- Table View
- List View
Sukshma Arthashastra 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. D. Awhad Dr S. R. Javale Dr D. B. Pawarद्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र स्पेशल - 1: सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या काढून विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sukshma Arthashastra 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Jawale Dr S. D. Awhad Dr D. B. Pawarद्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र (एस-1) भाग II साठी हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sukshma Arthashastrache Siddhant Bhag 1 FYBA First Semester - RTMNU: सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग १ बी.ए. प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग - १ (Micro Economics Theory - 1) हे बी.ए. प्रथम सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. प्रथम सेमिस्टर करिता' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sukshma Arthashastrache Siddhant Bhag 2 FYBA Second Semester - RTMNU: सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 2 बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग - 2 (Micro Economics Theory - 2) हे बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sukshma Arthshastra SY BA Pune University
by Pro. DR. R. A. Datira Pro . R. M. ChintamaniSukhshma Arthshastra marathi text book fo SY BA for Pune university in Marathi.
Sulabh Gomant Bharati Marathi-Pustak Dusare class 6 - Goa Board: सुलभ गोमंत भारती मराठी-पुस्तक दुसरें इयत्ता सहावी - गोवा बोर्ड
by Shikshan Sanchalnalay Panaji Goaगोवा सरकारने नवीन अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये क्रमान्वित केल्यावर त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले. ह्या उपक्रमांत गेल्या वर्षी इयत्ता पाचवीसाठी सर्व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली. ह्याच मालिकेतील इयत्ता सहावीची पुस्तके ह्या वर्षी राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने तयार केली. त्यातील मराठी (तृतीय भाषा) विषयासाठी ‘सुलभ गोमंत भारती' पुस्तक दुसरे तयार करण्यात आले. हे पुस्तक तयार करताना विद्यार्थ्यांच्या गरजा व स्थानिक वातावरण ध्यानात घेण्यात आले आहे. पुस्तकाच्या प्राथमिक अवस्थेत गोव्यातील तीस शाळांतील मराठी विषय शिक्षकांनी ह्या पुस्तकाची उपयोगिता पडताळून पाहिलेली आहे.
Sulabh Gomant Bharati Pustak Pahile class 5 - Goa Board: सुलभ गोमंत भारती पुस्तक पहिले इयत्ता पाचवी - गोवा बोर्ड
by Shikshan Sanchalnalay Goa Sarkar Panaji Goaगोव्यातील शाळांसाठी इ. ५ वी ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून हा अभ्यासक्रम १९९४-९५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येत आहे. सदर अभ्यासक्रम तयार करताना गोव्याची संस्कृती, इतिहास, सामाजिक व भौगोलिक वातावरण यांचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम गोव्यातील परिस्थितीला अनुरूप असाच ठरावा. अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम गोवा राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणन यावर्षी इयत्ता पाचवीची सर्व पाठ्यपस्तके तयार करण्यात आली. त्यापैकी 'सुलभ गोमंत भारती, पुस्तक पहिले' हे पुस्तक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक तृतीय भाषा-मराठी हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.
Sumati Ani Kumati
by Prashant GautamThis is a story of Ramaji helping those who are stuck with obstacles. So villagers got a big support for Ramaji. He won many people by his loving nature. He had won many hearts by his loving nature. While working in the field, Ramaji was also in the forefront in other work. His wife's name was Sumati. She used to always be good and kind counseling to her husband. Babaji’s wife named Kumati was jealous of him. She put some idea in Babaji's head. With that he started to break the boisterous ecstasy of joy and joy in his heart. He decided to actually implement the idea as planned...! Destruction of Ramaji’s house.
Sund Ani Upasund
by P. G. SahasrabuddheThere were two giants. They go to Lord Shankar to ask for a wish. They wanted to ask for the kingdom but they see his wife Parvati and get mesmerized, instead they ask for her. Lord Shankar gets angry but still, he agrees. He asks them who will take her. Both of them start fighting and die.
