Browse Results

Showing 976 through 1,000 of 1,427 results

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan class 11 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२१ पासून इयत्ता ११ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पाठ्यपुस्तक आहे. हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Vastrashastra class 11 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वस्त्रशास्त्र इयत्ता ११ वी या विषयाच्या पाठ्यपुस्तकाची आकर्षक स्वरूपाची प्रत आहे. सद्यस्थितीतील संकल्पनांचे ज्ञान, नवीन नैसर्गिक तंतूचा विकास, त्यांचे स्वरूप, उगम, उत्पादन, उपयोग व काळजी या बाबींद्वारे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. वस्त्रांचे क्रियाशील उत्पादन, हातमागाची वस्त्रे (हॅन्डलूम क्लॉथ) आणि भारतातील विविध राज्यातील वस्त्रांचा उपयोग यांचे मूलभूत ज्ञान प्राप्त करावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांकरीता हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विविध प्रकारचे वस्त्र, त्यांची पारंपरिक ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची सजावट, डिझाईन, धुलाईची उपकरणे, त्यांचा वापर याविषयीचे विस्तृत विचार, माहिती यांचा समावेश पुस्तकातील घटकांमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाचा उपयोग समजण्यासाठी या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले आहे.

Jhund Shahiche Band: झुंड शाहीचे बंड

by B. R. Sunthankar

प्रसिद्ध स्पॅनिश तत्वज्ञ ओ. वाय. गॅसेट यांच्या Revolt of the Masses या पुस्तकाचे केलेले हे भाषांतर आहे. गॅसेट हा विसाव्या शतकातील स्पेनचा मौलिक विचारवंत असून तो फ्रँकोच्या पूर्वकाळातील स्पेनच्या बौद्धिक क्षेत्रातील एक धुरीण होता. स्पेनच्या यादवी युद्धाच्या काळात त्याला स्पेन सोडून वनवासात जावे लागले. १९३० साली प्रसिद्ध झालेले प्रस्तुत पुस्तक हे युरोपीय वाङ्‍मयातील महत्वपूर्ण पुस्तक समजले जाते. गॅसेटची लिहिण्याची शैली विशिष्ट असून ती क्लिष्ट असली तरी अर्थगर्भ आहे. विवेचन करण्याची त्याची एक विशिष्ट एक विशिष्ट मर्मग्राही धर्ती असून कोणत्याही घटनेकडे तो व्यापक दृष्टीकोणातून पहातो. या पुस्तकात आधुनिक काळात युरोपातच नव्हे तर साऱ्या जगभर जनसमुदायांचे जे उत्थान झाले आहे आणि त्यातून जी झुंडशाही निर्माण झाली आहे तिची मीमांसा आणि विश्लेषण गॅसेटने विविध अंगांनी केले आहे. झुंडशाहीची त्याने केलेली मीमांसा सध्याच्या भारताच्या परिस्थितीला यथार्थाने लागू पडते. मधुनमधून आपल्याकडे जे झुंडीच्या उठावाचे प्रकार घडत आहेत त्यांचा उलगडा व्हायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मात्र हे पुस्तक वाचताना १९३० सालामधले जागतिक संदर्भ लक्षात घेणे अवश्य आहे.

Mi Isadora: मी-इझाडोरा!

by Dr Rohini Bhate

“मी-इझाडोरा!” हे पुस्तक इसाडोरा डंकन यांच्या “माय लाईफ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुध्द बंडेखारी करणारी मनस्विनी. स्वत:च्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुध्द जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुध्दिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वत:चं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणाऱ्या या दोघींना बांधणाऱ्या सहानुभवाच्या धाग्यातून अनुवादलेले आत्मचरित्र.

Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 1: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय खंड १

by Prabodhankar Thakare

प्रबोधनकार ठाकरे यांनी सत्यशोधक चळवळीच्या विचारांच्या प्रसारासाठी ‘प्रबोधन’ हे नियतकालिका प्रकाशित व संपादित केले. त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना मिळाली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील आठवणी ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातून सांगितल्या आहेत. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनकारांच्या रोखठोक, रांगड्या व भडक भाषेचा अनुभव यातून मिळतो. त्या काळच्या सामाजिक पद्धती, रूढींना विरोध करण्याची धमक ते दाखवत असत. त्यांची आजी ‘बय’ ही बेडर अन् बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. प्रबोधनकारांचे वर्तनही तसेच असे, याचे दाखले या आठवणींतून मिळतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचत असल्याने आपली स्मरणशक्ती तेज झाल्याचेही ते नमूद करतात. प्रबोधनकारांचा जन्म, गाव, आडनाव, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक स्थिती, त्यांचे स्वतःचे छंद, नोकरी-व्यवसाय, नाट्य कारकीर्द यांची माहिती या पुस्तकातून मिळते. त्या काळच्या सामाजिक, राजकीय स्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे व त्यांचा त्यातील सहभाग, भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Aeneid: इनिइड

