- Table View
- List View
Rangandhala: रंगांधळा
by Ratnakar Matkariमध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी ‘खळ्ळ्’ आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते… जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हातायाने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे? अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो… तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणाया, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
Rangapeksha Antarang Mahattvache
by Shankar KarhadeThis is a story of two people fighting for two colours and claiming that their colour is the best. One man comes and proves them both wrong. He asks them to put their cloth in boiling water and then put for drying. They see that the saffron colour is fading away and the green colour is also fading only the white colour remains. So he tells white is the Gods colour.
Ranicha Shaletala Pahila Divas
by Cheryl Raoशाळेच्या पहिल्या दिवशी राणीला कोण कोण दिसतं? तिला काय वाटतं?
Rarang Dhang SYBA Third Semester - SPPU: रारंग ढांग एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर यांचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.
Ras-Bhav-Vichar: रस–भाव–विचार
by Prof. R. P. Kangleभरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या संस्कृत ग्रंथातील रससिद्धान्तविषयक अध्याय ६ व ७ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवभारतीच्या टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले. रसाची व्याख्या व सविस्तर उपपत्ती भरतमुनीने नाट्यशास्त्रात सांगितली आहे. त्यानंतर झालेल्या नाट्यविषयक व काव्यविषयक शास्त्रग्रंथांमध्ये भरतमुनीचाच कमीजास्त प्रमाणात अनुवाद करून रससिद्धान्त चर्चिला आहे. रसाध्याय ६ व भावव्यंजक अध्याय ७ मिळून नाट्यशास्त्रामध्ये रससिद्धान्ताचे विवेचन केले आहे. सहाव्या रसाध्यायात रस, भाव इत्यादी नाट्याची अकरा अंगे व त्या प्रत्येक अंगाचे भेद यांचा नामनिर्देश करून पुढे शृंगार, हास्य इत्यादी आठ रसांचे स्थायिभाव, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारिभाव यांचे विवेचन केले आहे. सातव्या अध्यायात प्रथम भाव, विभाव व अनुभाव यांच्या स्वरूपाचे विवेचन असून नंतर स्थायिभाव, व्यभिचारिभाव यांचे विवेचन आहे.
Raste Ithech Rahatat
by Shekhar ShiledarOne day Shekh Chilli met his father’s friend asking for a way to his father’s house. He said none of the way goes to his house but he can show the way. But he said all the ways stay here only and they do not go anywhere. Hearing this the man complimented him. He had come with a proposal for him to get married with his daughter.
Rath: रथ
by Rangnath Pathare१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक चित्रण व विश्लेषण स्वाभाविकपणेच तिच्यात येते. चळवळी या त्या त्या काळाच्या अपरिहार्य गरजा म्हणून निर्माण होत असतात. माणसं निमित्तमात्र असतात. ती नसती तर त्यांची जागा आणखी कोणीतरी घेतलीच असती, हे खरंच आहे. पण माणसं निवडण्यासाठीची उपलब्धता ही त्या त्या काळाची मर्यादा सुध्दा असते. या मर्यादेचा चळवळीच्या गतिचक्रावर, तिच्या भवितव्यावरही प्रभाव पडत असतो. आणि हे अपरिहार्यही असतं. काही संपतं वा थांबतं तिथून नवं काही सुरू होतच असतं. किंबहुना माणसांना काहीच सुरू करता येत नाही वा थांबवताही येत नाही. दोन्ही प्रकारात कृतीचे जे भ्रम असतात त्यांचा निरास फक्त अनुभवाच्या ज्ञानाच्या उजेडातच होतो. या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.
Raza Rajala Bhetto
by Subhadra Sen Guptaमोगल सम्राट बादशहा अकबरकडे, रझाचे वडील रेहमत खान, शाही दर्जीचे काम करतात. बादशहाचे नवीन कपडे पोहचते करायला रझाही त्याच्या वडिलांबरोबर जातो. बादशहाच्या महालात पोहचल्यावर रझाच्या लक्षात येते की, बादशहा कपड्यांच्या आवडीनिवडी बाबत लहरी आहे. रझा त्या दिवशी कशी बाजी मारतो हे जाणण्यासाठी मोगल काळातील ही गोष्ट वाचा!
Repanjhal
by Sau. Leela ShindeThis is a story of Repenzil who was imprisoned by a witch. One prince falls in love with her. She had beautiful long golden hair and very sweet voice. The witch punishes her for falling in love with a price by cutting her hair. The prince jumps from the tall building in search of her and gets injured. Later he finds her and gets married to her.
Reshimgathi: रेशीमगाठी
by Kanchan Kashinath Ghanekarरेशीमगाठी पुस्तकातील काही लेख पूर्वी छापून आले असले, तरी ते जसेच्या तसे इथे छापलेले नाहीत. कारण ते लेख काही प्रसंगाने, संदर्भाने लिहिलेले असल्यामुळे ते आता कालबाह्य वाटण्याचा संभव होता. त्यामुळे त्यांचे पुनर्लेखन केले आहे. काही लेख छापताना काटछाट करून छापले गेले होते. ते या पुस्तकात पूर्ण स्वरूपात आहेत. पुस्तकात छायाचित्रांऐवजी रेखाचित्रे घालण्याचे ठरताच, ही कामगिरी श्री. वासुदेव कामत या निष्णात चित्रकारावर सोपविण्यात आली. या रेखाचित्रांसाठी लागणारी बरीचशी छायचित्रे आमच्या घरच्या संग्रहातीलच आहेत.
