Browse Results

Showing 1,576 through 1,580 of 1,580 results

Zool: झूल

by Bhalchandra Nemade

ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो. एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला मिळते. झूलचा आरंभ नामदेव भोळे आणि चांगदेव पाटील यांच्या आकस्मिक भेटीने होतो. भोळे ज्या कॉलेजात एक वर्षापूर्वी दाखल झालेला आहे, त्या कॉलेजात नव्याने रुजू होण्यासाठी चांगदेव निघालेला आहे. योगायोगाने दोघेही एकाच डब्यातून प्रवास करीत आहेत. दोघांचे जीवनविषयक दृष्टीकोण काहीसे भिन्न असले तरी वृत्तीत बरेच साम्य आहे. त्यामुळे त्यांची मैत्री जुळावयास वेळ लागत नाही. उभायतांतील मैत्रीचा हा धागा झूल कादंबरीच्या आरंभापासून अखेरपर्यंत सलगपणे प्रकट झाला आहे. बौद्धिक चर्चेसाठी प्रश्नांची उलटसुलट बाजू मांडण्यासाठी या उभयतांतील या मैत्रीचा लेखकाने भरपूर उपयोग करून घेतला आहे.

Zoya: झोया

by Anuja Chauhan

८३ मध्ये भारतानं वर्ल्ड कप पटकावला नेमका त्याच वेळी मिड लेव्हल ॲडव्हर्टायझिग अधिकारी झोया सिंग सोळंकीचा जन्म झाला, हे कळल्यावर भारतीय क्रिकेट टीममधले सगळे तरुण खेळाडू चक्रावून जातात. तिच्याबरोबर ब्रेकफास्ट केल्यावर मैदानावर विजय मिळतो तेव्हा ते इम्प्रेस होतात आणि तिच्याबरोबर ब्रेकफास्ट न केल्यानं हार होते तेव्हा ती त्यांचा लकी चार्म आहे, याची त्यांना खात्रीच पटते. फॅन्स अक्षरशः तिची पूजा करत असतात, तर स्पर्धक संघ मात्र तिला पाण्यात पाहात असतो. झोया मात्र शूरपणे भारतीय टीमसाठी तिचं छोटसं योगदान देण्याचा प्रयत्न करत असते. झोयासाठी हे फारसं अवघड नव्हतं, पण जर भारतीय टीमचा विक्षिप्त पण हुशार कॅप्टन निखिल खोडानं तिच्याशी वाद घालणं आणि वर्ल्ड कप जिकण्ं यासाठी त्याला तिच्या लकची गरज नाही हे सांगणं थांबवलं असतं तरच...

Zuk Zuk Zuk

by Vinita Krishna

छोटीची आगगाडी कशी चालली? झुक्-झुक्-झुक!

Zulaa Gelaa Udoon

by Sridala Swami

उडणारा झुला तुम्ही खाली कसा आणाल? या हुशार मुलांबरोबर खेळायला चला आणि याचं उत्तर शोधा.

Zund: झुंड

by Dr Sharankumar Limbale

झुंड कादंबरी मध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ही कादंबरी मुळातच जात आणि मानवी संबंध यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर या कादंबरीत प्रकट झाले आहेत.

Refine Search

Showing 1,576 through 1,580 of 1,580 results