- Table View
- List View
Man Me Hai Vishwaas First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मन में है विश्वास प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Vishwas Nangre Patilमन में है विश्वास हे विश्वास नांगरे-पाटील यांचे प्रेरणादायी पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कोकरूड या लहानशा खेड्यातून सुरुवात करत, त्यांनी कष्ट, जिद्द आणि स्वप्नांमुळे भारतीय पोलीस सेवेत (IPS) यशस्वी कारकीर्द गाजवली. पुस्तकात त्यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणा, शाळेतील आठवणी, खडतर परिस्थितीतही मिळवलेले यश, आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते संघर्ष, प्रयत्न आणि सकारात्मकतेच्या शक्तीवर आधारित आहे. ग्रामीण जीवनातील निसर्गरम्य आठवणी, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, आणि उच्चशिक्षणासाठी केलेल्या झगड्याचा प्रेरणादायी प्रवास यातून उलगडतो. २६/११ च्या रात्री हॉटेल ताजमध्ये दाखवलेले धैर्य, तसेच शौर्यपदकाने गौरवले गेलेला प्रसंग, हे प्रकरण पुस्तकाचा उत्कर्षबिंदू ठरतो. मन में है विश्वास हे केवळ आत्मचरित्र नाही, तर प्रत्येक वाचकाला त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. विश्वास नांगरे-पाटील यांची संघर्षमय जीवनकहाणी, विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी या पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील मुलांना ध्येय गाठण्यासाठी समर्पण, मेहनत आणि प्रामाणिकतेचा आदर्श प्रस्तुत करणारे हे पुस्तक आहे.
Manacha Mal Dhuvun Kadhala Tarach Jagan Halak Hou Shakat
by Baba BhandThis is a story of a man named Bhopale Maharaj. He got this name because of Bhopala(red pumpkin) made cap out of pumpkin, and used the stick from the same tree. He opened an orphanage and looked after them. He taught people about good things.
Manasachi Olakh
by D. V. JoshiThere is a cold war between Krishna and Duryodhana. Yudhistir apologizes to Krishna for not able to choose any wicked person for the ceremony. Krishna calls Duryodhan and asks him to find one gentleman in the crowd. He comes back and tells that there is not any gentleman in the gathering, suggesting that all are wicked here. Krishna says how a wicked man can find a gentleman.
Manasan Manasachi Kalaji Ghyayachi
by Baba BhandA teacher is hurt because of stone pelting in a village near Aurangabad. Rahim chacha comes and rescues this teacher. A riot breaks out after the destruction of the Babri masjid. Rahim chacha talks to young boys and dissolves the matter.
Manasashastra class 11 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमानसशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.
Manasashastra Class 12 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमानसशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.
Manasashastra Sadyakalin Prachalit Sampraday: मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय
by Mrs Kunda Dabholkar“मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे रॉबर्ट एस. वुडवर्थ यांच्या “Contemporary School of Psychology” या पुस्तकाचे हे भाषांतर आहे. “मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हा ग्रंथ म्हणजे मानसशास्त्राची व्याप्ती, आशय आणि रीत या विषयीच्या कोणत्या भिन्न विरोधी भूमिकांवर ते आधारले होते यासंबंधीची माहिती या पुस्तकातून आपल्याला वाचावयास मिळते. तसेच त्यांचा विकास कसकसा घडत गेला आणि भावी विकासाच्या संभाव्य दिशा कोणत्या होत्या याविषयीही विश्वसनीय आणि उद्बोधक माहिती या पुस्तकातून वाचकाला मिळते. शास्त्रीय ग्रंथांची शैली अलिप्त, औपचारिक आणि गंभीर असते. या पुस्तकातील माहितीही व्यापक आणि बिनचूक आहे. विवेचन तर्कशुद्ध आणि पद्धतशीर आहे. सामान्य वाचकाला कंटाळवाणी, नीरस किंवा क्लिष्ट वाटेल अशी एखादी ज्ञानशाखा तिच्या शास्त्रीय स्वरूपाशी प्रामाणिक राहून, आकर्षक स्वरूपात कशी मांडावी याचे, हे पुस्तक म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
