- Table View
- List View
Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.
Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.
Teen Rade
by Greystrokeश्रीमती चँग यांना वाचायला येत नसतं म्हणून आपल्या मुलाकडून आलेलं पत्र त्या वेन नावाच्या शिपायाला वाचायला सांगतात. पत्र बघताच वेन रडू लागतो. मग चँगही रडायला लागतात. पेंग नावाचा फेरीवाला तिथून जात असताना हे बघतो आणि त्यांच्याजवळ येऊन तोही रडायला लागतो. का रडतात हे तिघं? चीनमधली ही गमतीदार लोककथा वाचा.
Tel Gele Ani Tupahi Gele
by Shekhar ShiledarOne day Shekh Chilli’s mother asks him to buy oil for fifty Paise but gives him a small container. In an attempt to take the oil for fifty Paise in that small container he confuses the oil vendor and spills all the oil. His mother gets annoyed with him.
Tenaliramchi Svari
by Rajesh GuptaOne day the king lost a precious diamond from his ring and a man found it. He asked that he wants to sit on Tenali Raman’s back and go round the market as his reward. The king was not happy and he tells this to Tenali Raman. Tenali Raman understands the conspiracy and saves himself from it. Tenali exposes the man behind the conspiracy and the king becomes angry on that man and suspends him.
Thakalela Kutra Ani Bhukela Bail
by Baba BhandOne day a dog was exhausted and took shelter in a manger. He takes a deep sleep and suddenly the cow returns to the Stable. The cow sees green pasture there and wanted to start eating, but the dog wakes up and starts accusing the cow of waking him up. The cow does not bother and goes forward to eat but still, the dog keeps barking. The cow tells the dog you don't eat either you allow me to eat. What kind of mentality is this?
Thandi Palali
by Madhuri PurandareThere was a sheep named Babi. She had a lot of wool on her body and was heavy. She gives a little, little wool to everybody. All her wool gets over. Now during winter, she feels the need for it, but nobody gives it to her. The son of the shepherd shares his blanket with her to save her from the winter cold.
Thay Thay Pani
by Madhuri ShanbhagThis is a story of a small girl Anni. Today she has decided to water the plants with help of a plastic hose. The flowers and buds are very happy. They all enjoy the water. Anni is very happy and completely drenched with the water.
The Accidental Prime Minister: द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
by Sanjay Baru२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.
The Art Of War: दी आर्ट ऑफ वॉर
by Sun Tzu Vyanktesh Upadhye‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक इ.स पू. 515 मध्ये लौकिकार्थाने फारशा प्रसिद्ध नसलेल्या, सन त्झु नावाच्या एका चिनी पंडिताने लिहिले आहे. या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे, असे वरकरणी वाटते. खरेतर यात संघर्षाबद्दल केलेल्या चर्चेपेक्षा बुद्धिमत्तेबद्दल जास्त ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात. इतरांशी असलेल्या संघर्षामुळे वा अंतर्द्वद्वामुळे आपले आयुष्य कसे झाकोळले जाणार नाही याचा मार्ग दाखविणारे, आध्यात्मिक बैठक असलेले असे छोटेखानी तेरा धडे या पुस्तकात आहेत. आध्यात्मिकतेचा कोणताही मार्ग तुम्ही अनुसरत असाल किंवा नसाल तरीही सन त्झु याची ही प्राचीन विचारसरणी प्रत्येकास एकसारखीच लागू आहे. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
The Broker: द ब्रोकर
by John Grishamराजधानीतील सत्ताधाऱ्यांमध्ये ऊठबस करणारा, सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा बॅकमन, हा अनेकांची सरकारदरबारी असलेली कामे पैसे घेऊन करून द्यायचा. त्यामुळे त्याला 'दलाल' असे संबोधले जाई. काही कारणाने त्याला तुरुंगवास पत्करावा लागतो. सहा वर्षांनी त्याला माफी मिळाल्याने तो सुटून बाहेर येतो. बॅकमन सुटल्यावर त्याला अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी. आय. ए. देशाबाहेर नेऊन ठेवते. त्याला नवीन नाव, नवीन ओळख व एक नवीन घर दिले जाते. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिर झाल्यावर त्याचा नवीन पत्ता अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांना दिला जातो. कोण पुढे येऊन मारतो आहे, हे सी. आय. ए. ला ठाऊक करून घ्यायचे असते; पण या सगळ्या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळते. सी. आय. ए. च्या या योजनेची कल्पना बॅकमनला असते का, या योजनेला जी भलतीच कलाटणी मिळते, त्यात बॅकमनच्या अक्कलहुशारीचा भाग असतो का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'द ब्रोकर' वाचलंच पाहिजे. 'पुढे काय झाले' ही उत्सुकता ग्रिशॅमने कायम ठेवली आहेच.
