Browse Results

Showing 926 through 950 of 1,427 results

Sukshma Arthashastrache Siddhant Bhag 2 FYBA Second Semester - RTMNU: सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 2 बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr G. N. Jhamre

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग - 2 (Micro Economics Theory - 2) हे बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Antararashtriya Sambandh TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत. 'आंतरराष्ट्रीय संबंध' ही राज्यशास्त्राच्या अभ्यासाची नवीन शाखा म्हणता येईल अशी शाखा आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय संबंध व त्यांचे जागतिक राजकारणावर पडणारे प्रभाव यासंबंधी विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तुत विषयावरील पुस्तक प्रथमच लिहिले असल्याने त्यात नवनवीन संकल्पना, समस्या व्यवस्थितपणे सादर केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावेत असा प्रयत्न विद्यापीठाने आखून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून केलेला आहे.

Adhunik Bharat Isavi San 1886 Te 1947 SYBA Fourth Semester - RTMNU: आधुनिक भारत इ.स. १८८६ ते १९४७ बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vibha Anil Athalye

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्ष २०१६ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेमेस्टर (सत्र) प्रणाली लागू केली आहे व त्यानुसार कला शाखेच्या सर्वच विषयात व अभ्यासक्रमात व्यापक फेरबदल केले आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या बी.ए.द्वितीय वर्ष : सेमेस्टर-IV च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले 'आधुनिक भारत (इ.स. १८८६ ते इ.स. १९४७)' हे पाठ्यपुस्तक आहे. विद्यार्थ्यांना इतिहास विषयाच्या अध्ययनाची गोडी लागावी म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत.

Gruhvyavasthapan Ani Gruhsajavat FYBA Second Semester- RTMNU: गृहव्यवस्थापन आणि गृहसजावट बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Meena Kalele

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार गृहव्यवस्थापन आणि गृहसजावट (Family Resource Management II) हे प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली गृहव्यवस्थापन आणि गृहसजावट (Family Resource Management II) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये १ - कुटुंब निवास (Family Housing), २ - निर्णय घेणे (Decision Making), ३ - कार्य सरलीकरण (Work Simplification), ४ - वेळेचे व्यवस्थापन (Time Management), ५ - ऊर्जा व्यवस्थापन (Energy Management), ६ - रंग (Colour), ७ - ग्राहक संरक्षण (Consumer Education) आणि ८ - फर्निचर (Furniture) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Samajshastra Parichay FYBA First Semester- RTMNU: समाजशास्त्र परिचय बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम सेमिस्टरकरिता समाजशास्त्र परिचय हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक प्रा. रा. ज. लोटे तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये युनिट १ - समाजशास्त्राचा अर्थबोध (Understanding Sociology), युनिट २ - समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना (Basic Concepts in Sociology), युनिट ३ - सामाजीकरण (Socialization) आणि युनिट ४ - सामाजिक संरचना (Social Structure) इत्यादींचा अभ्यासक्रम पुस्तकामध्ये दिलेला आहे.

Bharatiy Arthavyavastha 2 TYBA Sixth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B. L. Jibkate Dr Sudhakar Shastri

"भारतीय अर्थव्यवस्था-२" हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आहे. नागपूर विद्यापीठाने जून २०१६ पासून संपूर्ण अभ्यासक्रमाची पुर्नरचना करून परीक्षेकरिता सेमिस्टर पद्धती सुरू केली आहे. त्यानुसार हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. भारतीय अर्थव्यवस्था - II च्या अभ्यासक्रमात अनेक नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. जसे - शाश्वत विकास, मानव विकास निर्देशांक, सर्वसमावेशक वाढ, नीती आयोग, चालू आर्थिक पाहणीची वैशिष्ट्ये, वस्तू व सेवा कर, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, चौदावा वित्त आयोग, बहुपक्षीय व द्विपक्षीय व्यापार, ब्रिक्स बँक इत्यादी. ही सर्व प्रकरणे नवीन व अद्ययावत स्वरूपाची आहेत.

