Browse Results

Showing 1,026 through 1,050 of 1,590 results

Parane

by Shakuntala Phadanis

This a story of small girl Anita. She wanted special meals in every day. Anita mother doesn't like murmur on time eating. Mother decided to gave special food and without shouted at her. Anita also became a good girl and not demanded..

Pardesi: परदेशी

by Ratnakar Matkari

नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, 'परदेशी' या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!

Paris Ni Badashahacha Hat

by Shrimati Tara Chaudhari

A story of an old woman. Her husband was the warrior and died in the war. She was starving for food. She presents a sword to the king. Birbal helped her.

Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.

Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.

Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.

Parivartanachi Kshitije: परिवर्तनाची क्षितिजे

by Dr S. S. Bhosle

‘दलितमित्र’ रा. ना. चव्हाण यांचे निवडक लेख तसेच सतत पन्नास वर्षे किती विपुल आणि विविध विषयांवर मूलगामी चिंतन करणारे लेखन केले आहे. त्यांच्या लेखनामागील वृत्तीही समंजस, अनाग्रही सुधारकाची. लेखनात काटेकोर शब्दरचना आणि समतोल वृत्ती. कोठेही अभिनिवेश वा आक्रस्ताळेपणाचा मागमूस नाही. बहुजन समाजाने अज्ञानाची अंधारी वाट सोडून ज्ञानाचा प्रकाशमय मार्ग धरला पाहिजे, तीच खरी मुक्ती, हे त्यांच्या विचाराचे प्रमुख सूत्र. बहुजन समाजाच्या प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ राहील यात काही शंका नाही. त्यांचे हे वैचारिक संचित आजच्या नवीन पिढीला लाभावे यासाठी साहित्य-संस्कृती मंडळाने “परिवर्तनाची क्षितिजे” या शीर्षकाने त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन एकत्र केले आहे.

Paropakar

by Shri. Ekanath Aavhad

paropkar is a story of a mango tree. a mango who provide so many things to everyone selflessly. one day when one human broak some branches, hit with a stick and become of this one bird's nest fall down, in that nest few young birds stay. the tree gets angry and then what happend next read a story.

Paropakar Chichundri Ani Shalindar

by Baba Bhand

One day an old porcupine who had no strength goes to the house of mice and asks for shelter. The mice allow it to stay inside but the house was very small and not enough space for all of them to fit in. After few days the mice request the porcupine to leave. The porcupine denies to leave but instead asks the mice to vacate the house and go.

Paropakar Hich Khari Ishvarseva

by Baba Bhand

This is a story about a man named Murali staying on a mountain near a temple in a village. He was a very hard-working man. He was always busy and never said no to any work. The village people were jealous of him and criticized him. But he never listened to anybody but kept on doing his good job.

Paryatan Ani Adaratithya Vyavsthapan Kaushalya Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवस्थापन कौशल्य दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Rakshit Madan Bagde

या पुस्तकात ‘पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवस्थापन कौशल्ये’ या विषयाची माहिती दिली आहे. यात पर्यटनाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि विविध प्रकारांविषयी मार्गदर्शन दिलेले आहे. पर्यटक, प्रवासी, अभ्यागत आणि पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय असतात याची माहिती यात समाविष्ट आहे. आदरातिथ्य व्यवस्थापनात ग्राहक सेवा, निवास, हॉटेल व्यवस्थापन, खाद्यपदार्थ, सुरक्षा आणि वितरण प्रणालीचे महत्त्व सांगितले आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक उपाय आणि कौशल्ये यावर मार्गदर्शन दिलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात चांगले करिअर घडवता येईल.

Paryatan Arthashastra First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: पर्यटन अर्थशास्त्र प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अर्थशास्त्र अभ्यासक्रमात 'पर्यटन अर्थशास्त्र' हा कौशल्य वृद्धीकरण अभ्यासक्रम (SEC) म्हणून समाविष्ट आहे. या पुस्तकात पर्यटनाच्या व्याख्या, प्रकार, महत्त्व, आर्थिक आणि सामाजिक परिणाम, तसेच भारतातील पर्यटनासाठी सरकारी धोरणे यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. पुस्तकातील भाषा विद्यार्थी-अनुकूल असून अभ्यासक्रमाशी सुसंगत उदाहरणे आणि तक्ते सादर करण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यटन उद्योगाचे आर्थिक महत्त्व समजणे सुलभ होते.