Manasashastrachi Multatve Ani Manasashastriy Chachanya Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि मानसशास्त्रीय चाचण्या दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Anuradha Prashant Harkare"मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि मानसशास्त्रीय चाचण्या" या पुस्तकामध्ये मानवी मनाचे मूलभूत स्वरूप, वर्तनाचे विविध पैलू, व व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास समाविष्ट आहे. यात मानसशास्त्राचे क्षेत्र, त्याचा व्याप्ती, आणि मानसशास्त्रीय पद्धतींविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. मानवी वर्तन समजून घेण्यासाठी संशोधनाच्या विविध पद्धतींचा वापर कसा होतो हे पुस्तक स्पष्ट करते. सामाजिक मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्वशास्त्र, व संज्ञानात्मक मानसशास्त्र यांसारख्या शाखांवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचे महत्त्व व त्यांची अचूकता, उपयोगिता यावरही चर्चा आहे. तसेच, चाचण्यांद्वारे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, व मनोवृत्तीचा अभ्यास करण्याच्या तंत्रांचा आढावा दिला आहे. या ग्रंथात मानसशास्त्रीय तत्त्वांचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्याच्या उपायांवरही भाष्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी उपयुक्त अशी ही मार्गदर्शिका आहे, जी वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात मानसशास्त्राचा वापर कसा करायचा याचा मार्ग दाखवते.
Manasashastrachi Payabharani First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Anuradha Prashant Harkareसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात मानसशास्त्राची पायाभरणी अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. मानसशास्त्राची पायाभरणी हे पुस्तक विद्यार्थ्यांना मानसशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांवर सखोल ज्ञान प्रदान करते. यामध्ये विज्ञान म्हणून मानसशास्त्राचे स्थान, संशोधन पद्धतींचे स्वरूप, बोधात्मक प्रक्रियेचे स्पष्टीकरण, आणि वर्तनावर जैविक, सामाजिक, व मानसिक घटकांचा प्रभाव यांचा समावेश आहे. सहज सोपी भाषा आणि वस्तुनिष्ठ उदाहरणे यामुळे विद्यार्थ्यांसाठी समजणे सुलभ होते. व्यक्तिमत्त्व विकास, स्मृती, विस्मरण, शिकणे, भावना, प्रेरणा अशा संकल्पनांचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेसाठी उपयुक्त ठरते. मानसशास्त्राच्या ऐतिहासिक प्रवासापासून आधुनिक दृष्टिकोनांपर्यंतचा आढावा घेत हे पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या व्यापक पैलूंवर प्रकाश टाकते.
Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Anuradha Prashant Harkareप्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.
Manatale Chandane
by Madhu Mangesh KarnikManatale Chandane a story of Bablu. who was distribute newspaper every morning at author home. later himself becomes an author of a magazine.
Manav Dharma: मानवधर्म
by Dada Bhagwanमनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे? माणूस जन्म घेतो तेव्हापासूनच संसार चक्रामध्ये फसून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो.परम पूज्य दादा भगवान म्हणतात, मनुष्य जन्म चार गतिंचे जंक्शन आहे. जिथून देवगति, जनावरगतिमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होतो. ज्या प्रकारचे बी पेरले आहे आणि ज्या कारणांचे सेवन केले आहे, त्या गतिमध्ये जावे लागते.मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती केव्हा मिळेल? दादाजी आपल्याला सांगतात की, ‘मानवता’ किंवा ‘मानवधर्माची’ सर्वोत्तम व्याख्या हीच आहे की, कोणी तुम्हाला दुःख दिले, ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना दुःख होईल असा व्यवहार करू नये. पुढच्या जन्मी नर्कगति किंवा जनावर गतिमध्ये जायचे नसेल तर मानवधर्माचे नेहमी पालन केले पाहिजे. याविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. आणि आपले मनुष्य जीवन सार्थक करा.
