Browse Results

Showing 51 through 75 of 1,430 results

Don Santh Vahatach ahe Bhag 1: डॉन संथ वहातच आहे भाग १

by Shri. Narendra Sindkar

श्री. नरेन्द्र सिंदकर यानी जगविख्यात रशियन लेखक मिखैल शोलोखोव् यांच्या ‘ॲण्ड क्वाएट फ्लोज् द डॉन’ या महाकादंबरीचा मूळ रशियन भाषेतून मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ही कादंबरी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला डॉन नदीच्या खोऱ्यात राहणार्‍या कॉसॅक्सच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधीपासून 1912 च्या आसपास, ही कथा टाटार्स्कच्या मेलेखोव्ह कुटुंबाभोवती फिरते, जे कॉसॅकचे वंशज आहेत. क्रिमियन युद्धादरम्यान एका तुर्कीला पत्नी म्हणून कैद केले. मेलेखोव्हच्या अंधश्रद्धाळू शेजाऱ्यांकडून तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला जातो. ज्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या पतीने त्यांचा सामना केला. त्यांचे वंशज, मुलगा आणि नातवंडे, जे कथेचे नायक आहेत, त्यांना "तुर्क" असे टोपणनाव दिले जाते.

Don Santh Vahatach ahe Bhag 2: डॉन संथ वहातच आहे भाग २

by Shri. Narendra Sindkar

श्री. नरेन्द्र सिंदकर यानी जगविख्यात रशियन लेखक मिखैल शोलोखोव् यांच्या ‘ॲण्ड क्वाएट फ्लोज् द डॉन’ या महाकादंबरीचा मूळ रशियन भाषेतून डॉन संथ वहातच आहे भाग २ कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ही कादंबरी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला डॉन नदीच्या खोऱ्यात राहणार्‍या कॉसॅक्सच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधीपासून 1912 च्या आसपास, ही कथा टाटार्स्कच्या मेलेखोव्ह कुटुंबाभोवती फिरते, जे कॉसॅकचे वंशज आहेत. क्रिमियन युद्धादरम्यान एका तुर्कीला पत्नी म्हणून कैद केले. मेलेखोव्हच्या अंधश्रद्धाळू शेजाऱ्यांकडून तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला जातो. ज्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या पतीने त्यांचा सामना केला. त्यांचे वंशज, मुलगा आणि नातवंडे, जे कथेचे नायक आहेत, त्यांना "तुर्क" असे टोपणनाव दिले जाते.

Gandhi Parv: गांधी पर्व

by T. V. Parvate

महाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक नवीन पर्व सुरु केले. १ ऑगस्ट, १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीची धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आली आणि ३० जानेवारी, १९४८ ला त्यांची हत्त्या होईपर्यंत ते राष्ट्राचे एकमेव असे नेते राहिले. त्यांच्या हयातीतच सामुदायिक असहकाराची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो इत्यादी चळवळी झाल्या. आणि शेवटी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय चळवळी केल्या नाहीत तर सामाजिक चळवळीही फार मोठ्या प्रमाणात करण्याचे श्रेय त्यांचे आहे. चरखा संघ, ग्रामोद्योग संघटना, कुष्ठरोग निवारणाची चळवळ इत्यादी अनेक विधायक चळवळी पण त्यांनी सुरु केल्या.

Iliad: इलियद

by Shamrao Nilkanth Oak

ग्रीक महाकवी होमर लिखित “Iliad” या ग्रीक महाकाव्याचे सँम्युएल बटलर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे मराठी भाषान्तर शामराव नीळकंठ ओक यांनी केले आहे. इलियड हे होमरचे जगप्रसिद्ध महाकाव्य आहे. यात ट्रॉय या ग्रीक शहरात झालेल्या युद्धाच्या विजयाचे आणि विध्वंसाचे वर्णन आहे. हे युद्ध ट्रॉजन युद्ध म्हणून ओळखले जाते.

Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके

by Dr Madhukar Ashtikar

नाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.