Paryatan Bhugol 1 TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल १ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Arjun Haribhau Musmade Dr Arjun Baban Doke Dr Dilip Dnyaneshwar Muluk

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘पर्यटन भूगोल’ विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. ‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख तसेच पर्यटन विकासाचे प्राकृतिक, सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय घटकांचा विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. यामध्ये हवामान, अभयारण्ये, धार्मिक-ऐतिहासिक-क्रीडा स्थळे, पर्यटकांची सुरक्षितता या बाबींचा विचार केलेला आहे. पर्यटन वर्गीकरणामध्ये राष्ट्रीयत्व, प्रवास कालावधी, उद्देश तसेच पर्यटन संकल्पनेमध्ये कृषी पर्यटन, इको टुरिझम, वन्यजीव पर्यटन, आरोग्य पर्यटन, क्रीडा पर्यटन यांचा समावेश केलेला आहे. पर्यटनातील पायाभूत सुविधेमध्ये वाहतुकीच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका, मार्गदर्शकाचे गुण व कर्तव्ये याचे मुद्देसूद वर्णन केलेले आहे. याबरोबरच प्रसारमाध्यमांचाही उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे. ‘पर्यटन भूगोल' या पुस्तकात जागतिक व आपल्या भारत देशातील सर्व पर्यटन स्थळांचे विस्तृतपणे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक तसेच पर्यटन करणाऱ्या सर्व पर्यटकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Paryatan Bhugol 2 TYBA Sixth Semester - SPPU: पर्यटन भूगोल 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Arjun Haribhau Musmade Dr Arjun Baban Doke Dr Dilip Dnyaneshwar Muluk

पर्यटन भूगोल 2 या पुस्तकात प्रकरण एकमध्ये पर्यटनातील निवासस्थानाची भूमिका या प्रकरणात निवासस्थानाचे प्रकार यामध्ये हॉटेल, मोटेल, पथिकाश्रम, खाजगी व शासनमान्य निवासस्थाने तसेच निवासव्यवस्थेची भूमिका या बाबींचा समावेश केलेला आहे. प्रकरण दोनमध्ये पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिणाम यांचे सखोल स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच शाश्वत विकासात पर्यटनाची भूमिका व धोरण याचाही अभ्यास केलेला आहे. प्रकरण तीनमध्ये पर्यटन विकासाचे नियोजन आणि धोरणे यामध्ये जागतिक पर्यटन संघटना (UNWTO), भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या सर्वांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रकरण चारमध्ये पर्यटन स्थळांचे अध्ययन यामध्ये मनाली व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे, ताजमहाल व रायगड किल्ला तसेच काझीरंगा व मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने या सर्व स्थळांचे अध्ययन विस्तृतपणे केलेले आहे. 'पर्यटन भूगोल 2' या पुस्तकात वरील सर्व मुद्द्यांनुसार पर्यटन स्थळांचे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Paryatan Bhugol First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: पर्यटन भूगोल प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Sanjay Dagu Pagar Prof. Dr. Dilip Dnyaneshwar Muluk Prof. Nitin Bajirao Borse

पर्यटन भूगोल हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत विकसित केले गेले आहे. "पर्यटन भूगोल" या पुस्तकात पर्यटनाच्या संकल्पना, घटक, प्रकार आणि नियोजनाच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केला आहे. पुस्तकामध्ये पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटनाच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आहे. सत्र 1 मध्ये पर्यटन भूगोलाची व्याख्या, स्वरूप, पर्यटनाचे वर्गीकरण व आधुनिक प्रकार मांडले आहेत. सत्र 2 मध्ये सहल नियोजन, आवश्यक तंत्रज्ञान, पासपोर्ट-व्हिसा प्रक्रिया, आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सहल नियोजनाचा समावेश आहे. पुस्तक विद्यार्थ्यांसह, पर्यटन व्यवसायाशी संबंधित प्राध्यापक, संशोधक व पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Paryatan Bhugol Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: पर्यटन भूगोल दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Shailesh Wagh Prof. Siddharth Sonawane

'पर्यटन भूगोल' हे पुस्तक प्रथम वर्ष कला (सत्र-२) साठी NEP अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. डॉ. शैलेश वाघ आणि प्रा. सिद्धार्थ सोनावणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पुस्तकात पर्यटन विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय घटक सविस्तरपणे मांडले आहेत. यामध्ये हवामान, धार्मिक स्थळे, राष्ट्रीय उद्याने यांचा समावेश आहे. तसेच, कृषी पर्यटन, इको-टुरिझम, वन्यजीव, आरोग्य आणि क्रीडा पर्यटन यांसारख्या पर्यटनाच्या आधुनिक प्रकारांची माहिती दिली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सहल नियोजनाची प्रक्रिया, त्याचे घटक आणि तंत्रे यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये सहलीची पूर्वतयारी, आवश्यक कागदपत्रे (पासपोर्ट, व्हिसा), संगणकाचा वापर आणि बुकिंग व्यवस्था यांसारख्या व्यावहारिक बाबींचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहल नियोजनाची उदाहरणे देऊन हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरते.

