Browse Results

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results

Akraman: आक्रमण

by D. D. Karve

दि. धों. कर्वे यांनी कोन्राड लोरेंत्स लिखित यांच्या ‘ऑन अग्रेशन’ या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ह्या कादंबरीचा विषय “आक्रमण” हा आहे. म्हणजे पशू व मानव ह्यांच्यात जी उपजत अशी लढाऊ वृत्ती आपल्या सजातीयांबद्दल असते तिच्याबद्दल येथे ऊहापोह केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात लोरेंत्झने पृष्ठवंशीयांतील आक्रमक प्रवृत्तीच्या उत्क्रांतीचा विचार केलेला आहे. त्याने असे दाखवून दिले आहे की आक्रमक प्रवृत्ती व लुटारूपणा किंवा शुद्ध हल्लेखोरपणा हे दोन अगदी वेगळे आहेत. आक्रमक प्रवृत्ती ही आपल्या प्रदेशाच्या संरक्षणाकरता, तसेच एखाद्या चोहीकडून वेढलेल्या प्राण्याच्या बचावाकरता जरूर आहे आणि ती इतर जन्मजात गुणांबरोबरच मिश्रित होऊन स्वजातीय प्राण्याचा नाश शक्य तितका कमी करते. मानवाजवळ आपली वर्तणूक संस्कारक्षम करण्याचे अनेक उपाय आहेत व त्यांतले पुष्कळ प्राण्यांच्याशी साधर्म्य दाखवणारे आहेत. एकंदरीतच “आक्रमण” हे पुस्तक त्या विषयाच्या तज्ज्ञाने लिहिले असून अत्यंत आकर्षक व माहितीपूर्ण असे झाले आहे.

Aurangzebacha itihas: औरंगजेबाचा इतिहास

by Sir Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.

Bandkhoriche Tattvadnyan: बंडखोरीचे तत्त्वज्ञान

by Shree. B.V. Marathe

“बंडखोरीचे तत्त्वज्ञान” हा लेख अल्बेर कामूच्या “द रिबेल” या ग्रंथाचे मराठी भाषांतर केलेले आहे. “बंडखोरीचे तत्त्वज्ञान” या ग्रंथात समाजातील समाजातील, विशेषतः पश्चिम युरोपमधील बंड आणि क्रांतीच्या आधिभौतिक आणि ऐतिहासिक विकासावर प्रकाश टाकला आहे. अल्बेर कामूचे ‘बंडखोर’ म्हणजे राजनीतीचे तत्त्वज्ञान. गेल्या दोन शतकातील इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यातील ज्ञानसंपदेच्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या युरोपमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक परिस्थितीचे ते उत्कृष्ट विवेचन व विवरण आहे.

See You At The Top: सी यू एट द टॉप

by Zig Ziglar

'सी यू एट द टॉप' या त्यांच्या सर्व विक्रम मोडणाऱ्या अफलातून पुस्तकाची 25 वी रौप्यमहोत्सवी सुधारित आवृत्ती काढण्यात येत असून, हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक विकास आणि वैयक्तिक यशासाठी काळाच्या चाचणीवर उतरलेलं सूत्र घेऊन पायरीपायरीने स्पष्ट करणारं अभिजात अमेरिकन पुस्तक आहे. ज्यांना या पुस्तकातील तत्त्वांनी मार्गदर्शन केले आहे, अशा वाचकांच्या पिढ्यांसाठी, त्या काळासाठी यातील तत्त्वज्ञान खरे ठरले आहे. 'सी यू अॅट द टॉप'चा अजूनही महामंडळ, शाळा, सरकारी संस्था, विक्री संस्था आणि सुधारगृहांसारख्या संस्थांमध्ये, जिथे कार्यप्रेरणा आणि स्वविकास ही महत्त्वाची ध्येयं असतात अशा ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि तरुण लोकांसाठी उपयुक्त ठरलेल्या 'आय कॅन (मी करू शकतो)' या अभ्यासक्रमाचा हे पुस्तक पाया ठरले आहे.

Yuddha Ani Shanti: युद्ध आणि शांती

by Prof. A. N. Pednekar

प्रस्तुत ग्रंथ “युद्ध आणि शांती” हा टॉल्‌स्टॉयच्या “WAR AND PEACE” या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद आहे. सदर अनुवाद मंडळाच्या वतीने प्रा. आ. ना. पेडणेकर यांनी केला असून तो मंडळाच्या भाषांतरमालेत प्रकाशित करण्यात आला आहे.

