Browse Results

Showing 51 through 75 of 1,427 results

Bharatacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारताचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल-1 हा विषय लागू केला आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून भारताचा भूगोल-1 हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमत समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचे स्थान, भौगोलिक स्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेतानाच भारत व त्याच्या शेजारी असलेल्या देशांचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासात भारताचे वेगवेगळे भौगोलिक विभाग नकाशाच्या मदतीने विस्तृतपणे स्पष्ट केलेले आहेत. भारतातील जलप्रणालीबद्दल विवेचन करताना अभ्यासक्रमात असलेल्या नद्यांशिवाय इतर नद्यांच्या विवेचनाचाही विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक अंगाने अधिक फायदा होईल.

Bharatiy Arthavyavastha 1 TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B.L. Jibhkate

नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षापासून बी.ए. तृतीय वर्ष: सेमेस्टर V च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली आहे. त्यानुसार "भारतीय अर्थव्यवस्था १" ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांना सादर केलेली आहे. त्यानुसार काही जुनी परंपरागत चालत आलेली प्रकरणे वगळून काही नवीन प्रकरणांचा समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. प्रस्तुत पुस्तक अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करण्यात आला आहे तसेच काही नवीन व दुर्मिळ माहितीसाठी इंटरनेटचीही फार मदत घेतली आहे.

Bhartiya Aarthik Vikas 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. V. Tile Dr S. R. Jawale Dr S. R. Pagar

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 साठी 'भारतीय आर्थिक विकास' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सर्वच देशांमधील सरकारांचा आर्थिक विकासाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास मंडळाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या संकल्पना समजणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आर्थिक विकास हा स्वतंत्र पेपर सामान्य स्तरावर आणला आहे. आर्थिक वृद्धी व विकास संकल्पनांचा अर्थ, गरज, महत्त्व, त्यांचे निर्देशक, दोघांमधील फरक इत्यादी बाबींचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल आहे.

Bhartiya Rashtriy Chalval (1885-1947) Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९४७) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळ (1885-1947)' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. अधिकाधिक चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Bhartiya Sanvidhanacha Parichay FYBA Second Semester - SPPU: भारतीय संविधानाचा परिचय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Bidlan Dr Pradip Deshpande Dr Pramod Tambe Prof. Haridas Arjun Jadhav

एफ.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर - 1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित 'भारतीय संविधानाचा परिचय' सत्र 2 हे पुस्तक आहे. भारतीय संविधानाचा परिचय या पुस्तकाच्या प्रकरण 1 मध्ये 'भारताचे कायदेमंडळ' म्हणजे संसद, त्याची संरचना, कायदेमंडळाचे अधिकार व कार्ये, राज्याचे विधानमंडळ, त्याची संरचना, अधिकार व कार्य तसेच संसद व विधानमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता, अपात्रता इ. प्रकरण 2 मध्ये ‘कार्यकारी मंडळ’ यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, भारताचा महान्यायवादी यांच्या नियुक्ती, कार्यकाळ, पदावनती अधिकार व कार्य तसेच घटकराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद व राज्याच्या महाधिवक्ता तसेच यांची नियुक्ती कार्यकाळ, पदावनती, कार्य व अधिकार हे पाहणार आहोत. प्रकरण 3 मध्ये 'न्यायव्यवस्था' यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची स्थापना, संरचना, न्यायाधिशांची नियुक्ती, पात्रता, शपथ, पदावनती/महाभियोग प्रक्रिया , सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे अधिकार व कार्ये, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन सक्रियता या संकल्पना पाहणार आहोत. प्रकरण 4 मध्ये 'निवडणूक व्यवस्था' यामध्ये निवडणूक आयोग त्याची निर्मिती, कार्य आणि भूमिका तसेच मुख्य निवडणूक आयुक्त व सध्या कळीचा मुद्दा/विषय असणारे निवडणूक सुधारणा या नवीन प्रकरणांची ओळख करून देणार आहोत.

