- Table View
- List View
MAR 253 Balsahitya T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Shree. S. Dha. jhambare Prof. Mahajan Prof. VasekarMAR 253 Balsahitya text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
MAR 254 Prasar Madhyamansathi Lekhan Kaushalye T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Shree Khore Shree BhonjalMAR 254 Prasar Madhyamansathi Lekhan Kaushalye text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.
MAR 252 Prabodhanapar Sahitya T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Vishvas Varsekar Vasudev Mulate Nagnath Kottapalle Sadanand More Sharankumar LinbaleMAR 252 Prabodhanapar Sahitya text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
MAR 305 Lokvanmay T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Ramesh Varkhede Eknath Pagar Prof. Patil Shri. Patil Sudhir KothavadeMAR 305 Lokvanmay text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
PSY 270 Manavi Vinimay Ani Samayojan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Sau. M. N. Shirolkar Prof. S.G. Janai Prof. A. K. Ghate Prof. R. M. Jhanje Prof. R. V. Pandit Prof. Sambare Prof. BodasePSY 270 Manavi Vinimay Ani Samayojan Textbook for T.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
PSY 271 Mi Ani Majhe Samajik Vartan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Pande Prof. Lavkare D. S. Janbandhu Kusum Damale Prof. Golvilakar Prof. TulpulePSY 271 Mi Ani Majhe Samajik Vartan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
PSY 272 Manasik Svasthya T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Lele Prof. Sant Prof. Desai Prof. Vatave Prof. AdhikariPSY 272 Manasik Svasthya textbook for T.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.
PSY 274 Vaivahik Samayojan Ani Margadarshan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Chandrashekhar Deshpande Prof. P. C. V. Jape N. R. Chaudhari Premala Kale Medha Kumthekar Ashok Borase Alaka Vadakar Prof. KinkarPSY 274 : Vaivahik Samayojan Ani Margadarshan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
PSY 308 Prayogik Paddhati Sankhyiki Va Manasashastriya Prayog T.Y.B.A - Y.C.M.O.U
by S. V. Deshpande Bharat Desai Shobhana Abhyankar Bharat Devare Sau. Puranik Prof. DevarePSY 308 Prayogik Paddhati Sankhyiki Va Manasashastriya Prayog Textbook for T.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
SOC 223 Bharatiy Samaj S.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Jadhav Prof. Patil Prof. Tannu B. K. Khadse Prof. ShawleSOC 223 Bharatiy Samaj text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 275 Bharatacha Arthik Vikas T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prof. N. B. Kulkarni Subhash Bhende Prof. P. K. Mokashi Prof. Dr. Santosh Dastane Prof. Dr. Vijay Kavimandan Prof. Sau. Suvarna Pathak Prof. RajderakrECO 275 Bharatacha Arthik Vikas text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 279 Grahak Sanrakshan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Mahesh Kulkarni Prof. Sau. Kshama Limaye Prof. Dr. Pramod Biyani Prof. Totale Shree. Apate Prof. Bhandari Shree. Gandhi Sau. ManjureECO 279 Grahak Sanrakshan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
POL 287 Rajkiya Sanrachana T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. K. Shri. Kshirsagar V. C. Phadake Shri. Date R. S. Morkhandikar V. K. KshirePOL 287 Rajkiya Sanrachana text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Zool: झूल
by Bhalchandra Nemadeज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो. एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला मिळते. झूलचा आरंभ नामदेव भोळे आणि चांगदेव पाटील यांच्या आकस्मिक भेटीने होतो. भोळे ज्या कॉलेजात एक वर्षापूर्वी दाखल झालेला आहे, त्या कॉलेजात नव्याने रुजू होण्यासाठी चांगदेव निघालेला आहे. योगायोगाने दोघेही एकाच डब्यातून प्रवास करीत आहेत. दोघांचे जीवनविषयक दृष्टीकोण काहीसे भिन्न असले तरी वृत्तीत बरेच साम्य आहे. त्यामुळे त्यांची मैत्री जुळावयास वेळ लागत नाही. उभायतांतील मैत्रीचा हा धागा झूल कादंबरीच्या आरंभापासून अखेरपर्यंत सलगपणे प्रकट झाला आहे. बौद्धिक चर्चेसाठी प्रश्नांची उलटसुलट बाजू मांडण्यासाठी या उभयतांतील या मैत्रीचा लेखकाने भरपूर उपयोग करून घेतला आहे.
