Economics.

Marathi Ekankika - SPPU: मराठी एकांकिका - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. L. Deshpande Datta Patil

महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे. ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम ‘एकांकिका' या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातन केलेले दिसते. प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात. त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्टात होणाऱ्या शंभरहून अधिक एकांकिका स्पर्धा होत. या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत. अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेले आहेत. या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली. तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते. जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे.

Bhugol B.A (Hons.) Sem-I -Ranchi University, N.P.U

by Chaturbhuj Mamoria Ratan Joshi

Bhugol textbook for B.A (Hons.) Sem-I from Ranchi University, Nilambar Pitambar University in Hindi.

Rajneeti Vigyan B.A (CBCS) Sem-III -Ranchi University, N.P.U

by J. C. Johari Rashmi Sharma

Rajneeti Vigyan text book According to the Latest Syllabus based on Choice Based Credit System (CBCS) for B.A Sem-III from Ranchi University, Nilambar Pitambar University in hindi.

Punarvasu: ಪುನರ್ವಸು

by Dr Gajanana Sharma

ಈ ಕಾದಂಬರಿಯಲ್ಲಿ ಲೇಖಕ ಎರಡು ಪ್ರಮುಖ ಹಂತಗಳನ್ನು ದಾಟಿದ್ದಾನೆ. ಒಂದು, ಇದುವರೆಗೆ ನಮಗೆ ತಿಳಿದಿದ್ದ ಶರಾವತಿಗಿಂತ ಭಿನ್ನವಾದ ಶರಾವತಿಯನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದು, ಎರಡು, ಶರಾವತಿಯ ಪರಿಸರದೊಂದಿಗೆ ಬದುಕನ್ನು ಹೆಣೆದುಕೊಂಡಿದೆ. ಇವೆರಡೂ ಅವರನ್ನು ವಿಶಿಷ್ಟ ಕಥೆಗಾರರನ್ನಾಗಿಸುತ್ತವೆ.

Aantrashtriya Sangathan M.A. – Kolhan University Chaibasa, Jharkhand: अन्तर्राष्ट्रीय संगठन एम. ए. – कोल्हान विश्वविद्यालय चाईबासा, झारखंड

by Surendra Sinhal

अन्तर्राष्ट्रीय संगठन कक्षा एम. ए. यह पुस्तक लक्ष्मी नारायण अग्रवाल ने हिंदी भाषा मे प्रकाशित किया है, इस पाठपुस्तक में नवीन परीक्षा प्रणाली को दृष्टि में रखकर प्रश्नों को स्थान दिया गया है और पुस्तक को लिखते समय यह प्रयास किया गया है कि यह पुस्तक विद्यार्थियों के लिए सरल और पूर्णरूपेण उपयोगी बन सके । यह पुस्तक विभिन्न विश्वविद्यालयों के राजनीतिशास्त्र के नवीन पाठ्यक्रमानुसार तैयार की गई है ।

IT Planet Petabyte Class 8

by PM Publishers Pvt. Ltd.

The Petabyte book is based on the latest software packages and operating system programs such as Microsoft Office 2019 and Windows 10. Apart from these two, author has covered latest software programs such as Scratch, Stykz, Animate, Photoshop, Spark, MIT App Inventor and Python. To produce a visually appealing and easy to understand book, the author has artfully combined the latest technology, pictures, drawings and text in this series. Most of the pictures in this series show a step-by-step pedagogy, which simplifies the more complex computer concepts. The terms and examples described in this series are those which everyone will come across while using computers in school as well as at home.

Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awari

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.

Samajshastrachi Olakh FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vijay M. Jadhav

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाच्या सुरूवातीला समाजशास्त्र या विषयाची मूलभूत माहिती, समाजशास्त्रांतर्गत येणारे अभ्यासविषय त्याचप्रमाणे समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्रातील विविध क्षेत्रे, समाजशास्त्रातील रोजगारविषयक संधी याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात समाज त्याचा अर्थ, व्याख्या, समाजाची वैशिष्ट्ये, समाजाचे स्थल-कालानुसार बदलत गेलेले प्रकार, त्याचप्रमाणे समूह, समूहाची संकल्पना, सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये, समूहाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच समुदाय आणि सोशल नेटवर्किंग या संकल्पनांची देखील चर्चा प्रस्तुत प्रकरणात केली आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात संस्कृती, संस्कृतीचे प्रकार यांची देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक स्तरीकरण, स्तरीकरणाची वैशिष्ट्ये, स्तरीकरणाचे आधार, सामाजिक अपवर्जन, सामाजिक असमानता यांची देखील विस्तृत आणि तपशीलवार चर्चा प्रस्तुत प्रकरणात करण्यात आली आहे.