Samrajyavadi Shadyantra: साम्राज्यवादी षड्‌यंत्र

by Dr Shanta Kothekar Sau Suman Vaidya

प्रस्तुत पुस्तक “साम्राज्यवादी षड्‌यंत्र” हे अलबर्ट काहन आणि मायकेल सेयर्स या अमेरिकन लेखकांच्या “The Great Conspiracy against Russia” ह्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. जागतिक शांतता टिकून राहण्याकरिता इतर कोणत्याही गोष्टीमुळे झाले नसेल इतके मोलाचे योगदान या ग्रंथामुळे झाले आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिका व रशिया यांत परस्पर सलोखा व सद्‌भाव असला तरच जगात खऱ्या अर्थाने टिकावू शांतता नांदू शकेल. रशियन क्रांतीनंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचे दर्शन रशियाच्या अनुभवांच्या चष्म्यातून या ग्रंथाद्वारे लेखकांनी घडविले आहे; रशियनांना आपल्याबद्दल काय वाटते हे त्यांनी आपल्याला जाणवून दिले आहे. या ग्रंथात वर्णन केलेल्या कारस्थानांसारखी सोविएतविरोधी कारस्थाने जर अशीच चालू राहिली तर त्याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल हे उघडच आहे. म्हणूनच जागतिक शांतता टिकावी याची कळकळ असलेल्या सर्व ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्यांनी, एवढेच नव्हे तर त्या दोन्ही राष्ट्रांतील सामान्य नागरिकांनीही या ग्रंथाचे परिशीलन करणे अगत्याचे आहे. आज संपूर्ण मानव जात सर्वसंहारक अशा स्टार वॉरच्या भयाने भयाकुल झालेली असता या विनाशकारी परिस्थितीची बीजे कशी व कोठे रोवली गेली यावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिने हा ग्रंथ अतिशय मोलाचा ठरतो.

Aadarsh Rajya: आदर्श राज्य

by Dr J. V. Joshi

‘प्लेटो’ या जगद्‌विख्यात ग्रीक तत्त्वज्ञाच्या ‘रिपब्लिक’ या जगद्‌विख्यात तात्त्विक संवाद ग्रंथाचे हे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित होत आहे. ‘प्लेटोची आदर्श राज्य घटना’ हे श्री. जनार्दन गणेश जोगळेकर यांनी इ. स. १९३९ साली प्रसिद्ध केलेले भाषांतर दुर्मिळ झाले होते. त्यामुळे कॉर्नफोर्ड, जोवेट यांनी केलेली सर्व प्रसिद्ध इंग्रजी भाषांतरे ‘प्लेटो आणि रिपब्लिक’ यावर आधारलेले अभ्यास व संशोधन ग्रंथ समोर ठेवून, तत्त्वज्ञान विषयाचे जिज्ञासू, अभ्यासक यांना उपयुक्त ठरू शकेल अशी सुधारित संपादित आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा हा प्रयत्न. ‘रिपब्लिक’ ग्रंथाची भूमिका, मध्यवर्ती समस्या, त्यामधील तात्त्विक चर्चेत आलेले महत्त्वाचे विषय इत्यादी संबंधीचे विवेचन व रूपरेखा प्रस्तावनेत मांडली आहे. ‘प्लेटोच्या आदर्श राज्यात’ प्रस्थान ठेवण्यापूर्वीचे हे हृद्‌गत, त्याचा अंतरंग परिचय करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे वाटते.

