Browse Results

Showing 76 through 100 of 1,427 results

Kavaledadachi Shala

by L. G. Paranjape

Kavaledadachi Shala is the story of the school. School principal visiting every classroom. He sees teachers are doing their job very well.

Manichi Phajiti

by Raja Managlvedhekar

This is a story of cat Mani and small girl suloo. On diwali vacation, suloo went to uncle homes. read story what happens.

Abhas Ani Vastavata: आभास आणि वास्तवता

by Sau. Gargi Sardesai

ख्रिस्तोफर कॉडवेल लिखित “ILLUSION AND REALITY” या पुस्तकाचा मराठी अनुवाद सौ. गार्गी सरदेसाई यांनी केला आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. जेमतेम तीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कॉडवेलचे स्पेनमधील यादवी युध्दात फ्रँको या हुकूमशहा विरुद्ध १९३७ साली लढताना निधन झाले तेव्हा त्यांच्या या ग्रंथांची छपाई सुरू होती. “आभास आणि वास्तवता” या शीर्षकाचा हा ग्रंथ काव्याच्या उगमासंबंधी कुतूहल असलेल्यांच्या तसेच आधुनिक इंग्रजी काव्य आवडीने वाचणाऱ्यांच्या विचारांना निःसंशय चालना देईल. प्रस्तुत ग्रंथ केवळ काव्यविषयक नसून काव्याच्या उगमासंबंधीही आहे. काव्य हे भाषेद्वारा लिहिले जाते, आणि म्हणून भाषेच्या उगमासंबंधी विचारही यात मांडला आहे.

Ramayanavar Nava Prakash: रामायणावर नवा प्रकाश

by Bhaskarrao Vithojirao Jadhav

रामायण व महाभारत या काव्य ग्रंथांना भारताच्या सांस्कृतिक संचितामध्ये अनन्यसाधारण स्थान लाभले आहे. त्यातील व्यक्तीरेखांनी कोट्यवधी माणसाच्या मनावर इतकी मोहिनी घातली आहे की त्यांच्या दृष्टीने राम किंवा कृष्ण या केवळ ऐतिहासिक व्यक्ती राहिलेल्या नसून ती श्रद्धास्थाने बनली आहेत. सर्वसामान्य भारतीय त्यांना अवतारी पुरुष मानतो आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करतो. इंग्रजी राजवटीत पाश्चात्य पंडितांनी रामायण व महाभारत हे ग्रंथ होमरच्या इलियड व ऑडिसीवरून रुपांतरित केले असावेत असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. तेव्हा न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंगानी त्याचे सप्रमाण खंडन केले. तरीही रामायणाचे मूळ इजिप्तमध्ये असल्याचे मत मल्लादि वेंकटरत्नम यांच्यासारखे विद्वान पुढील काळातही व्यक्त करीत असताना दिसतात. रामायणासंबंधी पंडितांमध्ये चाललेल्या या वादात १९३४ ते १९३६ या काळात भास्करराव जाधवही हिरीरीने उतरले. रामायणासंबंधी भास्कररावांनी त्या काळात “ज्ञानमंदिर”, “महाराष्ट्र शारदा” या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठवले होते. “रामायणावर नवा प्रकाश” वाल्मीकी रामायणावरील संशोधनात्मक लेख या पुस्तकात त्याचे हे लेख एकत्रित करण्यात आले आहेत.

Swatantryache Bhay: स्वातंत्र्याचे भय

by Dr A. H. Salunkhe

प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका व्यापक अध्ययनाचा भाग आहे. हे अध्ययन आधुनिक मानवाच्या स्वभावरचनेशी निगडित आहे. तसेच, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय घटकांच्या परस्परांवर ज्या क्रियाप्रतिक्रिया होतात, त्यांमधून निर्माण होणाऱ्या समस्यांशीही हे अध्ययन निगडित आहे.

Tisari Lat: तिसरी लाट

by Sharadini Mohite

तिसरी लाट हे पुस्तक अल्विन टॉफलर यांच्या ‘Third Wave’ चा मराठी अनुवाद आहे. ‘तिसरी लाट’ ह्या पुस्तकात दृष्टिकोण आहे, की काही घटनांचा, प्रक्रियांचा आणि तत्त्वांचा वापर एखादी संस्कृती करून घेत असते. आणि स्वतःचे एक पायाभूत उत्पत्तिशास्त्र तयार करत असते; आणि त्याच्या आधाराने ती वास्तवाचे स्पष्टीकरण करत असते. शिवाय स्वतःच्या अस्तित्वालाही न्याय देत असते. ह्या पुस्तकात एकमेकोंशी टक्कर घेणाऱ्या लाटांचे रूपक योजण्यात आलेले आहे. अतिशय विसंवादी अशा माहितीचे सुसूत्रीकरण हा एकच या रूपकामागचा हेतु नाही; तर त्यायोगे विचारांचा गोंधळ नाहीसा होऊन स्वच्छ, प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचेच परंतु नितळ स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते.

