Browse Results

Showing 801 through 825 of 1,567 results

Mahan Bhartiya Krantikarak Pratham Parv 1770 te 1900: महान भारतीय क्रांतिकारक प्रथम पर्व (१७७० ते १९००)

by Shree. Sarvottam Dhanaji Zambare

भारतीय स्वातंत्र प्राप्तीला अनेक क्रांतीकारकांचे प्रयत्न कारणीभूत झाले. अक्षरक्षः असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी त्यासाठी देहदंड सोसला, संघर्ष केला. त्यातील अनेक जण हुतात्मा झाले. तसेच अनेक जण अज्ञात व अनामिक राहिले. परंतु सुदैवाने या स्वातंत्र्यसैनिकांपैकी अनेकांची माहिती उपलब्ध आहे. त्या आधारावर ज्ञात असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची माहिती त्यांच्या चरित्र रुपाने प्रकाशित व्हावी असा प्रस्ताव श्री. सर्वोत्तम धनाजी झांबरे यांनी दिला. या प्रस्तावाचे महत्त्व जाणून भावी पिढ्यांसाठी भारताच्या स्वातंत्र्यवीरांची संक्षिप्त चरित्रे ग्रंथरुपाने प्रकाशित करावी असा निर्णय मंडळाने घेतला व आज ‘महान भारतीय क्रांतिकारक’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित होत आहे. श्री. सर्वोत्तम धनाजी झांबरे यांनी आयुष्याच्या उत्तर काळात अतिशय परिश्रम घेऊन स्वातंत्र्यवीरांची माहिती संकलित केली. या चरित्रग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये ९८ क्रांतिकारकांची अल्पचरित्रे समाविष्ट केलेली आहेत.

Mahan Shishya Eklavya

by P. P. Gharat

One day Eklavya goes to Dronyacharya for training but he only gives him his blessings and sends him home away. Eklavya was very disappointed but he learns the skill of archery without the training of Dronacharya by only keeping his image in his mind. The blessings of Dronacharya makes Eklavya a skilled archer. Dronacharya is also surprised at his skill and he himself wants to learn from him. But as a respect, Eklavya gives his thumb to Dronacharya which was very important for him to shoot the arrow.

Mahan Vhayala Jatana

by Meenakshi Sardesai

Kumya was an ambitious boy. He wanted to become somebody great. He tries to become an artist and takes a little advice from an artist and starts making portraits of his friend and people around. But he had a different idea about this art in his mind. He wanted to do something different and started mocking other people in his art of painting. He is scolded by everyone and the artist himself. Kumya learns a lesson. His mother encourages him to give up this idea and become a good artist.

Mahaparv: महापर्व

by Bal Samant

“महापर्व” हा संपादित ग्रंथ म्हणजे या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मवृत्तातील निवडक उतारे. या आत्मवृत्तामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महाराष्ट्राची कर्तबगारी असामान्य आणि अमोल अशी आहे. या स्वातंत्र्य चळवळीचे बीजारोपण महाराष्ट्रातच झाले आणि लो.टिळकांच्या रूपाने या चळवळीला एका विलक्षण झंझावाताचे स्वरूप प्राप्त झाले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्‌ध हक्क आहे,” हा स्वातंत्र्याचा महामंत्र काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र दुमदुमला. लो. टिळकांच्या, महात्मा गांधींच्या पावलांचा मागोवा घेत या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात महाराष्ट्रानेही आपली आहुति दिली. या स्वातंत्र्य युद्‌धात भाग घेतलेल्या लहान थोर स्वातंत्र्यसेनानींनी आपली आत्मवृत्ते आणि आठवणी लिहून ठेवल्या आहेत. या काळात महाराष्ट्रातील स्वातंत्र्याच्या चळवळीने झपाटून गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे हृद्‌गतच वाचकांना पानोपानी गवसते. ‘महापर्व’ हा संपादित ग्रंथ असाच तोलामोलाचा आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या प्रमुख स्वातंत्र्य-सेनानीचे हे हितगुज आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे.

