Browse Results

Showing 1 through 25 of 1,551 results

Prachin Bhartacha Itihas First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्राचीन भारताचा इतिहास पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Virendra Bais

प्राचीन भारताचा इतिहास (इ.स.पूर्व काळ ते इ.स. ५५० पर्यंत) हे पुस्तक बी.ए. (प्रथम वर्ष) सत्र-१ साठी, नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार तयार करण्यात आले आहे. यात प्राचीन भारताचा इतिहास अगदी प्रारंभापासून ते इ.स. ५५० पर्यंत सुसंगत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडण्यात आलेला आहे. इतिहास लेखनाची साधने, हडप्पा आणि वैदिक संस्कृती, बौद्ध व जैन धर्माच्या चळवळी, मौर्य, कुशाण, सातवाहन व गुप्त साम्राज्यांचा इतिहास, प्रशासन, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थिती, स्थापत्य व साहित्याची प्रगती यांचा सखोल अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. तसेच वाकाटक व अन्य स्थानिक राजवंशांचाही आढावा घेतला आहे. प्रत्येक प्रकरणानंतर अभ्यासासाठी प्रश्नही दिले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही हे पुस्तक उपयुक्त ठरते. हे पुस्तक इतिहासाच्या गाभ्यातील विषय समजावून सांगत असल्यामुळे, प्राचीन भारताचा कालखंड समजून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन आहे.

Rup Kaviteche TYBA Sixth Semester - SPPU: रुप: कवितेचे टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Shirish Landage Prof. Dr. Bhaskar Dhoke Prof. Dr. Sandeep Sangale

कविता हा एक प्रमुख साहित्यप्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे, आविष्कार पाहावयाला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी, कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकीरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे; कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केले आहे.

Sahityarang Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्यरंग भाग ३ बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Rakesh Kabhe Dr Rekha Vadikhaye Dr Pramod Munghate Dr Shailendra Lende Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Sopandev Pise Shri. Sachin Upadhyay

साहित्यसरितेला तिच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणांवर विविध प्रवाह येऊन मिळालेत, त्यामुळे आज तिचे स्वरूप व्यापक झाले आहे. या तिच्या विविध कालखंडातील रूपाची, त्यातील विविध वाङ्मयप्रकारांची आणि विविध प्रवाहांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातील संत-पंत-तंत साहित्यातील काही घटकांबरोबरच आधुनिक मराठी साहित्यातील ललितबंध, एकांकिका, कथा, वैचारिक लेख, कविता, व्यक्तिचित्रे इत्यादींना या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीची चर्चा, चिकित्सा आणि चिंतन करण्याची क्षमता वाढीला लागावी, विद्यार्थी साहित्याचा आस्वादक व्हावा व त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि जीवनमूल्यांचे त्याला जीवनव्यवहारात उपयोजन करता यावे, साहित्यातील मूल्यगर्भ विचारांचा परिचय होऊन त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या अभ्यासक्रमात दर्जेदार घटकांची निवड मंडळाने केली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ठरविण्यात आलेले, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचे तसेच अभ्यासक्रमाचे पायाभूत उद्दिष्ट साधले जावे, या मुख्य हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

Sathottari Marathi Katha FYBA New NEP Syllabus - RTMNU: साठोत्तरी मराठी कथा एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Sopandev Pise

साठोत्तरी मराठी कथा हा संग्रह १९६० ते २००० या कालखंडातील मराठी कथांचा प्रतिनिधिक दस्तऐवज आहे. या काळातील कथा सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक विविधतेचे सशक्त दर्शन घडवतात. पारंपरिक चौकटी मोडून नव्या जीवनमूल्यांची मांडणी करणाऱ्या या कथांमध्ये ग्रामीण, नागर, श्रमिक, दलित, आणि स्त्रियांचे वास्तव चित्रित होते. ह्या कथांतून माणसाच्या दु:खद संघर्षांतून उगम पावलेली करुणा, तिरस्कार, विषमता, आणि विद्रोहाचे स्वर सामोरे येतात. हरिभाऊंच्या स्फुट कथांपासून सुरू झालेली ही वाटचाल द. मा. मिरासदार, श्री. म. माटे, मधु मंगेश कर्णिक, आनंद यादव यांच्यासारख्या विविध शैलीतील कथाकारांनी पुढे नेली. कुणी विनोदी ढंगात तर कुणी वास्तववादी पद्धतीने जीवनाचे विवेचन केले. काही कथा ग्रामीण जीवनातील कष्ट, दारिद्र्य, मातृत्व व ममता यांची झलक दाखवतात, तर काहींमध्ये स्त्री-विषयक जाणीवा, सामाजिक विषमता व अंतर्मुखता प्रकर्षाने दिसते. आधुनिक मराठी कथेला नवा चेहरा देणारा हा संग्रह अभ्यासक, विद्यार्थी व रसिकांसाठी अमूल्य ठरतो. साठोत्तरी मराठी कथा म्हणजे काळाच्या प्रवाहातील मानवी संवेदना, मूल्यप्रत्यय व संघर्ष यांचे प्रतिबिंब होय.

