Browse Results

Showing 876 through 900 of 1,427 results

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Itihas va Nagrikshstra class 6 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये अकरा व नागरिकशास्त्रामध्ये पाच प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'प्राचीन भारताचा इतिहास' दिलेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरा यांची सर्वांगीण माहिती मिळावी तसेच याद्वारे त्यांची सामाजिक एकात्मतेसंबंधीची जाणीव वाढीस लागावी हा उद्देश आहे. नागरिकशास्त्राच्या भागात 'स्थानिक शासन संस्था' याविषयी माहिती घेत असताना विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेचा सहभाग, महिलांच्या सहभागाचा आणि त्यांच्या सहभागातून झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्या देशातील कारभार संविधान, कायदे व नियमांनुसार चालतो हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले आहे.

Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.

Sarmisal - Novel: सरमिसळ - कादंबरी

by Shri. D.M. Mirasdar

द.मा. मिरासदार लिखित सरमिसळ हे विनोदी कथासंग्रह असून यामध्ये लेखकांनी आपला वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव यामध्ये सांगितला आहे.

Shivchatrapati Parisar Abhyas Bhag 2 class 4 - Maharashtra Board: शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्रोत मानली जाते. पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तिदायी घटना दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून आणि व्यक्तिगत पातळीवर आलेल्या तक्रारींची व सूचनांची समितीने योग्य पद्धतीने छाननी करून प्रस्तुत पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे. तसेच आवश्यक तेथे काही अनुरूप अशा दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्रातील काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करण्यात आले आहे.

Ganit class 4 - Maharashtra Board: गणित इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये निसर्गत: असलेली चित्रांची आवड आणि स्वत: काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन हे पुस्तक चित्ररूप आणि कृतिप्रधान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रे शक्यतो बोलकी आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतील अशी आहेत. गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हावे, म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) स्वाध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायांमधील प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कंटाळवाणे होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पाठाच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती संवादरूपात पाठ्यपुस्तकात दिली आहे.

Marathi Balbharati class 4 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. इयत्ता चौथीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचनासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharti class 2 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पुस्तकातील चित्रे पाहा. चित्रामधील वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी आणि माणस यांच्याशी बाला. चित्रातील गोष्टी समजावून घ्या आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना सागा. सगळ्यांनी मिळून गाणी म्हणा. पाठ वाचा. वाचता-वाचता समजून घ्या, पाठाखाली वगवगळ्या कृता दिल्या आहत. त्या गमतीदार आहेत. पाठ वाचला, की पाठाखालील कृतींची उत्तरे मिळतील आणि पाठहा अधिक चागल्याप्रकारे समजेल. त्यामधून वाचन-लेखन शिकताना खूप मजा यईल.

Ganit class 3 - Maharashtra Board: गणित इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हाव म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) 'स्वाध्याय' आणि 'संवादांचा' समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायामधील प्रश्न विद्याथ्यानो स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कटाळवाण होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.

Samanya Vigyan class 6 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सोळा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सामान्य विज्ञान विषयाच्या अपेक्षित क्षमता नमूद केल्या आहेत. या क्षमतांच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील आशयाची नावीन्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करणे, कृतींच्या आधारे माहिती मिळविणे, माहितीचे संकलन करणे व त्यानुसार वर्गीकरण, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे इत्यादींवर आधारित कृती, उपक्रम व आशयासाठी पुस्तकात विविध शीर्षकांचा वापर केला आहे. पुस्तकात दिलेली पूरक माहिती विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करू शकेल.

Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.

Khelu Karu Shiku class 2 - Maharashtra Board: खेळू करू शिकू दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti Va Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या पुस्तकामध्ये भरपूर चित्रे आहेत. ति पाहून कोणते खेळ कसे खेळावे हे कळण्यास मदत होईल. विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, साधी राखी, कागदाचे भिरभिरे, वाळलेल्या पानाफुलांपासून सौंदर्याकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे दाखवले आहे.

Khelu Karu Shiku class 3 - Maharashtra Board: खेळू करू शिकू इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti V Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, फुलपाखरू, बचतपेटी, नारळाच्या करवंटीपासून कलाकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी, रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे सारे या पुस्तकात दाखवले आहे.

Itihas Va Nagarikshastra Class 8 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकाचे प्रमुख दोन भाग आहेत. इतिहासाच्या भागात ‘आधुनिक भारताचा इतिहास’ दिलेला आहे. इतिहासातील नवे प्रवाह आणि शिक्षणाची राष्ट्रीय गाभातत्त्वे, अध्ययन निष्पत्ती यांचा मेळ घालून या पाठ्यपुस्तकाचे लेखन केलेले आहे. नागरिकशास्त्राच्या भागात संसदीय शासनपद्धतीची ओळख करून देण्यात आलेली आहे. आपल्या देशातील कारभार संविधान, कायदे व नियम यांच्यानुसार चालतो हे सांगितले आहे.