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 9 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता नववी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता नववी' हे पुस्तक आहे. मराठी (LL) हा विषय अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरले आहे. इयत्ता नववी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या व्याकरण व भाषाभ्यासाच्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 10 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता दहावी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता दहावी' हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते आणि व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये गणितासारखे पैकीच्या पैकी गुणही मिळू शकतात. मराठी (LL) हा विषये अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, असे अनुभवास येते. अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरेल. इयत्ता दहावी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या 'व्याकरण व भाषाभ्यासा'च्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात या वर्षापासून [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Marathi Sulabhbharti class 7 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील कथा, संवाद, पाठ, कविता, गीते वाचून नवनवीन शब्द शिकायला मिळणार आहेत. या पाठ्यपुस्तकात आवडतील अशी शब्दकोडी आणि 'वाचा', 'चर्चा करा, सांगा', 'खेळ खेळूया' अशा अनेक कृती दिल्या आहेत. तसेच व्याकरण घटकांची सोप्या रीतीने ओळख करून दिली आहे. शिवाय तुमच्या नवनिर्मितीबद्दल बोलण्याची, लिहिण्याची संधीही मिळणार आहे. संगणक, मोबाइल सहजपणे हाताळता येतो. या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी उपयोग व्हावा यादृष्टीनेही काही कृती करण्यासाठी दिल्या आहेत. मराठी भाषा शिकत असताना त्यातून काही मूल्ये शिकणे, सामाजिक समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्यासाठी तत्पर राहायला शिकणे हेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीनेही या पाठ्यपुस्तकातील पाठ, कृती, स्वाध्याय यांचा विचार केला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील पाठ, कविता, गीते, कृती, संवाद, स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प यांसारख्या अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच व्याकरण घटकांची मनोरंजक, सोप्या व कार्यात्मक पद्धतीने मांडणी केली आहे. वैविध्यपूर्ण शीर्षकांखाली काही कृती दिलेल्या आहेत या कृतींतून विद्यार्थ्यांमधील निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यास वाव मिळणार आहे.

Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

Annashastra Ani Tantradnyan class 12 - Maharashtra Board: अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram

अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा हा इयत्ता 12 वी चा नवीन अभ्यासक्रम विशेषतः 11 वी मध्ये शिकलेल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रांशी संबंधित असलेल्या वैचारिक तत्त्वांचे उपयोजन यावर केंद्रित आहे. पाठ्यपुस्तकात 5 घटक व 12 अध्याय आहेत. घटक-1 आणि घटक-2 अधिक प्रभावीपणे औद्योगिक खाद्य उत्पादन जसे की दूध आणि प्राणी यावर आधारित उत्पादने, पेये, बेकरी आणि मिठाई उत्पादनाबाबतचे तंत्रज्ञान याबद्दल सांगते. घटक-3 सामुदायिक पोषणाशी संबंधित आहे, जे पोषण स्थिती व पोषणद्वारे चांगले आरोग्य मिळविण्यासाठीची आहार उपचार पद्धत याबद्दल विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालेल. अन्नसुरक्षेची तातडीची गरज पाहता, विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी, घटक-4 हे अन्न पदार्थांमधील भेसळ आणि त्याचा अभ्यास, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम याबाबतचे ज्ञान आणि अन्न अपव्यय व्यवस्थापन प्रणाली यासंबंधित अभ्यासासाठी समर्पित आहे. सेवा उद्योग हा अन्न उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने याचा अभ्यास घटक-5 मध्ये समाविष्ट केला आहे.

Gomant Bharati Pustak Pahile Tritiy Bhasha-Marathi class 8 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक पहिले तृतीय भाषा-मराठी इयत्ता आठवी - गोवा बोर्ड