Chitanisachi Karyapaddhati class 11 - Maharashtra Board: चिटणिसाची कार्यपद्धती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून इयत्ता ११ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले चिटणीसाची कार्यपद्धती हे पाठ्यपुस्तक आहे. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी व्यवसाय, व्यवसाय संस्था, व्यवसायाचे व्यवस्थापन, अर्थशास्त्र, वित्तीय लेखाशास्त्र इत्यादी घटकांचा अभ्यास विविध विषयांमधून करत असतो. चिटणिसाची कार्यपद्धती हा यापैकीच एक विषय जो व्यवसाय संघटनांच्या सर्वांत प्रसिद्ध आणि मोठ्या घटकाशी निगडित आहे, तो संघटना प्रकार म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. या विषयामध्ये विद्यार्थी फक्त संयुक्त भांडवली संस्था, तिचे कार्य, व्यवस्थापन इत्यादी बाबी शिकणार नसून त्याचबरोबर तो कंपनी चिटणिसाची भूमिका आणि महत्त्व, कायदेशीर बाबींचे अनुपालन करणारा अधिकारी आणि कंपनी चिटणिसाचे संप्रेषण कौशल्य इत्यादी गोष्टी शिकणार आहे.

Chitanisachi Karyapaddhati class 12 - Maharashtra Board: चिटणिसाची कार्यपद्धती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले चिटणीसाची कार्यपद्धती हे पाठ्यपुस्तक आहे. इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात भाग, कर्ज रोखे, सार्वजनिक ठेवी इ. द्वारे कंपनी वित्तीय बाजारात करत असलेल्या भांडवल उभारणीच्या पद्धतींवर भर देण्यात आला आहे. भांडवलाच्या महत्त्वाच्या स्रोतांपैकी भाग, कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी यासंबंधी प्रकरणांमध्ये भांडवल उभारणी संबंधी तरतुदी व कार्यपद्धतींचा समावेश आहे. या प्रकरणांनंतर सदर भांडवल पुरवणाऱ्या गुंतवणूकदारांशी पत्रव्यवहारसंबंधी प्रकरणांची रचना केली आहे. या विषयाचे घटक हे कंपनी कायदा २०१३ मधून मिळतात. कायद्यातील कायदेशीर व तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना सहज समजाव्यात यासाठी साध्या भाषेत मांडणी करून आवश्यक ती काळजी घेतली आहे. आवश्यक तेथे तक्ते व आकृत्यांचा उपयोग केला आहे. नवीन संज्ञेचा किंवा शब्दाचा अर्थ लगेचच चौकटीत स्पष्ट केला आहे. अध्ययनास उत्तेजन देण्यासाठी अधिकची माहिती आणि आवड निर्माण करण्याऱ्या कृती प्रकरणांमध्ये दिल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी परिपूर्ण स्वाध्याय दिले आहेत.

Devadnya: देवाज्ञा

by Narayan Dharap

देवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी. मृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे. तसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा!

Ek Hota Carver TYBA Third Semester - RTMNU: एक होता कार्व्हर बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Veena Gavankar

नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.

Grafalco Marathi class 7 - CBSE Board: ग्राफाल्को मराठी इयत्ता सातवी - सीबीएसई बोर्ड