Kirkol Vipanan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: किरकोळ विपणन पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Prakash Dehliwal

किरकोळ विपणन हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष, सेमेस्टर-१ च्या नवीन शिक्षण प्रणाली (NEP) अंतर्गत लिहिलेले आहे. यात किरकोळ विक्री आणि विपणन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन, विक्री संवर्धन, आणि ब्रँडिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट, आणि कायदेशीर बाबी यांचीही माहिती दिली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सहज आणि समजण्यास सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरेल​.

Prastavik Sthool Arthashastra Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B. L. Jibhkate

‘प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र’ हे प्रा. बी. एल. जिभकाटे यांचे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले असून बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. या पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राचे संकल्पनात्मक, व्याप्तिगत, सैद्धांतिक आणि उपयुक्त पैलू स्पष्ट करण्यात आले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा आणि तिचे मूल्य, व्यापार चक्र, रोजगाराचे सिद्धांत, सार्वजनिक वित्त व्यवस्था, कर व्यवस्था, महागाई व अपस्फीती, आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय, आर्थिक नियोजन व वृद्धी आदी स्थूल विषयांचे सखोल विवेचन साध्या भाषेत केले आहे. विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पनांना उदाहरणांच्या सहाय्याने समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘सूक्ष्म ते स्थूल’ अर्थशास्त्राचा संक्रमण, गृहितकांचा फरक, मूल्यपातळी, आर्थिक धोरणे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास का आवश्यक आहे, याचे सविस्तर विश्लेषण आहे. याशिवाय आर्थिक समस्यांचे व्यापक स्वरूप, बेरोजगारी, व्यापार चक्राचे परिणाम, व सार्वजनिक हितासाठी तयार केलेले धोरणात्मक उपायही मांडण्यात आले आहेत. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांच्या गोंधळ टाळण्यासाठी संकल्पनांचे पर्यायी शब्द व इंग्रजी प्रतिशब्द दिले आहेत. परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या प्रश्नसंचासह हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण करते. हे पुस्तक केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यवहार्य दृष्टिकोनातून देखील स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करते.

Bhartache Sanvidhan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Sheikh Hassan Dr Jogendra W. Gawai

‘भारताचे संविधान’ हे पुस्तक विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले असून प्रा. शेख हाशम आणि डॉ. जोगेंद्र व. गवई यांचे संशोधन आणि लेखन यामध्ये समाविष्ट आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, १८५८ च्या कायद्यापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्य कायद्यापर्यंतच्या घटनात्मक विकासाचा सविस्तर आढावा यात घेतला आहे. घटनेची उद्देशपत्रिका, तिचा अर्थ, स्वरूप, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, आणि मूलभूत कर्तव्ये या सर्व बाबी सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. पुस्तकात केंद्र व राज्य शासनाच्या रचना, कार्य, अधिकार, न्यायमंडळाची स्वायत्तता, आणि संसद व विधानमंडळाच्या कार्यपद्धती यांचे विश्लेषण केलेले आहे. संविधान समितीच्या कार्याचा इतिहास, विविध सुधारणा कायदे, स्वातंत्र्यलढ्याचा घटनात्मक संदर्भ, तसेच भारतीय समाजातील विविधतेला स्वीकारून घडवून आणलेली समावेशक राज्यघटना हे या पुस्तकाचे महत्त्वाचे पैलू आहेत. यामध्ये राज्यघटनेतील मूल्ये – समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता – यांचे स्पष्टीकरण आहे. अभ्यासक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अभ्यासार्थ प्रश्न व उदाहरणेही दिली आहेत. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ एक शैक्षणिक ग्रंथ नसून भारतीय लोकशाही आणि राज्यकारभाराच्या मूळ तत्त्वांना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरते.

