Browse Results

Showing 26 through 50 of 1,427 results

Paryavaraniy Abhyas SYBA, B.COM, B.SC Second Semester - SPPU: पर्यावरणीय अभ्यास एस.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pandurang Patil Dr Sanjay Patil

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, प्रदूषण प्रतिबंधन यामध्ये उत्साही युवाशक्तीचा वापर करता येईल व युवक मोठा वाटा उचलू शकतील याची जाणीव असल्याने पुणे विद्यापीठाने एक धाडसी प्रगत व आवश्यक पाऊल उचलले आहे. सन 2004-05 या शैक्षणिक वर्षापासून B.A., B.Com. व B.Sc. या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना 100 गुणांचा, 'पर्यावरणीय अभ्यास' (Environmental Studies) हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे व अनिवार्य (सक्तीचा) ठेवला आहे. तसेच इतर विद्यापीठांनीही अशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे सदर पुस्तक याच अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांची गरज पुरविण्याचा एक अल्प व नम्र प्रयत्न आहे. तसेच या पुस्तकाचा विषयशिक्षक, तज्ज्ञ आणि पर्यावरण-प्रश्नाबद्दल रुची असणारे सामान्य वाचक यांनाही काही उपयोग होईल अशीही आमची आशा आहे.

Rup Kaviteche TYBA Sixth Semester - SPPU: रुप: कवितेचे टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Shirish Landage Prof. Dr. Bhaskar Dhoke Prof. Dr. Sandeep Sangale

कविता हा एक प्रमुख साहित्यप्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे, आविष्कार पाहावयाला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी, कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकीरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे; कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केले आहे.

Sahityarang Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्यरंग भाग ३ बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rekha Vadikhaye Dr Pramod Munghate Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Shailendra Lende Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Sopandev Pise Dr Rakesh Kabhe Shri. Sachin Upadhyay

साहित्यसरितेला तिच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणांवर विविध प्रवाह येऊन मिळालेत, त्यामुळे आज तिचे स्वरूप व्यापक झाले आहे. या तिच्या विविध कालखंडातील रूपाची, त्यातील विविध वाङ्मयप्रकारांची आणि विविध प्रवाहांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातील संत-पंत-तंत साहित्यातील काही घटकांबरोबरच आधुनिक मराठी साहित्यातील ललितबंध, एकांकिका, कथा, वैचारिक लेख, कविता, व्यक्तिचित्रे इत्यादींना या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीची चर्चा, चिकित्सा आणि चिंतन करण्याची क्षमता वाढीला लागावी, विद्यार्थी साहित्याचा आस्वादक व्हावा व त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि जीवनमूल्यांचे त्याला जीवनव्यवहारात उपयोजन करता यावे, साहित्यातील मूल्यगर्भ विचारांचा परिचय होऊन त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या अभ्यासक्रमात दर्जेदार घटकांची निवड मंडळाने केली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ठरविण्यात आलेले, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचे तसेच अभ्यासक्रमाचे पायाभूत उद्दिष्ट साधले जावे, या मुख्य हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA First Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.

Sarvajanik Ayavyay 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय 2 पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D. G. Late Prof. Dr. S. B. Syed Prof. Dr. S. R. Javale Prof. S. P. Adhav

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 व 6 नेमलेल्या अर्थशास्त्र विशेष पेपर-3 साठी सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन काही जास्तीचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. सत्र 6 साठी नेमलेल्या अभासक्रमानुसार आम्ही सार्वजनिक आयव्ययाचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Swatantryottar Bharat (1947-1991) Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Swatantryottar Bharat 1947-1991 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७-१९९१) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने चौथे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Talghar: तळघर

by Narayan Dharap

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."

Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Kalyan Chavan

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.

