Browse Results

Showing 1,376 through 1,400 of 1,427 results

Sakaratmak Manasashastra Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: सकारात्मक मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

द्वितीय वर्ष कला या अभ्यासक्रमांतर्गत सामान्य मानसशास्त्राच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले हे पाठ्यपुस्तक आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्यांना मानसशास्त्र आवडते त्या सर्वांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व समजेल. आजमितीला सर्वांनाच अनिश्चितता, दहशतवाद, जागतिक स्तरावरील स्पर्धा, चिंता, संताप, शोषण इत्यादी नकारात्मक बाबींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने सकारात्मकता अंगी बाणविणे किती महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणे प्राधान्याचे असल्याने ‘सकारात्मक मानसशास्त्र’ हा विषय अभ्यासण्याची निकड निर्माण झाली आहे. या विषयाचा अंतर्भाव निश्चितच स्वागतार्ह आहे. जागतिक स्तरावरील 'कोविड-19' या महामारीची परिस्थिती पाहता सकारात्मक मानसशास्त्र या विषयावर आधारित हे पुस्तक अगदी योग्य वेळी आले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Samajshastra Vishay Ani Drushtikon FYBA Second Semester- RTMNU: समाजशास्त्र: विषय आणि दृष्टिकोन बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. सत्र-१ आणि बी.ए. सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात काही बदल केला आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. सत्र-१ आणि बी.ए. सत्र-२ च्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील ‘समाजशास्त्र' किंवा 'समाजशास्त्र परिचय' या विषयाकरिता उपयुक्त आहे.

Sanrakshanshastra class 11 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता अकरावीचे पुस्तक हे राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेला केंद्रभूत मानून तयार केले गेले आहे. संरक्षणशास्त्र या विषयाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय यात दिला आहे. यामध्ये राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा; भूराजनीती; संरक्षण अर्थशास्त्र; लष्करी इतिहास; विज्ञान आणि तंत्रज्ञानांचे कार्य यांचा समावेश केला गेला आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात चर्चिल्या गेले आहेत. संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबी या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याचा तुम्हांला निश्चितच उपयोग होईल. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना सुचवलेले उपक्रम शिक्षक आणि पालकांच्या मदतीने पूर्ण करा. याच बरोबर क्यू. आर. कोडचाही वापर करावा.

Sarvajanik Ayavyay 1 Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय १ पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D.G. Ushir Prof. Dr. S.R. Jawale Dr D. B. Pawar Dr S. B. Syyad

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र स्पेशल पेपर-4: सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच. अभ्यास मंडळातील माननीय सदस्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवीन अभ्यासक्रमांमध्ये काही जास्तीच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की पूर्वीप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांकडून स्वागत होईल. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Sathottari Marathi Kavita SYBA Third Semester - RTMNU: साठोत्तरी मराठी कविता बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Rakesh Kabhe

'साठोत्तरी मराठी कविता' हे १९६० नंतरच्या मराठी काव्याचे प्रातिनिधिक संपादन मराठी अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि रसिक वाचकांच्या भावराज्यात प्रस्तुत केलेले आहे. काव्याची निर्मिती आणि काव्याची समीक्षा ह्यांचा प्रवास, कालखंडाचा विचार करता कधीही समांतरपणे घडून येत नाही. काव्यनिर्मिती स्थिरस्थावर झाल्यावर, काहीएक मान्यता प्राप्त झाल्यावर, तिला काव्यसंग्रहांचे रूप प्राप्त झाल्यावर; त्यानंतर मग समावेशक अशा समीक्षा-विश्लेषणाला सुरुवात होत असते. ६० नंतरच्या बहुआयामी मराठी काव्यप्रवाहाची समीक्षा साधारणपणे १९९० नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतरच्या गत तीन दशकांत त्याविषयीचे निश्चित असे मूल्यात्मक निष्कर्षही प्रतिपादित केले गेले. प्रस्तुत संग्रहास जोडलेल्या काव्यसमीक्षाग्रंथाच्या सूचीवरूनही ह्या विशिष्ट वाङ्मयव्यवहाराची कल्पना येऊ शकते. आधुनिक मराठी काव्यपरंपरेला खऱ्या अर्थाने 'नवी' वळणे आणि नवे' प्रवाह साठोत्तर काळातच मिळालेले दिसतात. आठशे वर्षांच्या समृद्ध मराठी काव्यपरंपरेला ह्याच काळात नवनवे वैशिष्ट्यपूर्ण धुमारेही फुटलेले दिसतात. प्रस्तुत संपादनात मराठी काव्यधारेची हीच विविधता आणि समृद्धता संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Savad Raha Jagaruk Vha!: सावध रहा, जागरूक व्हा!

