Browse Results

Showing 76 through 100 of 1,427 results

Pailwaanji

by Sanjiv Jaiswal 'Sanjay'

पैलवान खूप गर्विष्ठ होता. परंतु गप्पूच्या पुढे त्याचं काही चाललं नाही. दोघांच्या कुस्तीची मजेदार गोष्ट वाचा.

Susheelachya Rangolya

by Sridala Swami

तुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील. पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिलीय? सुशीलानं हे कसं केलं, ते तुम्हाला या पुस्तकातून समजेल.

Saang Na Lavkar- Hasne Radne

by Madhav Chavan

आपल्या आजूबाजूला दिसणार्या रंग, आकार वगैरे अनेक गोष्टींबद्दल लहान मुलांना कुतूहल असते. मग ती मुले प्रश्न विचारतात आणि आई किंवा बाबा त्यांना उत्तरे देतात. 'सांग ना लवकर ... हसणे रडणे' यामध्ये अशीच छोटी छोटी प्रश्नोत्तरे आहेत.

Rang

by Madhav Chavan

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या रंग, आकार वगैरे अनेक गोष्टींबद्दल लहान मुलांना कुतूहल असते. मग ती मुले प्रश्न विचारतात आणि आई किंवा बाबा त्यांना उत्तरे देतात. सांग ना लवकर ... रंग यामध्ये अशीच छोटी छोटी प्रश्नोत्तरे आहेत.

Rangacha Rang

by Bulbul Sharma

एका चित्रकारानं मांडलेला हा रंगांचा खेळ. छोटुकल्मांना नक्कीच आवडेल असा.

Rumniya

by Rukmini Banerji

रुमनिमा आणि आजी ही मजेदार जोडी आहे, कारण त्यांना माहीत आहे शेवटी सगळं ठीकठाक होते. रुमनियाची ही सुंदर गोष्ट वाचा!

Sabu Aani Jojo

by Herminder Ohri

साबू आणि जोजोची मैत्री निराळीच आहे.

Samira Kharedila Jate

by Bharati Jagannathan

समीरा आणि मूचकबरोबर खरेदीला चला!

Shahi Miravnuk

by Subhadra Sen Gupta

पाटलीपुत्रात राहूनसुद्धा पार्वती आणि लक्ष्मणाने आपल्या राजाला कधीही पाहिलेले नव्हते. एके दिवशी विहारात मातीची भांडी द्यायला गेलेले असताना त्यांना एक नवीन मित्र भेटतो. तो त्यांना लवकरच राजाचे दर्शन होईल याची हमी देतो. त्यांचे हे स्वप्न साकार होते की नाही हे जाणण्यासाठी ही मौर्यकाळातील चित्तवेधक कथा वाचा...

Samudrasapharivaruna Ghari Parata

by Subhadra Sen Gupta

बसवा आणि त्याची बहीण सुंदरी पल्लवांच्या काळातल्या ममल्लापूरम या बंदर - शहरात राहतात. त्यांचे वडील कंबोजच्या समुद्रसफरीवरून अजून घरी परतले नाहीत म्हणून ती दोघं चिंतेत आहेत. वडिलांच्या जहाजाची माहिती शोधायला ते बंदरावर जातात. पण तिथले विदेशी खलाशी त्यांची भाषा बोलू शकत नाहीत! ते त्या विदेशी खलाशांबरोबर संवाद साधू शकतात का? हे जाणण्यासाठी ही गंमतीदार गोष्ट वाचा!

Sasa Aani Kasav

by Venkatramana Gowda

कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. पण पुढे काय झाले त्यांचे? वाचा ’ससा आणि कासव’मध्ये.

Sona Aaila Madat Karte

by Vinita Krishna

सोना मूळचीच हुशार. तिनं आपल्या बाबांना कशी मदत केली, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल. या गोष्टीत, आई जे काम करते आहे, तेच तिलाही करायचं आहे.

Shobhini Aani Aaji

by Sarvendra Vikram

छोट्या शोभिनीला नवीन-नवीन कामं करायला फार मजा वाटायची. कधी आपल्या आजीला घेऊन ती जत्रेला जायची, कधी जंगलात तर कधी नदीवर आंघोळ करायला. एक दिवस ती आजीला घेऊन चंद्रावर सहल करायला गेली. त्यावेळी काय झाले? "शोभिनी आणि आजी" यांची ही गोष्ट आहे.