by Grafalco

ग्राफाल्को मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता ७वी - मराठी भाषेची हसतखेळत, सहजगत्या ओळख करून देणारी व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या राज्यभाषेविषयी आवड निर्माण करणारी अशी पुस्तकमालिका आहे. महाराष्ट्रातील आय.सी.एस.ई व सी.बी.एस.ई. शाळांतील विद्यार्थ्यांना या पुस्तकातून मराठी भाषेची सुलभ पद्धतीने अक्षरओळख होईल. पुस्तकामध्ये आकर्षक चित्रे व सुरेख मांडणी, विविधांगी विषयांवर आधारित समाजभान विकासात्मक तसेच उद्बोधक व मनोरंजक कथा, कवितांचा समावेश, भाषाज्ञान व व्याकरणाचे सहजसोपे विश्लेषण आणि प्रत्येक गद्य व पद्य पाठांवर आधारित उजळणी व अभ्यास. त्याचबरोबर मराठी साहित्य व व्याकरणाचा सुयोग्य पद्धतीने अभ्यास करून या भाषेचा दैनंदिन जीवनात उत्तम वापर करता यावा, भाषेचा आनंद लुटता यावा, यासाठी हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरतील.

Grafalco Marathi Class 8 - CBSE Board: ग्राफाल्को मराठी इयत्ता आठवी - सीबीएसई बोर्ड

by Grafalco

ग्राफाल्को मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता ८वी - मराठी भाषेची हसतखेळत, सहजगत्या ओळख करून देणारी व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या राज्यभाषेविषयी आवड निर्माण करणारी अशी पुस्तकमालिका आहे. महाराष्ट्रातील आय.सी.एस.ई व सी.बी.एस.ई. शाळांतील विद्यार्थ्यांना या पुस्तकातून मराठी भाषेची सुलभ पद्धतीने अक्षरओळख होईल. पुस्तकामध्ये आकर्षक चित्रे व सुरेख मांडणी, विविधांगी विषयांवर आधारित समाजभान विकासात्मक तसेच उद्बोधक व मनोरंजक कथा, कवितांचा समावेश, भाषाज्ञान व व्याकरणाचे सहजसोपे विश्लेषण आणि प्रत्येक गद्य व पद्य पाठांवर आधारित उजळणी व अभ्यास. त्याचबरोबर मराठी साहित्य व व्याकरणाचा सुयोग्य पद्धतीने अभ्यास करून या भाषेचा दैनंदिन जीवनात उत्तम वापर करता यावा, भाषेचा आनंद लुटता यावा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Grahvyavasthapan class 11 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गृहव्यवस्थापन या विषयाचे पाठ्यपुस्तक व्यवस्थापनाची तत्त्वे आणि प्रक्रिया व त्याचे घराकरिता उपयोजन यांच्याशी संबंधित आहे. सदर पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व, व्यवस्थापनाचे प्रेरक घटक, व्यवस्थापन प्रक्रिया, निर्णय घेणे, कौटुंबिक संसाधने, गृह स्वच्छता या गोष्टींचे मूलभूत ज्ञान प्रदान करते. या पाठ्यपुस्तकात कुटुंबाचे निवासस्थान आणि घरातील फर्निचर अशा नवीन जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रकरणांची माहिती देते. तसेच पुष्परचना, लँडस्केपिंग यासारख्या प्रकरणांमधून कौशल्य विकासावर भर देता येईल. यामुळे विद्यार्थी अनुभव संपन्न होतात. त्यांच्यात ‘शिका आणि कमवा' ही भावना विकसित होण्यास मदत होते. या पुस्तकातील घटकांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आदान प्रदान वाढून त्यांच्यात सहसंबंध निर्माण होतात.

Grahvyavasthapan class 12 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि डिजिटायझेशनच्या काळात सहज, स्वास्थ्यपूर्ण आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाच्या क्षेत्रामधील मूलभूत संज्ञा तसेच आधुनिक बाबी देखील समाविष्ट करते. कौशल्य विकसन, पर्यावरण रक्षण आणि ग्राहकता यांवर देखील पाठ्यपुस्तक केंद्रित आहे. काही घटक उद्योजकता विकासासाठी लाभदायक ठरतील आणि 'कमवा आणि शिका' यासाठी संधी उपलब्ध करून देतील.

Gramin Vikasacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Dagu Pagar Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Prof. Ashok Maruti Thorat Prof. Dr. Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच उपयोगात येईल यात शंका नाही.