by Prof. Dattatraya Raghunath Ghodke

“दी इनिइड बाय व्हर्जिल” या पुस्तकाचे भाषांतर प्रा. द.र. घोडके यांनी मराठी भाषेमध्ये केले आहे. या पुस्तकामध्ये एनियासची कथा सांगतली आहे. एक ट्रोजन नायक, जो त्याच्या शहराच्या पडझडीनंतर त्याच्या शहरातून पळून जातो, त्याचे वडील एन्चिसेस आणि त्याचा तरुण मुलगा अस्कानियस. एनियासला रोम आणि वडील रोमन वंशाचा शोध घेण्यासाठी निघाले. एनियास त्याच्या ध्येयाच्या जवळ जात असताना, त्याने प्रथम त्याची योग्यता सिद्ध केली पाहिजे आणि अशा उत्कृष्ट कार्यासाठी आवश्यक परिपक्वता प्राप्त केली पाहिजे. तो भूमध्यसागरीय वादळांशी लढतो, भयानक चक्रीवादळांचा सामना करतो, कार्थेजची राणी डिडोच्या प्रेमात पडतो, अंडरवर्ल्डमध्ये प्रवास करतो आणि इटलीमध्ये युद्ध पुकारतो.

Mulakhavegala Raja: मुलखावेगळा राजा

by Appa Pant

मुलखावेगळा राजा हे पुस्तक हे एकाच (मुलखावेगळ्या) राजाचे चरित्र नाही. दोन मुलखावेगळ्या माणसांचे, राजाचे आणि राजपुत्राचे हे चरित्र आहे आणि हा राजपुत्रही असा तसा नाही तर जागतिक कीर्तीचा भारतीय राजदूत आहे. अर्धी चड्डी आणि बनियन लावून आपल्या संस्थानात फिरणारा हा राजपुत्र भारताचा राजदूत म्हणून पुढे अनेक देशात गाजला आहे. अशा या राजपुत्राने आपल्या वडिलांचे आणि एका रीतीने संस्थानच्या प्रजेचे लिहिलेले हे चरित्र; आपले आणि आपल्या कुटुंबाची अशी सांगितलेली कहाणी. त्यांच्या संस्थानात घडलेल्या प्रयोगाचाच हा इतिहास. हा राज्यव्यवस्थेचा प्रयोग ‘औंध एक्सपेरिमेंट’ म्हणून आज प्रसिद्ध आहे. आप्पासाहेबांची, एका मुलखावेगळ्या राजाच्या राजपुत्राची ही खंत. ही कथा आणि ही खंत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राच्या एका शिल्पकाराची कहाणी.

Bandkhoriche Tattvadnyan: बंडखोरीचे तत्त्वज्ञान

by Shree. B.V. Marathe

“बंडखोरीचे तत्त्वज्ञान” हा लेख अल्बेर कामूच्या “द रिबेल” या ग्रंथाचे मराठी भाषांतर केलेले आहे. “बंडखोरीचे तत्त्वज्ञान” या ग्रंथात समाजातील समाजातील, विशेषतः पश्चिम युरोपमधील बंड आणि क्रांतीच्या आधिभौतिक आणि ऐतिहासिक विकासावर प्रकाश टाकला आहे. अल्बेर कामूचे ‘बंडखोर’ म्हणजे राजनीतीचे तत्त्वज्ञान. गेल्या दोन शतकातील इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यातील ज्ञानसंपदेच्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या युरोपमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक परिस्थितीचे ते उत्कृष्ट विवेचन व विवरण आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 11 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी पुस्तकाची रचना अशी केली आहे, की सहअध्ययन आणि सामूहिक कृती सुलभ करण्यासाठी हे पाठ्यपुस्तक प्रोत्साहित करेल. रचनात्मक दृष्टिकोन आणि कृतींवर आधारित अध्यापन-अध्ययनासाठी हे पुस्तक तयार केले गेले आहे. सदर अभ्यासक्रम संबंधित चित्रांसह ज्ञान निर्मिती सुलभ करण्यासाठी वर्गीकृत पद्धतीने सादर केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि काळजी, जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसाठी हे पाठ्यपुस्तक ठळक मुद्दे मांडत आहे. या पुस्तकातील विषय अशा रीतीने मांडले आहेत, की ज्यांमुळे शाश्वत विकासाची संकल्पना विद्यार्थ्यांना कळून येईल. आजच्या जगातील पर्यावरणविषयक सामाजिक व आर्थिक समस्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठीची साधने व निरनिराळे मार्ग यांचाही समावेश या पाठ्यपुस्तकात केला आहे.

