Browse Results

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results

Aarsa

by Meenakshi Sardesai

This is a story of Prince Pavan. He was about twenty-two years and everybody was looking for good match for him. The condition was that the girl image should look spotless in the magical mirror. Pavan Kumar was humble, kind and tolerant. Sagar Gupta secretariat gave him the knowledge of the state. It is a matter of selflessness, how to handle the welfare of the people, how to keep peace in the state, and also how to give justice. So they wanted a wife with a similar character. Chaiti was a poor girl from a village and she fulfilled all the requirement and married Prince Pawan.

Aarogya Va Sharirik Shikshan class 12 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. व्यायाम व आरोग्याची जाणीव निर्माण होण्यासाठी तसेच योग्य सवयी लागण्यासाठी त्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. भावी आयुष्य निरामय होण्यासाठी योग्य व्यायाम, आहार, खेळ व कृतिशील जीवनशैली याची सवय लागावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा आयुष्यभर व्यायाम वर्तनाचा विकास घडवणारा, मानवी हालचालींचे ज्ञान देणारा, खेळातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणारा, 'स्व' ची जाणीव निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा, मनोरंजन यांच्या परस्पर संबंधाविषयी माहिती देणारा आहे. सुदृढ शरीर व उत्तम मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा विचार करून आवश्यक असलेली माहिती या पाठ्यपुस्तकात कार्यपुस्तिकेच्या स्वरूपात दिली आहे. विद्यार्थ्यांचे क्रीडाकौशल्य विकसित व्हावे व उपक्रम करताना त्यांचे मनोरंजन होऊन आनंद मिळावा व त्यामागची शास्त्रीय माहितीही मिळावी हा दृष्टिकोन ठेवून लेखन केले आहे.

Aarogya Va Sharirik Shikshan Class 11 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकात शारीरिक सुदृढता विकसन, स्थूलता, निसर्ग व आहार, योग आणि मुद्रा, उत्तेजक द्रव्ये, दुखापतीचे व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाकडून सक्रियतेकडे, खेळातील व्यवसाय संधी, विविध खेळ, विविध क्रीडा स्पर्धा, खेळाडूंच्या यशोगाथा या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असून उद्याच्या आरोग्यसंपन्न व उद्यमशील भारताचे आदर्श नागरिक आपण बनणार आहात. यासाठी शरीराबरोबरच मनाचीही तयारी असणे गरजेचे आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, कृतिप्रधानता व ज्ञानरचनावादावर भर दिला जावा, शारीरिक सुदृढतेच्या किमान क्षमता प्राप्त कराव्यात, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून या पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे.

Aaplyala Kaajwyansarkhe Chamchamtaa Kaa Yet Naahi?

by Nabanita Deshmukh

तुम्हाला माहीत आहे का, काजवे का चमकतात? गंमत म्हणजे काजव्यांची बाळं आपल्या प्रकाशाचा उपयोग शत्रूला दूर पळवण्यासाठी करतात. या पुस्तकात बुडी मारलीत तर चमचम करत, अंधार उजळून टाकणाऱ्या काजव्याविषयी आणखीही बऱ्याच गमती कळतील.

Aantararastriya Arthashastra TY BA Pune University

by G. J. Lomate DR D. G. Ushir R. K. Datir

Aantararastriya Arthashastra Marathi text book for Third year from The Pune Universtity in Marathi.

Aantararastriya Arthashastra T.Y.B.A. Savitribai Phule Pune University

by R. K. Datir Prof. G. J. Lomate D. G. Ushir

Aantararastriya Arthashastra text book for T.Y.B.A. from Savitribai Phule, Pune University in Marathi.