19 Vya Shatakatil Maharashtra Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: १९ व्या शतकातील महाराष्ट्र पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी '19 व्या शतकातील महाराष्ट्र' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे तिसरे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

20 Vya Shatakatil Maharashtracha Itihas Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: २० व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सैमिस्टरसाठी '20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास' हे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाचवे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Aadhunik Rajkiya Vishleshan Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-3 (G-3) CC-1E (3) साठी 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश आधुनिक राजकीय विश्लेषण ही एक अध्ययन शाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध विश्लेषणात्मक सिद्धान्तांचा आणि दृष्टिकोनांचा परिचय होणे आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल या उदात्त हेतूने 'राज्यशास्त्र अभ्यास मंडळ' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

Aamod Sampurn-Sanskritam class 9 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे एकूण सोळा अध्याय आहेत तसेच एक घटक परिक्षेचा एक भाग दिला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Aarogya Va Sharirik Shikshan Class 11 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकात शारीरिक सुदृढता विकसन, स्थूलता, निसर्ग व आहार, योग आणि मुद्रा, उत्तेजक द्रव्ये, दुखापतीचे व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाकडून सक्रियतेकडे, खेळातील व्यवसाय संधी, विविध खेळ, विविध क्रीडा स्पर्धा, खेळाडूंच्या यशोगाथा या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असून उद्याच्या आरोग्यसंपन्न व उद्यमशील भारताचे आदर्श नागरिक आपण बनणार आहात. यासाठी शरीराबरोबरच मनाचीही तयारी असणे गरजेचे आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, कृतिप्रधानता व ज्ञानरचनावादावर भर दिला जावा, शारीरिक सुदृढतेच्या किमान क्षमता प्राप्त कराव्यात, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून या पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे.

Aarogya Va Sharirik Shikshan class 12 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. व्यायाम व आरोग्याची जाणीव निर्माण होण्यासाठी तसेच योग्य सवयी लागण्यासाठी त्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. भावी आयुष्य निरामय होण्यासाठी योग्य व्यायाम, आहार, खेळ व कृतिशील जीवनशैली याची सवय लागावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा आयुष्यभर व्यायाम वर्तनाचा विकास घडवणारा, मानवी हालचालींचे ज्ञान देणारा, खेळातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणारा, 'स्व' ची जाणीव निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा, मनोरंजन यांच्या परस्पर संबंधाविषयी माहिती देणारा आहे. सुदृढ शरीर व उत्तम मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा विचार करून आवश्यक असलेली माहिती या पाठ्यपुस्तकात कार्यपुस्तिकेच्या स्वरूपात दिली आहे. विद्यार्थ्यांचे क्रीडाकौशल्य विकसित व्हावे व उपक्रम करताना त्यांचे मनोरंजन होऊन आनंद मिळावा व त्यामागची शास्त्रीय माहितीही मिळावी हा दृष्टिकोन ठेवून लेखन केले आहे.

Aarthik Bhugol 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: आर्थिक भूगोल २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Arjun Haribhau Musmade Dr Rajesh Tryambak Birajdar Dr Babasaheb Kachru Vani Dr Santosh Anil Bhailume

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास 'आर्थिक भूगोल 2' हा विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. 'आर्थिक भूगोल 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तकातून व्यापार आणि वाहतूक तसेच उद्योगधंदे या आर्थिक क्रियांचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच वेगवेगळ्या प्रदेशांतील साधनसंपत्तीचे योग्य नियोजन करून प्रादेशिक विकास साधणे सहज सोपे आहे हे सोप्या भाषेत विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण विकास साधनांना विविध शासकीय योजनांची काही प्रमाणात माहिती विद्यार्थी व शिक्षक या पुस्तकातून मिळवू शकतील.

Aarthik Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: आर्थिक भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A. B. Savadi Prof. P. S. Kolekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'आर्थिक भूगोल - 2' विषय [Cg 210 (B)] हे क्रमिक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सादर केले आहे. मानवी भूगोलाची एक महत्त्वपूर्ण शाखा 'आर्थिक भूगोल' आहे. सेमिस्टर - IV मध्ये या शाखेच्या अभ्यासातून मानवी आर्थिक क्रिया विशेषतः वाहतूक व व्यापार, उद्योगधंदे, प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक विकासातील असंतुलन, भारतातील ग्रामीण विकासाचे कार्यक्रम यांचा परिचय व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने 'आर्थिक भूगोल – 2' हा विषय भूगोल अध्ययनासाठी निश्चित केला आहे.