Agarkar Vangamay Khand 3: आगरकर-वाङ्मय खंड ३

by M. G. Natu D. Y. Deshpande

आगरकर-वाङ्मय: खंड १ च्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे या तिसऱ्या खंडात आगरकरांचे 'डोंगरीच्या तुरुंगात आमचे १.१ दिवस' (१८८२), 'विकारविलसित' (१८८३), वाक्यमीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण (१८८८), व विविधविषयसंग्रह (१८९१) हे ग्रंथ आणि केसरीतील निवडक निबंध, भाग १ व २ (१८८७ व १८८८) यांतील निर्विवादपणे आगरकरांचेच असलेले काही निबंध यांचा समावेश केला आहे. आगरकरांच्या वाङ्मयाची विभागणी प्रकाशनकालक्रमानुसार न करता त्यांचे सर्वात शेवटी प्रकाशित झालेले निबंधसंग्रह, भाग १, २ व ३ हे आम्ही खंड १ व २ यात घेतले आणि त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेले सर्व वाङ्मय या शेवटच्या खंडात समाविष्ट केले याचे कारण आम्ही पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेच आहे. त्याचा थोडक्यात पुनरुच्चार करायचा तर आगरकरांचे जीवितकार्य जी सुधारणा तिची मीमांसा सामाग्याने सुधारकातून निवडलेल्या या निबंधांतून झालेली आहे. त्या मानाने त्यांचे ग्रंथ भिन्न भिन्न प्रकारचे आणि त्यांचे विषयही भिन्न असल्यामुळे या खंडाला काहीसे संकीर्ण स्वरूप आले आहे. म्हणून या खंडाला आम्ही 'विविध विषय विभाग' असे नाव दिले आहे.

Mahaparv: महापर्व

by Bal Samant

“महापर्व” हा संपादित ग्रंथ म्हणजे या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मवृत्तातील निवडक उतारे. या आत्मवृत्तामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महाराष्ट्राची कर्तबगारी असामान्य आणि अमोल अशी आहे. या स्वातंत्र्य चळवळीचे बीजारोपण महाराष्ट्रातच झाले आणि लो.टिळकांच्या रूपाने या चळवळीला एका विलक्षण झंझावाताचे स्वरूप प्राप्त झाले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्‌ध हक्क आहे,” हा स्वातंत्र्याचा महामंत्र काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र दुमदुमला. लो. टिळकांच्या, महात्मा गांधींच्या पावलांचा मागोवा घेत या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात महाराष्ट्रानेही आपली आहुति दिली. या स्वातंत्र्य युद्‌धात भाग घेतलेल्या लहान थोर स्वातंत्र्यसेनानींनी आपली आत्मवृत्ते आणि आठवणी लिहून ठेवल्या आहेत. या काळात महाराष्ट्रातील स्वातंत्र्याच्या चळवळीने झपाटून गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे हृद्‌गतच वाचकांना पानोपानी गवसते. ‘महापर्व’ हा संपादित ग्रंथ असाच तोलामोलाचा आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या प्रमुख स्वातंत्र्य-सेनानीचे हे हितगुज आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे.

Mulakhavegala Raja: मुलखावेगळा राजा

by Appa Pant

मुलखावेगळा राजा हे पुस्तक हे एकाच (मुलखावेगळ्या) राजाचे चरित्र नाही. दोन मुलखावेगळ्या माणसांचे, राजाचे आणि राजपुत्राचे हे चरित्र आहे आणि हा राजपुत्रही असा तसा नाही तर जागतिक कीर्तीचा भारतीय राजदूत आहे. अर्धी चड्डी आणि बनियन लावून आपल्या संस्थानात फिरणारा हा राजपुत्र भारताचा राजदूत म्हणून पुढे अनेक देशात गाजला आहे. अशा या राजपुत्राने आपल्या वडिलांचे आणि एका रीतीने संस्थानच्या प्रजेचे लिहिलेले हे चरित्र; आपले आणि आपल्या कुटुंबाची अशी सांगितलेली कहाणी. त्यांच्या संस्थानात घडलेल्या प्रयोगाचाच हा इतिहास. हा राज्यव्यवस्थेचा प्रयोग ‘औंध एक्सपेरिमेंट’ म्हणून आज प्रसिद्ध आहे. आप्पासाहेबांची, एका मुलखावेगळ्या राजाच्या राजपुत्राची ही खंत. ही कथा आणि ही खंत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राच्या एका शिल्पकाराची कहाणी.

