Browse Results

Showing 1,426 through 1,430 of 1,430 results

Swami: स्वामी

by Ranjeet Desai

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई: मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.

Ashru - Novel: अश्रू - कादंबरी

by Vishnu Sakharam Khandekar

या विसाव्या शतकानं जगाला बर्‍यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षातघेऊन वाईट करण्यास न कतणारा सामान्य माणूस.

Samajik Vaad: सामाजिक वाद

by Vinayak Sitaram Sarwate

आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.

Bhashashuddhi - Novel: भाषाशुद्धी - कादंबरी

by Shri. Balarao Savarkar

या पुस्तकांत वीर सावरकरांच्या भाषाशुद्धि या विषयावरील काही निवडक लेखांचे पुनर्मुद्रण करीत आहों. ह्यांतील बहुतेक लेखांचे पुस्तकरूपाने हे तिसरे पुनर्मुद्रण आहे यावरून या लेखांविषयींची मराठी वाचकवर्गाला वाटणारी अभिरुचि आणि आवश्यकता व्यक्त होत आहे. वीर सावरकर लिखित भाषा शुद्धी या पुस्तकामध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, अरबी, फारशी, इंग्रजी, परराष्ट्रीय, उर्दू, पारशी, इत्यादी भाषांचे महत्व व त्या भाषांचे एकमेकांशी असलेले वेगवेगळे अर्थ आणि एकमेकांमधील फरक कसा आहे हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Shetkaryancha Asud - Novel: शेतकऱ्यांचा आसूड - कादंबरी

by Mahatma Jyotirao Phule

महात्मा फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवरील अडचणी, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक व त्यावरील सरकारचे दुर्लक्ष हे सविस्तर पणे पुस्तकामध्ये दिलेले आहे.

Refine Search

Showing 1,426 through 1,430 of 1,430 results