Adhunik Jag Bhag 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: आधुनिक जग भाग २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Ganesh D. Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-4 [Core Course-I (DSE- 2B)-3 Credit] साठी आधुनिक जग (आधुनिक जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन: भाग-२) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाचा इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जगाची तोंडओळख व्हावी असा दृष्टिकोन हे पुस्तक लिहिताना ठेवला आहे.

Antararashtriya Arthashastra 1 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 1 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Prof. G.J. Lomte Prof. S.A. Gaikwad Dr S. G. Sawant

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य विद्या शाखांसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र: Special - III अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र १' हा विषय या पूर्वीच्या अभ्यासक्रमात होताच; परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये काही जास्तीचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात सर्व नवीन सिद्धान्त आणि घटकांचे विश्लेषण सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.

Antararashtriya Arthashastra 2 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr R. K. Datir Dr S. R. Javale Dr S. G. Sawant Dr S. A. Gaikwad

तृतीय वर्ष कला शाखा सत्र - 5 व 6 साठी नेमलेल्या अर्थशास्त्र (विशेष पेपर 3) अंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सत्र 6 साठी नेमलेल्या अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Antararashtriya Sambandh Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे. पहिले प्रकरण हे 'आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिचय' हे असून यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे विकासाचे टप्पे हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन 'आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन' हे आहे. यामध्ये आदर्शवाद, वास्तववाद, व्यवस्था दृष्टिकोन आणि मार्क्सवाद या चार घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण 'दुसरे जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध' पाहणार आहोत. यात दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, शीतयुद्धाचा उदय ' आणि स्वरूप, शीतयुद्धाचा अंत आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चारमध्ये 'आंतरराष्ट्रीय संघटना' यात आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य आणि आव्हाने, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांत जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना तसेच प्रादेशिक संघटना युरोपियन महासंघ आणि सार्क संघटना यांचा अभ्यास करणार आहोत.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यावरणीय आपत्तीत वातावरणीय आपत्ती आणि त्याच्या व्यवस्थापनात गारपीट, ढगफुटी, वादळे, आवर्त, दुष्काळ, पूर व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या हवामानस्थितीचा अभ्यास सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Avaliye Aapta: अवलिये आप्त

by Suhas Kulkarni

आपल्याला नाना प्रकारची माणसं भेटत असतात. पण त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो. त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. काही माणसं आपली बनतात. आपण त्यांचे बनतो. मला अशी अनेक माणसं भेटली. अस्सल आणि अव्वल माणसं. खंबीर आणि खमकी माणसं. जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेली धुनी माणसं. स्वत:कडचं भरभरून देणारी अवलिया माणसं. अशा माणसांचं बोट पकडून चार पावलं चालायला मिळाल्यामुळे कळलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ताणेबाणे.

Balvikas class 12 - Maharashtra Board: बालविकास इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

बालविकास हा विषय शास्त्रीय ज्ञान देणारा व अनेक विषयांशी म्हणजेच जीवशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, समाजशास्त्र आणि मेंदूशास्त्र अशा विषयांशी संलग्न आहे. प्रत्येक प्रकरणात त्या त्या प्रकरणाशी निगडीत काही तथ्य आणि माहिती चौकटीत दिलेली आहे. ती माहिती वाचून, कृती सोडवून निश्चितच विषयज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल. बालविकास हा अत्यंत विस्तृत विषय आहे. सदर पुस्तकाद्वारे विषयातील महत्वाच्या बाबी पोहोचवल्या आहेत. काही माहिती 'क्यू आर कोड' (QR CODE) यामध्ये वाचायला मिळेल. यामध्ये काही दृकश्राव्य माहितीद्वारे ज्ञान अधिकाधिक सखोल होण्यास मदत होईल. याचबरोबर काही प्रश्न, कृती असतील ते सोडविल्याने विषयज्ञान अधिक समृद्ध होण्यासाठी, अभ्यास करणे सुलभ होण्यासाठी मदत होईल.

Refine Search

Showing 26 through 50 of 1,427 results