Manavi Bhugol FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thoratसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. 'मानवी भूगोलाचा परिचय' या पहिल्या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा व त्यांचे महत्त्व यांचा आढावा घेतला आहे. 'लोकसंख्या' या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त व भारतीय लोकसंख्येची रचना अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच प्रकरण तीनमध्ये मानवी वसाहत, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, प्रारूप व आकृतिबंध तसेच भारतातील नागरीकरण व महाराष्ट्रातील नागरिकरणाचा समावेश केला आहे. याशिवाय शेवटच्या प्रकरणात कृषी, कृषीचे प्रकार, कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय कृषीच्या समस्या यांचा समावेश केलेला आहे.
Manavi Bhugol (Gg - 110 B) FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल (Gg - 110 B) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by A. B. Savadi P. S. Kolekarयु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोव्हेंबर 2019 पासून सेमिस्टर-2 करिता 'मानवी भूगोल' (Gg - 110 B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. सर्वसामान्यपणे भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत. एक, प्राकृतिक भूगोल व दुसरे, मानवी भूगोल. पुणे विद्यापीठाने 'मानवी भूगोल' हा विषय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर-2 च्या भूगोल विषयाच्या अध्ययनासाठी निश्चित केला आहे. या नवीन अभ्यासक्रमात मानवी भूगोलाच्या एकंदर चार शाखा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणातील संज्ञा/व्याख्या, संकल्पना, पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. दर्जेदार वैज्ञानिक मांडणी करून मुद्द्यांचे सुलभतेने स्पष्टीकरण केले आहे. यामुळे संकल्पना स्पष्ट होतील.
Manavi Bhugol (Parichay va Pratyakshike) Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानवी भूगोल (परिचय व प्रात्यक्षिके) दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Ashok Maruti Thorat Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Sanjay Dagu Pagarमानवी भूगोल हा भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखांपैकी एक असून, तो मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करतो. या विषयामध्ये लोकसंख्या, वसाहती, कृषी, आर्थिक क्रिया, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. मानवी भूगोलाच्या शाखांमध्ये आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, नागरी भूगोल, राजकीय भूगोल आणि पर्यटन भूगोल यांचा समावेश आहे. या विषयाचा विकास 18व्या शतकात सुरू झाला आणि पुढील काळात तो अधिक व्यापक होत गेला. मानवी भूगोलामध्ये लोकसंख्येचे वितरण, स्थलांतर, शहरीकरण, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक आणि विपणन यांचे सखोल विश्लेषण केले जाते. या अभ्यासामुळे मानवी जीवनावर भौगोलिक घटकांचा प्रभाव समजण्यास मदत होते. आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह प्रतिमा आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या मदतीने मानवी भूगोलाचा अभ्यास अधिक प्रभावीपणे केला जातो. त्यामुळे मानवी भूगोल हा वेगाने विकसित होणारा विषय असून, नियोजन व संसाधन व्यवस्थापनासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
Manavi Bhugol SYBA Fourth Semester - RTMNU: मानवी भूगोल बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Vitthal Gharpure'मानवी भूगोल' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टरसाठी लिहिलेले दर्जेदार पाठ्यपुस्तक आहे. 'मानवी भूगोल' या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत. त्यामध्ये मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, मानवी वंश - अर्थ, लक्षणे व मानवी वंशाचे प्रकार, मानवाचे प्रारंभकालीन आर्थिक व्यवसाय, लोकसंख्येचे जागतिक वितरण, भारताच्या लोकसंख्येचे विभाग, प्रात्यक्षिकांमध्ये प्रक्षेपणाची कृती, गुण, दोष, वैशिष्ट्ये व उपयोग, संख्याशास्त्रीय पद्धतींचा उपयोग, रेषा व स्तंभालेखाचे उपयोग आणि स्थलनिर्देशक नकाशांचा क्षेत्रीय अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश होतो. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, लघुत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत. तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.