Maharashtra Mahodayacha Purvrang: महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

by Narayan Krushna Gadre

"महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग" हा कै. नारायण कृष्ण गद्रे यांनी लिहिलेला ऐतिहासिक ग्रंथ आहे, जो महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय उत्कर्षाचे सखोल वर्णन करतो. ग्रंथाचा कालखंड शालिवाहन शतक ते मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या पार्श्वभूमीपर्यंत आहे. लेखकाने ऐतिहासिक घटनांचे दस्तऐवजीकरण करत महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा आलेख उभा केला आहे. बखरी, कागदपत्रे, आणि तात्कालिक साधनांवर आधारित लेखन प्रौढ भाषा व संशोधनात्मक दृष्टिकोनाची ओळख पटवतो. पुस्तकाने वाचकांमध्ये स्वदेशाभिमान जागृत करण्याचे कार्य साधले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, आणि वाङ्मयीन परंपरेचा मागोवा घेत, लेखकाने मराठ्यांचा विजयनगर साम्राज्याशी असलेला संबंध आणि स्वराज्यस्थापनेचा मार्ग प्रकाशझोताखाली आणला आहे. या पुस्तकाचा आशय अत्यंत ज्ञानवर्धक असून महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाने याची पुनर्मुद्रित आवृत्ती प्रकाशित केली आहे, ज्यामुळे आधुनिक वाचकांना या अमूल्य साहित्याचा लाभ होईल.

Maharashtracha Bhugol 1 SYBA Third Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A.B. Savadi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (S1) Semester - III साठी (जून 2020 पासून) 'महाराष्ट्राचा भूगोल 1' हा विषय अभ्यासाकरिता आहे. 'महाराष्ट्राचा भूगोल 1' हा सेमिस्टर 3 मध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, प्राकृतिक स्वरूप, हवामान आणि साधनसंपत्ती यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विविध नकाशे व तक्ते यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्याचा निश्चितच उपयोग होईल. भाषा ओघवती व सोप्या शब्दात मांडल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे पटकन आकलन होईल.

Maharashtracha Bhugol 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Amit Eknath Sonawane Dr Jyotiram Chandrakant More Dr Ashok Maruti Thorat Dr Arjun Baban Doke

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास 'महाराष्ट्राचा भूगोल' हा विषय विशेष स्तरावर लागू केला आहे. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Maharashtracha Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A.B. Savadi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) SYBA Geography (S1) Semester - IV साठी महाविद्यालयीन 'महाराष्ट्राचा भूगोल 2' हे पाठ्यपुस्तक प्रकाशित कलेले आहे. या नवीन अभ्यासक्रमात एकूण चार प्रकरणे आहेत: १. कृषी, २. लोकसंख्या आणि वसाहत, ३. ग्रामीण विकास आणि ४. पर्यटन. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Maharashtracha Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Dagu Pagar Dr Sunil Dagu Thakre Prof. Sudam Bajirao Shinde Prof. Nikhil Uttam Agale

प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास 'महाराष्ट्राचा भूगोल' हा विषय विशेष स्तरावर लागू केला आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धांमुळे 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाचे महत्त्वदेखील वाढत आहे. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Maharashtracha Bhugol TYBA Fifth Semester - RTMNU: महाराष्ट्राचा भूगोल बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या भूगोल विषयावरील बी.ए. सेमिस्टर ५ चे सर्वात प्रथम पाठ्यपुस्तक आहे. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन भूगोल अभ्यास मंडळाने बी.ए. सेमिस्टर ५ साठीच्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करून तसा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती होईल. महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची जलप्रणाली, हवामान, जंगल संपत्ती, मृदा संपत्ती, शेती, उद्योगधंदे, खनिज संपत्ती व ऊर्जा संपत्ती, पर्यटन, लोकसंख्या, तसेच प्रात्यक्षिकांतील आलेख पद्धतीने विशालीकरण व लघुकरण, लोलकीय होकायंत्र सर्वेक्षण, दिगअंश दुरुस्त करणे, दिगअंश नकाशा काढणे आणि बंदिस्तमधील चूक दुरुस्ती करणे, सांख्यिकी माहितीचे सादरीकरण, आकृत्या, विभाजित वर्तुळ, विभाजित आयत, मनोरे (साधाव संयुक्त), नकाशे, टिंब पद्धत, प्रमाणबद्ध वर्तुळे पद्धत व छाया पद्धत इत्याद सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे.

