Browse Results

Showing 201 through 225 of 1,567 results

Bharatacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारताचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल-1 हा विषय लागू केला आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून भारताचा भूगोल-1 हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमत समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचे स्थान, भौगोलिक स्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेतानाच भारत व त्याच्या शेजारी असलेल्या देशांचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासात भारताचे वेगवेगळे भौगोलिक विभाग नकाशाच्या मदतीने विस्तृतपणे स्पष्ट केलेले आहेत. भारतातील जलप्रणालीबद्दल विवेचन करताना अभ्यासक्रमात असलेल्या नद्यांशिवाय इतर नद्यांच्या विवेचनाचाही विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक अंगाने अधिक फायदा होईल.

Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.

Bharatacha Itihas (1707-1845) SYBA Third Semester - SPPU: भारताचा इतिहास (१७०७-१८४५) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. G. Kolarkar

भारताचा इतिहास (छत्रपती शाहूपासून ते ब्रिटीश शाहीच्या अस्तापर्यंत) इ.स. १७०७ ते १८८५ या पाठ्यपुस्तकाची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली आहे. या कालखंडात मराठ्यांचा राजकीय इतिहास, ब्रिटिश कालखंडाचा राजकीय इतिहास आणि ह्याशिवाय १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा व त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या जागृतीची कारणे आणि मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी चालविल्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे लॉर्ड कर्झन, राष्ट्रीय चळवळींचा इतिहास, दहशतवादी चळवळी, मुस्लीम जातीयवादाचा उदय आणि विकास ही प्रकरणे या पुस्तकात आहेत. ह्या शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न देण्यात आले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल याची खात्री आहे. ह्याशिवाय योग्य ते नेमलेले नकाशे, महत्वाच्या घटनांची सुची व त्यांच्या तारखा दिल्याने विषय समजण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.

Bharatacha Itihas Prarambh Te 650 Paryant FYBA First Semester - SPPU: भारताचा इतिहास प्रारंभ ते ६५० पर्यंत एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. G. Joshi

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (U.G.C.) नूतन अभ्यासक्रमानुसार 'भारताचा इतिहास' (प्राचीन काळ) ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यातून U.G.C. च्या नवीन दृष्टिकोनांची व उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आठवा ग्रंथ कला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हाती देताना विशेष समाधान लाभत आहे. प्राचीन भारतातील धर्म, साहित्य, शास्त्र, कला, समाजजीवन, अर्थव्यवस्था आणि प्रशासन व राजकीय घडामोडींना विवेचनात प्राधान्य दिलेले आहे.

Bharatacha Svatantryaladha 1930-34: भारताचा स्वातंत्र्यलढा: १९३०-३४

by Dr V. N. Kuber

डॉ. वा. ना. कुबेर यांनी या ग्रंथात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील १९३०-१९३४ पर्यंतचा कालखंड घेतला आहे. १९३०-१९३४ या कालखंडात घडलेल्या घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. इतकेच नव्हे तर, यातील काही घटनांत त्यांनी स्वतः भाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाची विश्वासार्हता निश्चित वाढलेली आहे. या पुस्तकात भारताचा राष्ट्रवाद हा वंशवादविरोधी, साम्राज्यशाहीविरोधी, धर्मनिरपेक्ष (सेक्युलर), लोकशाहीचा पुरस्कर्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टी असलेला, मानवतावादी आणि विश्वबंधुत्ववादी असा विकसित झाला आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यानंतरच्या प्रकरणातून १९१९ ते १९३० या काळातील चळवळीवर परिणाम करणाऱ्या सर्व घटना, विचारप्रवाह यांचा ऊहापोह केला आहे.

Bharatatil Aapatti Vyavasthapan va Prashasan

by Priti Diliprao Pohekar

Disaster Management is a critical and integral part of any government’s planning strategy. Indian government has been struggling with it since long. This book discusses the varied threats, risks that the country faces. It talks about the Acts implemented, their advantages/disadvantages and their validity. It also talks about the different stakeholders involved, role players and decision makers in the country. It compare country’s disaster management with international decisive moments and acts and the UN’s ordinance.