Timmy Aani Pillu

by Madhav Chavan

मूल प्राण्याशी खेळते तेव्हा तो प्राणीही काही प्रतिसाद देतो. मग ते मूल त्याच्यातून आपल्यापरीने अर्थ काढते. कुत्रा किंवा मांजर लाडाने पाय पुढे करते व मग तो शेकहँड आहे असे मुलाला वाटते. टिमी आणि पिल्लू यातील टिमी असाच अर्थ काढते आहे काय?

Teen Rade

by Greystroke

श्रीमती चँग यांना वाचायला येत नसतं म्हणून आपल्या मुलाकडून आलेलं पत्र त्या वेन नावाच्या शिपायाला वाचायला सांगतात. पत्र बघताच वेन रडू लागतो. मग चँगही रडायला लागतात. पेंग नावाचा फेरीवाला तिथून जात असताना हे बघतो आणि त्यांच्याजवळ येऊन तोही रडायला लागतो. का रडतात हे तिघं? चीनमधली ही गमतीदार लोककथा वाचा.

Bunty Ani Bubbly

by Sorit Gupto

बंटीला साबण मुळीच आवडायचा नाही. स्वच्छता नको वाटायची. मग एका रात्री तिला स्वप्न पडतं. काय बरं घडलं असेल पुढे?

Swatantryakade Aagekooch

by Subhadra Sen Gupta

करोडो भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणार्या दांडीयात्रेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ही मुग्ध करणारी कथा लिहिली गेली आहे.

Didicha Rangeet Khajina

by Rukmini Banerji

कचऱ्याच्या ढिगातच नेहमी असणारी मुलं मजा-मस्ती कशी करू शकतील? पण एके दिवशी कुठून तरी एक दीदी आली आणि मुलांच्या आयुष्यात तिने रंग भरले. पुस्तकं जी त्या मुलांची मित्र बनली.

Sooraj Ani Sher Singh

by Anupa Lal

सूरज आणि शेरसिंग बागेत धमाल मजा करत आहेत. चला त्यांना भेटूया.

Tai Tai, Akash Nile Ke Aahe?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - आकाश निळे का आहे? जेव्हा त्याला त्याची ताई विचारते, त्याला असे का वाटते, तेव्हा त्याच्या कल्पना भरारी मारतात. कदाचित एखादी निळी साडी वाळत घातली असेल ज्यामुळे आकाश निळे दिसते किंवा काहीतरी वेगळे कारण असेल. अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा: तुम्हाला काय वाटते, आकाश निळे का आहे?

Tai Tai, Gadgadat Kuthun Hoto?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - गडगडाट कुठून होतो? आकाशातील रागावलेल्या राक्षसाच्या गर्जनेमुळे होतो, की ढगात असलेल्या मोटारसायकलींच्या टोळीमुळे हा आवाज होतो? अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, गडगडाट कुठून होतो?

Tai Tai, Vastu Var Kaa Nahi Padat?

by Roopa Pai

लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - वस्तू वर का नाही पडत? वस्तू वर पडल्या तर किती मजा येईल नाही? कमीतकमी आई तरी जमिनीवरच्या पसाऱ्यावरून कटकट करणार नाही! ताईला हसू येतं, आणि ती तिच्या छोट्या भावाला याबुद्धिविशिष्ट प्रश्नाचे उत्तर देते. पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, वस्तू वर का नाही पडत?

Yeta Aani Yet Nahi

by Radha Hs

हे छोटं पुस्तक तुम्हाला वाचता येतं. ज्या लहान मुलांना वाचता येत नाही, त्यांना यातल्या मस्त चित्रांची मजा घेता येते.

Veeruchi Circus

by Richa Ingle Deo

जम्बो-मम्बो सर्कस बघून वीरू परत येतो आणि त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना यायला लागतात. काय बरं करतो तो?

Tarangat Tarangat

by Vidya Tiware

सर्वच लहान मुलांना उंच आकाशाचे आकर्षण असते. आकाश पाहून त्यांच्या मनात अनेक विचार येतात. मन वसे ते स्वप्नी दिसे हे ’तरंगत तरंगत’ वाचताना प्रत्ययास येते.

Refine Search

Showing 76 through 100 of 1,427 results