Arthashastrachi Multatve Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: अर्थशास्त्राची मूलतत्त्वे दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B. L. Jibhkate

“अर्थशास्त्राची मूलतत्त्वे” हे प्रा. बी. एल. जिभकाटे लिखित पुस्तक बी.ए. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राचे प्राथमिक पण मूलभूत पैलू सुलभ भाषेत स्पष्ट करते. पुस्तकात सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत, राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा, मागणी-पुरवठा, उपभोग, उत्पादन, बाजार, तसेच किंमतनिर्धारण इत्यादी संकल्पनांचा समावेश आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जावे यासाठी उदाहरणांचा वापर करून विविध व्याख्या आणि सिद्धांतांचे सुलभ विश्लेषण केले आहे. ॲडम स्मिथ, मार्शल आणि रॉबिन्स यांच्या व्याख्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून अर्थशास्त्राचे स्वरूप, त्याची व्याप्ती, मर्यादा व महत्त्व समजावून सांगितले आहे. तसेच आधुनिक काळात अर्थशास्त्र हे केवळ एक शास्त्र न राहता व्यवहार व धोरणात्मक पातळीवर प्रभाव टाकणारे ज्ञानकेंद्र बनले असल्याचे दाखवून दिले आहे. सूक्ष्मदृष्टिकोनातून व्यक्ती, कुटुंब, उद्योग या घटकांचा, तर स्थूलदृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्न, चलनविषयक धोरण, रोजगार इत्यादी बाबींचा समावेश अभ्यासात केला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल अशी रचना असून प्रत्येक घटकाचे उपविभाग व प्रश्नसंचही समाविष्ट आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासासाठी नव्हे तर विचारप्रवृत्त करणारे मार्गदर्शनही करते.

Sthool Arthashastra FYBA Second Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्र बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B.L. Jibhakate

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत “स्थूल अर्थशास्त्र" ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्राध्यापक मित्र आणि व विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग १ च्या सेमिस्टर - II च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले असून ते महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. अर्थशास्त्रातील काही संकल्पना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून एकाच संकल्पनेकरिता मराठीतील अनेक पर्यायी नावे दिलेली असून इंग्रजीतील प्रतिशब्दही दिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेत एखादी संकल्पना किंवा सिद्धांत वेगळ्या नावाने विचारण्यात आला तरी विद्यार्थांना त्याचे अचूक उत्तर देता येईल, असा विश्वास आहे.

Maharashtratil Sthanik Swarajya Sanstha TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar

तृतीय वर्ष कला शाखेच्या जनरल राज्यशास्त्र विषयासाठी (जी-३) ‘महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था’ हा नवीन अभ्यासक्रम २०२१ पासून आहे. स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक विकासामध्ये तसेच स्थानिक जनतेला सेवा-सुविधा पुरविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? त्याचा विकास त्यांची रचना, अधिकार व कार्ये, स्थानिक नेतृत्व, विकास, स्थानिक शासनाच्या संदर्भातील शासनाने नेमलेल्या समित्या, स्थानिक शासनासंदर्भात झालेल्या घटनादुरुस्त्या या सर्व मुद्द्यांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील हे अभ्यास साहित्य अत्यंत उपयोगाचे आहे. साध्या, सोप्या व सहजपणे आकलन होईल, अशा पद्धतीने विषयांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Aptavani Shreni-6: आप्तवाणी श्रेणी -६