Natsamrat FYBA New NEP Syllabus - RTMNU: नटसम्राट एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by V. V. Shirwadkarवि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित नटसम्राट हे मराठी रंगभूमीवरील सर्वकालीन श्रेष्ठ नाटकांपैकी एक मानले जाते. शेक्सपिअरच्या King Lear च्या प्रेरणेने लिहिलेल्या या नाटकाचा नायक गणपतराव बेलवलकर हा एक निवृत्त नट आहे, ज्याने आपल्या अभिनय कारकिर्दीत अफाट यश संपादन केलं आहे. निवृत्तीनंतर तो आपली संपत्ती मुलांना देतो आणि पुढे त्याच मुलांकडून उपेक्षा, अवहेलना आणि मानसिक वेदना सहन करतो. या नाटकात वृद्धत्वातील एकटेपणा, माणुसकीचा ऱ्हास, आणि कुटुंबातील संबंधातील ताणतणाव यांचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. बेलवलकराच्या व्यथांची भावनिक गुंतागुंत, त्याची आत्माभिमानी वृत्ती, आणि व्यासपीठावरील त्याच्या कलावंताचे तेज – या सर्व गोष्टींनी नटसम्राट हा नाट्यकृतीचा शिखरबिंदू ठरतो. डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावी अभिनयामुळे हे पात्र अधिक अजरामर ठरले. नटसम्राट हे केवळ एक नाटक नाही, तर ते एक मानवी भावभावनांचे दर्पण आहे, जे प्रेक्षकाच्या मनामनात खोलवर रुजते. यातून नाटककाराने व्यक्ती, समाज आणि नाटक या तिन्ही अंगांचे विलक्षण तत्त्वज्ञान मांडले आहे. आजही हे नाटक विविध रंगभूमींवर आणि चित्रपटरूपात लोकप्रिय असून मराठी साहित्य-संस्कृतीतील एक अमूल्य ठेवा म्हणून गौरवले जाते.
Satyache Prayog Athava Atmakatha - Novel: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - कादंबरी
by Mohandas K. Gandhiमहात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादाची ही तिसरी आवृत्ती नवजीवन ट्रस्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांतून नवजीवन ट्रस्टने वाचकांना उपलब्ध करून दिलाच आहे. आज तो मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. श्री. आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपला मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्याची आम्हाला परवानगी दिली, याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ग्रंथाचे शेवटी छोटीशी विषयसूची जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाचकवर्गाची चांगली सोय होईल, अशी आशा आहे. महाराष्ट्रीय वाचकवर्ग पूर्वीप्रमाणे या आवृत्तीचाही यथायोग्य परामर्श घेईल, असा भरवसा वाटतो. ही चौथी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना आम्हास आनंद वाटतो. गांधीशताब्दी निमित्त मराठी जनता ह्या ग्रंथाचे प्रकर्षाने स्वागत करील, अशी आम्हास आशा आहे. ह्यातील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नियमावलीस धरून आहे.
Satyache Prayog Athava Atmakatha
by M. K. GandhiGandhiji's autobiography, "The Story of My Experiments with Truth" is one of the most read titles of the world. The autobiography has been translated in more than 15 languages in India and is available in more than 50 different languages world wide. Navajivan Trust had published the title under Gandhiji's supervision first in 1927 and has sold more than 19,00,000 copies so far. The book has inspired more and more people to study Gandhiji's thoughts and deeds.
