Browse Results

Showing 1,101 through 1,125 of 1,430 results

Boomrang Bhag-2: बूमरँग भाग-२

by Baba Kadam

मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग... तिचा हा दुसरा भाग... बूमरँग एक असे शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरीचा शेवटचा दुसरा भाग.

Aurangzebacha itihas: औरंगजेबाचा इतिहास

by Sir Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.

Sant Janabai: संत जनाबाई

by Dr Suhasini Yashwant Irlekar

नामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणाऱ्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या म्हणतात, त्या या जनाईच्याच! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या. समग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यांच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो!

Buddhi Prerana Va Kranti Bhag 2: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २

by B. R. Sunthankar

श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Swatantrya Sangramache Mahabharat: स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत

by G. P. Pradhan

इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.

Samajik Karar: सामाजिक करार

by Vasant Bhagwant Karnik

झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.

Uttarkalin Mughal Khand 2: उत्तरकालीन मुघल खंड २

by William Irwin

विल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.

Bhurtya: भुरट्या

by Amit Shinde

या कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.

Ek Hoti Begam: एक होती बेगम

by Baba Kadam

स्वातंत्रपूर्व कालखंड, राजे राजवाडे, जहागीरदार , जमीनदार हे सर्व जेव्हा अजूनही भारतात होते त्या कालखंडातील बाबा कदम लिखित एक अजरामर दीर्घ कादंबरी. नाट्य, रोमांच, कल्पकता आणि मंत्रमुग्ध करणारे बाबांचे लिखाण.

Lok Kavi Shahir Ramjoshi: लोककवी शाहीर रामजोशी

by Shirish Gandhe

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाशे पानाची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील “लोककवी शाहीर रामजोशी” हा तेविसावा चरित्रग्रंथ आहे. लोककवी शाहीर रामजोशी हा शाहिरांचा मुकूटमणी आहे आणि म्हणूनच “महाराष्ट्राचे शिल्पकार” या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेअंतर्गत या शाहिरावरचा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्यात मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रा. शिरीष गंधे यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन समरसून तर केलेले आहेच; पण त्याशिवाय चरित्रग्रंथासाठी रूढ असलेल्या लेखन पद्धतीचा अवलंब न करता कथात्मक लेखन पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रसंगाची मांडणीही अतिशय नाट्यपूर्ण रीतीने केलेली आहे. अर्थात अशा लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास चरित्रग्रंथात काही त्रुटी संभवतात; पण या ग्रंथात अशा त्रुटी अभावानाच आढळतात.

Aamcha Baap Aan Aamhi: आमचा बाप आन् आम्ही

by Dr Narendra Jadhav

ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी - त्याच्याच शब्दात - ग्रथित केल्या आहेत. हे गृहस्थ पिताजी नव्हते. वडीलही नव्हते. तर सरळ, निर्मळ 'बाप' होते. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते. दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नव्हता, अथवा त्यांच्या लढाऊ बाण्याला ढळ पोचला नव्हता. 'किसी को डरना मत' हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता, आणि तोच त्यांचा जीवनधर्म होता. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी ते प्रभावित झाले होते. त्यांनी जातीयतेची, लोकापवादाची, वरिष्ठांच्या अधिकारांची; आणि मुख्य म्हणजे दारिद्र्याचीही भीती कधी बाळगली नाही. त्यांचे जगणे काळोखावर मात करत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे होते. जिथे भयमुक्ती असते तेथे निरामय आनंदही असतो. सर्व प्रतिकुलावर मात करणाऱ्या अशा आनंदाची पेरणी आपल्या सुदाम्याच्या संसारात करीत ते जगत होते आणि सर्वांना जगवत होते. या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती. गोष्ट लहान असो वा मोठी, माणसाने खाटे-अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते. म्हणून त्यांनी लोकलमधून विनातिकिट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून पकडले आणि त्याला तिकिट काढायला लावले. अशा वातावरणात आणि संस्कारात, त्यांनी आपल्या मुलांना वाढवले. असा बाप मिळणे हे मुलांचे सद्भाग्य आणि अशी मुले मिळणे हे बापाचेही सद्भाग्य. सामाजिक सोपानाच्या अंतिम पायरीवर जन्मलेली मुले आज त्याच सोपानाच्या सर्वोच्च पायरीवर उभी आहेत. कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्यात सर्वोच्च यश मिळवा ह्या त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले आहे. त्यांनी अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्राला सांगितले होते, तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या सामान्य माणसाला झाला तर ते खरे, एरवी निरर्थक. असा हा बाप. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा, त्यांची मने घडवणारा. मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला, आणि तरीही खूप मोठा असलेला. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च पदावर असलेल्या त्याच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ही हृद्य श्रद्धांजली.

