Browse Results

Showing 126 through 150 of 1,567 results

Boomrang Bhag-2: बूमरँग भाग-२

by Baba Kadam

मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग... तिचा हा दुसरा भाग... बूमरँग एक असे शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरीचा शेवटचा दुसरा भाग.

Ek Hoti Begam: एक होती बेगम

by Baba Kadam

स्वातंत्रपूर्व कालखंड, राजे राजवाडे, जहागीरदार , जमीनदार हे सर्व जेव्हा अजूनही भारतात होते त्या कालखंडातील बाबा कदम लिखित एक अजरामर दीर्घ कादंबरी. नाट्य, रोमांच, कल्पकता आणि मंत्रमुग्ध करणारे बाबांचे लिखाण.

Marsi: मर्सी

by Baba Kadam

“बाबा कदम” द्वारा लिखित “मर्सी” एक अत्यंत प्रभावशाली कादंबरी आहे जी समाजातील विविध समस्यांना आणि मानवी भावनांना गहिरा न्याय देते. या कादंबरीत, लेखकाने सामाजिक आणि मानवी स्थितीवर विचार करत, एकाच पात्राच्या दृष्टिकोनातून जगण्याच्या संघर्षांची आणि आपल्या समाजातील असमानतेची गहन तपासणी केली आहे. “मर्सी” या कादंबरीचा मुख्य नायक एक साधा, पण बुद्धिमान व्यक्ती आहे, जो आपल्या समाजातल्या विषमता, अन्याय, आणि असमानतेच्या समस्यांशी लढा देत आहे. कादंबरीत, नायकाच्या जीवनातील विविध अडचणी, संघर्ष, आणि त्याची समाजातील सुसंगतीसाठी केलेली मेहनत अतिशय प्रभावीपणे दर्शवली आहे. लेखकाने पात्रांच्या मनोवृत्ती आणि सामाजिक परिस्थितीचे अचूक चित्रण केले आहे, ज्यामुळे वाचकांना त्या पात्रांच्या आयुष्याची गोडी लागते. कादंबरीतील घटनांची आणि पात्रांची गहन व अप्रतिम कथा वाचकांना मनोवैज्ञानिक आणि भावनिक दृष्टिकोनातून एक अनोखा अनुभव प्रदान करते. “मर्सी” हे पुस्तक वाचनानंतर वाचक समाजातील विविध समस्यांवर विचार करायला आणि त्यांच्या जीवनातील अडचणींवर उपाय शोधायला प्रवृत्त होते. कादंबरीतील तत्त्वज्ञान आणि कथा वाचन अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे.

Reward: रिवार्ड

by Baba Kadam

मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.

Shobha: शोभा

by Baba Kadam

शोभा कादंबरी ही समाजातील दुर्लक्षित महिलांच्या जीवनातील वास्तव आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांची मार्मिक मांडणी करते. चांदोर गावातील कुंभार गल्लीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा, मानवी भावना, संघर्ष आणि स्वाभिमानाची कथा सांगते. पोलिस निरीक्षक फडतरे यांच्या येण्याने गावात अस्वस्थता पसरते. त्यांच्या अनुचित मागण्या आणि वागणूक या महिला समुदायावर अन्याय आणि शोषणाचा अनुभव आणतात. या परिस्थितीत शोभा नावाची महिला तिच्या निर्भीड स्वभावामुळे उठून दिसते. तिचा संघर्ष, आत्मसन्मानासाठी उभारलेला आवाज, आणि अन्यायाविरुद्ध दिलेली लढाई कथा प्रगल्भ करते. शोभाच्या दृढ मनोबलाने न्याय व्यवस्थेसमोर खऱ्या मूल्यांची साक्ष ठरते. ही कादंबरी संवेदनशीलतेने मानवी नात्यांचा वेध घेत, वाचकांना अंतर्मुख करते आणि समाजातील वास्तवाचा वेध घेण्यास प्रवृत्त करते.

Pandit Nehrunchya Chan Chan Gosti

by Baburav Shinde

Pandit Nehru was born on 14th November 1889. He liked horse riding. His father was an advocate and he earned a lot of money. They stayed in a big mansion. He was influenced by politics and he became the first Prime Minister of India after freedom. He died of depression of 27th may 1964. He was also known as Chacha Nehru. Children’s day is celebrated in his Honor in India.

Dev Chhe! Pargrahavaril Antaralveer!: देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!

by Bal Bhagavat

विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले.आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत.पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणाNया दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात.