Sunday Dish Book
by Mangesh Madhukarसंडे डिश आजकाल टेन्शन्स,काळजी,स्ट्रेस आणि मोबाईल हे रोजचे सोबती. कोठेही गेलात तरी बरोबर असणारच कोणालाही न चुकणार, रुटीन लाइफ. म्हणजे सततची धावपळ. शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते सिनियर सिटीझन पर्यंत, कोणालाच ती चुकलेली नाही. त्यामुळे “संडे’ हा सगळ्यांचा अतिशय हवाहवासा वाटणारा,आवडता दिवस. “संडे” म्हणजे निवांतपणा,आराम,घड्याळाकडे न पाहता मस्त मजेत जगण्याचा दिवस. प्रत्येकजण त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. या निवांतवारी आपल्यासाठी सादर करीत आहे “संडे डिश” हा कुठला खायचा पदार्थ नाही तर रोजच्या जगण्यातल्या अनुभवांची,घटनांची केलेली खुमासदार मांडणी. “संडे डिश” कधी हसवेल तर कधी डोळ्यात पाणी आणेल तर कधी विचार करायला लावेल तिखट,आंबटगोड,चटकदार अशा पाणीपुरी सारख्या चवीची “संडे डिश” खास तुमच्यासाठी नक्की नक्की वाचा !!!
Suryaputra Lokmanya - Novel: सूर्यपुत्र लोकमान्य - कादंबरी
by Smita Damleलोलकातून (प्रिझम् मधून) सूर्यकिरणं आरपार गेली की त्यातले सप्तरंग उजळून निघतात. कै.सदाशिव विनायक बापट यांच्या लोकमान्य टिळकांच्या ‘आठवणी आणि आख्यायिका' या दोन खंडांचंही तसंच आहे. स. वि. बापटांनी चिवटपणे, अफाट मेहनत घेऊन ह्या आठवणींच्या रूपाने लोकमान्यांना आपल्यासमोर कायमचं जिवंत केलं. त्याचाच आढावा घेत ही कांदबरी डॉ. स्मिता दामले यांनी वाचकांसमोर आणली आहे.
Susheelachya Rangolya
by Sridala Swamiतुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील. पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिलीय? सुशीलानं हे कसं केलं, ते तुम्हाला या पुस्तकातून समजेल.
Sutaka Jhali
by Vishal TayadeAn ant was resting on a leaf and the leaf was old and about to fall. The ant did not know what to do when because of a heavy wind the leaf came from the tree. The leaf went and fell into the water and the ant was worried about how to get to the shore. Some ants along with her family rescue her and she is saved.
Sutti
by Ramesh VarkhedeFatik and Makkan were brothers. Fatik was short tempered and did not get along well with his brother. One day his uncle comes and takes him to Calcutta. There his aunt finds uncomfortable to keep him. Fatik was unhappy there. Later he falls sick and demands to go home. Fatiks uncle brings his mother to Calcutta. She meets her son.
Suvarnamudra
by P. G. SahasrabuddheOne businessman gets a pot of gold because he asked from Lord Shankar. He goes and tells this to a barber. The barber also tries to do the same what this businessman did. But instead, the barber goes to the jail.
Svabhav Parivartan
by Shivkumar BaijalOne man had to give a dowry and did not have money so he tried to steal the money from a widow’s house. The widow cries to God for the theft. The man returns the money and was worried about his daughter’s marriage. The daughter’s father-in-law gets a good profit in his business and he decides not to take the dowry. This man gives away the thought of stealing and becomes a good man.
Svachchhata Samitee
by L. G. ParanjapeThis a story of the frog. The village people knew him as the braveheart. He was very helpful for others. He was strict for cleaning and created a community of member. Once what happened, rain fell short. Once what happened, rain fell short, so how he had found, the solution read the story.
Svargadarshan
by Shivkumar BaijalNarayan was an innocent boy and in his dream he sees heaven. He wanted to go to heaven so he collects money by doing good deeds. One day an old man had lost all his good deed money and was crying. There Narayan meets him and gives him his coins. This man was God he keeps his hands on Narayan’s eyes and he sees heaven.
Svarthi Undir
by Manucheher KaymaramA story of a cat and a rat who were staying together in a godown. The rat was selfish and the cat was accumulating food for itself to eat later. The cat suggested him do the same. The rat did not listen to the cat but instead used to eat whatever food is stored by the cat. One day the cat catches the rat eating her food red-handed.
Svavlamban Hich Yashachi Pahili Payari
by Baba BhandThis is a story of a boy name Ram. He was very lazy. Everyday morning he heard a school bell and he did not like it, because he had to get up and get ready for school. He was reluctant to do his own work and asked his mother to help him in everything.
Swaha: स्वाहा
by Narayan Dharap‘‘सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट. मग खाली तपशील होता. गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.’’ श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.
Swami: स्वामी
by Ranjeet Desaiमहाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई: मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.
Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले
by Dr Hrishiskesh Pradeep Bodheस्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…
Swargatil Nirop
by Shrimati Tara ChaudhariKarim barber had tried to trick Birbal for his death through the orders of King, but Birbal had cleverly saved the own life.
Swatantrya Sangramache Mahabharat: स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत
by G. P. Pradhanइंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.