The Law Of Attraction - Aakarshanacha Niyam: द लॉ ऑफ अट्रॅक्शन: आकर्षणाचा नियम

by Esther and Jerry Hiks

या पुस्तकात अब्राहम यांच्या मूळ शिकवणुकीची शक्तिशाली पायाभूत तत्त्वं सांगितली आहेत. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वांत शक्तिशाली 'वैश्विक आकर्षणाच्या नियमा'च्या कार्यामुळे कशा घडतात, हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. "Like attracts like", "Birds of a feather flock together" किंवा "It is done unto you as you believe." अशी इंग्लिश वाक्यं आपण ऐकलेली असतात. थोडक्यात, 'सारख्याकडे सारखं ओढलं जातं.' हे आपल्याला माहीत असतं आणि या 'आकर्षणाच्या नियमाबद्दल' याआधी काही थोर विद्वानांनी ओझरतं लिहिलंही आहे. मात्र, ईस्थर आणि जेरी हिक्स या बेस्टसेलर लेखकद्वयींच्या या पुस्तकात हा नियम जितक्या स्पष्टपणे आणि प्रत्यक्षात अनुसरण करण्याजोग्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तितका तो याआधी कोणीही सांगितलेला नाही. या पुस्तकातून तुम्ही सार्वकालिक वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल. या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही अंगी बाणवून घेतलंत की, तुमच्या दैनंदिन जीवनातले अंदाज, शक्यता, भाकितं असे अनिश्चित प्रकार लुप्त होतील आणि अखेर आता तुम्हाला तुमच्या जीवनातील व तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी घडते याचं ज्ञान होईल. तुम्हाला मनापासून कराव्या वाटणाऱ्या गोष्टी आनंदानं करायला आणि मिळवायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.

Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू

by Rahul Shinde

या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.

Frankenstein: फ्रँकेन्स्टाइन

by Narayan Dharap

जनित्राचं चाक पिसाटासारखं गरगरत होतं. त्याच्या ठिणग्यांचा प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात मला त्या प्राण्याचा चेहरा दिसला. ओठ मागे गेले होते. आणि दात एका क्रूर हास्यात विचकले होते. तो चेहरा एका बेभान, हिंस्र पिसाट पशूचा होता! फाटक्या बँडेजमध्ये गुंडाळलेल्या त्या जाडजूड हाताचा माझ्या मानेभोवती विळखा पडला आणि एका हिसक्यासरशी मी प्रयोगशाळेत खेचला गेलो. केवढा दैवदुर्विलास! इतकी प्रगती झाल्यावर जे मी निर्माण केलं होतं त्याच्याच हातून माझा नाश व्हावा... निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा, एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी आणि त्या हाती मला मरण यावे...! कोण आहे हा बॅरेन फ्रँकेन्स्टाइन? प्रयोगशाळेत तो कसले प्रयोग करत होता? हिंस्र, पिसाट, राक्षसी मानवाचा त्याला कशामुळे सामना करावा लागला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

Zund: झुंड

by Dr Sharankumar Limbale

झुंड कादंबरी मध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ही कादंबरी मुळातच जात आणि मानवी संबंध यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर या कादंबरीत प्रकट झाले आहेत.

Grass: ग्रास

by Narayan Dharap

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं तरीही त्यांच्या `ग्रास' या पुस्तकातील तारणगावातील उत्तमचंदाचं पिशाचरूप कसं भंडावून सोडतं, कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला कसं गुंतवून ठेवायचं याची प्रचीती त्यांच्या रहस्यमय लेखनातून येते.