Maharashtrache Shilpkar Nana Patil: महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील

by Bharat Patankar

"महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील" हे भारत पाटणकर लिखित पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे. नाना पाटील, ज्यांना "आझाद" म्हणुनही ओळखले जाते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. पुस्तकाची कथा त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना, त्यांच्या कार्याची तत्त्वे, आणि त्यांनी केलेल्या संघर्षांवर प्रकाश टाकते. विशेषत: १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या दरम्यान त्यांनी प्रतिनिधी सरकार (Parallel Government) स्थापन करण्याचे धाडस केले होते. या सरकारने ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करताना स्थानिक प्रशासन, न्यायव्यवस्था आणि शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले. पुस्तकात नाना पाटील यांच्या क्रांतिकारी विचारधारांची आणि त्यांच्या नेतृत्वाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या कार्याची महत्ता, त्यांनी अनुभवलेल्या अडचणी आणि त्यांनी केलेले त्याग यांची चर्चा या पुस्तकात केली आहे. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये जागरूकता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा कशी निर्माण केली, याचे वर्णनही पुस्तकात समाविष्ट आहे. या पुस्तकातून नाना पाटील यांची प्रेरणादायक जीवनकथा समजते आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्रता संग्रामातील त्यांच्या योगदानाची सखोल माहिती मिळते. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करताना, वाचकांना त्यांच्या धैर्य, संकल्प आणि नेतृत्वाचे दर्शन घडते.

Maharashtrache Shilpkar Vasantdada: महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा

by Raja Mane

वसंतदादांचा जीवनकार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे, हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करून ते राज्य करू शकले.

Maharashtrartil Sthanika Svarajya Sanstha T.Y.B.A - Pune University

by R. G. Waradkar Nanda Rashinkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी. ए. भाग - 3 च्या राज्यशास्त्र विषयासाठी जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यात 'महाराष्ट्रातील स्थानिक संस्था' हा एक पेपर आहे. त्याला अनसरून प्रस्तुत पुस्तक लिहिलेले आहे. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयासाठी हे पस्तक उपयुक्त आहेच; तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याठीसुद्धा हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती, आकृतिबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या अडचणी, उदयास येणारे नेतृत्व त्याचे सविस्तर विवेचन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Omkar Ankush Korawale Prof. Bhakti Rajendra Patil

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन-1 हा विषय लागू केला आहे. पुस्तकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील निर्मिती, वाटचाल व विकास, पंचायतराज प्रणाली राबविताना विविध समित्यांनी केलेल्या शिफारशी तसेच 78 व्या घटनादुरुस्तीचा विस्तृत आढावा इत्यादी घटक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2 पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Korawale Sachin Sahadu Ghayatdke

'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले राज्यशास्त्र सत्र-6 चे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर सादर केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये 74 व्या घटनादुरुस्तीपूर्वीच्या नागरी संस्था, कलम 243 मधील संवैधानिक बदल तसेच नगर पंचायत या घटकांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व भारतीय संविधानातील 12 वे परिशिष्ट याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीनमध्ये राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग व आयोगासमोरील आव्हाने विस्तृतपणे लिहिली आहेत. चौथ्या प्रकरणामध्ये स्थानिक स्वराज्य शासनावरील नियंत्रण, स्थानिक स्वराज्य शासनावरील मर्यादा व त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

Maharashtratil Sthanik Swarajya Sanstha TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar

तृतीय वर्ष कला शाखेच्या जनरल राज्यशास्त्र विषयासाठी (जी-३) ‘महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था’ हा नवीन अभ्यासक्रम २०२१ पासून आहे. स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक विकासामध्ये तसेच स्थानिक जनतेला सेवा-सुविधा पुरविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? त्याचा विकास त्यांची रचना, अधिकार व कार्ये, स्थानिक नेतृत्व, विकास, स्थानिक शासनाच्या संदर्भातील शासनाने नेमलेल्या समित्या, स्थानिक शासनासंदर्भात झालेल्या घटनादुरुस्त्या या सर्व मुद्द्यांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील हे अभ्यास साहित्य अत्यंत उपयोगाचे आहे. साध्या, सोप्या व सहजपणे आकलन होईल, अशा पद्धतीने विषयांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Mahashweta: महाश्वेता

by Sudha Murthy

ती अनुपम लावण्यवती, गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर घरंदाज, लक्ष्मीपुत्र. सर्वाच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साऱ्या घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं - कचराकुंडीत घाण फेकावी, तसं!... पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला - ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?... ’ काय असते या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?... कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी, यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

Mahatma Gandhi: महात्मा गांधी

by Ravindranath Thakur

महात्मा गांधी यांच्यावर गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी बंगालीत वेळोवेळी केलेल्या चिंतनावर आधारित लेखांचे मराठी पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले. या पुस्तकामधील गुरूदेवांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रविंद्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे. रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याला गांधीजींबद्दल काय वाटत असेल हे या लहानशा पुस्तिकेतून कळणार असल्यामुळे या पुस्तिकेचे विशेष महत्त्व आहे.