Bharatatil Sadyakalin Samajik Samasya TYBA Sixth Semester - RTMNU: भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या (Current Social Problems in India) हे बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ' भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या (Current Social Problems in India)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये एकूण चार युनिट दिलेले आहेत. युनिट १ समकालीन भारतातील शिक्षण (Education in Contemporary India), युनिट २ विस्थापन आणि पुनर्वसन (Displacement and Rehabilitation), युनिट असहिष्णुता, दंगली आणि गुन्हे (Intolerance, Riot and Crime) आणि युनिट ४ भ्रष्टाचार (Curruption) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Bharatatil Samajshastriy Parampara SYBA Fourth Semester - RTMNU: भारतातील समाजशास्त्रीय परंपरा बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार भारतातील समाजशास्त्रीय परंपरा (Indian Sociological Tradition) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'भारतातील समाजशास्त्रीय परंपरा (Indian Sociological Tradition)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - भारतातील जातीच्या कुळांचे सैद्धांतिक विवेचन (Theoretical Roots of Caste in India), युनिट २ - भारतीय दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तन (Social Change from Indian Perspective), युनिट ३ - भारतीय समाज आणि समकालीन परिवर्तन (Indian Society and Contemporary Change) आणि युनिट ४ - लिंगभाव आणि भारतातील समाज (Gender and Society in India) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Bharatiy Arthavyavastha 1 TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B.L. Jibhkate

नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षापासून बी.ए. तृतीय वर्ष: सेमेस्टर V च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली आहे. त्यानुसार "भारतीय अर्थव्यवस्था १" ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांना सादर केलेली आहे. त्यानुसार काही जुनी परंपरागत चालत आलेली प्रकरणे वगळून काही नवीन प्रकरणांचा समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. प्रस्तुत पुस्तक अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करण्यात आला आहे तसेच काही नवीन व दुर्मिळ माहितीसाठी इंटरनेटचीही फार मदत घेतली आहे.

Bharatiy Arthavyavastha 2 TYBA Sixth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B. L. Jibkate Dr Sudhakar Shastri

"भारतीय अर्थव्यवस्था-२" हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आहे. नागपूर विद्यापीठाने जून २०१६ पासून संपूर्ण अभ्यासक्रमाची पुर्नरचना करून परीक्षेकरिता सेमिस्टर पद्धती सुरू केली आहे. त्यानुसार हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. भारतीय अर्थव्यवस्था - II च्या अभ्यासक्रमात अनेक नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. जसे - शाश्वत विकास, मानव विकास निर्देशांक, सर्वसमावेशक वाढ, नीती आयोग, चालू आर्थिक पाहणीची वैशिष्ट्ये, वस्तू व सेवा कर, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, चौदावा वित्त आयोग, बहुपक्षीय व द्विपक्षीय व्यापार, ब्रिक्स बँक इत्यादी. ही सर्व प्रकरणे नवीन व अद्ययावत स्वरूपाची आहेत.

Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awari

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.

Bharatiya Varasa Aakalan Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय वारसा आकलन दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Raghunath Borkar

‘भारतीय वारसा आकलन’ हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या NEP 2020 अभ्यासक्रमानुसार बी.ए. दुसऱ्या सेमिस्टरच्या इतिहास विषयासाठी लिहिलेले आहे. डॉ. रघुनाथ बोरकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात भारतीय वारशाची व्याख्या, पर्यटनाचा विकास, कला व स्थापत्य वारसा, हस्तकला, प्राचीन स्थळे, किल्ले, सण, संग्रहालयांचे महत्त्व यासारखे अनेक पैलू अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने समाविष्ट केले आहेत. अभ्यासक्रमाची रचना सोपी, मुद्देसूद व परीक्षेस उपयुक्त स्वरूपात सादर केली आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रश्नावली, प्रात्यक्षिके व क्षेत्रभेटीचा संदर्भही यामध्ये दिला आहे. हे पुस्तक केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सांस्कृतिक जाणीव जागवण्यासाठीही उपयुक्त ठरते.