The Company of Women: द कंपनी ऑफ विमेन
by Khushwant Singh‘सर्वसामान्य माणूस आनंदाच्या अनुभवाचा भुकेला असतो. कामवासनापूर्तीच्या अत्युच्च क्षणी या आनंदाचा त्याला, ओझरता का होईना, पण स्पर्श होतो. सर्वसामान्य माणसाला कामवासनपूर्तीतून मिळणाऱ्या आनंदाइतक्या सर्वोच्च आनंदाचा अनुभव अन्य कोणत्याही मार्गाने मिळत नसल्याने माणूस वारंवार त्या आनंदासाठी धडपडत असतो. संभोगात समर्पण तादात्म्य आणि, काही काळ का होईना, पण एक चिंतामुक्त, विचारशून्य अवस्था अनुभवता येते. या अनुभवाचा माणूस भुकेला असतो. कामवासनेकडे म्हणून तो वारंवार आकर्षित होतो. हा अनुभव देणारे माध्यम असणारी व्यक्ती मग त्याची सर्वाधिक प्रिय व्यक्ती ठरते. त्याचे प्रेम त्या व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित होते, त्याच्या भावविश्वावर त्या व्यक्तीचा अंमल चालू शकतो...’ चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृत्त आहे. खुशवंत सिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकानं हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं जिवंत केले आहेत. खुशवंत सिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही गेल्या दहा वर्षांतली पहिली कादंबरी. यात शेवटपर्यंत प्रेम, काम आणि वासना यांचा रिझवणारा आविष्कार आहे. तो आविष्कार कसल्याही रूढ संकेतांना न जुमानणारा आहे. वाचकाला तो चेतवतो आणि शेवटपर्यंत उत्तेजित करतो.
The Da Vinci Code: द दा विंची कोड
by Dan Brownपॅरिसमधील लूव्हर या सुप्रसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो. विचित्र गोष्ट अशी की, त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात. या खुणांचा शोध घेण्याची कामगिरी त्याचवेळी पॅरिसमध्ये आलेल्या रॉबर्ट लँग्डन या हॉर्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्रतज्ञावर सोपवली जाते. फ्रान्समधील निष्णात गुप्तलिपीतज्ज्ञ सोफी नेव्ह्यू हिच्या मदतीने लँग्डन या चित्रविचित्र खुणांमधून खुनाला वाचा फोडणारी काही दिशा मिळते का, याचा शोध घेतो. यातूनच मग काही वेगळेच रहस्य उजेडात येते. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंचीच्या अनेक चित्रांमधून अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने दडवलेले संकेत दोघांना आश्चर्यचकित करतात. खून झालेले संग्रहालय-व्यवस्थापक 'प्रायरी ऑफ सायन्स' या पंथाशी संबंधित असतात. ही स्फोटक माहितीही त्यांना कळते. अत्यंत गुप्तपणे काम करणार्या या पंथामध्ये सर ऐझॅक न्यूटन, व्हिक्टर ह्यूगो आणि दा विंची अशा अनेक नामवंत व्यक्ती कार्यरत असतात. संग्रहालय-व्यवस्थापकांनी मती गुंग करून टाकणारी एक ऐतिहासिक सत्य जिवापाड जपलेले असते. हा शोध घेत असताना एक अव्यक्त प्रतिगामी शक्ती सतत रॉबर्ट आणि सोफीचा पाठलाग करीत असते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले एक स्फोटक सत्य खुणा आणि संकेतांच्या भूलभुलैय्यातून बाहेर येते.
The Darker Side: द डार्कर साईड
by Cody McFadyenअमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…
The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी
by Leo Tolstoyलिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.
The Krishna Key: द कृष्णा की
by Ashwin Sanghiकृष्ण...पाच हजार वर्षांपूर्वी या जादुई व्यक्तिमत्त्वाने पृथ्वीवर जन्म घेतला, मानवाच्या कल्याणासाठी त्याने कित्येक चमत्कार घडवून आणले. या नीलदेवाच्या मृत्युमुळे मानवता नैराश्याच्या खाईत लोटली गेली असती; परंतु कलियुगात ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी नवीन अवतार धारण करून पृथ्वीवर पुन्हा येण्याचे वचन त्याने दिले आहे. आधुनिक काळात, श्रीमंत घरात जन्मलेला एक गरीब बिचारा मुलगा आपणच तो अंतिम अवतार आहोत, असे मानत मोठा होतो. मात्र तो फक्त एका खुनाची मालिका घडवून आणणारा खुनी ठरतो. आत्यंतिक संशोधन करून तयार करण्यात आलेली एक भव्यदिव्य रचना अश्विन संघी आपल्या हाती देत आहेत, कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने वेदकाळाचा पर्यायी रथही संघी उकलून दाखवत आहेत.