Bhumika Shilp: भूमिका शिल्प

by K. Narayan Kale

स्तानिस्लाव्‌स्कीच्या “Building a Character” या ग्रंथाचे भाषांतर के. नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. चारित्र्य घडवताना, ते स्पष्ट करतात की वर्णाची बाह्य अभिव्यक्ती त्या पात्राच्या आंतरिक जीवनातून वाहायला हवी: त्याच्या आठवणी, विश्वास, पूर्वाभिमान इ. त्यानंतर अभिनेत्याचे बोलणे, पेहराव आणि हालचाल (हावभाव, चेहऱ्यावरील हावभाव इ.) या पात्राच्या आंतरिक अनुभवाचा पुरावा देणारे मार्ग लेखकाने स्पष्ट केला आहे.

Islamachi Samajik Rachana: इस्लामची सामाजिक रचना

by Shreepad Kelkar

हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ‘ड्रिस्क्रिप्टिव्ह सोशिऑलॉजी’ च्या सूत्रानुसार पुढील संशोधन म्हणून हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सर ट्रस्टीजच्या विनंतीवरून प्रथम लिहिण्यात आला. सर्व जगातील मुस्लिम समाजाची समान धार्मिक श्रद्धेतून उद्‌भवलेली अशी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत ती एक संपूर्ण विषय म्हणून अभ्यासण्याजोगी आहेत. इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांची जीवनपद्धती व रचना यांच्यावर इस्लाम धर्माचा किती व कसा प्रभाव पडलेला आहे याचा शोध घेणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे दोन खंड अनुक्रमे १९३१ व १९३३ मध्ये ‘सोशिऑलॉजी ऑफ इस्लाम’ या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाच्या संदर्भात पहिल्या आवृत्तीमधील माहितींत जरूर त्या सुधारणा हे पुस्तक लिहिताना केल्या आहेत.

Khadaghast Ki Sanyast Khand 1: खड्‌गहस्त की सन्यस्त खंड १

by Shri. G.V. Vaidya

स्ताँदाल लिखित “Scarlet and Black” या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. गो. वि. वैद्य यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. “खड्‌गहस्त की सन्यस्त खंड 1” ह्या कादंबरी मध्ये स्ताँदालच्या विशिष्ट एकतानतेचे व नितांत शांतीचे क्षण आढळतात, तरी प्रारंभापासून अखेरीपर्यंत ती कादंबरी म्हणजे एक संघर्षकथाच आहे. गतिमान ताण-तणाव व नाट्यात्मकता हे तिचे स्थायीभाव आहेत. लेखकाने त्याच्या नायकाला कल्पनेने ज्या प्रसंग परिस्थितीत टाकले आहे ती खुद्द त्याच्यावर आली असता त्याने त्या नायकाच्याच जाणीवा संवेदना व्यक्त केल्या असत्या. कादंबरीतील अनेक प्रसंगांचे साम्य प्रत्यक्षात घडलेल्या प्रसंगांशी असले तरी कादंबरी म्हणजे काही स्ताँदालच्या अनुभूतीची निव्वळ लेखी नक्कल नव्हे; उलट त्याच्यातील कलाकाराने त्याच्या अनुभूतीचे चिकित्सक व काही वेळी आदर्शभूत स्वरूप दाखविले आहे.