Ved Bolila Anant: वेद बोलिला अनंत

by Mrinalini Desai

चार वेद हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार आहेत ही गोष्ट लहानपणापासून शिकवली गेली तरी वेद म्हणजे काही तरी फार अवघड, आपल्याला कधीही त्यातले काही कळणार नाही असे काही तरी वाटत होते. त्यातच ‘स्त्री शूद्र आणि चांडाळांना वेदाचा अधिकार नाही’ हे ही अधून मधून कानावर पडत होतेच. त्यामुळे कळत न कळत एक प्रकारची अरुचीही मनात होती! पण नंतर ती लिखिते वाचता वाचता ऋग्वेदाविषयी एक अपूर्व अशी आत्मीयता वाटू लागली. आयुष्यात येणाऱ्या विविध अनुभवांची त्यातून संगति लागत गेली. त्यामुळे विचारानाही एक वेगळीच चांगली दिशा लाभली. गुजरात राज्य ग्रंथ निर्माण बोर्डाचे अध्यक्ष डॉ. जे. बी. सेंडिल यानी हे मराठी पुस्तक तयार करून छापण्यास संमति दिली. त्याशिवाय ज्याना ज्याना मी या संहितेतून मला काय जे मिळाले ते सांगितले, त्या सर्वच लोकांनी हे पुस्तक रूपाने लवकर बाहेर आणावे असा आग्रह केला. लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान कलावंत आणि कारागीर सर्वांनाच आवडेल, हिताचे काही सापडेल, आणि जिवाभावाचा वडीलधारा आधार लाभेल असे काही ना काही या ऋग्वेदात आहे.

Cherry Land Sanskar Aai Ani Baaiche

by Prof. Samruddhi Balasaheb Mhatre

Speaks about how a mother brings her child in the society nurturing her with good values in marathi.

Dharmanirpekshata Navhe Ihvad: धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद

by Mahadev Shankar Dhole

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या श्री. महादेव शंकर ढोले यांनी आपल्या पुस्तकास “धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद” असे शीर्षक देऊन या वादातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वंकष स्वरूपाच्या धर्माचा जबरदस्त पगडा असलेल्या भारतासारख्या देशातील समाजात इहवादी शासनाची निर्मिती करणे हे अत्यंत कठिण असले तरी अशक्य नाही असे घटनेच्या शिल्पकारांना वाटत होते. भारताची घटना अस्तित्वात आली त्यालाही चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही येथील शासन अधिकाअधिक इहवादी होण्याऐवजी सर्वधर्मसमभावाचे कातडे पांघरुन धर्माधिष्ठीत चळवळी धुमाकूळ घालीत असल्याचे विपरीत दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशातील तसेच आधुनिक भारतातील विचारवंतांच्या इहवादाबद्दलच्या चिंतनाचा मागोवा घेत विश्लेषण करण्याचा श्री. ढोले यांनी प्रयत्न केला आहे.

Kali Ek Phul

by Pra. G. Sahasrabuddhe

Kali Ek Phul is a story of bud. she feels proud because she is most beautiful. she does not blossom a day. she realized the mistake.

Khaucha Tas

by L. G. Paranjape

Khaucha tas a story of the frog. the frog is jolly in nature. his mother gave dry fruit for lunch. He enjoying and singing with friends at school.

Mala Vatate

by Farooq S. Kaji

Aamir went to the school. he like to be a teacher .what happen next? in marathi

Pavashachi Pill

by Milind Vatave

Very old time. A Tree requested to the bird that he could talk to clouds. ask when will rain come. Tree and bird did deal. after some time happens rainfall.

Sinh Ani Sinhin

by T. T. Sawant

There was a big forest on the top of the mountain. A lion and Lioness decided to live in a cave. they were happy in a jungle.

Thenguchya Labadichi Shiksha

by Madhavi Kunte

thaenguchya labhadachi shiksha is a story of thaengu who live in fairyland.he was lazy and greedy of delicious food. when fairy queen knows about she teaches him a lesson and takes a promise from him to work hard and not to lie ever.

Hyderabadcha Svatantrya sangrama: हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम

by Shankarbhai Patel

श्री. शंकरभाई पटेल आज हा ग्रंथ प्रकाशित होत असताना हयात नाहीत याबद्दल हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच मंडळाच्या सदस्यांनाही अत्यंत दुःख होत आहे. शंकरभाईंच्या या आठवणी म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र विश्वसनीय इतिहास आहे असे समजण्याचे कारण नाही. या लढ्यातील ज्या घटनांशी शंकरभाईंचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्याबद्दल तपशीलवार साक्ष देण्यावर शंकरभाईंचा जास्त भर आहे. ते स्वतः या लढ्यात सहभागी झालेले असल्यामुळे विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिणे साहजिक होते. स्वातंत्र्यलढ्याविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य वाचकाला त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना एक महत्त्वाचे साधन म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेले आहे.