Aamod Sampurn-Sanskritam class 9 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे एकूण सोळा अध्याय आहेत तसेच एक घटक परिक्षेचा एक भाग दिला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Aamod Sampurn-Sanskritam class 10 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये एकूण पंधरा अध्याय दिले आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Aamcha Baap Aan Aamhi: आमचा बाप आन् आम्ही

by Dr Narendra Jadhav

ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी - त्याच्याच शब्दात - ग्रथित केल्या आहेत. हे गृहस्थ पिताजी नव्हते. वडीलही नव्हते. तर सरळ, निर्मळ 'बाप' होते. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते. दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नव्हता, अथवा त्यांच्या लढाऊ बाण्याला ढळ पोचला नव्हता. 'किसी को डरना मत' हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता, आणि तोच त्यांचा जीवनधर्म होता. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी ते प्रभावित झाले होते. त्यांनी जातीयतेची, लोकापवादाची, वरिष्ठांच्या अधिकारांची; आणि मुख्य म्हणजे दारिद्र्याचीही भीती कधी बाळगली नाही. त्यांचे जगणे काळोखावर मात करत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे होते. जिथे भयमुक्ती असते तेथे निरामय आनंदही असतो. सर्व प्रतिकुलावर मात करणाऱ्या अशा आनंदाची पेरणी आपल्या सुदाम्याच्या संसारात करीत ते जगत होते आणि सर्वांना जगवत होते. या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती. गोष्ट लहान असो वा मोठी, माणसाने खाटे-अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते. म्हणून त्यांनी लोकलमधून विनातिकिट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून पकडले आणि त्याला तिकिट काढायला लावले. अशा वातावरणात आणि संस्कारात, त्यांनी आपल्या मुलांना वाढवले. असा बाप मिळणे हे मुलांचे सद्भाग्य आणि अशी मुले मिळणे हे बापाचेही सद्भाग्य. सामाजिक सोपानाच्या अंतिम पायरीवर जन्मलेली मुले आज त्याच सोपानाच्या सर्वोच्च पायरीवर उभी आहेत. कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्यात सर्वोच्च यश मिळवा ह्या त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले आहे. त्यांनी अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्राला सांगितले होते, तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या सामान्य माणसाला झाला तर ते खरे, एरवी निरर्थक. असा हा बाप. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा, त्यांची मने घडवणारा. मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला, आणि तरीही खूप मोठा असलेला. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च पदावर असलेल्या त्याच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ही हृद्य श्रद्धांजली.

Aaji Cha Chashma

by Rohini Nilekani

आजीचा चष्मा सारखा हरवतो. मग कधीतरी तिला चष्मा शोधण्यासाठी हुशार गुप्तहेराची मदत घ्यावी लागते!

Aaji

by Madhuri Purandare

A story of a small girl Radha. Her childhood memories describe in the story. Radha mentioned as the little grandmother.

Aaichi Shaletli Gammat

by Nandini Nayar

एक दिवस मीराची आई तिच्या शाळेत गेली पण तिथे तर कुणीच नव्हतं. मीरा, वर्गातली मुलं, शिक्षक सगळे कुठे गायब झाले होते?

Aaich Aaikav

by Bha. M. Vaidya

This a story of mice. One old woman was lived in the hut. mice and four baby mice were lived near the hut. The old woman was upset with mice. One day she keeps a cage inside the hut. mice were stuck in the cage. read story what happens next.

Aai Viruddha Baai

by Shrikant Vishnu Bhosale

Life of a woman who lost her husband. she had a son, she fell in love with a man. the total family did not get along but this woman played the role of a mother of a son as well as a role of a woman to a man in marathi.