Revolution 2020: रिव्होल्यूशन २०२०
by Chetan Bhagatभारताच्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरूण होते. एकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी. पण एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं. ’रिव्होल्यूशन २०२०’ ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवायचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल ’सिस्टम’ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो? चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ’फाईव्ह पॉईंट समवन’, ’वन नाईट द कॉल सेंटर’, ’द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ’टू स्टेटस’ नंतर ची ‘रिव्होल्यूशन २०२०’ ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का?
Reward: रिवार्ड
by Baba Kadamमराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.
Riksha Udali
by Ken Spillmanदिल्लीच्या वाहतूक कोंडीत त्रस्त झालेल्या एका रिक्षाला अचानक जादुई अनुभव येतो. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासोबत तुम्हीही एक सफर करा. त्या चमचमत्या दुनियेचा हलका स्पर्श, तुम्हालाही नक्कीच आवडेल.
Rikta: रिक्त
by Mohana Prabhudesai Joglekar‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवेगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिस्थितीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Ringo
by Vijaylakshmi Nagarajब्रम्हपुत्रेच्या किनारी काझीरंगा अभयारण्यात रिंगो नावाचे गेंड्याचे पिलू राहते. ते लाजरे आहे. मग ते सगळ्यांशी कशी बुवा मैत्री करेल?
Ritooche Laambalachak Patra
by Mala Kumarरितू आपल्या आतेभावाला भेटायला आतुर आहे.म्हणून ती त्याला एक पत्र लिहिते.
Rokhe Bazar First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: रोखे बाजार पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Rakshit Madan Bagdeराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अर्थशास्त्र अभ्यासक्रमात "रोखे बाजार" हा महत्त्वाचा विषय समाविष्ट आहे. "रोखे बाजार" हे पुस्तक शेअर मार्केटच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे. पुस्तकात रोखे बाजाराचा इतिहास, कार्यप्रणाली, गुंतवणूकदारांच्या भूमिका, ट्रेडिंग प्रक्रिया, मार्केट नियमन, आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रकार यांसारख्या विषयांचा समावेश आहे. यामध्ये बीएसई (BSE), एनएसई (NSE), ट्रेडिंग सिस्टम, ऑर्डर टायप्स, सेटलमेंट प्रक्रिया, आणि गुंतवणुकीतील धोके यावर सखोल चर्चा आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र, समाजशास्त्र, आणि शेअर बाजारातील व्यावहारिक ज्ञान आत्मसात करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. तसेच, हे B.A. Semester (Skill Enhancement Course) साठी वापरले जाते आणि शेअर मार्केटमधील व्यवहार आणि गुंतवणूक निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते.
Rumniya
by Rukmini Banerjiरुमनिमा आणि आजी ही मजेदार जोडी आहे, कारण त्यांना माहीत आहे शेवटी सगळं ठीकठाक होते. रुमनियाची ही सुंदर गोष्ट वाचा!
Rup Kaviteche TYBA Sixth Semester - SPPU: रुप: कवितेचे टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Dr. Shirish Landage Prof. Dr. Bhaskar Dhoke Prof. Dr. Sandeep Sangaleकविता हा एक प्रमुख साहित्यप्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे, आविष्कार पाहावयाला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी, कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकीरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे; कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केले आहे.
Rusi Aani Pusi
by V. SuteyevThe story of a Rusi who had a cat named Puss. One day Rusi was drawing a picture of a house imagining Pussy to stay in the house. She was trying to make the house the way Pussy wanted.
SOC 101 Samajik Shastrancha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Prabhakar Dev A. B. Deshpande R. J. Patil Prof. N.B. Kulkarni Prof. P. G. Shinde. Ramesh Dhobale Shivranjani Pande Prof. Doshi Shree. Rajaderkar A. N. Pathak B. C. VaidyaSOC 101 Samajik Shastrancha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhary Prof. Pendse Prof. Sane Jotsna Bapat Virochan Joshi Sudha Kaldate Prof. Dullas Sharankumar LimeleSOC 222 Samajik Parivartan Ani Samajik Chalvali text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 223 Bharatiy Samaj S.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Jadhav Prof. Patil Prof. Tannu B. K. Khadse Prof. ShawleSOC 223 Bharatiy Samaj text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 291 Paryavaran Va Samaj T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Sane Prof. Apate Prof. Kamble Prof. Pendase Prof. AhiraravSOC 291 Paryavaran Va Samaj text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 292 Gramin Samajshastra T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari B. K. Khadase Prof. ApateSOC 292 Gramin Samajshastra text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.