Jaati Udgam: जाति उद्गम

by Prof. Pramod R. Dosi

चार्ल्स डार्विन लिखित “The Origin of Species” या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. प्रमोद रा. दोसी यांनी केला आहे तसेच हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तर्फे प्रकाशित केले गेले आहे. हे पुस्तक चार्ल्स डार्विनचे वैज्ञानिक साहित्य आहे. जो उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचा पाया मानला जातो.

Krantimargavaril Pravasi: क्रांतिमार्गावरील प्रवासी

by Prof. T. S. Kulkarni

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर क्रांतिकारक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी १९८९ च्या मार्चमध्ये निधन झाले. अंबाला शहराजवळच्या एका खेड्यात त्यांचा १५ सप्टेंबर, १८९२ रोजी जन्म झाला होता. ते मूळचे रजपूत असून त्यांचे चौधरी घराणे पंजाबात स्थायिक झाले. लहानपणीच त्यांची आई मरण पावली आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे पृथ्वीसिंहांचे वडील शादीराम यांना रोजगार शोधीत ब्रह्मदेशात जावे लागले. पृथ्वीसिंहांचे चुलते दोन पुतण्यांना घेऊन पंजाबातून ब्रह्मदेशात गेले. रशियातील १९०५ ची अयशस्वी क्रांती, बंगालच्या फाळणीविरुद्ध चाललेले आंदोलन, लाला लजपतरायांची हद्दपारी, लोकमान्य टिळकांना झालेली सहा वर्षांची शिक्षा वगैरे घटनांमुळे पृथ्वीसिंहांनी भारत स्वतंत्र करण्याचा ध्यास घेतला. ते १९१३ च्या अखेरीस अमेरिकेत गेल्यानंतर “गदर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत सामील झाले. हिंदुस्थानात परतल्यानंतर एकाच वेळी कलकत्त्यापासून पेशावरपर्यन्त सशस्त्र उठाव करण्याची योजना आखण्यात आली पण ती अयशस्वी ठरली.

Satyagrahi Samajvad Acharya Javadekar Nivdak Lekhsangrah: सत्याग्रही समाजवाद आचार्य जावडेकर निवडक लेखसंग्रह

by Suhas Palashikar

आचार्य जावडेकरांनी १९२० ते १९५५ या काळात विपुल लेखन केले. त्यांचे अनेक लेख त्या काळात पुस्तक किंवा छोटेखानी पुस्तिकांच्या रूपाने प्रकाशित झाले. वास्तविक आचार्यांचे लेखन आजही समाजवादाचे आणि गांधीवादाचे अभ्यासक तसेच तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी यांना फार उपयुक्त आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनेही या लेखनाचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील वैचारिक घडामोडींमध्ये जावडेकरांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांची माहिती कार्यकर्त्यांना असणे आणि त्या विचारांची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आचार्यांच्या लेखनाचे हे महत्त्व लक्षात घेता त्यांचे अधिकाधिक लेखन सहजगत्या उपलब्ध होणे आवश्यक ठरते. या भूमिकेतून आचार्यांच्या वैचारिक कार्याची काहीशी कल्पना येईल अशा प्रकारचा त्यांच्या निवडक लेखनाचा हा संग्रह तयार करण्यात आला आहे.

Suicha Janm

by Milind Vatave

Once upon time man lived in the cave. One day he had helped a bird and bird taught him how to made a needle.

Dhind FYBA - SPPU: धिंड एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Shankar Patil

“म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.” राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, “हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.” रामभाऊ हसून म्हणाले – “गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!” “अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.” “उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?” “अहो, काय चढलीया काय मला?” “अजून चढली न्हाई म्हणतोस?” “अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!” एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, “शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?” “शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?” “दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?” “माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?” “मग खाली जागा नव्हती काय?” “ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!” राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.

The Last Don: द लास्ट डॉन

by Mario Puzo

कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची... फार कशाला, साऱ्या जगाची डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं', तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां'चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बऱ्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द लास्ट डॉन' ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.

Vichar Kara Ani Shrimant Vha: विचार करा आणि श्रीमंत व्हा

by Napoleon Hill

“थिंक अॅण्ड ग्रो रिच” हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे. स्वतःची ध्येये ओळखा, खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा, जीवनात जे हवे ते मिळवा. परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा. या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.

Cheery Land Paropakar

by Shri. Ekanath Aavhad

a tree portrays its Importance to the nature and how it helps everybody and tells about a man's selfishness in marathi.

Jangalchi Rani

by T. T. Sawant

This is a story of the lioness. Lioness lost her cub. lioness roaring and village people scared. read story what happens next.

Refine Search

Showing 76 through 100 of 1,427 results