Browse Results

Showing 1,301 through 1,325 of 1,430 results

Svavlamban Hich Yashachi Pahili Payari

by Baba Bhand

This is a story of a boy name Ram. He was very lazy. Everyday morning he heard a school bell and he did not like it, because he had to get up and get ready for school. He was reluctant to do his own work and asked his mother to help him in everything.

Swaha: स्वाहा

by Narayan Dharap

‘‘सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट. मग खाली तपशील होता. गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.’’ श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

Swami: स्वामी

by Ranjeet Desai

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई: मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.

Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले

by Dr Hrishiskesh Pradeep Bodhe

स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…

Swargatil Nirop

by Shrimati Tara Chaudhari

Karim barber had tried to trick Birbal for his death through the orders of King, but Birbal had cleverly saved the own life.

Swatantrya Sangramache Mahabharat: स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत

by G. P. Pradhan

इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.

Swatantryache Bhay: स्वातंत्र्याचे भय

by Dr A. H. Salunkhe

प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका व्यापक अध्ययनाचा भाग आहे. हे अध्ययन आधुनिक मानवाच्या स्वभावरचनेशी निगडित आहे. तसेच, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय घटकांच्या परस्परांवर ज्या क्रियाप्रतिक्रिया होतात, त्यांमधून निर्माण होणाऱ्या समस्यांशीही हे अध्ययन निगडित आहे.

Swatantryakade Aagekooch

by Subhadra Sen Gupta

करोडो भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणार्या दांडीयात्रेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ही मुग्ध करणारी कथा लिहिली गेली आहे.

Swatantryottar Bharat (1947-1991) Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Swatantryottar Bharat 1947-1991 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७-१९९१) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने चौथे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Swavikas Va Kalarsaswad class 10 - Maharashtra Board: स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. स्व-विकास व कलारसास्वाद या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींशी आहे. पुस्तिकेची सुरुवात चित्रमय कथेतून केली आहे. चित्रातून पुढच्या प्रकरणात काय शिकणार आहोत याचा संदेश दिला आहे. या पाठ्यपुस्तकातून 'थोडी गंमत करू' व 'चर्चा करा' अशा अनेक कृतींतून हा विषय शिकणार आहात. पाठ्यपुस्तकात अनेक छोट्या छोट्या खेळांचा समावेश केलेला आहे. त्या खेळांतून तुम्ही बरेच काही शिकणार आहात. दिलेले उपक्रम, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी कृती स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करुन अध्ययन सुकर केले गेले आहे.

Swavikas Va Kalarsaswad class 9 - Maharashtra Board: स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

स्व-विकास व कलारसास्वाद इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. स्व-विकास व कलारसास्वाद या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींशी आहे. पुस्तिकेची सुरुवात चित्रमय कथेतून केली आहे. चित्रातून पुढच्या प्रकरणात काय शिकणार आहोत याचा संदेश दिला आहे. या पाठ्यपुस्तकातून 'थोडी गंमत करू' व 'चर्चा करा' अशा अनेक कृतींतून हा विषय शिकणार आहात. पाठ्यपुस्तकात अनेक छोट्या छोट्या खेळांचा समावेश केलेला आहे. त्या खेळांतून तुम्ही बरेच काही शिकणार आहात. दिलेले उपक्रम, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी कृती स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करुन अध्ययन सुकर केले गेले आहे.

Sybil: सिबिल

by Madhavi Kolhatkar

‘सिबिल’ ही अमेरिकेत घडलेली सत्यकथा. ‘सिबिल’ हे टोपणनाव असलेली ही मुलगी अतिशय बुद्धिमान्, उत्तम चित्रकार. पण शाळा- कॉलेजात असताना तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिचा दिवसा- तासांचा मेळ बसेना. आयुष्यातला बराच काळ हा आपण न जगताच जातो आहे, असं तिला वाटायचं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य काहीतरी वेगळं आहे; कुठेतरी, काहीतरी चुकतं आहे, असं जाणवल्यावर धाडस करून ती मनोविकारतज्ज्ञांकडे गेली. त्यांनी तिचा सर्व इतिहास जाणून घेऊन निदान केलं, ते भग्नव्यक्तित्वाचं. ‘सिबिल’ मध्ये एकूण सोळा व्यक्तित्वं आढळली. त्यातली पेगीसारखी काही व्यक्तित्वं भरपूर खात, हिंडत, उल्हासाने जगत; तर सिबिल ॲन्‌सारखी इतर काही एक पाऊल उचलण्याच्या कल्पनेनंही थकून जात.