by Dada Bhagwan

एकीकडे संसार व्यवहारात पदोपदी येणाऱ्या समस्या आणि दुसरीकडे आंतरिक संघर्षांशी झुंजणाऱ्या या काळाच्या मनुष्याला अंतरशांती कशी काय लाभेल? यातून सुटका कशी होईल? आपण पाहतो की कित्येकदा आपल्या बोलल्यामुळे समोरच्याला दुःख होत असते, तर कित्येकदा कोणी आपल्याला काही बोलले त्यामुळे आपल्याला दुःख होते, कधी वाटते आपल्याबरोबर अन्याय झाला आहे, तर कधी मनात शंका वाटत राहते, इतरांना दोषी पाहिले जाते... अशा परिस्थितीत समाधान कसे मिळवायचे? जीवन व्यवहार हे समस्यांचे संग्रहस्थानच आहे. एका समस्येचे निवारण झाले की दुसरी समस्या आ वासून उभीच असते. आपल्याला सतत अशा समस्यांचा सामना का करावा लागतो? स्वतःच्या कोणत्या चुकीमुळे आपण अनंतकाळापासून भटकत राहिलो आहोत? वास्तवात स्वतःजवळ आत्म्याचा परमानंद तर होताच पण स्वतः दैहिक सुखातच रममाण होता. ज्ञानी पुरुषांच्या कृपेमुळे आणि त्यानंतर स्व-पराक्रमाने ही चूक सुधारता येते. एकदा आत्मज्ञान झाले की अनंत समाधीसुख अनुभवास येते! तर चला, या अक्रम विज्ञानाद्वारे कर्म, बंधन, प्रतिक्रमण, वाणी, निसर्गाचे नियम... इत्यादीचे विज्ञान समजून घेऊया आणि त्या समजूतीने सांसारिक समस्यांना अगदी सहजपणे सोडवून परमानंद प्राप्तीकडे वळूया.

Aptavani-7 (In Marathi): आप्तवाणी श्रेणी - ७

by Dada Bhagwan

प्रस्तुत पुस्तक, ज्याचे नाव "आप्तवाणी ७" आहे, हे दादाश्रींच्या दैनंदिन जीवनाबद्दलच्या चर्चेचे आणि प्रश्नांच्या उत्तरांचे संकलन आहे. ज्ञानी पुरूष (ज्ञानी) जीवनातील साध्या घटनांना मोठ्या दृष्टी आणि समजुतीने पाहतात. अशा घटनांमुळे ज्ञानी वाचकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात एक नवीन दृष्टी आणि पूर्णपणे नवीन विचारप्रक्रिया मिळेल. येथे चर्चा केलेले विषय आहेत - जीवनात जागृती (सतर्कता), पैशाचे व्यवस्थापन, संघर्षमय परिस्थितीत शांत कसे राहायचे, कंटाळवाण्यावर मात कशी करावी, चिंता/भीतीपासून मुक्तता, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय घडते - मृत्यू जवळ येणे, क्रोध-चकमकी, सर्वात वाईट आजारांमध्ये शांत कसे राहायचे, पुण्य आणि पाप-कर्माची कारणे (पाप-पुण्य) आणि कार्यालय/व्यवसायात येणाऱ्या नियमित समस्यांना तोंड देणे. या पुस्तकात ज्ञानी पुरूषांच्या हृदयस्पर्शी भाषणाचे सादरीकरण केले आहे; ज्यामध्ये यापैकी काही घटना तपशीलवार प्रकाशित केल्या आहेत.

Aptavani Shreni-5: आप्तवाणी श्रेणी -५

by Dada Bhagwan

व्यवस्थित शक्ति के द्वारा हमारे जीवन का समस्त सांसारिक व्यवहार डिस्चार्ज हो रहा है। हमारी पाँचों इन्द्रियाँ कर्म के अधीन हैं। कर्मों के बंधन का कारण क्या है? यह धारणा की कि ‘मैं चंदुलाल हूँ’ वह कर्म बंधन का मूल कारण है। सिर्फ सच (तथ्य) जानने की आवश्यकता है। यह एक विज्ञान है। इस पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने पाँच ज्ञान इन्द्रियों तथा उनके कार्यों की प्रणाली के बारे में बताया है। मन-बुद्धि-चित्त-अहंकार, यह सब इन्द्रियों के अलग-अलग कार्य हैं। फिर अपना कार्य करने में कौन असफल रहा? ‘स्व’ रहा। ‘स्व’ का कार्य है जानना, देखना और हमेंशा आनंदमय स्थिति में रहना। हर इन्सान ज़िंदगी के बहाव के साथ आगे बह रहा है। यहाँ कोई भी कर्ता नहीं है। अगर कोई स्वतंत्र कर्ता होता तो वह हमेंशा बंधन में ही रहता। जो नैमित्तिक कर्ता है वह कभी भी बंधन में नहीं रहता। संसार प्राकृतिक परिस्थितियों के प्रभाव से उत्त्पन्न परिणाम पर ही चलता है। ऐसी परिस्थिति में ‘मैं कर्ता हूँ’ की गलत धारणा की उत्पत्ति होती है। इस कर्तापन की गलत धारणा की वजह से अगले जन्म के बीज बोए जाते हैं। इस संकलन में परम पूज्य दादाश्री ने कर्म के विज्ञान, कर्तापन, पाँच इन्द्रियों, अहंकार, मनुष्यों का स्वभाव, ज्ञानियों के प्रति विनय, पापों का प्रतिक्रमण, प्रायश्चित इत्यादि विषयों के बारे में बताया है। यह समझ साधकों को स्वयं के बारे में व संसार में दूसरों से कैसे शांतिपूर्वक व्यवहार करें, इस बारे में मदद करती है।