Acharya Bhagwat Sankalit Wangmay Khand 2: आचार्य भागवत संकलित वाङ्मय खंड २

by Achyut Keshav Bhagwat

आचार्यांची जीवनदृष्टी आणि त्यामागे असलेले तत्त्वज्ञान यावरच्या लेखांचे संकलन पहिल्या खंडात झाले. या दुसऱ्या खंडात प्रा. भागवत यांनी आचार्यांच्या साहित्यविषयक लिखाणाचे संकलन केले आहे. एका रीतीने हे आचार्यांचे साहित्य समीक्षाशास्त्रच होय. आचार्य भागवत यांची जीवन व साहित्य यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी होती. त्यामुळे आचार्यांच्या लिखाणाचा हा दुसरा खंड महाराष्ट्रातील नवीन पिढीला नेहमीच स्फूर्तिप्रद होत राहील.

Krantiparva: क्रांतिपर्व

by Dr Uttamrao Patil

डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरलेला ‘क्रांतिपर्व’ हा ग्रंथ आहे. डॉ. उत्तमराव पाटील हे इतिहासकार नाहीत; पण इतिहास घडविणारे वीर आहेत. या वीराने आपल्या साहाय्यकांच्या मदतीने १९४२ च्या ‘भारत छोडो’ लढ्यात जो इतिहास घडविला त्याची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे हे केव्हाही इतर कोणाकडून ती कहाणी ऐकण्यापेक्षा अधिक सरस ठरणार आहे. या ४२ च्या लढ्यात डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या घरातील सर्व लहानथोर मंडळी बलिदानाच्या वेदीवरच उभे होते. त्यांची आई तुरुंगात गेली ती परत आलीच नाही. स्वतः डॉ. उत्तमराव पाटील, त्यांचे धाकटे बंधू दशरथराव व सर्वात धाकटे बंधू श्री. शिवाजीराव पाटील, उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई या सर्वच मंडळींनी त्या काळात अलौकिक कार्य केले. आझाद हिंद सेनेची कॅ. लक्ष्मी आणि सातारच्या पत्री सरकारच्या तुफान स्त्री-सैनिकांची सेनानी लीलाताई यांचे नाव त्या काळात प्रत्येक लहानथोरांच्या जिभेवर होते. हा ग्रंथ डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे एवढे सांगितले म्हणजे या ग्रंथाचे मोल किती आहे हे आणखीनिराळ्या शब्दांत सांगण्याची गरज नाही.

Pravas Varnan Ek Vanmayprakar: प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार

by Dr Vasant Sawant

श्री. सावंत यांचा "प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार" ग्रंथ या प्रवासवर्णनाची जणुकाही समीक्षाच आहे. पण ते केवळ प्रवासवर्णनाची समीक्षाच करून थांबत नाहीत. ते त्या ‘प्रवासवर्णन’ संकल्पनेची चिरफाडही करतात, व्याकरणपण सांगतात, त्या संकल्पनेशी कल्पनेचे कोशाशी नातेपण जुळवितात. श्री. सावंत यांचा असा हा पंडित परंपरेत शोभून दिसणारा ग्रंथ. पण श्री. सावंत यांनी तो कुशलतेने लिहिला आहे, यात शंकाच नाही. त्यात निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा विषय सांगितला आहे आणि त्यांची माहितीही दिली आहे. त्यामुळे हा ग्रंथ प्रवास करणाऱ्यांना व प्रवासवर्णन करणाऱ्यांनाही उपयोगी पडेल असे वाटते. कदाचित भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागासही हा ग्रंथ उपयुक्त वाटावा. सामान्य वाचकांना व प्रवाशांना तर तो निश्चितच मार्गदर्शक होईल आणि प्रवास करताकरता त्यातून वाङ्‌मयही निर्माण करता येते, हे सर्वांना कळेल.

