Browse Results

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results

Gramin Vikasacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल 2 पेपर 3 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Pagaar Ashok Maruti Thorat Dr Jyotiram More

'ग्रामीण विकासाचा भूगोल भाग 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच होईल यात शंका नाही. म्हणूनच दुसऱ्या प्रकरणात समस्याप्रधान क्षेत्रांना डोळ्यांसमोर ठेवून विकासाच्या दिशांवर चर्चा केलेली दिसून येते. आपला देश आपल्या राज्यघटनेनुसार समानता मानणारा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण 'कल्याणकारी' राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे. म्हणूनच शासनातर्फे तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तो कशा प्रकारे केला जातो, यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत इत्यादींची सविस्तर माहिती तिसऱ्या प्रकरणात दिसून येते. चौथ्या प्रकरणात ग्रामीण विकासाबाबत झालेल्या किंवा चालू असलेल्या प्रयत्नांचा चिकित्सात्मक अभ्यास स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी 'क्षेत्रीय अभ्यास पद्धती' अवलंबलेली आहे. याचाच अर्थ एखाद्या गावाच्या, गटाच्या किंवा समूहाच्या विकासाचे प्रयत्न अभ्यासणे हा होय. यात योग्य उदाहरणे निवडून त्याबाबत साधकबाधक चर्चा केलेली दिसून येते. सर्व प्रकरणांच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला कितपत ज्ञान प्राप्त झाले आहे हेही पडताळून पाहता येईल.

Lokprashasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: लोकप्रशासन २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Haridas Arjun Jadhav

शैक्षणिक वर्ष 2021-2022, टी. वाय. बी. ए.: सत्र 6 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C(3)+1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विद्याथ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विद्याथ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र सहामध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'नोकरशाही' हे असून यामध्ये आपण नोकरशाहीची भूमिका, नियुक्तीकर्ते- सेवक संबंध, प्रशासकीय न्यायाधीकरण आणि प्रशासकीय निवाडा यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'कर्मचारी प्रशासन' हे असून यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन, प्रशासकीय भरती, प्रशिक्षण आणि बढती या संकल्पना समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'अंदाजपत्रकीय प्रक्रिया'. या प्रकरणात आपण वित्त प्रशासन, अंदाजपत्रकाचे प्रकार आणि अंदाजपत्रकीय प्रक्रिया अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'उत्तरदायित्व आणि नियंत्रण'. यामध्ये आपण उत्तरदायित्व आणि नियंत्रण या संकल्पनांबरोबरच प्रशासनावरील नियंत्रण या बाबी समजून घेणार आहोत.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2 पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Korawale Sachin Sahadu Ghayatdke

'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले राज्यशास्त्र सत्र-6 चे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर सादर केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये 74 व्या घटनादुरुस्तीपूर्वीच्या नागरी संस्था, कलम 243 मधील संवैधानिक बदल तसेच नगर पंचायत या घटकांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व भारतीय संविधानातील 12 वे परिशिष्ट याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीनमध्ये राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग व आयोगासमोरील आव्हाने विस्तृतपणे लिहिली आहेत. चौथ्या प्रकरणामध्ये स्थानिक स्वराज्य शासनावरील नियंत्रण, स्थानिक स्वराज्य शासनावरील मर्यादा व त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

Marathi Aksharbharati class 10 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘अक्षरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे. आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठांमध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्गवर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी, यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू

by Rahul Shinde

या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.