Tai Tai, Akash Nile Ke Aahe?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - आकाश निळे का आहे? जेव्हा त्याला त्याची ताई विचारते, त्याला असे का वाटते, तेव्हा त्याच्या कल्पना भरारी मारतात. कदाचित एखादी निळी साडी वाळत घातली असेल ज्यामुळे आकाश निळे दिसते किंवा काहीतरी वेगळे कारण असेल. अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा: तुम्हाला काय वाटते, आकाश निळे का आहे?

Tai Tai, Gadgadat Kuthun Hoto?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - गडगडाट कुठून होतो? आकाशातील रागावलेल्या राक्षसाच्या गर्जनेमुळे होतो, की ढगात असलेल्या मोटारसायकलींच्या टोळीमुळे हा आवाज होतो? अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, गडगडाट कुठून होतो?

Tai Tai, Vastu Var Kaa Nahi Padat?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - वस्तू वर का नाही पडत? वस्तू वर पडल्या तर किती मजा येईल नाही? कमीतकमी आई तरी जमिनीवरच्या पसाऱ्यावरून कटकट करणार नाही! ताईला हसू येतं, आणि ती तिच्या छोट्या भावाला याबुद्धिविशिष्ट प्रश्नाचे उत्तर देते. पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, वस्तू वर का नाही पडत?

Talghar: तळघर

by Narayan Dharap

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."

Tanjavarche Marathe Raje: तंजातंजावरचे मराठे राजेवरचे मराठे राजे

by Vinayak Sadashiv Vakaskar

मद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनी हे पुस्तक संशोधनपूर्वक लिहिले असल्याचे श्रीयुत अयंगार या प्रख्यात इतिहासतज्ञांनी आपल्या उपोद्घातात स्पष्ट म्हटलेच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असताना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणी घातली आहे. त्या मुळे हे पुस्तक आतापर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपाने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेत खोदविलेला आहे. त्याचे सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रड्मण्य यांना न मिळाल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेत लिहिलेच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुद्दाम परिशिष्टात दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य ते साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभी दिलाच आहे.

Tap Tap Paus

by Madhuri Shanbhag

This is a story of a small girl Anni. Anni is not happy with her family members she is angry and had decided not to talk to them forever. She sits on the stairs and much rain drops fall on her palm. They talk to each other. Describing the rainbow in the sky and how it is formed.

Tarangat Tarangat

by Vidya Tiware

सर्वच लहान मुलांना उंच आकाशाचे आकर्षण असते. आकाश पाहून त्यांच्या मनात अनेक विचार येतात. मन वसे ते स्वप्नी दिसे हे ’तरंगत तरंगत’ वाचताना प्रत्ययास येते.

Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.

Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.

Teen Rade

by Greystroke

श्रीमती चँग यांना वाचायला येत नसतं म्हणून आपल्या मुलाकडून आलेलं पत्र त्या वेन नावाच्या शिपायाला वाचायला सांगतात. पत्र बघताच वेन रडू लागतो. मग चँगही रडायला लागतात. पेंग नावाचा फेरीवाला तिथून जात असताना हे बघतो आणि त्यांच्याजवळ येऊन तोही रडायला लागतो. का रडतात हे तिघं? चीनमधली ही गमतीदार लोककथा वाचा.

Tel Gele Ani Tupahi Gele

by Shekhar Shiledar

One day Shekh Chilli’s mother asks him to buy oil for fifty Paise but gives him a small container. In an attempt to take the oil for fifty Paise in that small container he confuses the oil vendor and spills all the oil. His mother gets annoyed with him.

Tenaliramchi Svari

by Rajesh Gupta

One day the king lost a precious diamond from his ring and a man found it. He asked that he wants to sit on Tenali Raman’s back and go round the market as his reward. The king was not happy and he tells this to Tenali Raman. Tenali Raman understands the conspiracy and saves himself from it. Tenali exposes the man behind the conspiracy and the king becomes angry on that man and suspends him.

Refine Search

Showing 1,301 through 1,325 of 1,430 results