by Shikshan Sanchalnalay Goa Sarkar Panaji Goa

गोमंत भारती पुस्तक पहिले तृतीय भाषा - मराठी इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील परिणामकारी व समग्र माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि भावना वाढत असून त्यांच्यात शिक्षणाबद्दल रूची आणि ओढ निर्माण करण्यात या पुस्तकाची भूमिका अत्यंत मोलाची ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व विकासाकरिता हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरत आहेत. ज्ञान आणि माहितीचा स्त्रोत व प्राप्त ज्ञानाचा उपयोग करण्याच्या अनेक संधी या द्वारे उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वयानुरूप आणि इयत्तेनुसार उच्च दर्जाचा बौद्धिक विकास घडून येण्यासाठी व विविध उपक्रमाद्वारे त्यांच्यात आवश्यक जीवनकौशल्ये आणि मूल्ये यांचे संवर्धन होण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरत आहेत. विविध विषयांच्या पुस्तकांत दिलेले उपक्रम व कृती मुलांना विषयवस्तूबरोबरच माहितीचे व्यवहाराशी संयोजन करण्यासाठी विशेष प्रेरक ठरत आहेत.

Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.

Manasashastra Class 12 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मानसशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Ganiti Jadu Bhag 2 Class 1 - Goa Board: गणिती जादू भाग 2 इयत्ता पहिली - गोवा बोर्ड

by Directorate of Education Porvorim Goa

The textbook Ganiti Jadu Bhag 2 Class 1 is published Goa Board. It is Permitted and support by: “National Council of Educational Research and Training New Delhi”. The book plays an important role in the educational process as it provides the basis for activities and evaluation strategies in the academic framework. The book is printed in two languages English and Konkani Marathi. It contains match problems and logical thinking for children.

Gomant Bharati Pustak Chauthe Dviteey Bhasha-Marathi class 11 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक चौथे द्वितीय भाषा-मराठी इयत्ता अकरावी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट आणि इयत्ता दहावीपर्यंत या विद्यार्थ्यांनी केलेले मराठी भाषेचे अध्ययन विचारात घेऊन प्रस्तुत पुस्तकातील पाठांची निवड करण्यात आली आहे. साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांचे भावविश्व संपन्न व्हावे, समकालीन जीवनातील विविध प्रश्नांची जाणीव व्हावी, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचे संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत, त्यांची सामाजिक आणि वाङमयीन जाणीव समृध्द व्हावी, श्रेष्ठ मानवी जीवनमूल्यांची ऊर्जा त्यांना लाभावी ही सर्व उद्दिष्टे समोर ठेवूनच 'गोमंत भारती, पुस्तक चौथे' पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. भाषा ही विचारविनियमाचे आणि अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आपल्याला भाषेचा विविध प्रकारे उपयोग करणे गरजेचे असते. वृत्तपत्रीय लेखन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, कार्यक्रमपत्रिका, भाषणे या सारख्या क्षेत्रात भाषेचा वापर कसा करावा याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात 'रचनापाठ' या विभागात वृत्तान्तलेखन, कार्यक्रमपत्रिका यांच्या नमुन्यांचा अंतर्भाव केला आहे. प्रमाण लेखनासाठी व्याकरणाचे व लेखनविषयक नियमांचे ज्ञान आवश्यक असते. या पाठ्यपुस्तकात लेखनविषयक नियम दिले आहेत. विद्यार्थ्यांनी हे नियम आत्मसात करावेत यासाठी शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ शिकवताना विविध पाठातील शब्दांच्या उदाहरणांचा आधार घेणे आवश्यक आहे.

Sulabh Gomant Bharati Pustak Pahile class 5 - Goa Board: सुलभ गोमंत भारती पुस्तक पहिले इयत्ता पाचवी - गोवा बोर्ड

by Shikshan Sanchalnalay Goa Sarkar Panaji Goa

गोव्यातील शाळांसाठी इ. ५ वी ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून हा अभ्यासक्रम १९९४-९५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येत आहे. सदर अभ्यासक्रम तयार करताना गोव्याची संस्कृती, इतिहास, सामाजिक व भौगोलिक वातावरण यांचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम गोव्यातील परिस्थितीला अनुरूप असाच ठरावा. अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम गोवा राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणन यावर्षी इयत्ता पाचवीची सर्व पाठ्यपस्तके तयार करण्यात आली. त्यापैकी 'सुलभ गोमंत भारती, पुस्तक पहिले' हे पुस्तक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक तृतीय भाषा-मराठी हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.