Nazi Bhasmasuracha Udayasta: नाझी भस्मासुराचा उदयास्त

by V. G. Kanitkar

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

Paryatan Bhugol 2 TYBA Sixth Semester - SPPU: पर्यटन भूगोल 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

पर्यटन भूगोल 2 या पुस्तकात प्रकरण एकमध्ये पर्यटनातील निवासस्थानाची भूमिका या प्रकरणात निवासस्थानाचे प्रकार यामध्ये हॉटेल, मोटेल, पथिकाश्रम, खाजगी व शासनमान्य निवासस्थाने तसेच निवासव्यवस्थेची भूमिका या बाबींचा समावेश केलेला आहे. प्रकरण दोनमध्ये पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिणाम यांचे सखोल स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच शाश्वत विकासात पर्यटनाची भूमिका व धोरण याचाही अभ्यास केलेला आहे. प्रकरण तीनमध्ये पर्यटन विकासाचे नियोजन आणि धोरणे यामध्ये जागतिक पर्यटन संघटना (UNWTO), भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या सर्वांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रकरण चारमध्ये पर्यटन स्थळांचे अध्ययन यामध्ये मनाली व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे, ताजमहाल व रायगड किल्ला तसेच काझीरंगा व मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने या सर्व स्थळांचे अध्ययन विस्तृतपणे केलेले आहे. 'पर्यटन भूगोल 2' या पुस्तकात वरील सर्व मुद्द्यांनुसार पर्यटन स्थळांचे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Paryavaraniy Abhyas SYBA, B.COM, B.SC Second Semester - SPPU: पर्यावरणीय अभ्यास एस.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pandurang Patil Dr Sanjay Patil

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, प्रदूषण प्रतिबंधन यामध्ये उत्साही युवाशक्तीचा वापर करता येईल व युवक मोठा वाटा उचलू शकतील याची जाणीव असल्याने पुणे विद्यापीठाने एक धाडसी प्रगत व आवश्यक पाऊल उचलले आहे. सन 2004-05 या शैक्षणिक वर्षापासून B.A., B.Com. व B.Sc. या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना 100 गुणांचा, 'पर्यावरणीय अभ्यास' (Environmental Studies) हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे व अनिवार्य (सक्तीचा) ठेवला आहे. तसेच इतर विद्यापीठांनीही अशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे सदर पुस्तक याच अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांची गरज पुरविण्याचा एक अल्प व नम्र प्रयत्न आहे. तसेच या पुस्तकाचा विषयशिक्षक, तज्ज्ञ आणि पर्यावरण-प्रश्नाबद्दल रुची असणारे सामान्य वाचक यांनाही काही उपयोग होईल अशीही आमची आशा आहे.

Rup Kaviteche TYBA Sixth Semester - SPPU: रुप: कवितेचे टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Shirish Landage Prof. Dr. Bhaskar Dhoke Prof. Dr. Sandeep Sangale

कविता हा एक प्रमुख साहित्यप्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे, आविष्कार पाहावयाला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी, कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकीरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे; कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केले आहे.

Sahityarang Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्यरंग भाग ३ बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rekha Vadikhaye Dr Pramod Munghate Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Shailendra Lende Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Sopandev Pise Dr Rakesh Kabhe Shri. Sachin Upadhyay

साहित्यसरितेला तिच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणांवर विविध प्रवाह येऊन मिळालेत, त्यामुळे आज तिचे स्वरूप व्यापक झाले आहे. या तिच्या विविध कालखंडातील रूपाची, त्यातील विविध वाङ्मयप्रकारांची आणि विविध प्रवाहांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातील संत-पंत-तंत साहित्यातील काही घटकांबरोबरच आधुनिक मराठी साहित्यातील ललितबंध, एकांकिका, कथा, वैचारिक लेख, कविता, व्यक्तिचित्रे इत्यादींना या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीची चर्चा, चिकित्सा आणि चिंतन करण्याची क्षमता वाढीला लागावी, विद्यार्थी साहित्याचा आस्वादक व्हावा व त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि जीवनमूल्यांचे त्याला जीवनव्यवहारात उपयोजन करता यावे, साहित्यातील मूल्यगर्भ विचारांचा परिचय होऊन त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या अभ्यासक्रमात दर्जेदार घटकांची निवड मंडळाने केली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ठरविण्यात आलेले, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचे तसेच अभ्यासक्रमाचे पायाभूत उद्दिष्ट साधले जावे, या मुख्य हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA First Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.