Don Santh Vahatach ahe Bhag 1: डॉन संथ वहातच आहे भाग १

by Shri. Narendra Sindkar

श्री. नरेन्द्र सिंदकर यानी जगविख्यात रशियन लेखक मिखैल शोलोखोव् यांच्या ‘ॲण्ड क्वाएट फ्लोज् द डॉन’ या महाकादंबरीचा मूळ रशियन भाषेतून मराठी अनुवाद केला आहे व ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ तर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. ही कादंबरी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला डॉन नदीच्या खोऱ्यात राहणार्‍या कॉसॅक्सच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधीपासून 1912 च्या आसपास, ही कथा टाटार्स्कच्या मेलेखोव्ह कुटुंबाभोवती फिरते, जे कॉसॅकचे वंशज आहेत. क्रिमियन युद्धादरम्यान एका तुर्कीला पत्नी म्हणून कैद केले. मेलेखोव्हच्या अंधश्रद्धाळू शेजाऱ्यांकडून तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला जातो. ज्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या पतीने त्यांचा सामना केला. त्यांचे वंशज, मुलगा आणि नातवंडे, जे कथेचे नायक आहेत, त्यांना "तुर्क" असे टोपणनाव दिले जाते.

Dharma Ani Vidnyan: धर्म आणि विज्ञान

by V. V. Kuwadekar

''धर्म आणि विज्ञान'' हे पुस्तक बर्ट्रान्ड रसेल लिखित (RELIGION AND SCIENCE) या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. अनुवादक वि. वा. कुवाडेकर यांनी केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. धर्म आणि विज्ञान ही समाजजीवनाची दोन अंगे आहेत. त्यांतील पहिले अंग म्हणजे धर्म. मानवी मनःप्रवृत्तीच्या इतिहासाची आपणास ज्या काळापासून काहीतरी माहिती आहे त्या कालापासून हे अंग महत्व पावलेले आहे. त्याचे दुसरे अंग म्हणजे विज्ञान. हे ग्रीक व अरब लोकांत काही काळ, आणि तेही अधूनमधून भासमान झाले. पण, सोळाव्या शतकात मात्र ते एकदम महत्पदास चढले आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनातील कल्पनांना, आणि संस्थांना अधिकाधिक प्रमाणात आकार दिला आहे. धर्म आणि विज्ञान यात एक दीर्घकाल संघर्ष चालू असून त्यात काही वर्षापूर्वीपर्यंत विज्ञानच नेहमी विजयी ठरले आहे. परंतु रशिया व जर्मनी या देशांत नव्या धर्माचा उदय झाल्यामुळे, आणि त्या धर्माला मिशनरी कार्याच्या विज्ञाननिर्मित नवसाधनांची जोड मिळाल्यामुळे हा प्रश्न, विज्ञानयुगाच्या प्रारंभी होता तितकाच पुनश्च शंकास्पद ठरला आहे. त्यामुळे, परंपरागत धर्माने शास्त्रीय ज्ञानाशी चालविलेल्या युद्धाची कारणे व त्या लढ्याचा इतिहास तपासून पहाणे हे पुन्हा एकवार महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.

Don Quixote Bhag 2: डॉन क्विक्झोट भाग २

by D. N. Shikhare

सरव्हँटिस्‌-लिखित ‘Don Quixote Part 2’ या ग्रंथाचा भागाचा मराठी अनुवाद श्री. दा. न. शिखरे पुणे यांनी केला असून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाच्या भाषांतरमालेखाली ‘डॉन क्विक्झोट’ भाग २ प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये सरव्हँटिस्‌ने लिहिले की पहिले अध्याय "ला मंचाच्या संग्रहणातून" घेतले गेले आहेत आणि बाकीचे मूरिश लेखक सिड हॅमेटे बेनेंगेली यांनी अरबी मजकुरातून भाषांतरित केले आहेत. ही कल्पित युक्ती मजकुराला अधिक विश्वासार्हता देते, असे दिसते की डॉन क्विक्सोट एक वास्तविक पात्र आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान, नायक सराईत, वेश्या, शेळीपालक, सैनिक, पुजारी, पळून गेलेले दोषी आणि अपमानित प्रेमींना भेटतात. उपरोक्त वर्ण कधीकधी वास्तविक जगातील घटनांचा समावेश असलेल्या कथा सांगतात. डॉन क्विक्सोटच्या कल्पनेने त्यांच्या गाठीभेटी शूर शोधांमध्ये वाढवल्या जातात. डॉन क्विक्सोटची स्वतःशी संबंधित नसलेल्या बाबींमध्ये हिंसक हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती आणि कर्ज न भरण्याच्या त्याच्या सवयीमुळे एकांत, दुखापत आणि अपमान होतो (सांचो बहुतेकदा पीडित असतो). शेवटी, डॉन क्विक्सोटला त्याच्या गावी परतण्यास राजी केले जाते.