Prakrutik Bhugol Paper 1 FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक पद्धती व सेमिस्टर पद्धती जून 2019 पासून प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लागू केल्या आहेत. तसेच प्राकृतिक भूगोल हा पेपर भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची शाखा असून प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र व सागरशास्त्र अशा अनेक शाखांचा समावेश केला गेला आहे. पुस्तकातील पहिल्या प्रकरणात प्राकृतिक भूगोल परिभाषा, प्राकृतिक भूगोल स्वरूप आणि व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा व पृथ्वीप्रणालीबद्दल परिचय अत्यंत सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक मांडल्याने अभ्यासकांना विविध संकल्पना समजण्यास त्याचा फायदा होईल. पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मृदावरण अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग, वेगनरचा भूखंडवहन सिद्धान्त व डेव्हिसची खननचक्र संकल्पना समाविष्ट केली आहे. पुस्तकातील तिसऱ्या वातावरण या प्रकरणात वातावरणाची रचना, उष्णतेचा ताळेबंद, वायुभार पट्टे व वाऱ्याची प्रणाली आणि दृष्टीची रूपे व प्रकार असे घटक घेतले आहेत. पुस्तकातील चौथ्या जलावरण या प्रकरणात जलचक्र, महासागराचे सामान्य स्वरूप, सागरी लाटा व लहरी आणि क्षेत्रभेट (अभ्यास) असे घटक घेतल्याने सागरशास्त्राचा महत्त्वपूर्ण भाग समाविष्ट केलेला दिसून येतो. क्षेत्रभेट (अभ्यास) व क्षेत्रभेटीमुळे विषयाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Bhartiya Sanvidhanacha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Dr Minal Kshirsagar

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर-1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधान परिचय सत्र-1 पुस्तक आहे. भारतीय संविधान परिचय यावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सदर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे कार्य, भारतीय संविधानाची प्रस्तावना व त्यातील महत्त्वाची तत्त्वे यांची ओळख, भारतीय संविधानाची वैशिष्टये, मूलभूत अधिकार त्यांची तरतूद व मानवी हक्कांविषयी तोंडओळख होण्याबरोबरच मूलभूत कर्तव्ये व राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे प्राथमिक पातळीवर शिकणार आहोत. राज्या राज्यांमध्ये होणारे विविध संघर्ष, भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे बदल समजण्यासाठी तसेच भारतीय संघराज्याचे स्वरूप, वैशिष्टय त्याचबरोबर संविधान सुधारणांची संविधानामधील तरतूद, संविधान सुधारणा पद्धती, भारतीय संविधानातील मोठ्या संविधान सुधारणा व संविधानाची मूलभूत संरचना या नवीन प्रकरणांची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेणार आहोत.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagar

प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.

Samajshastracha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Prof. Dr. Sudhir Yevale

समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. सेठ/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्द्यांना या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कुटुंब, नातेसंबंध याचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा प्रयत्नही झाला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांना आकलन होईल अशा सोप्या व सरळ भाषेत हा अभ्यासक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वापरले जाणारे पर्यायी शब्दही दिले आहेत.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat Pragaitihasik Kaal Te Mauryakal FYBA First Semester - SPPU: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.

Prakrutik Bhugol FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी.च्या सूचनेनुसार जून 2019 पासून सेमिस्टर 1 करिता 'प्राकृतिक भूगोल' (Physical Geography) या भूगोलाच्या मूलभूत शाखेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा आखलेला आहे. प्राकृतिक भूगोल शाखेचा मुख्य उद्देश असा की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा परिचय आणि संलग्नित आव्हानाची ओळख होईल, त्यांना प्राकृतिक भूगोलातील जागतिक स्तरावरील सद्य घडामोडीसंबंधी जाणीव होईल. विशेषतः प्राकृतिक भूगोलामधील शिलावरण, वातावरण व जलावरणासारख्या आवरणावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

F.Y.B.A. Farajiyat Vishay Gujrati GUJ-COM Bhag 1 - BAOU: પ્રથમ વર્ષ બી.એ. ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ ૧

by Babasaheb Ambedkar Open University

આ પુસ્તકમાંની અભ્યાસ-સામગ્રી મૂળે મધ્યપ્રદેશ ભોજ ઓપન યુનિવર્સીટી, ભોપાલ દ્રારા તૈયાર કરવામાં આવી છે. જેમાં પ્રસ્તુત પુસ્તક પ્રથમ વર્ષ બી.એ.ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ 1નું છે.

F.Y.B.A. Farajiyat Vishay Gujrati GUJ-COM Bhag 2 - BAOU: પ્રથમ વર્ષ બી.એ. ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ ૨

by Babasaheb Ambedkar Open University

આ પુસ્તકમાંની અભ્યાસ-સામગ્રી મૂળે મધ્યપ્રદેશ ભોજ ઓપન યુનિવર્સીટી, ભોપાલ દ્રારા તૈયાર કરવામાં આવી છે. જેમાં પ્રસ્તુત પુસ્તક પ્રથમ વર્ષ બી.એ.ફરજિયાત વિષય ગુજરાતી ભાગ 2નું છે.