Sarvajanik Ayavyay 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय 2 पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D. G. Late Prof. Dr. S. B. Syed Prof. Dr. S. R. Javale Prof. S. P. Adhav

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 व 6 नेमलेल्या अर्थशास्त्र विशेष पेपर-3 साठी सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन काही जास्तीचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. सत्र 6 साठी नेमलेल्या अभासक्रमानुसार आम्ही सार्वजनिक आयव्ययाचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Swatantryottar Bharat (1947-1991) Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Swatantryottar Bharat 1947-1991 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७-१९९१) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने चौथे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Talghar: तळघर

by Narayan Dharap

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."

Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Kalyan Chavan

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.

Anandadayi Ganit class 1 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता पहिली - एनसीईआरटी - २३

by National Council of Educational Research and Training

इयत्ता पहिलीसाठी आनंददायी गणित या पाठ्यपुस्तकातील आशय NCF-FS 2022 मध्ये नमूद केलेल्या पुढील चार घटकांवर आधारित आहे तोंडी गणित चर्चा, कौशल्य शिकवणे, कौशल्य सराव आणि गणिती खेळ सर्व अध्यायांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यापैकी बहुतेक एकात्मिक पद्धतीने सादर केले आहेत. तथापि, खालील प्रकरणे केवळ गणितीय समज आणि क्षमता विकसित करण्याच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टाशी (CG-8) आणि परिमाणे, आकार आणि मापे यांद्वारा जग ओळखू शकण्याशीच संरेखित नाहीत तर NCF-FS 2022 मध्ये दिलेल्या सर्वांगीण विकासाकडे नेणाऱ्या इतर सर्व अभ्यासक्रम व अभ्यासक्रमिय उद्दिष्टांशीदेखील सरेखित आहेत - मौखिक गणित चर्चा, कौशल्यशिक्षण, कौशल्यसराव आणि गणिती खेळ. बौद्धिक आव्हान आणि विचारप्रवर्तक कार्यांमुळे गणिताचे अध्ययन व निर्णयनक्षमता अधिक चांगल्या प्रकारे होते. मेंदूला सतावणारे प्रश्न, कोडी, कूट प्रश्न यामुळे नेहमीच्या शिकण्याच्या जोडीने मुलांना याची संधी मिळते. मुलांच्या वयाला साजेशी अनेक कोडी या पुस्तकात दिली आहेत.

Anandadayi Ganit class 2 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता दुसरी - एनसीईआरटी - २३

by National Council of Educational Research and Training

इयत्ता दुसरीसाठी असलेले आनंददायी गणित असे नाव असलेले गणिताचे पाठ्यपुस्तक NEP 2020, NCF-FS 2022 तसेच पायाभरणीच्या टप्प्यासाठीचा अभ्यासक्रम यांच्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे। बालवाटिका 1 ते 3 तसेच पहिली झाल्यावर (3-8 वर्षे वयात) दुसरीत जाणाऱ्या मुलाला अंकांचे ज्ञान झालेले असते, असे यात गृहीत धरले आहे। परंतु, आपल्या देशातील विविधता बघता, कदाचित काही मुलांची एकदम शाळेत पहिलीत गेल्यावरच पहिल्यांदा अंकांची ओळख होत असेल, असेही होऊ शकते। हे क्रमिक पुस्तक तयार करताना अशा परिस्थितीचाही विचार केलेला आहे। वयाच्या या टप्प्यावरील मुले मुक्तपणे खेळणे, खेळणी यात रमतात। हे लक्षात घेऊन, अवकाशीय समज, अंकहाताळणी, गणितीय आणि संगणकीय संकल्पना इ। शिकवण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खेळ, खेळणी यांचा वापर करण्यासाठी पुष्कळ वाव ठेवलेला आहे। यामुळे प्रत्येक नवीन संकल्पना किंवा कौशल्य शिकताना मूर्त वस्तूंकडून चित्रस्वरूपाकडे व त्याकडून अमूर्त कल्पनांपर्यंतचे संक्रमण सहजपणे होऊ शकते। सर्वांगीण विकासासाठी अनुभवातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, इयत्ता दुसरीसाठी असलेल्या आनंददायी गणित या पुस्तकामध्ये, वर्गात आणि वर्गाबाहेर करण्यासारखे अनेक उपक्रम दिले आहेत। यातील सर्व प्रकरणांमध्ये, उपक्रमाधारित कार्यांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचे आकलन करून दिले आहे। सक्तीने, नाखुषीने गणित शिकण्याऐवजी, आपण खेळ खेळत आहोत अशा भावनेने मुलांनी हे उपक्रम करावेत आणि त्याद्वारे गणितीय संकल्पना आपोआप रुजाव्यात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे।