by Reserve Bank Of India

गेल्या काही वर्षांत, डिजीटल माध्यमांचा वापर करून पैसे देवाण घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्राहकांच्या सोयीसुविधेत तर भर पडली आहेच, शिवाय आर्थिक समावेशनाचे राष्ट्रीय उद्दीष्ट गाठण्यातही मोठा हातभार लागला आहे. परंतु आर्थिक व्यवहारांत सुलभता येण्याबरोबरच यामार्फत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. सर्वसामान्य, भोळ्या-भाबड्या नागरिकांनी मोठ्या स्वकष्टाने कमावलेले पैसे लुबाडण्यासाठी आर्थिक गुन्हेगारांकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. या गुन्हेगारांकडून मुख्यत: सध्याच्या तंत्रज्ञानाभिमुख आर्थिक व्यवहारांच्या जगाशी नव्यानेच ओळख होत असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते. अशा या आर्थिक व्यवहारांसाठी नव्यानेच डिजिटल माध्यमे वापरणाऱ्या नवख्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन या पुस्तिकेची रचना करण्यात आली असून यासंदर्भात जास्तीत जास्त व्यावहारिक पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.

Shikshanshastra class 11 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता अकरावी या शिक्षणशास्त्र शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन आणि शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून एक नवीन अध्याय शिकावयास मिळेल. शिक्षणाच्या पायाभूत आधार, भारतीय आणि पाश्चिमात्य विचारवंतानी सांगितलेले शिक्षणाचा अर्थ कळेल. आपल्या शिक्षण व्यवस्थेला विविध विचारवंत आणि सुधारकांनी वैचारिक अधिष्ठान दिलेले आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.

Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.

Sthool Arthashastra 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. B. Kale Dr S. R. Jawale Dr G. K. Sanap

द्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय विशेष (Special) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थूल अर्थशास्त्र भाग-2 हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Sukshma Arthashastra 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. D. Awhad Dr S. R. Javale Dr D. B. Pawar

द्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र स्पेशल - 1: सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या काढून विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Sukshma Arthashastra 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Jawale Dr S. D. Awhad Dr D. B. Pawar

द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र (एस-1) भाग II साठी हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Swatantrya Sangramache Mahabharat: स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत

by G. P. Pradhan

इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.

A Twist in the Tale: अ ट्विस्ट इन द टेल

by Jeffrey Archer

भांडणाच्या भरात एका प्रियकराकडून त्याच्या प्रेयसीचा खून होतो आणि अटक मात्र भलत्याच माणसाला होते... एकदम वेगळ्याच प्रकारचं वाईन टेस्टिंग... एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रणयाचा खेळ... गोल्फ क्लबहाउसच्या बारमध्ये जुंपलेलं आगळंवेगळं भांडण... कॉर्नफ्लेक्स खाण्यावरून सुरू झालेलं वैमनस्य आणि त्यातून उद्भवलेली ईर्ष्या... अत्यंत धूर्तपणे रचलेलं कथानक, अत्यंत वेगवान आणि मनोरंजनाने ओतप्रोत भरलेल्या या कथांमधून हाताळण्यात आलेल्या काही विषयांची ही छोटीशी झलक... चित्तथरारक सुरुवात आणि धक्कादायक शेवट असलेल्या... सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लेखकाच्या लेखणीतून उत्तरलेल्या रहस्यमय, उत्कंठा वाढविणाऱ्या कथांचा संग्रह.