Don Quixote Bhag 2: डॉन क्विक्झोट भाग २

by D. N. Shikhare

सरव्हँटिस्‌-लिखित ‘Don Quixote Part 2’ या ग्रंथाचा भागाचा मराठी अनुवाद श्री. दा. न. शिखरे पुणे यांनी केला असून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाच्या भाषांतरमालेखाली ‘डॉन क्विक्झोट’ भाग २ प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये सरव्हँटिस्‌ने लिहिले की पहिले अध्याय "ला मंचाच्या संग्रहणातून" घेतले गेले आहेत आणि बाकीचे मूरिश लेखक सिड हॅमेटे बेनेंगेली यांनी अरबी मजकुरातून भाषांतरित केले आहेत. ही कल्पित युक्ती मजकुराला अधिक विश्वासार्हता देते, असे दिसते की डॉन क्विक्सोट एक वास्तविक पात्र आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान, नायक सराईत, वेश्या, शेळीपालक, सैनिक, पुजारी, पळून गेलेले दोषी आणि अपमानित प्रेमींना भेटतात. उपरोक्त वर्ण कधीकधी वास्तविक जगातील घटनांचा समावेश असलेल्या कथा सांगतात. डॉन क्विक्सोटच्या कल्पनेने त्यांच्या गाठीभेटी शूर शोधांमध्ये वाढवल्या जातात. डॉन क्विक्सोटची स्वतःशी संबंधित नसलेल्या बाबींमध्ये हिंसक हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती आणि कर्ज न भरण्याच्या त्याच्या सवयीमुळे एकांत, दुखापत आणि अपमान होतो (सांचो बहुतेकदा पीडित असतो). शेवटी, डॉन क्विक्सोटला त्याच्या गावी परतण्यास राजी केले जाते.

Mi Isadora: मी-इझाडोरा!

by Dr Rohini Bhate

“मी-इझाडोरा!” हे पुस्तक इसाडोरा डंकन यांच्या “माय लाईफ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुध्द बंडेखारी करणारी मनस्विनी. स्वत:च्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुध्द जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुध्दिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वत:चं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणाऱ्या या दोघींना बांधणाऱ्या सहानुभवाच्या धाग्यातून अनुवादलेले आत्मचरित्र.

Dasharupak Vidhan: दशरूपक-विधान

by Prof. R.P. Kangle

भरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या अभिजात संस्कृत ग्रंथातील नाटक व नाट्यशास्त्रविषयक अध्याय १८ व १९ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवगुप्ताच्या “अभिनवभारती” टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले आहे. नाट्याचे प्रकार, व्याख्या व रचना यासंबंधीचे विवेचन भरतमुनींनी केले आहे. “दशरूपनिरूपणम्‌” नामक अध्याय १८ मध्ये नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन केले आहे. “इतिवृत्त नामक अध्याय १९ मध्ये कथानकाचा विचार केला आहे. कथानकाच्या अवस्था, अर्थप्रकृती, सन्धी, संघ्यंगे, संध्यंतरे, पताकास्थान इत्यादींचे विवेचन केले असून शेवटी नाटकात सर्वप्रकारच्या लोकस्वभावाचे दर्शन घडवावे असे सांगून नाटकाच्या रचनेविषयी काही सूचना केल्या आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रात ज्या अनेक विषयांचे विवेचन आहे त्यांपैकी नाटक, प्रकरण आदी रूपकांचे प्राधान्य निर्विवाद आहे. कारण नटांच्या द्वारा रंगभूमीवर प्रस्तुत केले जाणारे जे नाट्य ते मुख्यत्वेकरून ह्या रूपकांच्या प्रयोगाशीच संबद्ध आहे. इतर बहुतेक विषय ह्या नाट्यप्रयोगाच्या संदर्भात अनुषंगाने आले आहेत. तेव्हा रूपकांच्या विवेचनाला ह्या ग्रंथात महत्त्वाचे स्थान असावे यात आश्चर्य नाही.

Dharma Ani Vidnyan: धर्म आणि विज्ञान

by V. V. Kuwadekar

''धर्म आणि विज्ञान'' हे पुस्तक बर्ट्रान्ड रसेल लिखित (RELIGION AND SCIENCE) या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. अनुवादक वि. वा. कुवाडेकर यांनी केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. धर्म आणि विज्ञान ही समाजजीवनाची दोन अंगे आहेत. त्यांतील पहिले अंग म्हणजे धर्म. मानवी मनःप्रवृत्तीच्या इतिहासाची आपणास ज्या काळापासून काहीतरी माहिती आहे त्या कालापासून हे अंग महत्व पावलेले आहे. त्याचे दुसरे अंग म्हणजे विज्ञान. हे ग्रीक व अरब लोकांत काही काळ, आणि तेही अधूनमधून भासमान झाले. पण, सोळाव्या शतकात मात्र ते एकदम महत्पदास चढले आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनातील कल्पनांना, आणि संस्थांना अधिकाधिक प्रमाणात आकार दिला आहे. धर्म आणि विज्ञान यात एक दीर्घकाल संघर्ष चालू असून त्यात काही वर्षापूर्वीपर्यंत विज्ञानच नेहमी विजयी ठरले आहे. परंतु रशिया व जर्मनी या देशांत नव्या धर्माचा उदय झाल्यामुळे, आणि त्या धर्माला मिशनरी कार्याच्या विज्ञाननिर्मित नवसाधनांची जोड मिळाल्यामुळे हा प्रश्न, विज्ञानयुगाच्या प्रारंभी होता तितकाच पुनश्च शंकास्पद ठरला आहे. त्यामुळे, परंपरागत धर्माने शास्त्रीय ज्ञानाशी चालविलेल्या युद्धाची कारणे व त्या लढ्याचा इतिहास तपासून पहाणे हे पुन्हा एकवार महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.

