Browse Results

Showing 851 through 875 of 1,567 results

Manavi Bhugol FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. 'मानवी भूगोलाचा परिचय' या पहिल्या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा व त्यांचे महत्त्व यांचा आढावा घेतला आहे. 'लोकसंख्या' या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त व भारतीय लोकसंख्येची रचना अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच प्रकरण तीनमध्ये मानवी वसाहत, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, प्रारूप व आकृतिबंध तसेच भारतातील नागरीकरण व महाराष्ट्रातील नागरिकरणाचा समावेश केला आहे. याशिवाय शेवटच्या प्रकरणात कृषी, कृषीचे प्रकार, कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय कृषीच्या समस्या यांचा समावेश केलेला आहे.

Manavi Bhugol SYBA Fourth Semester - RTMNU: मानवी भूगोल बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

'मानवी भूगोल' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टरसाठी लिहिलेले दर्जेदार पाठ्यपुस्तक आहे. 'मानवी भूगोल' या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत. त्यामध्ये मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, मानवी वंश - अर्थ, लक्षणे व मानवी वंशाचे प्रकार, मानवाचे प्रारंभकालीन आर्थिक व्यवसाय, लोकसंख्येचे जागतिक वितरण, भारताच्या लोकसंख्येचे विभाग, प्रात्यक्षिकांमध्ये प्रक्षेपणाची कृती, गुण, दोष, वैशिष्ट्ये व उपयोग, संख्याशास्त्रीय पद्धतींचा उपयोग, रेषा व स्तंभालेखाचे उपयोग आणि स्थलनिर्देशक नकाशांचा क्षेत्रीय अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश होतो. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, लघुत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत. तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.

Manavi Bhugol TY BA Pune University

by A. B. Savadi P. S. Kolekar

Manavi Bhugol Marathi text book for Third year from The Pune Universtity in Marathi.

Manavi Hakk Ani Samajik Nyayacha Parichay Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Suhas Gagangras Dr Sudhir Ashruba Yewle Vinayak Subhash Lashkar Vikramaditya Prabhakar Gaikwad

तृतीय वर्ष बी. ए. जनरलचे ‘मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय' हे पुस्तक वाचकांच्या हातात सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सेमिस्टर-6 चे हे पुस्तक आहे. गुन्हा आणि समाज हे पुस्तक लिहिताना गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्ह्यांविषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला होता. या क्रमिक पुस्तकात 'मानवी हक्क आणि सामाजिक न्याय' याच्याशी संबंधित विविध पैलूंची मांडणी केली आहे.

Manavi Vikasache Arthashastra Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: मानवी विकासाचे अर्थशास्त्र दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Rakshit Madan Bagde

‘मानवी विकासाचे अर्थशास्त्र’ या पुस्तकात मानवी विकासाच्या विविध पैलूंचे विश्लेषण केले आहे. यात मानवी विकास म्हणजे काय, त्याचे अर्थ, व्याख्या, महत्त्व आणि उद्दिष्ट्ये काय आहेत, याबद्दल चर्चा केली आहे. या पुस्तकात मानवी विकासाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन स्पष्ट केले आहेत, जसे की मूलभूत गरजा दृष्टिकोन, गुणवत्ता जीवन दृष्टिकोन आणि क्षमता दृष्टिकोन. मानवी सुरक्षा, शाश्वत विकास उद्दिष्ट्ये आणि मानवी विकासासाठी दृष्टीकोन यावरही चर्चा करण्यात आली आहे. यात आर्थिक सुरक्षा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, व्यक्तिगत सुरक्षा, समुदाय सुरक्षा आणि राजकीय सुरक्षा यांचा समावेश आहे. पुस्तकात मानवी विकासाचे परिमाण आणि त्याचे मोजमाप कसे करायचे, याची माहिती दिली आहे. यात सशक्तीकरण, सहकार्य, समता, शाश्वतता, सहभाग आणि उत्पादकता यांसारख्या घटकांचे विश्लेषण आहे. तसेच, मानवी विकास निर्देशांक (HDI) आणि इतर निर्देशांकांच्या साहाय्याने मानवी विकासाचे मूल्यांकन कसे करायचे, हे स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, जागतिकीकरण, व्यापार आणि तंत्रज्ञान यांचा मानवी विकासावर काय परिणाम होतो, याचीही माहिती पुस्तकात दिली आहे.

Mangi Ani Tichi Aai

by Meenakshi Sardesai

This is a story of Mangi who was very intelligent. There was no financial backup for her studies and they had a problem running the house. So she makes a plan. She goes and finds a job for her mother. The mother was not comfortable with it but Mangi somehow convinces everybody at home and they all stay very happy. Mangi also studies hard and managed to get a scholarship.

Manichi Phajiti

by Raja Managlvedhekar

This is a story of cat Mani and small girl suloo. On diwali vacation, suloo went to uncle homes. read story what happens.

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Manorajya

by P. G. Sahasrabuddhe

This is a story of a Brahmin his name was Devsharma. One day he sees a dream about becoming rich and then in the dream he also saw that he is beating people with the stick. When he gets up he sees that he has broken many pots around him and he is fired from the job.

Manus Mhanun Jaganyasathi - Novel: माणूस म्हणून जगण्यासाठी - कादंबरी

by Vivek Pandit

माणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.

Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी

by Shri. Shripad Nagnath Rautwad

सामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.

Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी

by Shri. Ashok Kothare

अशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.

Marathi Aksharbharati Class 9 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'अक्षरभारती' मराठी इयत्ता नववीचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख करून दिलेली आहे, ते वाचून मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे, हे लक्षात येईल. भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा, म्हणून या पुस्तकात अनेक भाषिक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतीतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरूची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे व त्याचे फायदेही समजून घ्यायचे आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा.