Pratikraman (Granth): प्रतिक्रमण (ग्रंथ)

by Dada Bhagwan

माणूस पावलोपावली कुठली ना कुठली तरी चूक करतच असतो. त्यामुळे इतरांना खूप दुःख होते. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला या सर्व राग– द्वेष याच्या हिशोबातून मुक्त व्हावे लागेल. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्याकडून घडलेल्या पापांसाठी प्रायश्चित्त करणे किंवा माफी मागणे. हे करण्यासाठी तीर्थंकरांनी आपल्याला खूप शक्तिशाली हत्यार ( साधन) दिले आहे ज्याचे नाव आहे - प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे आपल्याकडून झालेली अतिक्रमणे धुऊन टाकणे. ज्ञानी पुरुष दादा भगवान यांनी आपल्याला आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान याची किल्ली दिली आहे. या किल्लीद्वारे आपण अतिक्रमणांपासून मुक्त होऊ शकतो. आलोचना याचा अर्थ आहे की आपली चूक कबूल करणे. प्रतिक्रमण म्हणजे त्या चुकीबद्दल माफी मागणे आणि प्रत्याख्यान करणे याचा अर्थ अशी चूक पुन्हा न होवो असा दृढ निश्चय करणे. या पुस्तकात आपल्याला आपण केलेल्या अनेक वेगवेगळ्या अतिक्रमणांतून मुक्त कसे व्हावे याचा मार्ग मिळतो.

Aptavani Shreni-4: आप्तवाणी श्रेणी -४

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल.ज्ज् दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Jagat Karta Kaun?: जगत कर्ता कोण?

by Dada Bhagwan

अनादि काळापासून जगाची वास्तविकता जाणण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील आहे. परंतु तो खरे काय ते जाणू शकलेला नाही. मुख्यतः वास्तविकतेत, ‘मी कोण आहे ? या जगाला चालविणारा कोण आहे? तसेच जगाचा रचनाकार कोण आहे ?’ हे जाणून घ्यायला हवे. प्रस्तुत संकलनात खरा कर्ता कोण आहे, हे रहस्य उघड केले आहे. सामान्यतः काही चांगले झाले तर ‘मी केले’ असे तो मानतो आणि वाईट झाले तर दुसऱ्यावर आक्षेप घेतो की ‘त्याने बिघडविले.’ नाही तर ‘माझी ग्रहदशा बिघडली आहे’ असे बोलतो, किंवा ‘देवाने केले’ असा आरोप पण करतो. या सर्व राँग बिलीफस् (चुकीच्या मान्यता) आहेत. देव काय असा पक्षपात करणारा आहे का, की तो आपले नुकसान करील ? हे जग कोणी बनविले ? जर कोणी बनविणारा असेल तर मग त्याला कोणी बनविले? मग त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले ? म्हणजे या गोष्टीचा अंतच नाही. आणि दुसरा असाही प्रश्न पडतो की, जर त्याला जग बनवायचेच होते तर त्याने असे जग का बनविले की ज्यात सर्व दुःखीच आहेत ? कोणीच सुखी नाही ? म्हणजे त्याची मौज आणि आमची शिक्षा, हा कसला न्याय? या काळात कर्त्या संबंधीचा सिद्धांत पहिल्यांदाच विश्वाला यथार्थपणे परम पूज्य दादा भगवानांनी दिला आहे, आणि तो असा आहे की जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. या जगाला रचणारा किंवा चालविणारा कोणीही नाही. हे जग सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सने चालत आहे. ज्याला परम पूज्य दादाश्री ‘व्यवस्थित शक्ती’ असे म्हणतात. जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, परंतु सगळे नैमित्तिक कर्ता आहेत, सगळे निमित्त आहेत. गीतेत पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, हे अर्जुना! तू युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस. प्रस्तुत पुस्तिकेत कर्ता कोण, याचे रहस्य परम पूज्य दादाश्रींनी साध्या सरळ भाषेत, हृदयात उतरेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे.