Bhartacha Itihas Prachin Kal te Isavi San 1525 FYBA First Semester- RTMNU: भारताचा इतिहास प्राचीन काळ ते इ.स. १५२५ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम सेमिस्टरकरिता भारताचा इतिहास - प्राचीन काळ ते इ.स. १५२५ हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये हरप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, सोळा महाजनपदे, जैन धर्म व बौद्ध धर्म, मौर्य साम्राज्य, गुप्त घराणे, भारतावरील आक्रमणे, अल्तमश व बल्बन, अलाउद्दीन खिलजी, महंमद बीन तुघलक आणि फिरोज तुघलक, भक्ती चळवळ, सुफी पंथ आणि सुल्तानशाहीतील स्थापत्यकला (Architecture) इत्यादी अभ्यासक्रम पुस्तकामध्ये दिलेला आहे.

Bhartache Sanvidhan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Sheikh Hassan Dr Jogendra W. Gawai

‘भारताचे संविधान’ हे पुस्तक विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले असून प्रा. शेख हाशम आणि डॉ. जोगेंद्र व. गवई यांचे संशोधन आणि लेखन यामध्ये समाविष्ट आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, १८५८ च्या कायद्यापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्य कायद्यापर्यंतच्या घटनात्मक विकासाचा सविस्तर आढावा यात घेतला आहे. घटनेची उद्देशपत्रिका, तिचा अर्थ, स्वरूप, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, आणि मूलभूत कर्तव्ये या सर्व बाबी सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. पुस्तकात केंद्र व राज्य शासनाच्या रचना, कार्य, अधिकार, न्यायमंडळाची स्वायत्तता, आणि संसद व विधानमंडळाच्या कार्यपद्धती यांचे विश्लेषण केलेले आहे. संविधान समितीच्या कार्याचा इतिहास, विविध सुधारणा कायदे, स्वातंत्र्यलढ्याचा घटनात्मक संदर्भ, तसेच भारतीय समाजातील विविधतेला स्वीकारून घडवून आणलेली समावेशक राज्यघटना हे या पुस्तकाचे महत्त्वाचे पैलू आहेत. यामध्ये राज्यघटनेतील मूल्ये – समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता – यांचे स्पष्टीकरण आहे. अभ्यासक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अभ्यासार्थ प्रश्न व उदाहरणेही दिली आहेत. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ एक शैक्षणिक ग्रंथ नसून भारतीय लोकशाही आणि राज्यकारभाराच्या मूळ तत्त्वांना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरते.

Bhartache Sanvidhan Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Sheikh Hassan

हे पुस्तक 'भारताचे संविधान' या विषयावर असून, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विषयाची सखोल माहिती व्हावी, अभ्यासक्रमातील संकल्पना सुलभतेने समजाव्यात आणि विषयाचे पूर्ण आकलन व्हावे या हेतूने हे पुस्तक अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत लिहिलेले आहे. पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करून विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक केवळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठीच नव्हे, तर 'नेट-सेट' व इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासासाठीही उपयुक्त ठरेल असा विश्वास लेखकांनी व्यक्त केला आहे. अनेक अधिकृत ग्रंथांच्या आधारे तयार केलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करेल आणि त्यांना पूर्ण समाधान देईल, ज्यामुळे इतर पुस्तके पाहण्याची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपयुक्त आहे.

Bhartachya Itihas (A.D. 500 te A.D. 1206) Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचा इतिहास (इ. स. ५५० ते इ. स. १२०६) दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Govind Tirmanwar

“भारताचा इतिहास” हे पुस्तक इ. स. ५५० ते इ. स. १२०६ या कालखंडातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे सविस्तर विश्लेषण करते. या काळात भारतात अनेक राजवंश उदयास आले आणि त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. सम्राट हर्षवर्धनच्या कारकिर्दीत कन्नौज हे सत्ता आणि सांस्कृतिक केंद्र बनले. त्यानंतर राजपूत राजवंशांनी उत्तरेकडील प्रदेशावर वर्चस्व गाजवले. चालुक्य, राष्ट्रकूट आणि प्रतिहार यांच्यात कन्नौजच्या ताब्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष झाला. दक्षिण भारतात चोल, पल्लव आणि पांड्य राजवंशांनी प्रशासन, व्यापार आणि स्थापत्यकलेला मोठे योगदान दिले. याशिवाय, पुस्तकात मध्ययुगीन समाजरचना, धर्म आणि संस्कृती यांचा आढावा घेण्यात आला आहे. भक्ती चळवळीचा प्रभाव, बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार, तसेच वेदकालीन परंपरांचा विकास यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. तत्कालीन राजकीय घटनांसह समाजव्यवस्थेचे सखोल विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण आणि इतिहासप्रेमींसाठी ज्ञानवर्धक असे हे पुस्तक भारताच्या ऐतिहासिक वारशाचा व्यापक आढावा घेण्यास मदत करते.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagar