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan class 11 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२१ पासून इयत्ता ११ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पाठ्यपुस्तक आहे. हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Vastrashastra class 11 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वस्त्रशास्त्र इयत्ता ११ वी या विषयाच्या पाठ्यपुस्तकाची आकर्षक स्वरूपाची प्रत आहे. सद्यस्थितीतील संकल्पनांचे ज्ञान, नवीन नैसर्गिक तंतूचा विकास, त्यांचे स्वरूप, उगम, उत्पादन, उपयोग व काळजी या बाबींद्वारे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. वस्त्रांचे क्रियाशील उत्पादन, हातमागाची वस्त्रे (हॅन्डलूम क्लॉथ) आणि भारतातील विविध राज्यातील वस्त्रांचा उपयोग यांचे मूलभूत ज्ञान प्राप्त करावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांकरीता हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विविध प्रकारचे वस्त्र, त्यांची पारंपरिक ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची सजावट, डिझाईन, धुलाईची उपकरणे, त्यांचा वापर याविषयीचे विस्तृत विचार, माहिती यांचा समावेश पुस्तकातील घटकांमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाचा उपयोग समजण्यासाठी या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले आहे.

Vastrashastra Class 12 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ह्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम सुधारित असून त्यात वैशिष्टयपूर्ण अशा मानवनिर्मित तंतू आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात सतत वाढत जाणारे उपयोग, रंगाई, छपाई व फॅशन डिझायनिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. हे पाठ्यपुस्तक अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना वस्त्रशास्त्राचे विविध पैलू, त्याचा वैभवशाली प्राचीन इतिहास आणि हल्ली प्रचलित असलेला कल याचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे. तुम्हांला वस्त्रशास्त्राची निगडीत विविध क्षेत्रांची रूपरेषा दाखविल्यावर भर देण्यात आला आहे.

Vitteey Vyavastha 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. R. Javale D. G. Ushir

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तीय व्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तीय व्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही, तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Aadhunik Rajkiya Vishleshan 2 Paper 2 TYBA Sixth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण २ पेपर २ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R.G. Varadkar

राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए.भाग-3 साठी आधुनिक राजकीय विश्लेषण 2' हा पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यशास्त्राला अधिक शास्त्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने अमेरिका, जर्मनी अशा देशांतील राजकीय विश्लेषकांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रियेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संकल्पनांचा त्यांनी वापर केला. त्यांच्या या प्रयत्नातून आधुनिक राजकीय विश्लेषण पद्धतीचा उदय झाला. राज्यशास्त्राच्या विकासात या विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.

Antararashtriya Sambandh 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध 2 पेपर 4 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर-4, सत्र-6, DSE-2D साठी 'आंतरराष्ट्रीय संबंध-II' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. सत्र-6 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.

Bhartiya Aarthik Vikas 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. V. Tile Dr S. R. Jawale Dr S. R. Pagar

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र सामान्य स्तर-3 (जी-3) सत्र 5 आणि 6 साठी भारतीय आर्थिक विकास हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवीन सिद्धान्त आणि घटक घेण्यात आले आहेत. त्या सर्व घटकांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज

by Krishnarao Arjun Keluskar

गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

Gramin Vikasacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल 2 पेपर 3 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Pagaar Ashok Maruti Thorat Dr Jyotiram More

'ग्रामीण विकासाचा भूगोल भाग 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच होईल यात शंका नाही. म्हणूनच दुसऱ्या प्रकरणात समस्याप्रधान क्षेत्रांना डोळ्यांसमोर ठेवून विकासाच्या दिशांवर चर्चा केलेली दिसून येते. आपला देश आपल्या राज्यघटनेनुसार समानता मानणारा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण 'कल्याणकारी' राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे. म्हणूनच शासनातर्फे तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तो कशा प्रकारे केला जातो, यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत इत्यादींची सविस्तर माहिती तिसऱ्या प्रकरणात दिसून येते. चौथ्या प्रकरणात ग्रामीण विकासाबाबत झालेल्या किंवा चालू असलेल्या प्रयत्नांचा चिकित्सात्मक अभ्यास स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी 'क्षेत्रीय अभ्यास पद्धती' अवलंबलेली आहे. याचाच अर्थ एखाद्या गावाच्या, गटाच्या किंवा समूहाच्या विकासाचे प्रयत्न अभ्यासणे हा होय. यात योग्य उदाहरणे निवडून त्याबाबत साधकबाधक चर्चा केलेली दिसून येते. सर्व प्रकरणांच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला कितपत ज्ञान प्राप्त झाले आहे हेही पडताळून पाहता येईल.

Refine Search

Showing 1,376 through 1,400 of 1,427 results