Paryatan Bhugol TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vasudev Sivaji Salunkhe Dr Santosh Jabaji Lagad

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न अवलंबण्यात आला आहे. भूगोल (G-3) (पर्यटन भूगोल -१) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी जून २०२० पासून होत आहे. हे पुस्तक आपत्ती व्यवस्थापनावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला पर्यटन आणि पर्यटक या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहे. पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच भूगोलाघी पर्यटन विकासात असणारी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात पर्यटन विकासास प्रभावित करणाऱ्या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने प्राकृतिक घटक, सामाजिक सांस्कृतिक घटक आणि राजकीय घटक पर्यटनास कशाप्रकारे प्रभावी ठरतात हे जाणून घेण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात पर्यटनाचे व पर्यटकांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रीयत्वानुसार, पर्यटन कालावधीनुसार आणि पर्यटनाच्या उद्देशानुसार पर्यटकांचे असणारे प्रकार स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासंदर्भातील विविध संकल्पनांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने कृषी पर्यटन, पर्यावरण पर्यटन, वन्यजीव पर्यटन, निरोगी पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि क्रीडा पर्यटन या संकल्पना आणून घेण्यात आल्या आहे. पुस्तकाच्या शेवटी पर्यटन विकासात वेगवेगळ्या वाहतूक साधनांची आणि संदेशवहनाची असणारी भूमिका अभ्यासण्यात आली आहे. एकूणच पर्यटन भूगोलातील अभ्यास घटकांची विश्लेषणात्मक माहिती देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 11 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी पुस्तकाची रचना अशी केली आहे, की सहअध्ययन आणि सामूहिक कृती सुलभ करण्यासाठी हे पाठ्यपुस्तक प्रोत्साहित करेल. रचनात्मक दृष्टिकोन आणि कृतींवर आधारित अध्यापन-अध्ययनासाठी हे पुस्तक तयार केले गेले आहे. सदर अभ्यासक्रम संबंधित चित्रांसह ज्ञान निर्मिती सुलभ करण्यासाठी वर्गीकृत पद्धतीने सादर केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि काळजी, जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसाठी हे पाठ्यपुस्तक ठळक मुद्दे मांडत आहे. या पुस्तकातील विषय अशा रीतीने मांडले आहेत, की ज्यांमुळे शाश्वत विकासाची संकल्पना विद्यार्थ्यांना कळून येईल. आजच्या जगातील पर्यावरणविषयक सामाजिक व आर्थिक समस्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठीची साधने व निरनिराळे मार्ग यांचाही समावेश या पाठ्यपुस्तकात केला आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 12 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम रचना २०१० (SCF 2010) ही राष्ट्रीय पाठ्यक्रम रचना २००५ च्या अनुसार तयार करण्यात आली आहे. वर्तमान पुस्तक एस्सीएफ् २०१० नुसार अध्यापन आणि अध्ययनाच्या दृष्टिकोनावर व साहित्यावर आधारून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात संपूर्ण पर्यावरण समजून घेण्यासाठी मदत होईल असे विषय समाविष्ट केले आहेत. भौतिक, जैविक, सामाजिक व आर्थिक प्रणाली या प्रणाली परस्परांशी जोडलेल्या असतात. त्यांचे परस्परांशी व पर्यावरणीय समस्यांशी असलेले संबंध यावर येथे लक्ष केंद्रित केले गेले आहे. या पाठ्यपुस्तकात योग्य अशा पर्यावरणविषयक घटनांची उदाहरणे देण्यात आली आहेत. एखादी घटना ही सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रणालींच्या दृष्टिकोनातून कशी पहावी हे सांगितले गेले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा व्यापक दृष्टिकोन दिलेला आहे. त्यांनी कृतियक्त शिक्षण घ्यावे व कृतियक्त शिक्षण हेच शिकण्याचे माध्यम असावे यावर येथे जोर देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक स्तरावर, पर्यावरणासाठी सातत्याने सक्रिय कृती सुरू ठेवण्यासाठी असलेला अभ्यासक्रम, हा कृती व प्रकल्पावर स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे अनिवार्य पात्रता अभ्यासक्रम मानला आहे.