Ganit Bhag 2 Class 9 - Maharashtra Board: गणित भाग 2 इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित भाग 2 इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकात कृतींचे दोन भाग आहेत. एक सिद्‌धता लेखन करणे व दुसरा गुणधर्मांचा आणि शिकलेल्या निष्कर्षांचा प्रात्यक्षिकांद्‌वारे पडताळा घेणे. या कृती करण्याकरिता व पुस्तक अधिक उद्‌बोधक होण्याकरिता चर्चा, प्रश्नोत्तरे, सामूहिक उपक्रम अशा विविध पद्‌धतींचा उपयोग केला आहे. प्रमेयांच्या सिद्‌धता आव्हानात्मक उदाहरणे पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत. याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये नमुन्यादाखल प्रात्यक्षिकांची यादी दिली आहे. त्या व्यतिरिक्त उपलब्ध साहित्यातून निरनिराळी प्रात्यक्षिके तयार केली आहेत, तसेच साहित्यनिर्मिती देखील केलेले आहे. पाठ्यपुस्तकातील विविध कृती या प्रात्यक्षिकांमध्ये अंतर्भूत केल्या आहेत.

Ganit Class 8 - Maharashtra Board: गणित इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात दोन विभागांमध्ये सतरा प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. जीवनातील आर्थिक व्यवहारात वापरले जाणारे चक्रवाढव्याज, सूट - कमिशन, चलन, नियमित आणि अनियमित विविध आकृत्यांचे क्षेत्रफळ, काही त्रिमितीय आकारांचे घनफळ इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.

Bhugol Class 8 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून भूगोलाच्या थोड्या उच्च श्रेणीच्या संकल्पना दिलेल्या आहेत. बालपणापासून आकाशात दिसणारे ढग, पाऊस यांच्या संदर्भाने विशेष अभ्यास या पाठ्यपुस्तकात आहे. आपल्या नीलग्रहाचे अंतरंग कसे आहेत. मनुष्याने कशाच्या आधारावर अंतरंगाबाबत अनुमाने काढली याचे विवेचन या पाठ्यपुस्तकात थोडक्यात केले आहे. पृथ्वीचा सर्वात जास्त भाग व्यापलेल्या जलावरणातील जलाची गतीशीलता, प्रवाह व त्यांमागील प्रेरक शक्ती यांचा अभ्यास या पाठ्यपुस्तकात दिला आहे. हे सर्व घटक शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकात अनेक कृती, उप्रकम दिले आहेत. विचारांवर चालणारे प्रश्न आणि पाठ्यपुस्तकात दिलेले नकाशे, चित्राकृतींचा वापर केला आहे, त्यामुळे भौगोलिक संकल्पना सोप्या होण्यास मदत होईल.

Itihas Va Rajyashastra Class 9 - Maharashtra Board: इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इ.स. १९६१ नंतरच्या काळात भारतात झालेल्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांतील विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. उद्योग आणि शेती यांचा समावेश असलेल्या भारताच्या आर्थिक धोरणांची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांची, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि समाजातील शेवटच्या घटकांशी संबंधित अशा विकासाच्या घटनांची नोंद या पुस्तकात आहे. राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत १९४५ पासूनचे जगातील प्रमुख प्रवाह, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, भारताची सुरक्षा व्यवस्था व भारतीय सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने यांचा अभ्यास करायचा आहे. भारत आणि अन्य देशांचे राजकीय संबंध, संयुक्त राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांततारक्षण कार्यात भारताचे योगदान इत्यादी विषयांची चर्चा करण्यात आली आहे.

Marathi Kumarbharati Class 10 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी कुमारभारती दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि भाषा यांमधील वैविध्य स्पष्ट केला आहे. या अभ्यासातून तुम्हांला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात येईल. या पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य, समजून घेण्यास मदत होईल. आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे.

Marathi Balbharati Class 8 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. त्याचा अभ्यास केल्याने मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात येईल. या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. ‘वाचा’, ‘चर्चा करूया’ ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘सारे हसूया’, ‘सुविचार’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Samanya Vidnyan Class 8 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘सामान्य विज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतूहा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घ्या व इतरांना समजवा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून सांगितले आहे. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.

Sanrakshanshastra Karyapustika Class 10 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

संरक्षणशास्त्र (कार्यपुस्तिका) दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तिकेत ‘राष्ट्रीय सुरक्षा' या संकल्पनेच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच अंतर्गत सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य यांविषयीची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. २१ व्या शतकात आवश्यक असलेली संरक्षणशास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी व संरक्षणशास्त्र क्षेत्रातील करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी या विषयातून आवश्यक ते मार्गदर्शन केलेले आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखती अशा अनेक कृतींतून हा विषय अभ्यासणार आहोत.

Bhugol Class 10 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तू नेमक्या कशा तयार झाल्या, त्या कोठून आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आंतरक्रियेतून मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, संस्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आंतरजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपुस्तकामध्ये समजाविल्या आहेत. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. जोपासा, नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने दर्शविली आहेत.

Refine Search

Showing 876 through 900 of 1,427 results