Granthalay Ani Mahitishastra class 11 - Maharashtra Board: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. 'ग्रंथालय आणि माहितीशास्त्र' या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन संकल्पनांचा समावेश करणे अथवा त्याचे प्रतिबिंब असणे निश्चितच गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक हित जोपासणारी सार्वजनिक ग्रंथालय निर्मिती चळवळीची गरज येथपासून ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्र, माहितीसेवा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विविध घटक पाच प्रकरणातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहेत. वाचकांना हवी असलेली माहितीसाधने व ‘माहिती' घटक कसे पोहचवता येतात हे विविध प्रकरणांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथालयातील विविध कार्ये कशी पार पाडता येतील व वाचकांना कार्यक्षमपणे ‘माहितीसेवा' कशा देता येतील, यांसंदर्भातील अभ्यास या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेला आहे.

Granthalay Ani Mahitishastra Class 12 - Maharashtra Board: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. 'ग्रंथालय आणि माहितीशास्त्र' या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन संकल्पनांचा समावेश करणे अथवा त्याचे प्रतिबिंब असणे निश्चितच गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक हित जोपासणारी सार्वजनिक ग्रंथालय निर्मिती चळवळीची गरज येथपासून ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्र, माहितीसेवा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विविध घटक पाच प्रकरणातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहेत. वाचकांना हवी असलेली माहितीसाधने व ‘माहिती' घटक कसे पोहचवता येतात हे विविध प्रकरणांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथालयातील विविध कार्ये कशी पार पाडता येतील व वाचकांना कार्यक्षमपणे ‘माहितीसेवा' कशा देता येतील, यांसंदर्भातील अभ्यास या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेला आहे.

Gunha Ani Samaj 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: गुन्हा आणि समाज १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Suhas Gagangras Prof. Vinayak Subhash Lashkar Dr Sudhir Ashruba Yeole Prof. Vikramaditya Prabhakar Gaikwad

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'गुन्हा आणि समाज -1' हा विषय लागू केला आहे. 'गुन्हा आणि समाज-1' ह्या पुस्तकामध्ये गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्हे या विषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

Itihaslekhanshastracha Parichay Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: इतिहासलेखनशास्त्राचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Ganesh Raut

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 इतिहास विशेष पेपर-3 साठी इतिहासलेखनशास्त्राचा परिचय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. इतिहासलेखनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आलेल्या इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या महत्त्वाच्या व्याख्या, इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती, इतिहासाची साहाय्यकारी शास्त्रे, इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास शास्त्र की कला, इतिहासलेखनशास्त्राची प्रक्रिया, परीक्षण यांची समग्र माहिती देऊन इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहासाचे पुनर्लेखन यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. पुस्तकाची भाषा सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Kalecha Itihas Va Rasgrahan class 11 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.

Kalecha Itihas Va Rasgrahan class 12 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.

Ladhe Andhashraddheche: लढे अंधश्रध्देचे

by Dr Narendra Dabholkar

लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) - १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे अंधश्रद्धा निर्मूलनावरील सहावे पुस्तक. आत्तापर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात काही निश्चित वेगळेपण आहे. ‘भ्रम आणि निरास’ या पहिल्या पुस्तकात अंधश्रद्धांच्या सर्व प्रकारांची संक्षिप्त माहिती आहे. ‘प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या दुसऱ्या पुस्तकात सर्वत्र सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत. ‘अंधश्रद्धा विनाशाय’ या तिसऱ्या पुस्तकात अंधश्रद्धेविरुद्धचे लढलेले स्थानिक संघर्ष आहेत. ‘विचार तर कराल?’ या चौथ्या पुस्तकात अंधश्रद्धेबाबत आजूबाजूच्या जीवनात दैनंदिन घडणाऱ्या घटनांच्यावर वैचारिक प्रकाशझोत आहे; तर ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या पाचव्या पुस्तकात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित काही बाबींचे सखोल, पण संभाषणाच्या अंगाने केलेले विवेचन आहे. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे सहावे पुस्तक आहे. यातील लढे हे एकेका ठिकाणचे आणि चळवळीच्या एखाद्या शाखेशी संबंधित असे नाहीत, तर त्यांचे स्वरूप महाराष्ट्रव्यापी आहे. ते लढवताना संपूर्ण महाराष्ट्रात त्या विचारांच्या अनुषंगाने कमीजास्त खळबळ माजलेली आहे.

Lokprashasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: लोकप्रशासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Haridas Arjun Jadhav Pramod Rajendra Tambe Swati Kurade

शैक्षणिक वर्ष 2021-2022 टी.वाय.बी.ए. सत्र - 5 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर - 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C (3) + 1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विध्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विध्यार्थ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र पाचमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'नव-लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण नव-लोकप्रशासनाचा उदय, नव-लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'लोकप्रशासनाचे दृष्टिकोन'. या प्रकरणात आपण लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे पारंपरिक, वर्तनवादाचा व्यवस्था दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'शासन'. यामध्ये आपण सुशासनाची संकल्पना, ई-प्रशासन आणि सार्वजनिक - खासगी क्षेत्र भागीदारी समजून घेणार आहोत.

Loksankhya Ani Bhartiya Samaj Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: लोकसंख्या आणि भारतीय समाज पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Dr Sudhir Yevale

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'समाजशास्त्र' अभ्यासमंडळ यांनी 'समाजशास्त्र' द्वितीय वर्षे सर्वसाधारण अभ्यासक्रम नुकताच पुनर्रचित केला. याच अभ्यासक्रमावर आधारित लोकसंख्या आणि भारतीय समाज हे पुस्तक आहे. यावर्षी एस.वाय.बी.ए. चे विद्यार्थी क्रेडिट सिस्टिमला सामोरे जाणार आहेत, त्यामुळे सेमिस्टर 3 व सेमिस्टर 4 अशी लोकसंख्या आणि भारतीय समाज या अभ्यासक्रमावर आधारित दोन पुस्तके वेळेवर उपलब्ध केली आहेत. नेहमीप्रमाणेच साध्या, सुटसुटीत व आकलनास सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी केली आहे. समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश यावेळी काही प्रकरणात आहे. त्याबद्दलची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रे, शासकीय माहिती, काही संशोधन पत्रिका, पेपर्स याचा आधार माहितीचे स्रोत म्हणून घेतला आहे. शाब्दिक अवडंबर टाळले आहे मात्र गुणवत्तेशी कोठेही तडजोड केलेली नाही.

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: लोकसंख्या भूगोल पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dilip Dnyaneshwar Muluk Dr Snehal Nivruti Kasar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विशेष स्तरावर 'लोकसंख्या भूगोल' हा विषय समाविष्ट केलेला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

Madhyayugin Bharat Mughal Kalkhand Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: मध्ययुगीन भारत मुघल कालखंड पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Prof. Kalyan Chavan Bhushan Phadtare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून मानव्यविद्या शाखेतील द्वितीय वर्षासाठी Choice Based Credit System लागू केलेली आहे. इतिहास विषय अभ्यास मंडळाच्या मान्यतेने द्वितीय वर्ष, विषय इतिहास विशेष स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी Discipline Specific Elective Course (DSE-1B) - 3 Credit या कोर्सच्या सत्र 4 साठी 'मध्ययुगीन भारत: मुघल कालखंड' हा पेपर निश्चित केला आहे. मुघल कालखंडाच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या उपयुक्त साधनांपासून, बाबर: मुघल सत्तेची स्थपना ते मुघल सत्तेच्या अस्तापर्यंतच्या राजकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचा आढावा या पुस्तक लेखनातून घेतलेला आहे.

Refine Search

Showing 51 through 75 of 1,427 results