Paryavaran Shikshan-1 First Semester FYBA, B.COM, B.SC New NEP Syllabus - SPPU: पर्यावरण शिक्षण-1 प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Kishore Pawar Prof. Mrs. Nalini Pawar

"पर्यावरण शिक्षण-1" या पुस्तकात पर्यावरण आणि मानव यांच्यातील परस्परसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकात पर्यावरणीय समस्या, संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन, प्रदूषणाचे प्रकार आणि त्यावर उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच, जागतिक तापमानवाढ, जलवायू बदल, पर्यावरणीय कायदे आणि पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व यावरही चर्चा केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये लागू करण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होईल. हे पुस्तक पर्यावरण समस्यांचे मूलभूत आकलन करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करते.

Paryavaraniy Abhyas SYBA, B.COM, B.SC Second Semester - SPPU: पर्यावरणीय अभ्यास एस.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pandurang Patil Dr Sanjay Patil

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, प्रदूषण प्रतिबंधन यामध्ये उत्साही युवाशक्तीचा वापर करता येईल व युवक मोठा वाटा उचलू शकतील याची जाणीव असल्याने पुणे विद्यापीठाने एक धाडसी प्रगत व आवश्यक पाऊल उचलले आहे. सन 2004-05 या शैक्षणिक वर्षापासून B.A., B.Com. व B.Sc. या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना 100 गुणांचा, 'पर्यावरणीय अभ्यास' (Environmental Studies) हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे व अनिवार्य (सक्तीचा) ठेवला आहे. तसेच इतर विद्यापीठांनीही अशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे सदर पुस्तक याच अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांची गरज पुरविण्याचा एक अल्प व नम्र प्रयत्न आहे. तसेच या पुस्तकाचा विषयशिक्षक, तज्ज्ञ आणि पर्यावरण-प्रश्नाबद्दल रुची असणारे सामान्य वाचक यांनाही काही उपयोग होईल अशीही आमची आशा आहे.

Paryavaraniy Bhugol 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat Dr Rajendra Bhausaheb Jholekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गासाठी सामान्य स्तरावर 'पर्यावरणीय भूगोल' हा विषय सुरू केला आहे. दिवसेंदिवस वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक प्राणी व वनस्पतींच्या समूळ जाती नष्ट होत असून ते आपल्या दृष्टीने खूपच घातक आहे. यातूनच 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते. 'पर्यावरणीय भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. विषय तसा नवीन असला तरी त्याचा दररोजच्या जीवनात प्रत्येकाचा संबध त्याच्याशी येत असल्याने हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा बनला आहे.

Paryavaraniy Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एस.वाय.बी.ए. सेमिस्टर - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल 2' विषय कोड Gg - 210 (B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. पर्यावरणीय भूगोल 2 हा पूर्णपणे उपयोजित पर्यावरणीय भूगोलाचा भाग आहे. वर्तमान स्थितीत आपण ज्या पर्यावरणीय समस्यांना/आपत्तींना तोंड देत आहोत त्यांचा ऊहापोह अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्या दृष्टीने पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. या दृष्टीने आपण या 'सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय आपत्ती (2) पर्यावरणीय समस्या (3) पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन (4) पर्यावरणीय धोरणे या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.

Paryavaraniy Bhugol SYBA Third Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester - III साठी (जून 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल' विषय अभ्यासाकरिता आहे. एक प्रकारे सर्वत्र पर्यावरणाचा सातत्याने विचार मांडलेला असतो. चर्चा चालू असते. पर्यावरण आणि भूगोल हे दोन्ही एकमेकांशी अतिशय निगडित आहेत. या दृष्टीने याची माहिती होणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि काळाची गरजही आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. या दृष्टीने आपण या सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय भूगोलाचा परिचय (2) परिसंस्था (3) जैवविविधता आणि संवर्धन (4) पर्यावरणीय प्रदूषण या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.

Pasha Parat Ala

by Jyoti Solapurkar

A story two brother and their pet a dog. One Sunday uncle bring back their dog at home. They both are excited to see him. they spend surprise to changes in a dog.

Refine Search

Showing 1,026 through 1,050 of 1,590 results