Manavi Bhugol TY BA Pune University
by A. B. Savadi P. S. KolekarManavi Bhugol Marathi text book for Third year from The Pune Universtity in Marathi.
Manavi Hakk Ani Samajik Nyayacha Parichay Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sudhir Ashruba Yewle Vinayak Subhash Lashkar Dr Jyoti Suhas Gagangras Vikramaditya Prabhakar Gaikwadतृतीय वर्ष बी. ए. जनरलचे ‘मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय' हे पुस्तक वाचकांच्या हातात सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सेमिस्टर-6 चे हे पुस्तक आहे. गुन्हा आणि समाज हे पुस्तक लिहिताना गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्ह्यांविषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला होता. या क्रमिक पुस्तकात 'मानवी हक्क आणि सामाजिक न्याय' याच्याशी संबंधित विविध पैलूंची मांडणी केली आहे.
Manavi Vikasache Arthashastra Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: मानवी विकासाचे अर्थशास्त्र दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Rakshit Madan Bagde‘मानवी विकासाचे अर्थशास्त्र’ या पुस्तकात मानवी विकासाच्या विविध पैलूंचे विश्लेषण केले आहे. यात मानवी विकास म्हणजे काय, त्याचे अर्थ, व्याख्या, महत्त्व आणि उद्दिष्ट्ये काय आहेत, याबद्दल चर्चा केली आहे. या पुस्तकात मानवी विकासाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन स्पष्ट केले आहेत, जसे की मूलभूत गरजा दृष्टिकोन, गुणवत्ता जीवन दृष्टिकोन आणि क्षमता दृष्टिकोन. मानवी सुरक्षा, शाश्वत विकास उद्दिष्ट्ये आणि मानवी विकासासाठी दृष्टीकोन यावरही चर्चा करण्यात आली आहे. यात आर्थिक सुरक्षा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, व्यक्तिगत सुरक्षा, समुदाय सुरक्षा आणि राजकीय सुरक्षा यांचा समावेश आहे. पुस्तकात मानवी विकासाचे परिमाण आणि त्याचे मोजमाप कसे करायचे, याची माहिती दिली आहे. यात सशक्तीकरण, सहकार्य, समता, शाश्वतता, सहभाग आणि उत्पादकता यांसारख्या घटकांचे विश्लेषण आहे. तसेच, मानवी विकास निर्देशांक (HDI) आणि इतर निर्देशांकांच्या साहाय्याने मानवी विकासाचे मूल्यांकन कसे करायचे, हे स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, जागतिकीकरण, व्यापार आणि तंत्रज्ञान यांचा मानवी विकासावर काय परिणाम होतो, याचीही माहिती पुस्तकात दिली आहे.
Mangi Ani Tichi Aai
by Meenakshi SardesaiThis is a story of Mangi who was very intelligent. There was no financial backup for her studies and they had a problem running the house. So she makes a plan. She goes and finds a job for her mother. The mother was not comfortable with it but Mangi somehow convinces everybody at home and they all stay very happy. Mangi also studies hard and managed to get a scholarship.
Manichi Phajiti
by Raja ManaglvedhekarThis is a story of cat Mani and small girl suloo. On diwali vacation, suloo went to uncle homes. read story what happens.
Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी
by Vishwas Nangre Patilध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
Manorajya
by P. G. SahasrabuddheThis is a story of a Brahmin his name was Devsharma. One day he sees a dream about becoming rich and then in the dream he also saw that he is beating people with the stick. When he gets up he sees that he has broken many pots around him and he is fired from the job.
Manus Mhanun Jaganyasathi - Novel: माणूस म्हणून जगण्यासाठी - कादंबरी
by Vivek Panditमाणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.
Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी
by Shri. Shripad Nagnath Rautwadसामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.