Akherache Parv: अखेरचे पर्व

by Vijaya Rajadyaksha

विजयाताईंच्या 'अखेरचे पर्व' या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या प्रत्येक कथेतून मानवी मनाचे... त्यातल्या भावभावनांचे वेगवेगळे पैलू अधोरेखित होतात. कथांतून जे काही घडतं ते वास्तवाच्या परिघातलं असतं. स्वभावदोषामुळे कधी विस्कळीत होणारी, तर सद्भावनेमुळे जोडली जाणारी नाती नित्य प्रसंगांतून व्यक्त होत राहतात. पिढ्यांतील वैचारिक अंतर... मतभेद... क्वचित्प्रसंगी निर्माण होणारा संघर्ष हा सार्वत्रिक अनुभव विजयाताईंच्या सिद्धहस्त लेखणीतून वेगवेगळ्या रूपाने कथाबद्ध होतो. या कथा वाचताना आपल्याला असे जाणवते, की त्या अतिरंजित किंवा अ-वास्तव नाहीत. त्यात कल्पनाविलास नाही. दाद मिळवण्याच्या अभिप्सेने अनिवार्यपणे येणारा लालित्याचा अभिनिवेश नाही. भाषा साधीसोपी मनाला भिडणारी... कथाप्रवाहात वाहून नेणारी आहे. कथेत नाट्य असलेच तरी ते जीवनानुभवाच्या स्तरावरचे आहे. कथा सुखांतिक असेल, तर आपण मोरपिसांचा स्पर्श अनुभवतो आणि शोकांतिक असेल, तर मळभ दाटल्यासारखे अस्वस्थ होतो. कथांतील काही प्रसंग आपल्या पाहण्यातले किंवा कदाचित आपल्या घरात घडल्यासारखे वाटत राहतात. कधी त्यातल्या पात्रांची विचारसरणी आपल्याशी कुठेतरी जुळते असे जाणवत राहते. थोडक्यात, कथाबीजातील 'सर्वसमावेशकता' हे विजयाताईंच्या लेखनातील महत्त्वाचे वैशिष्ट आहे. या संग्रहातील काही कथांचा शेवट वाचकांनी कल्पावा, असा विजयाताईंचा मानस दिसतो. एकूणच अवश्य वाचावा आणि 'फील' करावा असाच हा कथासंग्रह आहे.

Chukat Kon Nahi Grahapatatil Anand

by Kumudini Ballal

Childrens First day in the school and the homework how they do it in marathi.

Jhund Shahiche Band: झुंड शाहीचे बंड

by B. R. Sunthankar

प्रसिद्ध स्पॅनिश तत्वज्ञ ओ. वाय. गॅसेट यांच्या Revolt of the Masses या पुस्तकाचे केलेले हे भाषांतर आहे. गॅसेट हा विसाव्या शतकातील स्पेनचा मौलिक विचारवंत असून तो फ्रँकोच्या पूर्वकाळातील स्पेनच्या बौद्धिक क्षेत्रातील एक धुरीण होता. स्पेनच्या यादवी युद्धाच्या काळात त्याला स्पेन सोडून वनवासात जावे लागले. १९३० साली प्रसिद्ध झालेले प्रस्तुत पुस्तक हे युरोपीय वाङ्‍मयातील महत्वपूर्ण पुस्तक समजले जाते. गॅसेटची लिहिण्याची शैली विशिष्ट असून ती क्लिष्ट असली तरी अर्थगर्भ आहे. विवेचन करण्याची त्याची एक विशिष्ट एक विशिष्ट मर्मग्राही धर्ती असून कोणत्याही घटनेकडे तो व्यापक दृष्टीकोणातून पहातो. या पुस्तकात आधुनिक काळात युरोपातच नव्हे तर साऱ्या जगभर जनसमुदायांचे जे उत्थान झाले आहे आणि त्यातून जी झुंडशाही निर्माण झाली आहे तिची मीमांसा आणि विश्लेषण गॅसेटने विविध अंगांनी केले आहे. झुंडशाहीची त्याने केलेली मीमांसा सध्याच्या भारताच्या परिस्थितीला यथार्थाने लागू पडते. मधुनमधून आपल्याकडे जे झुंडीच्या उठावाचे प्रकार घडत आहेत त्यांचा उलगडा व्हायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मात्र हे पुस्तक वाचताना १९३० सालामधले जागतिक संदर्भ लक्षात घेणे अवश्य आहे.

