Browse Results

Showing 101 through 125 of 1,431 results

Kotawalala Ghadali Addal

by Milind Vatave

This a story of birds. birds were lived together at mango farm. one visitor bird came and save from crow. all birds called him security guard. soon he feels proud. At the end, all birds teach him a good lesson.

Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 1: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय खंड १

by Prabodhankar Thakare

प्रबोधनकार ठाकरे यांनी सत्यशोधक चळवळीच्या विचारांच्या प्रसारासाठी ‘प्रबोधन’ हे नियतकालिका प्रकाशित व संपादित केले. त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना मिळाली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील आठवणी ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातून सांगितल्या आहेत. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनकारांच्या रोखठोक, रांगड्या व भडक भाषेचा अनुभव यातून मिळतो. त्या काळच्या सामाजिक पद्धती, रूढींना विरोध करण्याची धमक ते दाखवत असत. त्यांची आजी ‘बय’ ही बेडर अन् बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. प्रबोधनकारांचे वर्तनही तसेच असे, याचे दाखले या आठवणींतून मिळतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचत असल्याने आपली स्मरणशक्ती तेज झाल्याचेही ते नमूद करतात. प्रबोधनकारांचा जन्म, गाव, आडनाव, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक स्थिती, त्यांचे स्वतःचे छंद, नोकरी-व्यवसाय, नाट्य कारकीर्द यांची माहिती या पुस्तकातून मिळते. त्या काळच्या सामाजिक, राजकीय स्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे व त्यांचा त्यातील सहभाग, भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Asi Hi Mule

by K. Narakhede

Story about different small children's habbits... in marathi

Bhai Madhavraoji Bagal Nivdak Lekhsangrah: भाई माधवरावजी बागल निवडक लेखसंग्रह

by Prof. M.G. Mali Prof. R.K. Kanbarkar Dr Nirmalkumar Fadkule Prof. Ramesh Jadhav Shri. N.D. Mahanor Shri. Arjunrao Dangle Shri. Baburao Dharwade

सर्वव्यापी भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आजच्या सार्वजनिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर, स्वतःच्या संसाराची होळी करून समाजसेवेचा एक मानदंड ठरलेल्या भाई माधवराव बागल यांचे जीवन हे केवळ आजच्या नव्हे तर उद्याच्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल. म्हणूनच त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणाऱ्या “निवडक माधवराव बागल” या ग्रंथाचे प्रयोजन. माधवरावांच्या जीवनपाटचे पाच कालखंड पडतात. (१) बालपण व १९२५ ते ३० पर्यंतचा कालखंड, (२) १९३० ते १९४९ ला संस्थान विलीन होईपर्यंतचा, प्रजा परिषदेच्या लढ्याचा कालखंड, (३) १९५० ते १९५९ पर्यंतचा संस्थानाबाहेरील राजकारणाचा, शे. का. पक्ष प्रवेश व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा कालखंड, (४) संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंतचा काँग्रेसशी सहकार्याचा कालखंड, (५) १९७५ नंतर मृत्यूपर्यंत निवृत्त जीवनाचा कालखंड.

Cherry Land Makar Sankrat

by Lata Guthe

A story of Makar sankrant. A hindu festival in India in marathi.

Chimani Ani Sasa

by Damodar Viththal Phaphe

This story is a rabbit and a bird. Both were fighting for the house. cat took advantage of it.

Chintuchi Karamat

by Raja Mangalvedhekar

This a story of chintu. he was a very naughty boy. one day chintu put up shaving foam on his own face then problem start.

Chukat kon Nahi Ashi Asate Maitri

by Kumudini Ballal

Story of two friends had same name Ram, they also had similar features in marathi.

Lokshahir Anna Bhau Sathe Nivadak Wangmay: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय

by Vasundhara Pendse-Naik

प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात वा लिंगभेद ह्यांची कुंपणे नसतात. ती स्फुरते कुणाही सहृदयाला, अनुभूतिपूत अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचे आजच्या औपचारिक शिक्षणावाचून तरी कुठे अडते? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. शाहीर अण्णा भाऊ साठे हे वरील निकषांचे जागते उदाहरण होय. ते जसे जगले, त्याला जागले. ते लिहायला लागले आणि लिहीतच राहिले. साहित्यात त्यांनी आपले आगळे स्थान मिळवले. अण्णा भाऊंचे सगळेच साहित्य मोलाचे. जीवनाला उपयोगाचे. नव्या पिढीला प्रेरक ठरायचे. पण प्रचंड व्यासाचे. बरे ते इतर प्रकाशकांनी पुनःपुन्हा जनतेसमोर आणलेले. म्हणूनच अण्णा भाऊंचे आगळेपण सिद्ध करणारे निवडक साहित्य व त्याबाबतचे काही विचक्षण आलेख महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Mini Ani Chani

by Alaka Patil

This a story of Meenu and Chani. Meenu saw the squirrel in the back garden of the home. soon they both became friends. one day meenu went to uncle home and squirrel also came along with her. after some time squirrel wants to go back. meenu have sweet memories of the squirrel.

Moravala: मोरावळा

by Shivaji Sawant

हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!

Thokalyache Chitr

by Y. G. Joshi

This a story of school boy . Teacher gives a assignment of painting . A boy who painted a picture other than the subject given. Read a story what happens next.