Kibbutz Navsamaj Nirmiticha Ek Prayog: किबुट्झ: नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग

by S. H. Deshpande Kusum Deshpande

इस्त्रायली किबुट्‌झ हा समाजवादाचा एक वेगळ्या धर्तीचा आणि अधिक उन्नत प्रयोग आहे. तथाकथित ‘समाजवादी’ देशांतील समाजवादापेक्षा किबुट्झच्या समाजवादाचा आशय अधिक समृद्ध असून त्याचे तंत्रही अधिक प्रभावी आहे. इस्त्रायल राष्ट्राच्या उभारणीत तर किबुट्झचा ऐतिहासिक वाटा एवढा मोठा आहे की किबुट्‌झशिवाय इस्त्रायलचा विचार करणेही अशक्य आहे. शिवाय किबुट्‌झने आर्थिक व्यवहार, सामाजिक रचना, शिक्षण इत्यादि क्षेत्रांमध्ये इतके नवीन प्रयोग केलेले आहेत की समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, संस्कृतिशास्त्रज्ञ ह्यांनी त्याचा हरतऱ्हांनी अभ्यास केला आहे. मराठी वाचकांना ह्या प्रयोगाची ओळख व्हावी म्हणून किबुट्‌झविषयक एका महत्त्वाच्या पुस्तकाचा अनुवाद विवेचक प्रस्तावनेसह या ग्रंथात सादर करण्यात आला आहे.

Iliad: इलियद

by Shamrao Nilkanth Oak

ग्रीक महाकवी होमर लिखित “Iliad” या ग्रीक महाकाव्याचे सँम्युएल बटलर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे मराठी भाषान्तर शामराव नीळकंठ ओक यांनी केले आहे. इलियड हे होमरचे जगप्रसिद्ध महाकाव्य आहे. यात ट्रॉय या ग्रीक शहरात झालेल्या युद्धाच्या विजयाचे आणि विध्वंसाचे वर्णन आहे. हे युद्ध ट्रॉजन युद्ध म्हणून ओळखले जाते.

Ashok Ani Mauryancha Rhas: अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास

by Dr Sharavati Shirgavkar

अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्याज हा डॉ. रोमिला थापर यांचा गाजलेला ग्रंथ. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने उत्कृष्ट ऐतिहासिक ग्रंथांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेले आहेत. डॉ. थापर यांच्या या गाजलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची संधी डॉ. शरावती शिरगावकर मिळाली. या ग्रंथाचे वाचन करताना ऐतिहासिक कल्पनाशक्ती म्हणजे काय हे अधिक उत्कटतेने अनुभवाला मिळेल. स्थलनामांसाठी शब्दोच्चारांच्या खुणांचा वापर करण्यात सुसंगतेचा काहीसा अभाव वाचकांना जाणवेल. संस्कृत आणि पाली या भाषांमधील कमी परिचित असलेल्या नावांपैकी जी अधिक रुढ आहेत त्यांचे लिप्यंतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथामध्ये संस्कृत व पाली शब्दांच्या बाबतीत या दोनही भाषांमधील शब्द एकाच भाषेत आणण्याचा प्रयत्न न करता शक्यतो प्रामुख्याने मूळची रुपे ठेविली आहेत.

Aamod Sampurn-Sanskritam class 9 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे एकूण सोळा अध्याय आहेत तसेच एक घटक परिक्षेचा एक भाग दिला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Marathi Sugambharati Class 8 - Maharashtra Board: मराठी सुगमभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुगमभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Marathi Aksharbharati Class 9 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'अक्षरभारती' मराठी इयत्ता नववीचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख करून दिलेली आहे, ते वाचून मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे, हे लक्षात येईल. भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा, म्हणून या पुस्तकात अनेक भाषिक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतीतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरूची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे व त्याचे फायदेही समजून घ्यायचे आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा.