Mahaparv: महापर्व

by Bal Samant

“महापर्व” हा संपादित ग्रंथ म्हणजे या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मवृत्तातील निवडक उतारे. या आत्मवृत्तामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महाराष्ट्राची कर्तबगारी असामान्य आणि अमोल अशी आहे. या स्वातंत्र्य चळवळीचे बीजारोपण महाराष्ट्रातच झाले आणि लो.टिळकांच्या रूपाने या चळवळीला एका विलक्षण झंझावाताचे स्वरूप प्राप्त झाले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्‌ध हक्क आहे,” हा स्वातंत्र्याचा महामंत्र काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र दुमदुमला. लो. टिळकांच्या, महात्मा गांधींच्या पावलांचा मागोवा घेत या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात महाराष्ट्रानेही आपली आहुति दिली. या स्वातंत्र्य युद्‌धात भाग घेतलेल्या लहान थोर स्वातंत्र्यसेनानींनी आपली आत्मवृत्ते आणि आठवणी लिहून ठेवल्या आहेत. या काळात महाराष्ट्रातील स्वातंत्र्याच्या चळवळीने झपाटून गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे हृद्‌गतच वाचकांना पानोपानी गवसते. ‘महापर्व’ हा संपादित ग्रंथ असाच तोलामोलाचा आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या प्रमुख स्वातंत्र्य-सेनानीचे हे हितगुज आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे.

Dalit Sahitya Ek Aakalan TYBA Third Semester - RTMNU: दलित साहित्य: एक आकलन बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Balkrushna Kavathekar

प्रस्तुत दलित साहित्य एक आकलन पुस्तक म्हणजे दलित साहित्याचा इतिहास नव्हे. विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या सर्वच्या सर्व दलित साहित्यकृतींचा आढावा घेणे, हेही या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. दलित साहित्यिकांनी आणि साहित्यविशमर्शकांनी दलित साहित्यविषयी मांडलेल्या विविध भूमिकांचा परामर्श घेऊन त्याविषयी आपली भूमिका मांडणे आणि तिच्या अनुषंगाने प्रमुख दलित साहित्यिकांनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार करणे हे पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. फार पूर्वीपासून दलित लेखक साहित्यनिर्मिती करीत आलेले असले तरी दलित साहित्य या संज्ञेचा वापर आणि दलित साहित्याची चळवळ यांची सुरुवात मात्र १९६० नंतरच झाली असे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जागृत झालेल्या दलित आत्मभानाने केलेल्या लेखनातूनच दलित साहित्याच्या चळवळीचा प्रारंभ झाला. ज्यांच्या साहित्यनिर्मितीमुळे ही चळवळ सुरू झाली, प्रतिष्ठा पावली आणि या चळवळीमुळेच जे लेखनाला प्रवृत्त झाले. अशा काही लक्षणीय दलित साहित्यिकांच्या साहित्यनिर्मितीचाच विचार या पुस्तकात केला आहे.

Aaich Aaikav

by Bha. M. Vaidya

This a story of mice. One old woman was lived in the hut. mice and four baby mice were lived near the hut. The old woman was upset with mice. One day she keeps a cage inside the hut. mice were stuck in the cage. read story what happens next.

Bhitara Sasa

by Bha. M. Vaidya

There was one Coward rabbit in the jungle. One day cloud comes together in the sky and loudly made a sound. rabbit scared and he very attempts to close the eyes but he didn't.

Chiu Ni Kau

by Bha. M. Vaidya

This a story the crow and the bird. crow lost his home in heavy rainfall flood. bird has been welcome to crow at home. Bird had cooked food and the crow has been finished the food alone and the bird was angry on crow. bird taught him the lesson.

Gadhavacha Gondhal

by Bha. M. Vaidya

One day an elephant started declaring that he is the king of the jungle. Lion and the tiger also started doing the same thing. The elephant shouted on top of his voice proclaiming himself to be the king. The donkey started laughing and dancing and kicking in random direction. Finally, nobody could decide who the king was.

Kavala Ni Bagala

by Bha. M. Vaidya

This a story of a crow and a stork. stork was the big liar. one day crow asked him how I would become white? stork was suggested him rub the soap over on body. At last, nothing happens crow got a pained.

Shabas Chiutai

by Bha. M. Vaidya

This is the story of the intelligent sparrow. One day she was flying in the sky suddenly rainfall happens. She was got wet. Now she took a shelter at the tree. There was a dog plan to kill her. Read story what happens next.

Unidirmama Ni Raja

by Bha. M. Vaidya

A story of naughty the mouse. One day he made fun with the king and run away from the place.

Madhucha Sobati

by Bhaa. M. Vaidya

This a story of small boy Madhu. He lived in Mumbai with parents. In school vacation, he went to uncles house. He saw the cat, cow, and other animals, he enjoyed the lot over theirs.