Tukaramanche Nivadak Abhang FYBA - SPPU: तुकारामांचे निवडक अभंग एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by P. N. Joshi'तुका आकाशाएवढा' असे स्वतः तुकारामांनीच म्हटले आहे. आमचा निवास त्रिभुवनात असतो. आम्ही खरे म्हणजे वैकुंठात राहणारे, पण जनांचा उध्दार करण्यासाठी या पृथ्वीवर आलो, अशी त्यांची साक्ष आहे. आकाशाऐवढे तुकाराम अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असतात. त्यांच्या पिंडात ब्रह्मांड साठवलेले असते. एन्हवी पाहिले तर तुकाराम अगदी साधे कुणबी प्रवृत्तीचे दिसतात. धंदा नीट चालला नाही, घरी बायको तोंडाळ, घरात उपासमार, सर्वत्र फजितीचा प्रसंग, पण ईश्वरी योग असा की, संसारतापाने त्रस्त झालेले तुकाराम 'नित्य नवा दीस जागृतीचा' असा अनुभव घेऊन 'तुका झाला पांडुरंग' या अवस्थेला ते पोचले. मंजुळ व रसाळ वाणी त्यांच्या मुखातून स्त्रवू लागली. ते मराठी मनाचे एकमेव संतकवी बनले. तुकारामांचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे कसे बनले ? या प्रश्नाचे उत्तर या लहानश्या पुस्तकात मिळेल.
Shobha: शोभा
by Baba Kadamशोभा कादंबरी ही समाजातील दुर्लक्षित महिलांच्या जीवनातील वास्तव आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांची मार्मिक मांडणी करते. चांदोर गावातील कुंभार गल्लीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा, मानवी भावना, संघर्ष आणि स्वाभिमानाची कथा सांगते. पोलिस निरीक्षक फडतरे यांच्या येण्याने गावात अस्वस्थता पसरते. त्यांच्या अनुचित मागण्या आणि वागणूक या महिला समुदायावर अन्याय आणि शोषणाचा अनुभव आणतात. या परिस्थितीत शोभा नावाची महिला तिच्या निर्भीड स्वभावामुळे उठून दिसते. तिचा संघर्ष, आत्मसन्मानासाठी उभारलेला आवाज, आणि अन्यायाविरुद्ध दिलेली लढाई कथा प्रगल्भ करते. शोभाच्या दृढ मनोबलाने न्याय व्यवस्थेसमोर खऱ्या मूल्यांची साक्ष ठरते. ही कादंबरी संवेदनशीलतेने मानवी नात्यांचा वेध घेत, वाचकांना अंतर्मुख करते आणि समाजातील वास्तवाचा वेध घेण्यास प्रवृत्त करते.
Nazi Bhasmasuracha Udayasta: नाझी भस्मासुराचा उदयास्त
by V. G. Kanitkarनाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
Arthat: अर्थात
by Achyut Godboleअर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय चूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. खकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक घांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी कलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा हे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून कते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील मवंतांनी रवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत न् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच.
Tatayan - Ek Poladi Udyamgatha: टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा
by Girish Kuberटाटा... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मुल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली, भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती. टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!
Ek Hota Carver TYBA Third Semester - RTMNU: एक होता कार्व्हर बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Veena Gavankarनैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.
Man Me Hai Vishwaas First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मन में है विश्वास प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Vishwas Nangre Patilमन में है विश्वास हे विश्वास नांगरे-पाटील यांचे प्रेरणादायी पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कोकरूड या लहानशा खेड्यातून सुरुवात करत, त्यांनी कष्ट, जिद्द आणि स्वप्नांमुळे भारतीय पोलीस सेवेत (IPS) यशस्वी कारकीर्द गाजवली. पुस्तकात त्यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणा, शाळेतील आठवणी, खडतर परिस्थितीतही मिळवलेले यश, आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते संघर्ष, प्रयत्न आणि सकारात्मकतेच्या शक्तीवर आधारित आहे. ग्रामीण जीवनातील निसर्गरम्य आठवणी, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, आणि उच्चशिक्षणासाठी केलेल्या झगड्याचा प्रेरणादायी प्रवास यातून उलगडतो. २६/११ च्या रात्री हॉटेल ताजमध्ये दाखवलेले धैर्य, तसेच शौर्यपदकाने गौरवले गेलेला प्रसंग, हे प्रकरण पुस्तकाचा उत्कर्षबिंदू ठरतो. मन में है विश्वास हे केवळ आत्मचरित्र नाही, तर प्रत्येक वाचकाला त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. विश्वास नांगरे-पाटील यांची संघर्षमय जीवनकहाणी, विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी या पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील मुलांना ध्येय गाठण्यासाठी समर्पण, मेहनत आणि प्रामाणिकतेचा आदर्श प्रस्तुत करणारे हे पुस्तक आहे.
Rarang Dhang SYBA Third Semester - SPPU: रारंग ढांग एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर यांचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.