Yashodhan: यशोधन

by Prof. Ram Shewalkar

"यशोधन" हा ग्रंथ थोर इतिहास संशोधक डॉ. यशवंत खुशाल उपाख्य आप्पासाहेब देशपांडे यांच्या आजपर्यंतच्या असंकलित व विकीर्ण लेखांचा संग्रह आहे. महानुभाव साहित्याचे संशोधन, मराठीतील त्या ऐश्वर्यसंपन्न पण अज्ञात दालनाचा मराठी वाचकांना करून दिलेला सविस्तर परिचय. त्या क्षेत्रातील संशोधनाची इतर तरुण संशोधकांना दिलेली प्रेरणा, शिलालेख व ताम्रपटांच्याद्वारे विदर्भाच्या प्राचीन इतिहासावर टाकलेला प्रकाश. शारदाश्रमाची स्थापना, त्यात विदर्भातील कानाकोपऱ्यातून कष्टपूर्वक जमा केलेल्या हस्तलिखितांचा बहुमोल संग्रह, विविध देशी व परदेशी इतिहास परिषदांमधील उपस्थिती व सहभाग. वाङमयीन व संशोधन क्षेत्रातील प्राप्त झालेले विविध सन्मान, साहित्य व इतिहास संमेलनांची भूषविलेली अध्यक्षपदे, संशोधन क्षेत्रातील आजन्म तपश्चर्येचा “डी. लिट.” या सर्वोच्च पदवीने झालेला गौरव, घरची देशपांडेपणाची घरंदाज श्रीमंती व यवतमाळातील वकिलीचा व्यवसाय यांच्यावर सुखासुखी पाणी सोडून संशोधन क्षेत्राला वाहून घेतल्याबद्दल आयुष्याला आलेली कृतार्थता. कुटुंबवत्सल वैवाहिक जीवन व निरोगी दीर्घायुष्य या विविध कांतिमान रंगांनी डॉ. देशपांडे यांचे चरित्र रंगून व उजळून निघाले आहे.

Bhartiya Musalman: भारतीय मुसलमान

by Shree Vasant Nagarkar

प्रा. मुजीब लिखित "The Indian Muslims" या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद भारतीय मुसलमान हा आहे. ब्रिटिश अमदानीत आणि त्यानंतर जे इतिहास लिहिले गेले त्यांनाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारच्या इतिहासांची किंवा विशिष्ट ऐतिहासिक घटना अथवा प्रश्न यावर लिहिल्या गेलेल्या प्रबंधांची सर्वसामान्य चर्चा करणे येथे अप्रस्तुत होईल. हा ग्रंथ हिंदी मुसलमानांवर लिहिलेला असल्यामुळे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तुरळक अपवाद वगळता मुसलमान इतिहासकारांनी निष्पक्षदृष्टी ठेवलेली दिसत नाही. त्यामुळे आजवर मुसलमान समाजाचे व्यक्‍तिमत्व, त्यांचे प्रश्न आणि यशापयश यांचे संपूर्ण आकलन होऊ शकलेले नाही. प्रस्तुत ग्रंथाची मोठी व्याप्‍ति पाहता उपलब्ध साधनांचा साकल्याने अभ्यास करणे आवश्यक असूनही ते लेखकाच्या आवाक्याबाहेरचे काम होते.

Delhichya Shahajahancha Itihas: दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास

by Shri. B.G. Kunte

श्री. ब. प्र. सक्सेना लिखित History of Shahajahan of Delhi चा मराठी अनुवाद आहे. हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या सर्व मोगल सम्राटात अतिशय रसिक, रंगेल आणि तितकाच कट्टर धर्माभिमानी म्हणून शहाजहानचा उल्लेख करावा लागेल. आपला बाप जहांगीर याच्या विरुद्ध त्याने अयशस्वी बंड केले. बंडखोरीचे वीष जणुकाही मुसलमान राज्यकर्त्यांच्या अंगी भिनले होते. हीच बंडखोरी औरंगजेबाने केली आणि आपल्या बापाला-शहाजहानला-जीवंतपणी नरकयातना भोगावयास लावल्या. शहाजहानचे चरित्र म्हणजे आनंद आणि शोक यांचा एक आविष्कार आहे. डॉ. सक्सेना यांनी आपल्या ग्रंथात हे चरित्र अष्टपैलूपणे सादर केले आहे.