The Last Don: द लास्ट डॉन
by Mario Puzoकोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची... फार कशाला, साऱ्या जगाची डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं', तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां'चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बऱ्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द लास्ट डॉन' ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
The Law Of Attraction - Aakarshanacha Niyam: द लॉ ऑफ अट्रॅक्शन: आकर्षणाचा नियम
by Esther and Jerry Hiksया पुस्तकात अब्राहम यांच्या मूळ शिकवणुकीची शक्तिशाली पायाभूत तत्त्वं सांगितली आहेत. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वांत शक्तिशाली 'वैश्विक आकर्षणाच्या नियमा'च्या कार्यामुळे कशा घडतात, हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. "Like attracts like", "Birds of a feather flock together" किंवा "It is done unto you as you believe." अशी इंग्लिश वाक्यं आपण ऐकलेली असतात. थोडक्यात, 'सारख्याकडे सारखं ओढलं जातं.' हे आपल्याला माहीत असतं आणि या 'आकर्षणाच्या नियमाबद्दल' याआधी काही थोर विद्वानांनी ओझरतं लिहिलंही आहे. मात्र, ईस्थर आणि जेरी हिक्स या बेस्टसेलर लेखकद्वयींच्या या पुस्तकात हा नियम जितक्या स्पष्टपणे आणि प्रत्यक्षात अनुसरण करण्याजोग्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तितका तो याआधी कोणीही सांगितलेला नाही. या पुस्तकातून तुम्ही सार्वकालिक वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल. या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही अंगी बाणवून घेतलंत की, तुमच्या दैनंदिन जीवनातले अंदाज, शक्यता, भाकितं असे अनिश्चित प्रकार लुप्त होतील आणि अखेर आता तुम्हाला तुमच्या जीवनातील व तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी घडते याचं ज्ञान होईल. तुम्हाला मनापासून कराव्या वाटणाऱ्या गोष्टी आनंदानं करायला आणि मिळवायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.
The Lost Symbol: द लॉस्ट सिम्बॉल
by Dan Brownफ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा, छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले… रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले… सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या… शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंबऱ्यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!
The Partner: द पार्टनर
by John Grishamचार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे!
The Rozabal Line: दि रोझाबल लाइन
by Ashwin Sanghiदि रोझाबल लाइन ही रहस्यमय कादंबरी अनेक शतकांमधून आणि खंडांमधून उलगडत जाते. अश्विन सांघी गुंत्यांमधील वेटोळ्यांचा माग काढता काढता धर्माच्या रक्तरंजित जन्मापर्यंत पोचतात. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुठ्ठ्याचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. ते खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि लगेचच त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं. जगाचा अंत जवळ आल्याच्या जाणिवेने तो सुन्नपणे मान हलवतो. तिकडे तिबेटमध्ये एक बौद्ध भिक्खूंचा समूह ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वजांनी ज्युदेआमध्ये ईश्वरपुत्राचा शोध घेतला होता त्याचप्रमाणे अवताराच्या शोधात निघतो. जेरुसलेममध्ये निर्माण झालेल्या या कोड्याची गुरूकिल्ली असते संघर्षाने ग्रस्त काश्मीरमधल्या रोझाबल नावाच्या एका कबरीत आणि ते कोडं सुटणार असतं वैष्णोदेवीत. एका अमेरिकन प्रिस्टला परिचित माणसांची अस्वस्थ करणारी दृश्यं दिसतात. फक्त ही दृश्यं आणि त्यातली लोकं कुठल्यातरी दुसऱ्याच काळात आहेत, असं त्याला वाटतं असतं.
Thembane Geli Ti, Haudane Parat Yenar Nahi
by Shrimati Tara ChaudhariKing was using his perfume drop by drop. One day, King accidently drops one drop of the perfume on the ground, but he used that drop as well. Birbal saw all happened. The king was embarrassed. He had filled a tank with perfumes and announced in the village to take the perfume. Birbal told the King, Once after losing the respect, nothing can do as it was, even if he gives away a tank full of perfume instead of a drop.
Thenguchya Labadichi Shiksha
by Madhavi Kuntethaenguchya labhadachi shiksha is a story of thaengu who live in fairyland.he was lazy and greedy of delicious food. when fairy queen knows about she teaches him a lesson and takes a promise from him to work hard and not to lie ever.
Thokalyache Chitr
by Y. G. JoshiThis a story of school boy . Teacher gives a assignment of painting . A boy who painted a picture other than the subject given. Read a story what happens next.
Ti Shur Virbala
by Vasumati DhuruThis is a story of Nima who was studying during nighttime and she catches a burglar in her house during nighttime. She holds him tight and calls her father for help but in the meantime, he escapes jumping down the gallery. All the people in the house praise her for the courage she had shown to drive the thief away.