Karmcha Siddhant: कर्माचा सिद्धांत

by Dada Bhagwan

कर्म म्हणजे काय ? चांगली कर्मे वाईट कर्मांना धूऊ शकतात का ? चांगली माणसे दुःखी का असतात? कर्मबंधन होणे कसे थांबवायचे ? कर्मामुळे कोण बंधनात आहे, शरीर की आत्मा ? जेव्हा आपली सर्व कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यू होतो. हे सारे जग म्हणजे दुसरे काही नाही, फक्त कर्माचा सिद्धांत आहे. बंधनाचे अस्तित्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. तुमच्या समोर जे काही येते त्याचे चित्रण तुम्हीच केलेले आहे; त्यासाठी इतर कोणी जबाबदार नाही. अनंत जन्मांसाठी ‘संपूर्णपणे फक्त’ तुम्हीच जबाबदार आहात. परम पूज्य दादाजी सांगतात कर्माची बीजे पूर्व जन्मात पेरली गेली होती आणि त्याची फळे या जन्मात मिळतात. त्या कर्मांची फळे कोण देतो? देव ? नाही. फळे निसर्ग किंवा आपण ज्याला ‘सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स’ म्हणतो, तो देतो. परम पूज्य दादाश्रींनी आपल्या ज्ञानाद्वारे कर्मांचे विज्ञान जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानातेमुळे कर्म भोगतेवेळी राग-द्वेष होतात, त्यामुळे नवीन कर्मे बांधली जातात, जी मग पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्मबंधन होण्याचे थांबवितात. जेव्हा सर्व कर्मे पूर्णपणे संपतात, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते.

Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले

by Dr Hrishiskesh Pradeep Bodhe

स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…

Aptavani Shreni-3: आप्तवाणी श्रेणी-३

by Dada Bhagwan

ज़िंदगी में लोगों के बहुत से लक्ष्य और उद्देश होते हैं, लेकिन वे सबसे बुनियादी सवाल का जवाब नहीं दे पाते कि ‘मैं कौन हूँ’। बल्कि हममें से अधिकतर लोग यह नहीं जानते। अनंत समय से लोग संसार के भौतिक साधनों के पीछे भागते रहे हैं। सिर्फ ज्ञानीपुरुष ही आत्म साक्षात्कार करवा सकते हैं और आपको संसार के भौतिक बंधनों से मुक्ति दिलवा सकते हैं। प्रस्तुत पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने आत्मा के गुणों और अन्य अनेकों विषयों जैसे ‘स्वयं’ के ज्ञान, दर्शन तथा शक्तियों के बारे में बताया है। सुख, स्वसत्ता, परसत्ता, स्वपरिणाम, परपरिणाम, व्यवहार आत्मा, निश्चय आत्मा तथा अनेक विषयों के बारे मे भी बताया है। पुस्तक के दुसरे भाग में परम पूज्य दादाश्री ने ‘क्लेश रहित जीवन कैसे जीएँ’ इसकी चाबी दी है तथा यह भी बताया है कि सही सोच से परिवार में बिना दुखी हुए कैसे व्यव्हार करें जैसे-बच्चों से व्यव्हार, दूसरों को सुधारने के बजाय खुद को सुधारना, दूसरों के साथ तालमेल बिठाना, सांसारिक संबंधों को कैसे निभाएँ, परिवार, मेहमान, बड़ों के साथ, अलग-अलग व्यक्तित्ववाले सदस्यों से कैसे व्यवहार करें, रिश्तों को सामान्य कैसे करें इत्यादि... इस पुस्तक का अध्ययन करके जीवन में उतारने से जीवन हमेशा के लिए शांति और आनंदमय हो जाएगा।