Marathi Aksharbharati class 10 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘अक्षरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे. आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठांमध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्गवर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी, यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

Marathi Antarbharti class 10 - Maharashtra Board: मराठी आंतरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘आंतरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे., जे मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करते. या पुस्तकात कविता, कथा, निबंध, नाटक, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललितलेखन इत्यादी विविध साहित्यिक प्रकारांचा समावेश आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेऊन, या पुस्तकाने मराठी साहित्याचा सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. साहित्यिक अभिव्यक्तीचे विविध पैलू आणि त्यांचे महत्त्व या पुस्तकाद्वारे वाचकांना समजावून सांगितले आहे. साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

Marathi Balbharati Class 1 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात गाणी आहेत. ती सगळ्यांनी मिळून म्हणताना तुम्हांला खूप मजा येईल. तसेच इथे गोष्टीसुद्धा आहेत. गोष्टी ऐकताना, सांगताना मोठी धमाल वाटेल. चित्रांवरून गोष्टी तयार करून त्या मित्रमैत्रिणींना सांगताना तुम्ही अगदी रमून जाल. चित्रे पाहून गप्पा मारताना, तुमचे अनुभव ऐकताना सर्वांना खूप गंमत वाटेल. भाषेतील शब्द, अक्षरे शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी खूप रंगीत चित्रे दिलेली आहेत. चित्रांवरून शब्द आणि अक्षरे शिकताना तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल. ऐकायचे, पाहायचे आणि म्हणत म्हणत वाचायला शिकायचे, गिरवत गिरवत लिहायला शिकायचे, सरावातून ते पक्के करायचे, सारे काही अगदी मजेत. इथे शब्दांचे काही खेळसुद्धा दिले आहेत. ते खेळत खेळत भाषा शिकायची आहे.

Marathi Balbharati Class 3 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. शाळेत आल्यानंतर पहिली व दुसरीमध्ये मूल वाचायला व लिहायला शिकले आहे. इयत्ता तिसरीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचन साहित्याची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharati Class 8 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. त्याचा अभ्यास केल्याने मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात येईल. या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. ‘वाचा’, ‘चर्चा करूया’ ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘सारे हसूया’, ‘सुविचार’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Marathi Balbharati class 4 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. इयत्ता चौथीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचनासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharati class 5 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पाठ व कविता मिळून संत्तावीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठपुस्तकात विद्यार्थ्यांना घर व परिसरातील व्यक्तींशी घटना-प्रसंगानुरूप बोलता यावे, स्वच्छता, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर विचार करायला ते प्रवृत्त व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण, त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनुभवकथन यांतून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होईल. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, खेळ खेळूया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी' या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव दिला आहे.

Marathi Balbharti class 2 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पुस्तकातील चित्रे पाहा. चित्रामधील वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी आणि माणस यांच्याशी बाला. चित्रातील गोष्टी समजावून घ्या आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना सागा. सगळ्यांनी मिळून गाणी म्हणा. पाठ वाचा. वाचता-वाचता समजून घ्या, पाठाखाली वगवगळ्या कृता दिल्या आहत. त्या गमतीदार आहेत. पाठ वाचला, की पाठाखालील कृतींची उत्तरे मिळतील आणि पाठहा अधिक चागल्याप्रकारे समजेल. त्यामधून वाचन-लेखन शिकताना खूप मजा यईल.

Marathi Balbharti class 6 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी, सारे हसूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया' या शीर्षकांखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांस वाव दिला आहे. 'आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Marathi Bhasha ani Shuddhalekhan FYBA New NEP Syllabus - RTMNU: मराठी भाषा आणि शुद्धलेखन एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Satvashila Samant

मराठी भाषा आणि शुद्धलेखन – एक विचार मंथन" हे सत्त्वशीला सामंत यांचे भाषेप्रती प्रेम, अभ्यास आणि चिकाटी यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे पुस्तक मुख्यतः मराठी भाषेच्या शुद्धलेखनाच्या नियमांवर, व्याकरणाच्या अचूकतेवर, भाषाशुद्धतेच्या आवश्यकतेवर आणि भाषेच्या भवितव्याबाबत समाजधुरीणांनी काय भूमिका घ्यावी, यावर प्रकाश टाकते. इंग्रजी भाषेच्या अति प्रभावामुळे मराठी भाषेची होत असलेली हानी, मराठी शिक्षणातील अडचणी, शासनाची उदासीनता आणि माध्यमांचा प्रभाव यांचे विश्लेषण लेखकाने अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. बालभारतीतील तोडाक्षर पद्धती, प्रसारमाध्यमांतील अशुद्ध उच्चार व लेखन, अनुवादातील अडचणी यावरही लेखकाने सखोल चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांनी शुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लेखन करावे, यासाठी लेखकाने अनेक उपाय सुचवले आहेत. हे पुस्तक एफ.वाय.बी.ए. स्तरावर मराठी भाषेचा मूलभूत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून ते भाषेच्या शुद्धतेसाठी एक प्रेरणादायी दस्तऐवज ठरते.

Marathi Ekankika - SPPU: मराठी एकांकिका - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. L. Deshpande Datta Patil

महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे. ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम ‘एकांकिका' या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातन केलेले दिसते. प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात. त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्टात होणाऱ्या शंभरहून अधिक एकांकिका स्पर्धा होत. या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत. अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेले आहेत. या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली. तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते. जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे.

Marathi Kumarbharati Class 10 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी कुमारभारती दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि भाषा यांमधील वैविध्य स्पष्ट केला आहे. या अभ्यासातून तुम्हांला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात येईल. या पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य, समजून घेण्यास मदत होईल. आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे.

Refine Search

Showing 851 through 875 of 1,567 results