Samajik Sanstha Ani Badal FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि बदल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Vijay M. Jadhav

सामाजिक संस्था आणि बदल याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक सामाजिक मानसशास्त्रावर यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला विविध सामाजिक संस्था जसे की कुटुंब, नातेसंबंध, विवाह, राजतंत्र, अर्थव्यवस्था यांची सम्यक आणि मुद्देसूद चर्चा करण्यात आलेली असून समाज परिवर्तन आणि बदलत्या सामाजिक स्थितीनुसार त्यांच्यात झालेले बदल यांची देखील चर्चा विस्तृत स्वरूपात करण्यात आलेली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संस्थांचे मानवी जीवनातील आणि सामाजिक जीवनातील स्थान, महत्त्व इत्यादी स्पष्ट करण्यात आलेले आहे. धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे ही व्यक्तीच्या सामाजिक जीवनात महत्वाच्या भूमिका बजावून व्यक्तीच्या सामाजिक जीवनात ते मार्गदर्शन करतात, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे देण्यात आलेले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात सामाजिक बदल व या बदलांचे सहाय्यक घटक यांची सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून या प्रकरणात आधुनिकीकरणाचा विकास व जागतिकीकरण यांची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.

Manavi Bhugol FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. 'मानवी भूगोलाचा परिचय' या पहिल्या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा व त्यांचे महत्त्व यांचा आढावा घेतला आहे. 'लोकसंख्या' या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त व भारतीय लोकसंख्येची रचना अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच प्रकरण तीनमध्ये मानवी वसाहत, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, प्रारूप व आकृतिबंध तसेच भारतातील नागरीकरण व महाराष्ट्रातील नागरिकरणाचा समावेश केला आहे. याशिवाय शेवटच्या प्रकरणात कृषी, कृषीचे प्रकार, कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय कृषीच्या समस्या यांचा समावेश केलेला आहे.

Samajik Manasashastrachi Olakh FYBA Second Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे होते. या अभ्यास क्रमावर आधारित सामाजिक मानसशास्त्राची ओळख पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी खुपच उपयोगी ठरणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा बदल केला आहे तो म्हणजे दुसऱ्या सत्रात 'सामाजिक मानसशास्त्राची ओळख' या विषयाचा समावेश. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधील सामाजिक मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचे समाजनिष्ठ वर्तन समजून घेण्यासाठी तितकाच उपयुक्तसुद्धा आहे.

Samajik Sanstha Ani Parivartan FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि परिवर्तन एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Yevale Jyoti Suhas Gagangras

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता समाजशास्त्र विषयासाठी 'सामाजिक संस्था आणि परिवर्तन' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. सेमिस्टर (II) करिता या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. पुस्तक वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे निरसनही होईल. पुस्तकामध्ये नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Bhartiya Sanvidhanacha Parichay FYBA Second Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Prof. Haridas Arjun Jadhav

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर - 1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित 'भारतीय संविधानाचा परिचय' सत्र 2 हे पुस्तक आहे. भारतीय संविधानाचा परिचय या पुस्तकाच्या प्रकरण 1 मध्ये 'भारताचे कायदेमंडळ' म्हणजे संसद, त्याची संरचना, कायदेमंडळाचे अधिकार व कार्ये, राज्याचे विधानमंडळ, त्याची संरचना, अधिकार व कार्य तसेच संसद व विधानमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता, अपात्रता इ. प्रकरण 2 मध्ये ‘कार्यकारी मंडळ’ यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, भारताचा महान्यायवादी यांच्या नियुक्ती, कार्यकाळ, पदावनती अधिकार व कार्य तसेच घटकराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद व राज्याच्या महाधिवक्ता तसेच यांची नियुक्ती कार्यकाळ, पदावनती, कार्य व अधिकार हे पाहणार आहोत. प्रकरण 3 मध्ये 'न्यायव्यवस्था' यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची स्थापना, संरचना, न्यायाधिशांची नियुक्ती, पात्रता, शपथ, पदावनती/महाभियोग प्रक्रिया , सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे अधिकार व कार्ये, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन सक्रियता या संकल्पना पाहणार आहोत. प्रकरण 4 मध्ये 'निवडणूक व्यवस्था' यामध्ये निवडणूक आयोग त्याची निर्मिती, कार्य आणि भूमिका तसेच मुख्य निवडणूक आयुक्त व सध्या कळीचा मुद्दा/विषय असणारे निवडणूक सुधारणा या नवीन प्रकरणांची ओळख करून देणार आहोत.

Refine Search

Showing 36,001 through 36,025 of 36,194 results