Browse Results

Showing 1,226 through 1,250 of 1,542 results

Samidha FYBA - SPPU: समिधा एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Sadhana Amte

बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाबाईंनी अपार कष्ट केले, अग्निदिव्ये म्हणावीत अशा प्रसंगांतून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने व आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यही टिकविले. बाबा आमटे यांचे कार्य किती महान आहे याचे अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वभावात अद्वितीय सहानुभूती आणि जबरदस्त तापटपणा, असामान्य सहृदयता आणि तत्त्वांचा आग्रह धरताना पत्नीच्या होरपळीकडे त्यांनी काही वेळा केलेली डोळेझाक अशी एक विलक्षण विसंगती आहे. बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी जी आयुष्यभर साथ दिली तिची अद्भुतरम्य कहाणी असे या आत्मकथेचे स्वरूप आहे.

Samira Kharedila Jate

by Bharati Jagannathan

समीरा आणि मूचकबरोबर खरेदीला चला!

Sampurn Gadkari Khand 1: संपूर्ण गडकरी खंड १

by Ram Ganesh Gadkari

नाटककार, विनोदी लेखक आणि कवी म्हणून ख्यातनाम असलेले राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे सर्व साहित्य मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. गेली जवळजवळ शंभर वर्षे या थोर साहित्यकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले वाङ्मय महाराष्ट्राने शिरोधार्य मानलेले आहे. आजही त्यांच्या साहित्याची लोकप्रियता अणूमात्र कमी झालेली नाही. त्यामुळे गडकरी यांचे समग्र वाङ्मय, ज्याला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची प्रदीर्घ अशी विश्लेषक व आस्वादक समीक्षा प्रस्तावने च्यारुपाने लाभली आहे, ते गडकरी जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुनर्मुद्रित करावे असे तत्कालीन मंडळाच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी ठरविले व १९८४ मध्ये ‘संपूर्ण गडकरी’ हा ग्रंथ दोन भागामध्ये प्रकाशित करण्यात आला. ही पुनर्मुद्रित आवृत्ती यथाकाल संपली. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या या महान साहित्यिकाचे पुनःस्मरण करावे या हेतूने गडकऱ्यांच्या समग्र साहित्याच्या दोन्ही खंडाचे पुन्हा एकवार मुद्रण करून ते महाराष्ट्राच्या नव्या पिढीला उपलब्ध करून द्यावे, असे विद्यमान मंडळाने ठरवले. त्यानुसार आज गडकरी वाङ्मयाचे दोन्ही खंड मराठी वाचकांना सादर होत आहे.

Samrajyavadi Shadyantra: साम्राज्यवादी षड्‌यंत्र

by Dr Shanta Kothekar Sau Suman Vaidya

प्रस्तुत पुस्तक “साम्राज्यवादी षड्‌यंत्र” हे अलबर्ट काहन आणि मायकेल सेयर्स या अमेरिकन लेखकांच्या “The Great Conspiracy against Russia” ह्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. जागतिक शांतता टिकून राहण्याकरिता इतर कोणत्याही गोष्टीमुळे झाले नसेल इतके मोलाचे योगदान या ग्रंथामुळे झाले आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिका व रशिया यांत परस्पर सलोखा व सद्‌भाव असला तरच जगात खऱ्या अर्थाने टिकावू शांतता नांदू शकेल. रशियन क्रांतीनंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचे दर्शन रशियाच्या अनुभवांच्या चष्म्यातून या ग्रंथाद्वारे लेखकांनी घडविले आहे; रशियनांना आपल्याबद्दल काय वाटते हे त्यांनी आपल्याला जाणवून दिले आहे. या ग्रंथात वर्णन केलेल्या कारस्थानांसारखी सोविएतविरोधी कारस्थाने जर अशीच चालू राहिली तर त्याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल हे उघडच आहे. म्हणूनच जागतिक शांतता टिकावी याची कळकळ असलेल्या सर्व ब्रिटिश व अमेरिकन मुत्सद्यांनी, एवढेच नव्हे तर त्या दोन्ही राष्ट्रांतील सामान्य नागरिकांनीही या ग्रंथाचे परिशीलन करणे अगत्याचे आहे. आज संपूर्ण मानव जात सर्वसंहारक अशा स्टार वॉरच्या भयाने भयाकुल झालेली असता या विनाशकारी परिस्थितीची बीजे कशी व कोठे रोवली गेली यावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिने हा ग्रंथ अतिशय मोलाचा ठरतो.