Uttarkalin Mughal Khand 2: उत्तरकालीन मुघल खंड २

by William Irwin

विल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.

Aai Viruddha Baai

by Shrikant Vishnu Bhosale

Life of a woman who lost her husband. she had a son, she fell in love with a man. the total family did not get along but this woman played the role of a mother of a son as well as a role of a woman to a man in marathi.

Abbaji Gokhale Ek Anandyatri: आबाजी गोखले एक आनंदयात्री

by Sau. Swamini Vikram Savarkar

श्री. पांडुरंग बळवंत उपाख्य आबाजी गोखले हे नागपूरच्या सार्वजनिक जीवनातील, एक विख्यात व्यक्तिमत्व होते. नाग-विदर्भात ते नर्मदा परिक्रमावासी पदयात्री म्हणून ओळखले जात. कारण त्यांनी श्री नर्मदा नदीची अत्यंत अवघड अशी परिक्रमा, अल्पकाळात पूर्ण केली. केवळ नर्मदा परिक्रमाच नव्हे, तर सर्व भारतभर त्यांनी पद भ्रमण केले. एका व्यक्तिने वर्षानुवर्षे कोणताही राजकीय हेतु किंवा आर्थिक अभिलाषा न बाळगता हजारो मैलांचा प्रवास, लोकनिरीक्षण, निसर्गाशी नाते जोडणे आणि या देशातील दुर्गम आदिवासी जनतेची ओळख करुन घेण्यासाठी करणे, हे क्वचित आढळणारे उदाहरण आहे. पर्यटनातील त्यांच्या विविध अनुभवांचा लाभ मराठी वाचकांना व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आबाजींचे व्यक्तिमत्व व त्यांचे अनुभव हे पुस्तकरूपाने आले तर ते वाचकांना उपयुक्त होईलच पण मराठी साहित्यालाही एक वेगळा आयाम मिळेल. आबाजींच्या व्यक्तिमत्वाचे लेखन आणि त्यांनी केलेल्या शब्दांकनांचे आवश्यक ते संपादन करुन हे पुस्तक तयार केलेले आहे.

Agarkar Vangamay Khand 1 - Novel: आगरकर-वाङ्मय खंड १ - कादंबरी

by M. G. Natu D. Y. Deshpande

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

Anakhi Shikari

by T. T. Sawant

This a story of hunter and lion. cub become a prisoner by hunter. read a story what happens next.

Anakhi Shikari

by T. T. Sawant

This a story of hunter and lion. cub become a prisoner by hunter. read a story what happens next.

Bagala Ani Masa

by Damodar Viththal Phaphe

In this story, Stork thinks, How to raise a lot of fish from a lake. but how the crab fight with Stork for his life. read story what happens.

Balpanichya Athavani

by Palanki Venkata Ramachandramurti

balpanichya athavani is a story of the dacoit. He was big dacoit of that time. he gets trapped and he got the punishment of death.at the last moment when jailor asks him to remembered god's name or someone who equally important for him. he remembered his childhood memories with his mother.

Cherry Land Julie

by Sarasvati Datar

Story of a small girl who came across a cat in her house. she name her Julie in marathi.

Cherry Land Supriyachi Katha

by Madhavi Kunte

A girl named Supriya who belonged to a rich family but was very humble and cared for poor and helpless people. Gautam Buddha was very happy too see that see had learned something from him in marathi.

Dr. Babasaheb Ambedkar Gauravgranth: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ

by Daya Pawar

क्रियाशील नेता थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलित साहित्याचा प्रेरणास्त्रोत असे ज्यांचे वर्णन केले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत मातेचे थोर सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कृतिशील अभिवादन करावे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक गौरवग्रंथ प्रसिद्ध करण्याचे ठरविले आणि त्यानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्या गौरवग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण परिचय घडावा म्हणून, महाराष्ट्रातील आणि बाहेरीलसुद्धा अनेक अभ्यासकांनी विनंतीला प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार, आर्थिक विचार, धार्मिक चिंतन आणि वाङ्मयीन विचार ह्यावरील वैशिष्ट्यपूर्ण लेख तर येथे आहेतच; पण त्याखेरीज बाबासाहेबांची लेखनशैली, विनोद, पत्रकारिता, दलित साहित्याचे प्रेरणास्त्रोत ह्यासुध्दा विषयांवर लेखन समाविष्ट केले आहे. राखीव जागेचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्वकाळातील दलित चळवळ, कामगार विषयक धोरण, स्वतंत्र मजूर पक्ष, शे. का. फेडरेशन, बाबासाहेबांचे समकालीन, बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार, इत्यादी विविध विषयांवरील लेखनाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानावर, नव्याने शोध घेण्याचे प्रयत्न येथे शब्दबद्ध केले आहेत.

Gharatyala Ganapatichi Sond

by Milind Vatave

This is a story of the sparrow. sparrow lived with his wife. one cat has eaten all the eggs of the sparrow. sparrow got an idea and sparrow made a beautiful home in the shape of the trunk.

Gharatyala Ganapatichi Sond

by Milind Vatave

This is a story of the sparrow. sparrow lived with his wife. one cat has eaten all the eggs of the sparrow. sparrow got an idea and sparrow made a beautiful home in the shape of the trunk.

Refine Search

Showing 101 through 125 of 1,431 results