Dvait: द्वैत

by Narayan Dharap

खर सूर्यप्रकाशात दिसणार्या पावसाळ्यात धूक्याने आच्छादलेले शिखर आपल्याला खुणावतात. कारण धूक्याच्या आवरणामुळे त्यांना रहस्यमय बनवलेले असते. मानवी जडणघडण अशी असते की, त्याला नेहमीच अर्धवट दिसणार्या गोष्टींवरील पडदा उघडून त्यांचे गूढ जाणून घेण्याचा थरार अनुभवायचा असतो. हा नियम केवळ भौतिक जगतालाच लागू पडतो. असे नाही तर अगोदर, अपार्थिव जगातील गोष्टींबाबतही तितकाच लागू पडतो. मानवी मनाचे हे वैशिष्ट्य गेल्या शतकातील ख्यातमान लेखक श्री नारायण धारप यांनी अचूकपणे हेरले आणि उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय कथांचा मनोवेधक नजराणा वाचकाला भेट दिला. आपल्याला माहीत नसलेल्या अनुभवापलीकडच्या जगात काय असेल हे जाणून घेण्याच्या आपल्या उत्कट इच्छेला ते हळूवारपणे फुंकर घालून फुलवतात. त्यांच्या कथांमधून आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा घटना एकापाठोपाठ वेगाने घडू लागतात आणि आपला या जगाशी असलेला संबंध तात्पुरता तुटतो. आपण त्या काल्पनिक जगात इतके गुरफटले जातो की, पुस्तक पूर्ण वाचून बाजूला ठेवेपर्यंत एका अनोख्या विश्वाचा भाग बनून जातो. धारपांच्या द्वैत या कादंबरीतील ठेंगू खलनायक अशीच वाचकांची उत्कंठा वाढवत जातो. कादंबरीतील विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण घटनाक्रमांचे विविध पैलू दिसत जातात. पाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत, ॲजबस्ट्रॅक्ट आहेत; पण पापी स्वभाव ही गोष्ट खरी आहे, कारण ती एक घटना आहे. त्यामागे माणसाचा स्वभाव आहे आणि किंवा नसेलही; पण निसर्ग मात्र माणसाचा स्वभाव अवश्य कोरून ठेवतो आणि तोही कपाळासारख्या अशा एखाददुसर्या ठिकाणी नाही, तर शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा साचा उठवलेला असतो. क्रोमोसोमच्या रंगसूत्राची शृंखला आणि त्यातले जीन्सचे दुवे - त्यांच्यातच हे रहस्य दडलेले असते.

Badlat Geleli Sahi FYBA - SPPU: बदलत गेलेली सही एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Anjali Kulkarni

सही म्हणजे स्वओळख. 'बदलत गेलेली सही' हा कवितासंग्रह म्हणजे माणसांच्या, हरवत चाललेल्या स्वओळखीच्या शोधाचा प्रवास. एका बाजूला माणसांच्या जगण्याभोवती गरगरणारा आधुनिक काळातला, जागतिकीकरण, संगणकीकरण, युद्धखोरी आणि बाजारीकरणाचा भोवरा, त्यात हरवून गेलेली माणसाची व्यक्तीविशिष्टता, ऐहिक लोलुपतेच्या एकाच साच्यातून जगणाऱ्या माणसांचे यांत्रिकीकरण, त्याचे ताणतणाव आणि दुसऱ्या बाजूला यासकट आणि याशिवाय पुरुषी सनातनत्वाचे चटके-फटके सोसणारी, तरीही स्वतःची ओळख शोधू-जपू मागणारी स्त्री. नात्यांचे ताणतणाव पेलणारी सारं जग एका थक्क करणाऱ्या ऐहिक विकासाच्या परमोच्च बिंदूवर गतीमानतेनं पोचत असताना, जुन्याच परिघावर अडखळून उभी असलेली. अद्याप चेहराच न मिळालेली. अंजली कुलकर्णी यांनी या आधुनिक काळात वावरणाऱ्या माणसांच्या आणि विशेषकरून स्त्रीच्या दुखःची दुखरी नस नेमकेपणानं पकडली आहे. एकाच वेळी एकतानता आणि आलीप्तता, खोल विचारशीलता आणि उत्कट भावनाशीलता यांनी या कवितेच्या पैठणीवस्त्राला झळझळीत फिरता रंग बहाल केला आहे.

Marathi Aksharbharati class 10 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘अक्षरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे. आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठांमध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्गवर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी, यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

Tanjavarche Marathe Raje: तंजातंजावरचे मराठे राजेवरचे मराठे राजे

by Vinayak Sadashiv Vakaskar

मद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनी हे पुस्तक संशोधनपूर्वक लिहिले असल्याचे श्रीयुत अयंगार या प्रख्यात इतिहासतज्ञांनी आपल्या उपोद्घातात स्पष्ट म्हटलेच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असताना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणी घातली आहे. त्या मुळे हे पुस्तक आतापर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपाने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेत खोदविलेला आहे. त्याचे सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रड्मण्य यांना न मिळाल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेत लिहिलेच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुद्दाम परिशिष्टात दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य ते साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभी दिलाच आहे.