Anolakhi Disha Bhag 1: अनोळखी दिशा भाग 1

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Antararashtriya Sambandh 1 TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध 1 बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत.

The Darker Side: द डार्कर साईड

by Cody McFadyen

अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…

Digital Bharat: डिजिटल भारत

by Dr Deepak Shikarpur

पंचवीस वर्षांनी माहिती तंत्रज्ञानाची गंगा म्हणजेच 'आयटी' भारतात वाहत आहे आणि ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वास्तव बनली आहे. अंगणी येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मुळात ही संगणकीय क्रांती असली तरी, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (किमान साधे मोबाइल फोन) आल्यापासून त्याचा खरा प्रसार (आणि परिणाम) जाणवू लागला आहे. आपली बरीचशी सरकारी कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत! किमान बिले भरणे, एखाद्या प्रकरणाची माहिती घेणे, तक्रारी दाखल करणे, संबंधित कार्यालयात पोहोचणे आणि तिथल्या विभागाचा शोध घेणे आणि योग्य अधिकाऱ्याची वाट पाहणे यासारख्या मूलभूत कामांसाठी शहरी-निमशहरी भागातही तासनतास वाया जातात. आणि जतन केलेले मानसिक आणि शारीरिक श्रम (सामाजिक, आर्थिक, आत्म-सुधारणा इ.) इतरत्र वापरा. काही हरकत नाही! आणि हे अगदी घरी केले जाऊ शकते. थोडे कौशल्य आत्मसात केले तर अनेकांना त्यात दूरगामी करिअरच्या (कमाईच्या) संधी मिळतील. इंटरनेट, कनेक्टेड कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन आणि स्वत:चे बँक खाते यांच्या मदतीने - अगदी गृहिणी देखील तिच्या घरातील आरामात पैसे कमवू शकते. एकदा तुम्ही डिजिटल कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर, तुम्ही अनेक व्यावहारिक, परस्पर पैलू हाताळण्यास सक्षम असाल. "खरीच कर लो दुनिया मुटका" हे स्वप्न आता सहज शक्य झाले आहे.

Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.

Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.

Majet Shikuya Marathi Class 1 - Maharashtra Board: मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र शासनाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय सन २००९ मध्ये घेतला. 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२' मध्येही याच धोरणानुसार, अनिवार्य मराठी हा विषय इयत्ता पहिलीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या स्तरावर मराठी हा विषय शिक्षकांनी श्रवण, भाषण व संभाषण या कौशल्यांच्या स्वरूपात शिकवावा आणि त्या विषयासाठी 'पाठ्यपुस्तक' असू नये अशी अपेक्षा आहे; म्हणून इयत्ता पहिलीकरिता मराठी विषयाची ही छोटेखानी पूरक साहित्य पुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली आहे. या पूरक पुस्तिकेमध्ये गाणी, गोष्टी दिल्या आहेत. तसेच परिचित, अपरिचित पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फुले, फळे, झाडे यांचा रंगीत चित्रे व शब्दांतून परिचय करून दिलेला आहे. काही सूचना व कृती दिल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ जावे यासाठी पुस्तिकेच्या शेवटी 'दिशा अध्ययन-अध्यापनाची' या शीर्षकाखाली मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक व दर्जेदार होण्यासाठी त्याचा उपयोग करावा.

Refine Search

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results