Samudrasapharivaruna Ghari Parata

by Subhadra Sen Gupta

बसवा आणि त्याची बहीण सुंदरी पल्लवांच्या काळातल्या ममल्लापूरम या बंदर - शहरात राहतात. त्यांचे वडील कंबोजच्या समुद्रसफरीवरून अजून घरी परतले नाहीत म्हणून ती दोघं चिंतेत आहेत. वडिलांच्या जहाजाची माहिती शोधायला ते बंदरावर जातात. पण तिथले विदेशी खलाशी त्यांची भाषा बोलू शकत नाहीत! ते त्या विदेशी खलाशांबरोबर संवाद साधू शकतात का? हे जाणण्यासाठी ही गंमतीदार गोष्ट वाचा!

Samudrat Bhutataki

by Rajiv Tambe

One day the school decide to organize examination on the beach. Joshi sir did not know swimming and everybody wanted him to learn. All of them go on the beach far away on a ship where there is no one. Raina’s Loving Ghost helps them enjoy their educational trip. All of them have fun including the principal.

Sandeh: संदेह

by Ratnakar Matkari

‘मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं... अजूनही वाटतं... आतून आम्ही एकच आहोत. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला- कधी त्यानं माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं! शेजारून एक जीप झपकन गेली. अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून! ``दे आर आऊट टु किल अस. श्रीनाथच्या स्वरात घबराट होती. दे आर आऊट टु किल अस! नियतीचा हा शेवटचा डाव आहे का- आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट या दोघांनाही, त्यांच्या प्रियतमेसकट नष्ट करावं, असा? जीप पुन्हा एकदा झपकन जवळून गेली... घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते, तशी पुढं गेली... काय होणारेय आता? आम्ही तिघं- नियतीच्या हातची खेळणी... कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर श्वास रोखून वाचाल अशा या दहा कथा. प्रत्येक कथा जबरदस्त संदेह निर्माण करणारी. ताण शेवटपर्यंत वाढवीत नेणारी. मराठीतल्या, अगदी मोजक्या स्वतंत्र संदेहकथांपैकी या दहा. संदेहनिर्मितीबरोबरच मानवी मनाचे झोक्यावरचे खेळही दाखवणाऱ्या. कधी मनाची उंची मोजणाऱ्या... कधी त्याचा तळ गाठणाऱ्या. हेच रत्नाकर मतकरी यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य. त्यांची कथा केवळ चित्तथरारक असत नाही- ती मेंदूलाही झिणझिण्या आणते. इथं प्रथमच संग्रहित झालेल्या त्यांच्या या दहा कथा, रत्नाकर मतकरींची या वेगळ्या विषयावरची हुकमत पुन्हा एकदा सिद्ध करतात. स्वतंत्र संदेहकथाकार म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान निश्चित करतात.

Sanganak

by A. Dnya. Puranik

In this story Tejal playing with computer gathering lot information..in marathi

Sangharsh Tala: संघर्ष टाळा

by Dada Bhagwan

दैनंदिन जीवनात संघर्षाचे निराकरण करण्याची गरज सर्वांना समजते. आपण संघर्षामुळे आपले सर्वकाही बिघडवून टाकतो. हे योग्य नाही. रस्त्यावर लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लोक मनमानी करत नाहीत कारण तसे केल्याने टक्कर होऊन मरून जातील. टकरेमध्ये जोखीम आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनात संघर्ष टाळायचे आहेत. असे केल्याने जीवन क्लेशरहित होईल व मोक्ष प्राप्ती होईल. जीवनात ही क्लेशाचे कारण म्हणजे जीवनाच्या नियमांची अपूर्ण समज हे होय. जीवनाचे नियम समजण्याबाबतीत आपल्यात मूलभूत कमतरता आहे. ज्या व्यक्ति कडून आपण हे नियम समजून घेतो, त्या व्यक्तीस हया नियमांची ह्यांची सखोल समज असायला हवी. ह्या पुस्तकाद्वारे तुम्हाला समजेल की संघर्ष का होतो. संघर्षाचे काय काय प्रकार आहेत, आणि संघर्ष कसा टाळावा की ज्यामुळे जीवन क्लेशरहित होईल. ह्या पुस्तकाचा उद्देश म्हणजे तुमचे जीवन शांति आणि उल्हासाने भरणे हा आहे, तसेच मोक्ष मार्गावर तुमचे पाऊल मजबूत करणे हा आहे.