Gandhi: गांधी: कार्य व विचारप्रणाली

by Prof. Bhaskar Ramchandra Bapat

गांधी आणि माओ या आधुनिक काळातील दोन अलौकिक क्रांतिकारक व्यक्ती होत. ‘पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ ए गन’ असे म्हणणाऱ्या माओचे गांधींशी काय साम्य असे प्रथमतः वाटते. वरील वचनामध्ये माओ शासनसत्तेविषयी विलक्षण जागरूकता दाखवितो; समाजिक व्यवहारात सत्ता कोणाच्या हाती आहे हा मोक्याचा प्रश्न असतो हे स्पष्ट करतो. गांधी अराज्यवादी म्हणून ओळखले जातात.

Pandit Shivnath Shastri Yanche Atmacharitra: पंडित शिवनाथ शास्त्री यांचे आत्मचरित्र

by Parashuram Sadashiv Desai

पंडित शिवनाथ शास्त्री यांच्या “आत्मजीवनी” या बंगाली पुस्तकाचा मराठी अनुवाद परशुराम सदाशिव देसाई यांनी केला तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित केला गेला आहे. पंडित शिवनाथशास्त्री हे बंगालमध्ये जुन्या जमान्यात होऊन गेलेले एक विद्वान समाजसुधारक आहेत. त्यांनी या आत्मचरित्रात आपल्या जीवनाचा जन्मादारम्य वृत्तांत मोकळेपणाने आणि निस्पृहतेने दिला आहे. त्यांचे कार्य विविध होते. ब्राह्मसमाजाचे ते कडवे पुरस्कर्ते होते. पुनर्विवाह, बालविवाहप्रतिबंध, जातपात एकीकरण यांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यामुळे या आत्मचरित्रात त्यांच्या जमान्यातील चालरीती, रूढी, ज्ञातीबंधने, पूजा-अर्चा, संस्कारसंस्कृति, सुधारक-दुर्धारक, धर्मसुधारक आणि कर्मठ या सर्वांसंबंधीचे विवेचन आणि त्यांच्यातील संघर्षही स्वाभाविकपणाणेच आले आहेत.

Pashchatya Rog Chikitsa Khand 2: पाश्चात्य रोग चिकित्सा खंड २

by Dr G. E. Bomma

डॉ. जी. ई. बोमाँ लिखित “Medicine: Essentials For Practitioners and Students” या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉ. मधुकर रानडे, मुंबई यांनी ग्रंथविषयाची माहिती मूळ ग्रंथकाराप्रमाणेच देऊन पण मराठी भाषेच्या प्रकृतीशी मेळ बसेल अशारीतीने केला आहे. तसेच डॉ. बोमाँ यांच्या मूळ ग्रंथातील मूलभूत वैद्यकविज्ञान मराठी भाषांतरात कायम ठेवले असून भारतीय संदर्भात मूळ ग्रंथाचा विषय नीट स्पष्ट करण्यासाठी डॉ. रानडे यांनी, मूळ प्रकाशकांच्या परवानगीने, सदर भाषांतरात आवश्यक ते बदल केले आहेत.