Mahatma Gandhiche Vichar - Novel: महात्मा गांधीचे विचार - कादंबरी

by U. R. Rao R. K. Prabhu

श्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.

Maitri

by Meenakshi Sardesai

This is a story of two very good friends. One was the son of an industrialist and the other was very poor. Both were in same class in a school. Shreyas was rich and Dagdu was poor. Shreyas cared for Dagdu. One day Dagdu had to give up education for the sake of earning. Shreyas gives him a job at his father’s company. His father finds that Dagdu is of good character and decided to give him a good education and take care of all his expenses. He employed Dagdu’s father in his company with a suitable job. Shreyas parents were proud of their son for having a very good friend.

Maitri

by Premchand

Friendship a story of two friends. at school teachers are very strict for fees. Amarkant is unable to pay his own fees so his friend Salim helps him. Read story what happens next.

Maitri Bankingashi: मैत्री बँकिंगशी

by Vandana Dharmadhikari

सौ. वंदना धर्माधिकारी लिखित “मैत्री बँकिंगशी” या पुस्तकाची बारावी आवृत्ती आहे, २०११मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. सर्वसामान्यांना बँकिंगबाबतची माहिती सहज, सोप्या पद्धतीने या पुस्तकातून होते. बँकिंगची तांत्रिकता असूनही हे पुस्तक वाचकांना विशेष उपयोगी ठरताना दिसत आहे. बँकिंग ही संकल्पना जरी सर्वत्र एकसारखीच असली तरी आजच्या ऑनलाईन पद्धतीमुळे बँकिंगची सगळी परिभाषा बदलून गेली आहे. प्रत्यक्ष बँकांमध्ये जाण्याची गरज आता उरलेली नाही. अशा या स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक युगात बँकिंगची संकल्पना सातत्याने बदलत आहे. त्यामुळे त्यातले बारकावे समजून घेत आवश्यक ती माहिती अपडेट ठेवण्याचीदेखील आज गरज आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी, विदेशी, लघुवित्त (Small Finance) अशा सर्वच प्रकारच्या बँका आणि सहकारी पतसंस्था यांमध्ये मूळ बँकिंग जरी सारखेच असले तरी प्रत्येक प्रकारातील नियम आणि व्यवहारातील बदल हे समजून घेणे आवश्यक आहे, ज्याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. बॅंकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बॅंकिंग करिअर निवडणार्‍या अशा उमेदवारांनादेखील हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे.

Maja

by Pankaj Chaturvedi

आपल्या रोजच्या जीवनात आनंद लपलेला असतो. या, ही गोष्ट वाचून त्याला शोधू...

Maja kutumb

by Arishi Naaz Kuldeep Sindu Shushila

A story of a boy and his family.

Majet Shikuya Marathi Class 1 - Maharashtra Board: मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र शासनाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय सन २००९ मध्ये घेतला. 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२' मध्येही याच धोरणानुसार, अनिवार्य मराठी हा विषय इयत्ता पहिलीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या स्तरावर मराठी हा विषय शिक्षकांनी श्रवण, भाषण व संभाषण या कौशल्यांच्या स्वरूपात शिकवावा आणि त्या विषयासाठी 'पाठ्यपुस्तक' असू नये अशी अपेक्षा आहे; म्हणून इयत्ता पहिलीकरिता मराठी विषयाची ही छोटेखानी पूरक साहित्य पुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली आहे. या पूरक पुस्तिकेमध्ये गाणी, गोष्टी दिल्या आहेत. तसेच परिचित, अपरिचित पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फुले, फळे, झाडे यांचा रंगीत चित्रे व शब्दांतून परिचय करून दिलेला आहे. काही सूचना व कृती दिल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ जावे यासाठी पुस्तिकेच्या शेवटी 'दिशा अध्ययन-अध्यापनाची' या शीर्षकाखाली मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक व दर्जेदार होण्यासाठी त्याचा उपयोग करावा.

Refine Search

Showing 801 through 825 of 1,567 results