Aai Vadil Aani Mulancha Vyavhar: आई-वडील आणि मुलांचा व्यवहार

by Dada Bhagwan

मुलांच्या संगोपनात आई–वडिलांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आई–वडील असे प्रेमळ असावेत की त्यांचे प्रेम पाहून मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाही. आई–वडील मुलांना दटावत राहिले किंवा मारत राहिले तर मुले निश्चित त्यांचे ऐकणार नाही आणि उलट मार्गावर वळतील. आई–वडिलांच्या उच्च संस्कारामुळेच घरात आनंदमय, शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. काचे समान बालमनाला कसे हाताळायचे ? त्यांच्यावर उच्च संस्कार कसे घडवायचे ? तरुण पिढीसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार कसा करावा ? ह्याचे पूर्ण मार्गदर्शन ह्या संक्षिप्त पुस्तकात दिलेले आहे. त्याचबरोबर मुलांनाही तरुणवयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान कसे मिळवावे ? त्यांना स्वत:च्या आई–वडिलांसोबत कसा व्यवहार करावा ? आई–वडिलांच्या सेवेचे महात्म्य आणि त्यांचे उत्तम परिणाम कोणते ? ह्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा सुंदर मार्गदर्शन येथे संकलित केलेले आहे, जे निट समजून घेतल्याने आई–वडील आणि मुलांचा एकमेकांशी आदर्श व्यवहार नक्कीच संस्थापित करता येईल.

Aai

by Uddhav J. Shelake

Aai in a story . a woman working at farm. A day when the mother becomes angry on her son when he disobeys her and later she takes him near.

Aag Gaditil Sahal

by Surekha Panandikar

Chintu was invited to Delhi for accepting an award for essay writing competition. The Prime minister himself was going to handover the award to him. He was traveling by a train. In the train Chintu managed to catch some thieves who were robbing a trunk of another passenger. The police alarmed the people and the police caught hold of those fugitives. Instead of one Chintu received two awards. One for essay writing and one for bravery.

Aaela sutti devuya

by Meenakshi Sardesai

One day children decide to give rest to their mother from all house work. She goes to her cousin’s house. Father and children plan to do their jobs. Cooking was the most difficult part. Everybody helps. The cooked food is not like normal food. Chapati is different shape potatoes are burnt and so on. The cat drinks all the milk. The kitchen is in chaos. Suddenly mummy comes and the children become happy. All of them understand how difficult it is to manage the house.

Aadhunik Rajkiya Vishleshan Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-3 (G-3) CC-1E (3) साठी 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश आधुनिक राजकीय विश्लेषण ही एक अध्ययन शाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध विश्लेषणात्मक सिद्धान्तांचा आणि दृष्टिकोनांचा परिचय होणे आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल या उदात्त हेतूने 'राज्यशास्त्र अभ्यास मंडळ' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

Aadhunik Rajkiya Vishleshan 2 Paper 2 TYBA Sixth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण २ पेपर २ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R.G. Varadkar

राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए.भाग-3 साठी आधुनिक राजकीय विश्लेषण 2' हा पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यशास्त्राला अधिक शास्त्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने अमेरिका, जर्मनी अशा देशांतील राजकीय विश्लेषकांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रियेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संकल्पनांचा त्यांनी वापर केला. त्यांच्या या प्रयत्नातून आधुनिक राजकीय विश्लेषण पद्धतीचा उदय झाला. राज्यशास्त्राच्या विकासात या विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.

Aadarsh Rajya: आदर्श राज्य

by Dr J. V. Joshi

‘प्लेटो’ या जगद्‌विख्यात ग्रीक तत्त्वज्ञाच्या ‘रिपब्लिक’ या जगद्‌विख्यात तात्त्विक संवाद ग्रंथाचे हे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित होत आहे. ‘प्लेटोची आदर्श राज्य घटना’ हे श्री. जनार्दन गणेश जोगळेकर यांनी इ. स. १९३९ साली प्रसिद्ध केलेले भाषांतर दुर्मिळ झाले होते. त्यामुळे कॉर्नफोर्ड, जोवेट यांनी केलेली सर्व प्रसिद्ध इंग्रजी भाषांतरे ‘प्लेटो आणि रिपब्लिक’ यावर आधारलेले अभ्यास व संशोधन ग्रंथ समोर ठेवून, तत्त्वज्ञान विषयाचे जिज्ञासू, अभ्यासक यांना उपयुक्त ठरू शकेल अशी सुधारित संपादित आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा हा प्रयत्न. ‘रिपब्लिक’ ग्रंथाची भूमिका, मध्यवर्ती समस्या, त्यामधील तात्त्विक चर्चेत आलेले महत्त्वाचे विषय इत्यादी संबंधीचे विवेचन व रूपरेखा प्रस्तावनेत मांडली आहे. ‘प्लेटोच्या आदर्श राज्यात’ प्रस्थान ठेवण्यापूर्वीचे हे हृद्‌गत, त्याचा अंतरंग परिचय करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे वाटते.