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Rajyashastracha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Koravle Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार द्वितीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर - 2 (G2) CC-1D (3) साठी ‘राज्यशास्त्राचा परिचय' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. सत्र 4 साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे मूलभूत राजकीय मूल्ये हे असून यामध्ये स्वातंत्र्य संकल्पना, स्वातंत्र्याचे प्रकार, स्वातंत्र्याचे संरक्षक घटक 'समता', समतेचे प्रकार, समतेपुढील आव्हाने, न्याय संकल्पना, व्यायाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन हे हक्क/अधिकार हे असून यामध्ये आपण हक्काच्या व्याख्या आणि अर्थ, प्रकार व हक्कांसमोरील आव्हाने अभ्यासणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करणार आहोत यात राष्ट्रवाद, समाजवाद, फॅसिस्टवाद या विचारप्रणाली आहेत. प्रकरण चारमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना, कार्ये आणि आव्हाने, प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये युरोपियन संघ (EU), सार्क, ओपेक, नाटो यांची ओळख करून घेणार आहोत. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या ही राजकीय संकल्पना म्हणून अभ्यासणार आहोत.

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: लोकसंख्या भूगोल पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dilip Dnyaneshwar Muluk Dr Jyotiram Chandrakant More Dr Arjun Haribhau Musmade Dr Snehal Nivruti Kasar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विशेष स्तरावर 'लोकसंख्या भूगोल' हा विषय समाविष्ट केलेला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

Pashchimatya Rajakiy Vichar 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: पाश्चिमात्य राजकीय विचार २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Pramod Sharda Rajendra Tambe Omkar Nirmala Ankush Koravle Vikas Lalita Tejerao Waghmare

शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या (CBCS) पॅटर्नप्रमाणे एस.वाय.बी.ए. राज्यशास्त्र विशेष स्तरावरील (Discipline Specific Efective Course) (DSE - 1BC3) म्हणून, 'पाश्चिमात्य राजकीय विचार' या विषयाचा सत्र 4 साठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमानुसार सत्र चारमध्ये आपण चार विचारवंत अभ्यासणार आहोत. यात प्रकरण 1 मध्ये रूसो यांच्या राज्याचा स्वभाव, सामूहिक ईहा व सामाजिक कराराचा सिद्धान्त यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 2 मध्ये हेगेल यांच्या आदर्शवाद, राज्यांचा सिद्धान्त आणि स्वातंत्र्यावरील त्यांचे विचार या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 3 मध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांच्या स्वातंत्र्यविषयक विचार, प्रातिनिधिक शासन आणि उपयुक्ततावादावरील विचार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 4 मध्ये कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवाद वर्गसंघर्ष, राज्य आणि क्रांतीचा सिद्धान्त या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत.

Paryavaraniy Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एस.वाय.बी.ए. सेमिस्टर - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल 2' विषय कोड Gg - 210 (B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. पर्यावरणीय भूगोल 2 हा पूर्णपणे उपयोजित पर्यावरणीय भूगोलाचा भाग आहे. वर्तमान स्थितीत आपण ज्या पर्यावरणीय समस्यांना/आपत्तींना तोंड देत आहोत त्यांचा ऊहापोह अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्या दृष्टीने पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. या दृष्टीने आपण या 'सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय आपत्ती (2) पर्यावरणीय समस्या (3) पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन (4) पर्यावरणीय धोरणे या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.

Sakaratmak Manasashastra Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: सकारात्मक मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

द्वितीय वर्ष कला या अभ्यासक्रमांतर्गत सामान्य मानसशास्त्राच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले हे पाठ्यपुस्तक आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्यांना मानसशास्त्र आवडते त्या सर्वांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व समजेल. आजमितीला सर्वांनाच अनिश्चितता, दहशतवाद, जागतिक स्तरावरील स्पर्धा, चिंता, संताप, शोषण इत्यादी नकारात्मक बाबींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने सकारात्मकता अंगी बाणविणे किती महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणे प्राधान्याचे असल्याने ‘सकारात्मक मानसशास्त्र’ हा विषय अभ्यासण्याची निकड निर्माण झाली आहे. या विषयाचा अंतर्भाव निश्चितच स्वागतार्ह आहे. जागतिक स्तरावरील 'कोविड-19' या महामारीची परिस्थिती पाहता सकारात्मक मानसशास्त्र या विषयावर आधारित हे पुस्तक अगदी योग्य वेळी आले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Refine Search

Showing 1 through 25 of 1,551 results