प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA Second Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr Vijaykumar Wavale

प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहे.

Bhartiya Aarthik Vikas 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Pagar Dr S. V. Tile Dr S. R. Jawale

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 साठी 'भारतीय आर्थिक विकास' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सर्वच देशांमधील सरकारांचा आर्थिक विकासाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास मंडळाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या संकल्पना समजणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आर्थिक विकास हा स्वतंत्र पेपर सामान्य स्तरावर आणला आहे. आर्थिक वृद्धी व विकास संकल्पनांचा अर्थ, गरज, महत्त्व, त्यांचे निर्देशक, दोघांमधील फरक इत्यादी बाबींचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल आहे.

Bhartiya Aarthik Vikas 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Pagar Dr S. V. Tile Dr S. R. Jawale

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र सामान्य स्तर-3 (जी-3) सत्र 5 आणि 6 साठी भारतीय आर्थिक विकास हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवीन सिद्धान्त आणि घटक घेण्यात आले आहेत. त्या सर्व घटकांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Bhartiya Arthashastra ani Vyavsay Model FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: भारतीय अर्थशास्त्र आणि व्यवसाय मॉडेल एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Milind Gulhane Dr Prabhakar Motghare Dr Nabha Kamble

‘भारतीय अर्थशास्त्र आणि व्यवसाय मॉडेल’ हे पुस्तक बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक भारतीय आर्थिक विचारांचा इतिहास, कौटिल्याचा अर्थशास्त्र, प्राचीन भारतातील शेती, व्यापार, शासन, शिक्षण, संपत्ती, तसेच प्राचीन व मध्ययुगीन भारतातील आर्थिक धोरणांचा सखोल अभ्यास करते. यामध्ये वसाहतपूर्व भारतातील आर्थिक योगदान, स्वातंत्र्यानंतरचे नियोजन, हरित क्रांती, उदारीकरण व डिजिटल युगातील नव्या धोरणांचा ऊहापोह आहे. या पुस्तकात भारतीय व्यवसाय मॉडेल, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, आणि शाश्वत विकासासारख्या आधुनिक संकल्पनांचा समावेश केला आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यासारख्या उपक्रमांद्वारे भारताचा आर्थिक विकास कसा घडतो आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राचीन धर्मशास्त्रीय तत्त्वज्ञानाचे आणि शुक्रनीतीसारख्या ग्रंथांचे आधुनिक आर्थिक विचारांवर होणारे परिणाम देखील समजावण्यात आले आहेत. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धीक व भारताच्या आर्थिक धोरणांची सखोल समज प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे.

Bhartiya Arthavyavstha Paper-1 ani Paper-2 First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय अर्थव्यवस्था पेपर-१ आणि पेपर-२ प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher

"भारतीय अर्थव्यवस्था: पेपर-१ आणि पेपर-२" पुस्तक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेले पुस्तक आहे. हे पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख मुद्द्यांवर सखोल प्रकाश टाकते, जसे की अर्थव्यवस्थेचा अर्थ, विकसित व विकसनशील अर्थव्यवस्थांचे वैशिष्ट्य, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकसनशील देश म्हणून अभ्यास. यामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील योगदान, लोकसंख्या व मानव संसाधनाचे महत्त्व, आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचे सविस्तर वर्णन आहे. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे मूलभूत संकल्पना समजून घेण्यास मदत करणारे हे पुस्तक, अल्प व दीर्घकालीन आर्थिक धोरणांचे विवेचन करते. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासातील अडथळे, संधी आणि भविष्यातील मार्ग यावरही सखोल विचार करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण साधन आहे.