Revolution 2020: रिव्होल्यूशन २०२०

by Chetan Bhagat

भारताच्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरूण होते. एकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी. पण एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं. ’रिव्होल्यूशन २०२०’ ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवायचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल ’सिस्टम’ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो? चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ’फाईव्ह पॉईंट समवन’, ’वन नाईट द कॉल सेंटर’, ’द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ’टू स्टेटस’ नंतर ची ‘रिव्होल्यूशन २०२०’ ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का?

The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी

by Leo Tolstoy

लिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Grafalco Marathi class 7 - CBSE Board: ग्राफाल्को मराठी इयत्ता सातवी - सीबीएसई बोर्ड

by Grafalco

ग्राफाल्को मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता ७वी - मराठी भाषेची हसतखेळत, सहजगत्या ओळख करून देणारी व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या राज्यभाषेविषयी आवड निर्माण करणारी अशी पुस्तकमालिका आहे. महाराष्ट्रातील आय.सी.एस.ई व सी.बी.एस.ई. शाळांतील विद्यार्थ्यांना या पुस्तकातून मराठी भाषेची सुलभ पद्धतीने अक्षरओळख होईल. पुस्तकामध्ये आकर्षक चित्रे व सुरेख मांडणी, विविधांगी विषयांवर आधारित समाजभान विकासात्मक तसेच उद्बोधक व मनोरंजक कथा, कवितांचा समावेश, भाषाज्ञान व व्याकरणाचे सहजसोपे विश्लेषण आणि प्रत्येक गद्य व पद्य पाठांवर आधारित उजळणी व अभ्यास. त्याचबरोबर मराठी साहित्य व व्याकरणाचा सुयोग्य पद्धतीने अभ्यास करून या भाषेचा दैनंदिन जीवनात उत्तम वापर करता यावा, भाषेचा आनंद लुटता यावा, यासाठी हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरतील.

Grafalco Marathi Class 8 - CBSE Board: ग्राफाल्को मराठी इयत्ता आठवी - सीबीएसई बोर्ड

by Grafalco

ग्राफाल्को मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता ८वी - मराठी भाषेची हसतखेळत, सहजगत्या ओळख करून देणारी व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या राज्यभाषेविषयी आवड निर्माण करणारी अशी पुस्तकमालिका आहे. महाराष्ट्रातील आय.सी.एस.ई व सी.बी.एस.ई. शाळांतील विद्यार्थ्यांना या पुस्तकातून मराठी भाषेची सुलभ पद्धतीने अक्षरओळख होईल. पुस्तकामध्ये आकर्षक चित्रे व सुरेख मांडणी, विविधांगी विषयांवर आधारित समाजभान विकासात्मक तसेच उद्बोधक व मनोरंजक कथा, कवितांचा समावेश, भाषाज्ञान व व्याकरणाचे सहजसोपे विश्लेषण आणि प्रत्येक गद्य व पद्य पाठांवर आधारित उजळणी व अभ्यास. त्याचबरोबर मराठी साहित्य व व्याकरणाचा सुयोग्य पद्धतीने अभ्यास करून या भाषेचा दैनंदिन जीवनात उत्तम वापर करता यावा, भाषेचा आनंद लुटता यावा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Basics Of Academic English 1 Foundation Course - RTMNU

by Deeptha Achar Rajan Barett Santosh Dash Charul Jain Sachin Ketkar Aarati Mujumdar

Basics of Academic English 1 has been written bearing in mind the need for comprehensive textbooks that fulfil the requirements of the Foundation Course in English under the Choice Based Credit System (CBCS) introduced for undergraduate students of arts, commerce and science in Gujarat. This is a skills-based book for students of semester 3, and it aims to build on the knowledge acquired in semesters 1 and 2. The aim is to develop the communication skills required in academic situations through practice exercises and activities done by students rather than only through what is taught by the teacher. Many of the themes, contexts and sample texts in the lessons are drawn from everyday life. This allows students to adapt, consolidate and actively make use of what they learn outside the classroom.

Refine Search

Showing 1,101 through 1,125 of 1,430 results