Sulabh Gomant Bharati Marathi-Pustak Dusare class 6 - Goa Board: सुलभ गोमंत भारती मराठी-पुस्तक दुसरें इयत्ता सहावी - गोवा बोर्ड

by Shikshan Sanchalnalay Panaji Goa

गोवा सरकारने नवीन अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये क्रमान्वित केल्यावर त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले. ह्या उपक्रमांत गेल्या वर्षी इयत्ता पाचवीसाठी सर्व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली. ह्याच मालिकेतील इयत्ता सहावीची पुस्तके ह्या वर्षी राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने तयार केली. त्यातील मराठी (तृतीय भाषा) विषयासाठी ‘सुलभ गोमंत भारती' पुस्तक दुसरे तयार करण्यात आले. हे पुस्तक तयार करताना विद्यार्थ्यांच्या गरजा व स्थानिक वातावरण ध्यानात घेण्यात आले आहे. पुस्तकाच्या प्राथमिक अवस्थेत गोव्यातील तीस शाळांतील मराठी विषय शिक्षकांनी ह्या पुस्तकाची उपयोगिता पडताळून पाहिलेली आहे.

Aarthik Bhugol 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आर्थिक भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Amit Eknath Sonawane Prof. Shivram Mahadu Korde Dr Vasudev Shivaji Saluke Prof. Dilip Dnyaneshwar Muluk

'आर्थिक भूगोल' हे पुस्तक आपल्या असंख्य वाचकांचे हाती देताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. प्रथम सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास हा विषय विशेष स्तरावर लागू केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. कारण दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धांमुळे 'आर्थिक भूगोल' या विषयाचे महत्व देखील वाढत आहे. 'आर्थिक भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्वाचा उद्देश हा विषय सुरू करताचा आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 12 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम रचना २०१० (SCF 2010) ही राष्ट्रीय पाठ्यक्रम रचना २००५ च्या अनुसार तयार करण्यात आली आहे. वर्तमान पुस्तक एस्सीएफ् २०१० नुसार अध्यापन आणि अध्ययनाच्या दृष्टिकोनावर व साहित्यावर आधारून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात संपूर्ण पर्यावरण समजून घेण्यासाठी मदत होईल असे विषय समाविष्ट केले आहेत. भौतिक, जैविक, सामाजिक व आर्थिक प्रणाली या प्रणाली परस्परांशी जोडलेल्या असतात. त्यांचे परस्परांशी व पर्यावरणीय समस्यांशी असलेले संबंध यावर येथे लक्ष केंद्रित केले गेले आहे. या पाठ्यपुस्तकात योग्य अशा पर्यावरणविषयक घटनांची उदाहरणे देण्यात आली आहेत. एखादी घटना ही सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रणालींच्या दृष्टिकोनातून कशी पहावी हे सांगितले गेले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा व्यापक दृष्टिकोन दिलेला आहे. त्यांनी कृतियक्त शिक्षण घ्यावे व कृतियक्त शिक्षण हेच शिकण्याचे माध्यम असावे यावर येथे जोर देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक स्तरावर, पर्यावरणासाठी सातत्याने सक्रिय कृती सुरू ठेवण्यासाठी असलेला अभ्यासक्रम, हा कृती व प्रकल्पावर स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे अनिवार्य पात्रता अभ्यासक्रम मानला आहे.

Bharatacha Itihas (1707-1845) SYBA Third Semester - SPPU: भारताचा इतिहास (१७०७-१८४५) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. G. Kolarkar

भारताचा इतिहास (छत्रपती शाहूपासून ते ब्रिटीश शाहीच्या अस्तापर्यंत) इ.स. १७०७ ते १८८५ या पाठ्यपुस्तकाची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली आहे. या कालखंडात मराठ्यांचा राजकीय इतिहास, ब्रिटिश कालखंडाचा राजकीय इतिहास आणि ह्याशिवाय १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा व त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या जागृतीची कारणे आणि मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी चालविल्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे लॉर्ड कर्झन, राष्ट्रीय चळवळींचा इतिहास, दहशतवादी चळवळी, मुस्लीम जातीयवादाचा उदय आणि विकास ही प्रकरणे या पुस्तकात आहेत. ह्या शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न देण्यात आले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल याची खात्री आहे. ह्याशिवाय योग्य ते नेमलेले नकाशे, महत्वाच्या घटनांची सुची व त्यांच्या तारखा दिल्याने विषय समजण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.