Bhartiya Arthavyavstha Paper-3 ani Paper-4 Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय अर्थव्यवस्था पेपर-३ आणि पेपर-४ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Savita Sawant

"भारतीय अर्थव्यवस्था - पेपर-3 आणि पेपर-4" हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NEP-2020 अभ्यासक्रमानुसार रचले गेले आहे. यामध्ये भारतातील आर्थिक नियोजन, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी आणि आर्थिक विकासाचे विविध पैलू सविस्तरपणे मांडले आहेत. नियोजनाची उद्दिष्टे, नीती आयोगाची भूमिका, तसेच पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश यांचा अभ्यास पुस्तकात समाविष्ट आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील सहकारी चळवळ, प्रादेशिक असंतुलन, पाणी व्यवस्थापन, आणि रोजगार निर्मितीवरील चर्चाही विस्तृतपणे आहे. पुस्तकात आर्थिक असमानता, सामाजिक न्याय, आणि शाश्वत विकास यासंदर्भातील उपाय सुचवण्यात आले आहेत. आर्थिक धोरणांचे परिणाम, क्षेत्रीय विकास, आणि ग्रामीण-शहरी समस्या या घटकांवरही भर देण्यात आला आहे. पुस्तकाची भाषा सोपी व मुद्देसूद असून विद्यार्थ्यांना भारताच्या आर्थिक यंत्रणेचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. यामध्ये सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक भागांचा अंतर्भाव असून, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.

Bhartiya Arthik Dhoran-1 First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय आर्थिक धोरण-१ प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Deepak Kare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय आर्थिक धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत अभ्यास, त्यातील तत्त्वे, संरचना, व कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. आर्थिक धोरणाच्या माध्यमातून भारतातील अर्थव्यवस्थेची संघराज्यीय रचना, आर्थिक हक्क, व धोरणात्मक दृष्टिकोन यांची विस्तृत माहिती देण्यात येते. विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक सुधारणा, व त्याचे भारताच्या सामाजिक-आर्थिक व राजकीय विकासामधील महत्त्व समजते. हा अभ्यासक्रम केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यावर मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक मूल्यांचा आदर, आर्थिक समता, व विकासात्मक संकल्पना रुजविण्याचा उद्देश आहे. अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय विकास, आर्थिक सुधारणा, व आर्थिक समतेसारख्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जातो. भारतीय आर्थिक धोरणाचे महत्त्व केवळ शैक्षणिक नाही, तर जागरूक नागरिक आणि आर्थिक दृष्टिकोनाने सशक्त देश घडविण्यासाठी आवश्यक आहे. NEP 2020 अंतर्गत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सक्षम नागरिक बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Bhartiya Arthik Dhoran-2 Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय आर्थिक धोरण-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Ugale Dr Amol Gaikwad Dr Manisha Aher Dr Deepak Kare

"भारतीय आर्थिक धोरण-2" या दस्तऐवजामध्ये भारताच्या लोकसंख्या, रोजगार, आर्थिक धोरणे आणि दारिद्र्य यासंबंधीचे मुद्दे उलगडले आहेत. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी हा दस्तऐवज तयार करण्यात आला असून तो NEP अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यात लोकसंख्या वाढ, तिचा आर्थिक विकासावर होणारा प्रभाव, लोकसंख्या नियंत्रण धोरणे, दारिद्र्याची कारणे, उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला आहे. व्यावसायिक विभाजन, ग्रामीण-शहरी वितरण, वयोमानानुसार लोकसंख्येचे स्वरूप आणि मानवी भांडवलनिर्मितीवर देखील भर दिला आहे. दस्तऐवजातून भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक धोरणांचा, लोकसंख्येचा दृष्टीने आर्थिक लाभ आणि आव्हाने यांचा विचार मांडण्यात आला आहे. दस्तऐवजातील मुद्दे विद्यार्थ्यांना भारतातील आर्थिक परिप्रेक्ष्य समजून घेण्यास मदत करतात.

Refine Search

Showing 201 through 225 of 1,567 results