Pita Putra: पिता-पुत्र

by Prof. V.V. Badave

इवान तुर्गेनेव लिखित “FATHERS AND SONS” या कांदबरीचा मराठी अनुवाद प्रा. व. वि. बडवे यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. “पिता-पुत्र” ही कादंबरी या पार्श्वभूमीवर लिहिली गेली आहे. यातील जुनी पिढी ही मृतप्राय होत असलेल्या स्वप्नाळू, सौंदर्यवादी आणि प्रतिगामी विचारसरणीची प्रतिनिधी आहे; तर नवी पिढी कार्ल मार्क्सच्या विचारांची गंधवार्ताही नसलेली क्रांतिकारक व आवेशयुक्त पिढी आहे. तुर्गेनेवने या कादंबरीत कमीतकमी पात्रे आणि प्रसंग यांच्या साह्याने, गुप्त कारस्थाने किंवा सनसनाटी प्रसंग यांना पूर्णपणे फाटा देऊन, तत्कालीन महत्त्वाच्या समस्यांचे नाट्यपूर्ण चित्रण केले असून भावी कालात होणाऱ्या क्रांतीचे दिग्दर्शन केले आहे. काटकसरीने वापरलेली साधनसामुग्री व प्रसादपूर्ण शैली यामुळे ही कथा कलापूर्ण झालेली आहे.

Ras-Bhav-Vichar: रस–भाव–विचार

by Prof. R. P. Kangle

भरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या संस्कृत ग्रंथातील रससिद्धान्तविषयक अध्याय ६ व ७ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवभारतीच्या टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले. रसाची व्याख्या व सविस्तर उपपत्ती भरतमुनीने नाट्यशास्त्रात सांगितली आहे. त्यानंतर झालेल्या नाट्यविषयक व काव्यविषयक शास्त्रग्रंथांमध्ये भरतमुनीचाच कमीजास्त प्रमाणात अनुवाद करून रससिद्धान्त चर्चिला आहे. रसाध्याय ६ व भावव्यंजक अध्याय ७ मिळून नाट्यशास्त्रामध्ये रससिद्धान्ताचे विवेचन केले आहे. सहाव्या रसाध्यायात रस, भाव इत्यादी नाट्याची अकरा अंगे व त्या प्रत्येक अंगाचे भेद यांचा नामनिर्देश करून पुढे शृंगार, हास्य इत्यादी आठ रसांचे स्थायिभाव, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारिभाव यांचे विवेचन केले आहे. सातव्या अध्यायात प्रथम भाव, विभाव व अनुभाव यांच्या स्वरूपाचे विवेचन असून नंतर स्थायिभाव, व्यभिचारिभाव यांचे विवेचन आहे.

Visave Shatak Ani Samajwad: विसावे शतक आणि समाजवाद

by Prof. K.N. Valsangkar

आपल्या कल्पनेतील समाजवादी समाजाच्या जीवनाचे कलाक्तक चित्र कल्पक लेखकांनी रंगविले आहे. वास्तववादी इतिहासकारांनी समाजवादी विचार आणि आचारातील प्रगतीच्या मार्गातील निरनिराळ्या गटांचा मागोवा घेतला आहे. भविष्यातील समाजवादी समाजाची घटना राजकीय सैद्धांतिकांनी तयार केली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली आहे; एवढेच नव्हे तर सत्ता मिळाल्यास प्रत्यक्ष काय कृती केली जाईल याची माहिती देणारे अनेक कार्यक्रम समाजवादी पक्षाने मांडले आहेत. समाजवादी नीतिशास्त्राच्या भूमिकेतून आर्थिक व्यवस्थेच्या क्षेत्राचा विचार या ठिकाणी अभिप्रेत आहे. “समाजवाद हा मूलतः नैतिक प्रश्न आहे आणि मानव व त्याचे बांधव यांच्यातील परस्पर संबंधाशी समाजवाद प्रामुख्याने निगडीत आहे.” चांगल्या समाजाच्या आमच्या कल्पनेत अंतर्भूत असलेला आदर्शवाद आणि असा समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेला वास्तववाद या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या उद्याच्या समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत व्यापक नि तर्कनिष्ठ भूमिका मांडणे हाच हेतू आहे.

Samajik Karar: सामाजिक करार

by Vasant Bhagwant Karnik

झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.