Sankatat Dhavun Yenare Char Mitra

by Baba Bhand

This is a story of four friends’ rat, deer, crow and the tortoise. They help each other to save themselves from the enemy. Here in this story the deer is trapped in the net of a hunter. The rat and the other friends save themselves from the hunter.

Sanrakshanshastra class 11 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता अकरावीचे पुस्तक हे राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेला केंद्रभूत मानून तयार केले गेले आहे. संरक्षणशास्त्र या विषयाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय यात दिला आहे. यामध्ये राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा; भूराजनीती; संरक्षण अर्थशास्त्र; लष्करी इतिहास; विज्ञान आणि तंत्रज्ञानांचे कार्य यांचा समावेश केला गेला आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात चर्चिल्या गेले आहेत. संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबी या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याचा तुम्हांला निश्चितच उपयोग होईल. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना सुचवलेले उपक्रम शिक्षक आणि पालकांच्या मदतीने पूर्ण करा. याच बरोबर क्यू. आर. कोडचाही वापर करावा.

Sanrakshanshastra Class 12 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता बारावीचे संरक्षणशास्त्र हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये भारताच्या संदर्भातील राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणात भारताच्या लष्करी, राजकीय आणि राजनयिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा या विविध पैलूंना समजावून घेण्यासाठीचा आराखडा दिलेला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेल्या समस्यांसंबंधी जगातील विविध भूभाग व देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध यांचा परामर्श घेतला आहे. शेवटच्या प्रकरणात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारील देशांशी झालेल्या विविध युध्दांची माहिती दिलेली आहे.

Sanrakshanshastra Karyapustika Class 10 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तिकेत ‘राष्ट्रीय सुरक्षा' या संकल्पनेच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच अंतर्गत सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य यांविषयीची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. २१ व्या शतकात आवश्यक असलेली संरक्षणशास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी व संरक्षणशास्त्र क्षेत्रातील करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी या विषयातून आवश्यक ते मार्गदर्शन केलेले आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखती अशा अनेक कृतींतून हा विषय अभ्यासणार आहोत.

Sanrakshanshastra Karyapustika Class 9 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तिकेत संरक्षणशास्त्र विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू तुमच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखत, भूमिका अभिनय अशा अनेक कृतींतून तुम्ही हा विषय अभ्यासणार आहात. हे सर्व उपक्रम तुम्ही आवर्जून करावयाचे आहेत. या उपक्रमातून तुमच्या विचारप्रक्रियेला चालना मिळेल. चर्चेतून मिळालेले मुद्दे व माहिती लिहिण्यासाठी पुस्तिकेत पुरेशी जागा दिलेली आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखती अशा अनेक कृतींतून हा विषय अभ्यासणार आहोत.

Sanshodhan Paddhati Ani Manasashastriya Mapan TYBA Fifth Semester - SPPU: संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Bharat Desai Dr Shobhana Abhyankar

संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन मानसशास्त्र हा विषय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पातळीवर मराठी माध्यमातून शिकणारा विद्यार्थीवर्ग बराच मोठा आहे. मात्र इंग्रजी भाषेची अडचण असल्यामुळे उत्तम बौद्धिक कुवत असूनही या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मर्यादा पडतात. हा विद्यार्थीवर्ग डोळ्यांसमोर ठेवून आम्ही २००१ मध्ये ' प्रायोगिक मानसशास्त्र आणि संशोधन पद्धती' हे पहिले तांत्रिक विषयावरचे मराठीतून पुस्तक लिहिले. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पातळीवर विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन पुस्तकांमध्ये संशोधनसंबंधीची विखुरलेली माहिती सलगपणे एका पुस्तकातून देण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही सादर करीत आहोत.