20 Vya Shatakatil Maharashtracha Itihas Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: २० व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सैमिस्टरसाठी '20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास' हे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाचवे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

20 Vya Shatakatil Jagacha Itihas (1914-1992) TYBA Fifth Semester - SPPU: २० व्या शतकातील जगाचा इतिहास (१९१४ ते १९९२) टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Bhushan Govind Phadtare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या व समाज विज्ञान शाखांतर्गत इतिहास विषयाच्या तृतीय वर्ष कला (जनरल पेपर ३) वर्गासाठी असलेले विसाव्या शतकातील जगाचा इतिहास (१९१४ - १९९२) हे पुस्तक आहे. विसाव्या शतकाची सुरूवात ही पहिल्या जागतिक महायुध्दातून झालेली आहे. या युध्दामुळे जागतिक शांतता, सुरक्षितता व विश्वकल्याण या गोष्टीतर दुरच राहिल्या उलट पुन्हा युध्दमय परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाने शांततामय मार्गाचा वापर केला. या सर्वांची माहिती प्रकरणांमध्ये दिलेली आहे.

20 Vya Shatakatil Jagacha Itihas 1914-1992 T.Y.B.A. Savitribai Phule Pune University: 20 व्या शतकातील जगाचा इतिहास 1914-1992 तृतीय वर्ष कला सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठ

by N. S. Tamboli

20 व्या शतकातील जगाचा इतिहास (1914-1992) [History of the World in 20th Century (1914-1992)] हे पुस्तक सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाच्या जून 2015 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच यू. जी. सी. अभ्यासक्रमावर आधारित आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाने केलेल्या नियोजनानुसार 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय 'वर्ष कला'व्या जनरल पेपर-3 साठी 'विसाव्या शतकातील जगाचा इतिहास' (1941-1992) हा विषय सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात पाच प्रकरणे तर दुसऱ्या सत्रात चार प्रकरणे अशी एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यांपैकी पहिले प्रकरण 'संकल्पनांचा अभ्यास’ हे असून त्यात एकूण बारा संकल्पनांवर लेखन केले आहे. दुसरे प्रकरण पहिले महायुद्ध हे असून त्यात सुरुवातीला कारणे व परिणाम यांवर चर्चा केली असून पॅरिस शांता परिषद आणि राष्ट्रसंघाच्या कार्याचे टीकात्मक परीक्षण केले आहे. तिसरे करण रशियन राज्यक्रांतीचे असून त्यात सुरुवातीस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी विशद केली आहे. या क्रांतीतील लेनिनचे योगदान देताना त्याचे नवीन आर्थिक धोरण तसेच स्टॅलिन व त्याच्या काळातील पंचवार्षिक योजनांवर प्रकाश टाकला आहे. चौथे प्रकरण हुकूमशाहीचा उदय हे असून त्यात इटली, जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रातील अनुक्रमे मुसोलिनी, हिटलर व केमाल पाशा या हुकूमशहांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. पाचदे प्रकरण महामंदी हे असून त्याचे स्वरूप, कारणे व परिणामांचे विवेचन करताना महामंदी दूर व्हावी यासाठी तत्कालीन विविध उपाययोजनांची सविस्तर चर्चा केली आहे.

1984-George Orwell - Novel: १९८४-जॉर्ज ऑरवेलने - कादंबरी

by George Orwell

‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे. या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.

Refine Search

Showing 1,401 through 1,425 of 1,430 results