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Zool: झूल

by Bhalchandra Nemade

ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो. एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला मिळते. झूलचा आरंभ नामदेव भोळे आणि चांगदेव पाटील यांच्या आकस्मिक भेटीने होतो. भोळे ज्या कॉलेजात एक वर्षापूर्वी दाखल झालेला आहे, त्या कॉलेजात नव्याने रुजू होण्यासाठी चांगदेव निघालेला आहे. योगायोगाने दोघेही एकाच डब्यातून प्रवास करीत आहेत. दोघांचे जीवनविषयक दृष्टीकोण काहीसे भिन्न असले तरी वृत्तीत बरेच साम्य आहे. त्यामुळे त्यांची मैत्री जुळावयास वेळ लागत नाही. उभायतांतील मैत्रीचा हा धागा झूल कादंबरीच्या आरंभापासून अखेरपर्यंत सलगपणे प्रकट झाला आहे. बौद्धिक चर्चेसाठी प्रश्नांची उलटसुलट बाजू मांडण्यासाठी या उभयतांतील या मैत्रीचा लेखकाने भरपूर उपयोग करून घेतला आहे.

PSY 308 Prayogik Paddhati Sankhyiki Va Manasashastriya Prayog T.Y.B.A - Y.C.M.O.U

by S. V. Deshpande Bharat Desai Shobhana Abhyankar Bharat Devare Sau. Puranik Prof. Devare

PSY 308 Prayogik Paddhati Sankhyiki Va Manasashastriya Prayog Textbook for T.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Maharashtrache Shilpkar Nana Patil: महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील

by Bharat Patankar

"महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील" हे भारत पाटणकर लिखित पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे. नाना पाटील, ज्यांना "आझाद" म्हणुनही ओळखले जाते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. पुस्तकाची कथा त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना, त्यांच्या कार्याची तत्त्वे, आणि त्यांनी केलेल्या संघर्षांवर प्रकाश टाकते. विशेषत: १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या दरम्यान त्यांनी प्रतिनिधी सरकार (Parallel Government) स्थापन करण्याचे धाडस केले होते. या सरकारने ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करताना स्थानिक प्रशासन, न्यायव्यवस्था आणि शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले. पुस्तकात नाना पाटील यांच्या क्रांतिकारी विचारधारांची आणि त्यांच्या नेतृत्वाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या कार्याची महत्ता, त्यांनी अनुभवलेल्या अडचणी आणि त्यांनी केलेले त्याग यांची चर्चा या पुस्तकात केली आहे. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये जागरूकता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा कशी निर्माण केली, याचे वर्णनही पुस्तकात समाविष्ट आहे. या पुस्तकातून नाना पाटील यांची प्रेरणादायक जीवनकथा समजते आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्रता संग्रामातील त्यांच्या योगदानाची सखोल माहिती मिळते. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करताना, वाचकांना त्यांच्या धैर्य, संकल्प आणि नेतृत्वाचे दर्शन घडते.

Samira Kharedila Jate

by Bharati Jagannathan

समीरा आणि मूचकबरोबर खरेदीला चला!

PSY 217 Balsangopan Ani Balvikas S.Y.B.A - Y.C.M.O.U

by Sunita Kulkarni Mira Oak Bharti Goswami Sharad Kulkarni Jayashree Godse Sudha Kulkarni

PSY 217 Balsangopan Ani Balvikas text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

MAR102-2 Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A - Y.C.M.O.U.

by Vidyagauri Tilak Dilip Dhondge Bhaskar Shelke

MAR102-2 Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Ramayanavar Nava Prakash: रामायणावर नवा प्रकाश

by Bhaskarrao Vithojirao Jadhav

रामायण व महाभारत या काव्य ग्रंथांना भारताच्या सांस्कृतिक संचितामध्ये अनन्यसाधारण स्थान लाभले आहे. त्यातील व्यक्तीरेखांनी कोट्यवधी माणसाच्या मनावर इतकी मोहिनी घातली आहे की त्यांच्या दृष्टीने राम किंवा कृष्ण या केवळ ऐतिहासिक व्यक्ती राहिलेल्या नसून ती श्रद्धास्थाने बनली आहेत. सर्वसामान्य भारतीय त्यांना अवतारी पुरुष मानतो आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करतो. इंग्रजी राजवटीत पाश्चात्य पंडितांनी रामायण व महाभारत हे ग्रंथ होमरच्या इलियड व ऑडिसीवरून रुपांतरित केले असावेत असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. तेव्हा न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंगानी त्याचे सप्रमाण खंडन केले. तरीही रामायणाचे मूळ इजिप्तमध्ये असल्याचे मत मल्लादि वेंकटरत्नम यांच्यासारखे विद्वान पुढील काळातही व्यक्त करीत असताना दिसतात. रामायणासंबंधी पंडितांमध्ये चाललेल्या या वादात १९३४ ते १९३६ या काळात भास्करराव जाधवही हिरीरीने उतरले. रामायणासंबंधी भास्कररावांनी त्या काळात “ज्ञानमंदिर”, “महाराष्ट्र शारदा” या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठवले होते. “रामायणावर नवा प्रकाश” वाल्मीकी रामायणावरील संशोधनात्मक लेख या पुस्तकात त्याचे हे लेख एकत्रित करण्यात आले आहेत.

Refine Search

Showing 126 through 150 of 1,567 results