Sanskruti

by D. V. Joshi

Ravana was kidnapping Sita through an aerial route. Sita dropped her ornaments on the way so that Ram may be able to trace her. On the way they find it but her upper body ornament was unknown to Lakshman so he could not recognize it. But the ornaments which were from her ankles were known to Lakshman because he always touched her feet. The older brother's wife was always like a mother to him.

Sant Janabai: संत जनाबाई

by Dr Suhasini Yashwant Irlekar

नामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणाऱ्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या म्हणतात, त्या या जनाईच्याच! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या. समग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यांच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो!

Sanwad: संवाद

by Achyut Godbole

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणलानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्‍नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वार, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करुन आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायसा लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाळा आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात बाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल फोन, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सर्वांच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जन्मकथा आपल्याला ‘संवाद’मध्ये खिळवून ठेवतील.

Sanyasi Jyane Apli Sampati Vikli: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली

by Robin Sharma

संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली हे रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच जयको पब्लिशींग हाऊस यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ही प्रेरणादायक गोष्ट अधिकाधिक धैर्य, संतुलन, विपुलता आणि आनंदाने जगण्यासाठी एक प्रेरणादायी दृष्टीकोन प्रदान करते. एक आश्चर्यकारकपणे रचली गेलेली दंतकथा आहे, संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली ज्युलियन मेंटलची विलक्षण गोष्ट सांगतात. वकील ज्यांला त्याच्या आऊटबॅलेन्सच्या जीवनातील आध्यात्मिक संकटाचा सामना करण्यास भाग पाडले होते. एका प्राचीन संस्कृतीच्या जीवनदायी साहसपूर्ण प्रदिर्घ प्रवासावर, तो आपल्याला शक्तिशाली, शहाणे आणि व्यावहारिक धडे शोधून काढतो, ज्या आपल्याला शिकवतात: आनंदी विचारांचा विकास करा,आपल्या जीवनाचे ध्येय आणि कॉलिंग अनुसरण करा, स्वत: ची शिस्त लावा आणि धैर्याने कार्य करा, आमची महत्वाची वस्तू म्हणून वेळ, आपल्या नातेसंबंधांचे पोषण करा आणि आनददायी जीवन जगा.

Sapachya Dokyavar Beduk

by P. G. Sahasrabuddhe

A snake had become old and was lying nearby a pond. A frog goes to meet the snake and asks him about his condition. He says that he is cursed and is supposed to carry a frog upon his head. The frog sits on his head. After three days the snake becomes tired and hungry. The frog has pity on him and offers him one frog every day. After all the frog gets over the snake eats this frog as well.

Sarkashit Bhutataki

by Rajiv Tambe

Reena and all her friends had gone for a show to a circus. There her friend ghost had also gone. During the show the tiger and leopard gets the smell of the eatables the children had brought. The tiger and leopard become hungry and pounce on the children. The ghost saves the children from the attack.

Sarmisal - Novel: सरमिसळ - कादंबरी

by Shri. D.M. Mirasdar

द.मा. मिरासदार लिखित सरमिसळ हे विनोदी कथासंग्रह असून यामध्ये लेखकांनी आपला वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव यामध्ये सांगितला आहे.

Sarvajanik Ayavyay 1 Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय १ पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D.G. Ushir Prof. Dr. S.R. Jawale Dr D. B. Pawar Dr S. B. Syyad

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र स्पेशल पेपर-4: सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच. अभ्यास मंडळातील माननीय सदस्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवीन अभ्यासक्रमांमध्ये काही जास्तीच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की पूर्वीप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांकडून स्वागत होईल. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Sarvajanik Ayavyay 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय 2 पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D. G. Late Prof. Dr. S. B. Syed Prof. Dr. S. R. Javale Prof. S. P. Adhav

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 व 6 नेमलेल्या अर्थशास्त्र विशेष पेपर-3 साठी सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन काही जास्तीचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. सत्र 6 साठी नेमलेल्या अभासक्रमानुसार आम्ही सार्वजनिक आयव्ययाचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Sarvajanik Ayavyay T.Y.B.A. Savitribai Phule Pune University

by S. V. Dhamdhere Sanjay Tupe

Sarvajanik Ayavyay text book for T.Y.B.A. from Savitribai Phule, Pune University in Marathi.

Refine Search

Showing 1,226 through 1,250 of 1,542 results