Buddhi Prerana Va Kranti Bhag 2: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २

by B. R. Sunthankar

श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Buddhi Prerana Va Kranti Bhag 1: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग १

by B. R. Sunthankar

श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग १ ग्रंथाचा हा प्रथम खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Marathyanchya Itihasachi Sadhane Portuguese Daptar Khand 3: मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर खंड ३

by Shri S.S. Desai

महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असलेली अशा प्रकारची साधने मराठीत अनुवादून प्रकाशित करण्याचा जो कार्यक्रम मंडळाने आखला आहे त्यातील हे पहिले पुस्तक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाने ज्या विविध प्रकाशनयोजना हाती घेतल्या आहेत त्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण इतिहासाच्या साधनांचे प्रकाशनही अंतर्भूत होते. पोर्तुगीज, डच व फ्रेंच यांचे भारताशी दळणवळण १७ व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांच्या तत्कालीन दप्तरांमधील महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासाची पुष्कळ साधने अजून इतिहास–लेखकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता, पोर्तुगीज, डच, आणि फ्रेंच उत्तम रीतीने जाणणाऱ्या स्वदेशी व विदेशी इतिहास–संशोधकांच्या प्रयत्नांची गरज आहे. श्री. ए. बी. द. ब्रागांस परेरा, अध्यक्ष, पुराणवस्तु संशोधन विभाग, पोर्तुगीज शासन, गोवा, यांनी परिश्रमपूर्वक केलेले संशोधन अनेक खंडांत पोर्तुगीज भाषेत प्रसिद्ध केले. त्यांतील खंड ३ रा, आशिया विभाग, या ग्रंथातील मराठ्यांच्या इतिहासाशी संबद्ध असलेली प्रकरणे श्री. स. शं. देसाई यांनी आस्थापूर्वक मराठीमध्ये परिश्रमपूर्वक हा अनुवाद केला आहे.

Dharmashastracha Ithihas Purvardha: धर्मशास्त्राचा इतिहास पूर्वार्ध

by Yashwant Abaji Bhat

भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे ह्यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘History of Dharmashastra’ ह्या विस्तृत आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथाच्या मराठीमध्ये केलेल्या सारांश स्वरूपाच्या अनुवादाचा पूर्वार्ध मराठी वाचकांपुढे सादर करण्यात आला आहे. “भारतामधील चालीरीतींमध्ये जे फेरबदल घडून आले आहेत त्यांच्या संबंधी, त्याचप्रमाणे भारतीय समाजरचनेमध्ये झालेल्या स्थित्यंतराविषयी आणि सामान्यतः कालानुक्रमाविषयी शास्त्रीवर्गात चमत्कारिक भावना प्रचलित आहेत आणि शास्त्रीवर्गाचे भारतातील सामान्य जनसमुदायावर फार मोठे वजन आहे ह्याकरिता ह्या ग्रंथाचे संस्कृत भाषेत आणि मराठी भाषेमध्ये भाषांतर केले आहे. “धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे विवेचन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकित्सा करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने पाहिल्यास हा ग्रंथ त्या विषयावरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरूपाचा आहे.

Mahatma Gandhiche Vichar - Novel: महात्मा गांधीचे विचार - कादंबरी

by R. K. Prabhu U. R. Rao

श्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.

Dharmarahasya: धर्मरहस्य

by Dr K. L. Daptari

‘धर्मरहस्य’ हा निबंध हिंदुधर्माचा बुद्धिवादी पद्धतीने काढलेला उत्कृष्ट निष्कर्ष आहे. मानवी बुद्धि स्वतंत्र रीतीने ज्या पारलौकिक अतींद्रिय तत्त्वांचे किंवा सिद्धांतांचे आकलन करू शकत नाही अशा अमरत्व, ईश्वर, पुनर्जन्म, दिव्यदृष्टी इत्यादि तत्त्वांचा वा सिद्धान्तांचा अंगीकार न करता मानवी बुद्धीस समजू शकेल व पटू शकेल अशा हिंदुधर्मीय सिद्धान्तांची सुसंगत तर्कशुद्ध रचना या पुस्तकात केलेली आढळते. वेद, स्मृति व पुराणे या हिंदुधर्मशास्त्राच्या व धर्मेतिहासाच्या ग्रंथांचे दीर्घकालपर्यंत परिशीलन करून त्यांची व्यवस्थित उपपत्ती येथे मांडली आहे. या निबंधात वेद, स्मृती व पुराणे यांची ऐतिहासिक दृष्टीने मीमांसा करून त्यातील निष्कर्ष व्युत्पादिले आहेत. ऐतिहासिक पद्धती व ग्रंथप्रामाण्य पद्धती अशा दोन परस्परविरोधी पद्धती स्वीकारणारे हिंदुधर्म मीमांसकांचे दोन विरोधी संप्रदाय आहेत.

Refine Search

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results