Netaji: नेताजी

by V. S. Walimbe

सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी सूर्य! या सूर्याच्या तेजाने इंग्रजांना पोळले, जाळले आणि त्यांच्या साम्राज्याला खिळखिळे केले. युरोपमध्ये उफाळून आलेल्या दुसर्‍या महायुध्दाच्या रुपाने भारताच्या स्वाभाविक आकांक्षेला साकार रूप देण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देण्यासाठी सुभाषबाबूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी केलेले कार्य निर्णायक ठरले, अशी इतिहासाची साक्ष आहे. सुभाषबाबूंच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांची गुंफण करत, छोट्या छोट्या परिच्छेदातून हे चरित्र वाचकांपुढे उलगडत जाते. अखेरपर्यंत वेधकता कायम ठेवणारी, प्रसंगानुरूप रूप घेणारी वाळिंब्यांची शैली वाचकांना बांधून ठेवते. सुभाषबाबूंसारख्या अलौकिक, निग्रही आणि निर्धारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या पिढीला करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. वि. स. वाळिंबे यांनी आपल्या ओघवत्या आणि चित्रदर्शी निवेदन शैलीने शब्दबध्द केलेली चरितकहाणी.

Portuguese Maratha Sambandh: पोर्तुगीज मराठा संबंध

by Sadashiv Shankar Desai

पोर्तुगाल ही हिंदुस्थानच्या जलमार्गाचा शोध लावणारी पहिली युरोपियन सत्ता. तथापि पोर्तुगीजांच्या पूर्वी अरब प्रवासी आणि व्यापारी हिंदुस्थानात जलमार्गाने व खुष्कीच्या मार्गाने येत असत. मध्ययुगीन कालात अरब व्यापाऱ्यानी आणि विचारवंतानी भारतीय माल आणि भारतीय तत्वज्ञान आफ्रिका मार्गे युरोपात पोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योगायोगाची किंवा दुर्दैवाची गोष्ट ही की, पोर्तुगीज नावाड्याना हिंदी महासागरात आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या समुद्रात आणून सोडण्यास अरबच कारणीभूत ठरले. असे सांगतात की, पोर्तुगीज लोकानी हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीच्या अद्‌भूतरम्य कथा कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. त्यामुळे सोन्याचा धूर वाहात असलेल्या ह्या समृद्ध देशात जाऊन तेथील धनसंपत्ती लुटून आणून आपला गरीब देश श्रीमंत करावा, ह्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानच्या शोधार्थ बाहेर पडले. आता हा मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधील संबंधाचा इतिहास प्रकाशात येत आहे.

Ani Pakshanna Rang Milale

by Anagha Hire

Ani pakshanna rang milale is a story of magical forest and birds . A long time ago , all the birds are white in colour, one of them ,the bird "salunki" fly to another forest ,there he found colourfull fruits ,and magical land and water. he eat fruits and play in water and enjoy a lot. Suddenly, the bird saw that he got color on his wings, body, and in beak. The bird travel to his native forest,his freind like the colorful bird and they also travel to magical forest and they also get color.

Ani Pakshanna Rang Milale

by Anagha Hire

Ani pakshanna rang milale is a story of magical forest and birds . A long time ago , all the birds are white in colour, one of them ,the bird "salunki" fly to another forest ,there he found colourfull fruits ,and magical land and water. he eat fruits and play in water and enjoy a lot. Suddenly, the bird saw that he got color on his wings, body, and in beak. The bird travel to his native forest,his freind like the colorful bird and they also travel to magical forest and they also get color.

Cherry Land Shod Ani Shastradnya

by Lata Guthe

Here are mentioned few inventions done by scientist Edisson in marathi.

Cherry Land Vartan Sanskar

by Madhavi Kunte

Here are some points how to welcome guest and take care of them in marathi.

Refine Search

Showing 51 through 75 of 1,430 results