Aarogya Va Sharirik Shikshan class 12 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. व्यायाम व आरोग्याची जाणीव निर्माण होण्यासाठी तसेच योग्य सवयी लागण्यासाठी त्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. भावी आयुष्य निरामय होण्यासाठी योग्य व्यायाम, आहार, खेळ व कृतिशील जीवनशैली याची सवय लागावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा आयुष्यभर व्यायाम वर्तनाचा विकास घडवणारा, मानवी हालचालींचे ज्ञान देणारा, खेळातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणारा, 'स्व' ची जाणीव निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा, मनोरंजन यांच्या परस्पर संबंधाविषयी माहिती देणारा आहे. सुदृढ शरीर व उत्तम मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा विचार करून आवश्यक असलेली माहिती या पाठ्यपुस्तकात कार्यपुस्तिकेच्या स्वरूपात दिली आहे. विद्यार्थ्यांचे क्रीडाकौशल्य विकसित व्हावे व उपक्रम करताना त्यांचे मनोरंजन होऊन आनंद मिळावा व त्यामागची शास्त्रीय माहितीही मिळावी हा दृष्टिकोन ठेवून लेखन केले आहे.

Dudh Ani Dudhache Padarth class 9 - Maharashtra Board: दूध आणि दूधाचे पदार्थ इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

दूध आणि दूधाचे पदार्थ कार्यशिक्षण इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. कार्यशिक्षण हा विषय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केला आहे. त्यात एकूण नऊ विषय समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी 'दूध आणि दुधाचे प्रदार्थ' या विषयाची कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांना फक्त भरपूर ज्ञान देणे, त्याची परीक्षा घेऊन गुणवत्ता ठरवणे हा उद्देश न ठेवता, जीवनाशी निगडित असलेल्या बाबींची माहिती देणे, त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे; त्या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणे, एखादा व्यवसाय मनापासून केला तर विकासाच्या वाटा मोकळ्या होतात हा अनुभव मिळणे यासारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे लेखन केले आहे. दूध हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची आवश्यक ती शास्त्रीय माहिती या पुस्तिकेतून मिळेल. दुधापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात, त्यांच्या कृती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सादरीकरण कसे करावे याबाबतच्या सविस्तर सूचनाही पुस्तिकेत दिलेल्या आहेत. अशा प्रकारे, तात्त्विक आणि प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत लिहिलेली, आकर्षक चित्रांनी सजवलेली, सोप्या भाषेतील ही कार्यपुस्तिका आहे.

Dudh Ani Dudhache Padarth Class 10 - Maharashtra Board: दूध आणि दूधाचे पदार्थ इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

दूध आणि दूधाचे पदार्थ कार्यशिक्षण इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. कार्यशिक्षण हा विषय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केला आहे. त्यात एकूण नऊ विषय समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी 'दूध आणि दुधाचे प्रदार्थ' या विषयाची कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांना फक्त भरपूर ज्ञान देणे, त्याची परीक्षा घेऊन गुणवत्ता ठरवणे हा उद्देश न ठेवता, जीवनाशी निगडित असलेल्या बाबींची माहिती देणे, त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे; त्या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणे, एखादा व्यवसाय मनापासून केला तर विकासाच्या वाटा मोकळ्या होतात हा अनुभव मिळणे यासारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे लेखन केले आहे. दूध हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची आवश्यक ती शास्त्रीय माहिती या पुस्तिकेतून मिळेल. दुधापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात, त्यांच्या कृती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सादरीकरण कसे करावे याबाबतच्या सविस्तर सूचनाही पुस्तिकेत दिलेल्या आहेत. अशा प्रकारे, तात्त्विक आणि प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत लिहिलेली, आकर्षक चित्रांनी सजवलेली, सोप्या भाषेतील ही कार्यपुस्तिका आहे.

Refine Search

Showing 926 through 950 of 1,427 results