Marathi Sulabhabharati class 8 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुलभभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Vinoba Jeevan Darshan: विनोबा-जीवन-दर्शन

by Shivaji N. Bhave

१५ नोव्हेंबर १९८२ ला पूज्य विनोबाजींचा आत्मा ब्रह्मात विलीन झाल्याची बातमी आली. प्रत्येक नश्वर देहाला पंचत्वात विलीन व्हावेच लागते. पण सर्वांच्याच विलीन होण्याची नोंद घेण्यात येत नसते. विनोबाजींचे व्यक्तित्व हे असामान्य. श्री. अरविंदांनी आपल्या कल्पनेतला महामानव रंगविताना महात्मा गांधी आणि विनोबा यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवले असेल किंवा नाही कोण जाणे. पण सामान्य माणूस जेव्हा माणसातल्या या हिमालयाकडे पाहातो तेव्हा तत्त्वज्ञांनी वर्णन केलेला महामानव तो हाच, असे त्याला वाटल्यावाचून रहात नाही. स्वभावविशेषाच्या भिन्नतेमुळे गांधी, नेहरू, विनोबा, अरविंद, रवीन्द्रनाथ, मार्क्स, रसेल, शंकराचार्य, ज्ञानेश्वर हे वेगवेगळे भासतील हे खरे. पण हे सगळेच महामानव होते यांत शंका नाही. पूज्य विनोबांचे सगळेच सामान्य माणसापेक्षा वेगळे. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे वेगळे. त्यांचे मरण पण वेगळे. साहित्य-संस्कृति-मंडळातर्फे पूज्य विनोबाजींचे चरित्र प्रकाशीत करण्यात आले आहे. कु. निर्मला देशपांडे, श्री. रमाकांत पाटील, श्री. म्हसकर, श्री. गौतम बजाज आणि विनोबाजींचे खाजगी चिटणीस श्री. बाळ विजय इत्यादींच्या सहकार्यामुळे विनोबाजींचे चरित्र आज प्रसिद्ध करण्याचा योग येत आहे.

Krantiparva: क्रांतिपर्व

by Dr Uttamrao Patil

डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरलेला ‘क्रांतिपर्व’ हा ग्रंथ आहे. डॉ. उत्तमराव पाटील हे इतिहासकार नाहीत; पण इतिहास घडविणारे वीर आहेत. या वीराने आपल्या साहाय्यकांच्या मदतीने १९४२ च्या ‘भारत छोडो’ लढ्यात जो इतिहास घडविला त्याची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे हे केव्हाही इतर कोणाकडून ती कहाणी ऐकण्यापेक्षा अधिक सरस ठरणार आहे. या ४२ च्या लढ्यात डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या घरातील सर्व लहानथोर मंडळी बलिदानाच्या वेदीवरच उभे होते. त्यांची आई तुरुंगात गेली ती परत आलीच नाही. स्वतः डॉ. उत्तमराव पाटील, त्यांचे धाकटे बंधू दशरथराव व सर्वात धाकटे बंधू श्री. शिवाजीराव पाटील, उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई या सर्वच मंडळींनी त्या काळात अलौकिक कार्य केले. आझाद हिंद सेनेची कॅ. लक्ष्मी आणि सातारच्या पत्री सरकारच्या तुफान स्त्री-सैनिकांची सेनानी लीलाताई यांचे नाव त्या काळात प्रत्येक लहानथोरांच्या जिभेवर होते. हा ग्रंथ डॉ. उत्तमराव पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे एवढे सांगितले म्हणजे या ग्रंथाचे मोल किती आहे हे आणखीनिराळ्या शब्दांत सांगण्याची गरज नाही.

Dharmashastracha Ithihas Purvardha: धर्मशास्त्राचा इतिहास पूर्वार्ध

by Yashwant Abaji Bhat

भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे ह्यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘History of Dharmashastra’ ह्या विस्तृत आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथाच्या मराठीमध्ये केलेल्या सारांश स्वरूपाच्या अनुवादाचा पूर्वार्ध मराठी वाचकांपुढे सादर करण्यात आला आहे. “भारतामधील चालीरीतींमध्ये जे फेरबदल घडून आले आहेत त्यांच्या संबंधी, त्याचप्रमाणे भारतीय समाजरचनेमध्ये झालेल्या स्थित्यंतराविषयी आणि सामान्यतः कालानुक्रमाविषयी शास्त्रीवर्गात चमत्कारिक भावना प्रचलित आहेत आणि शास्त्रीवर्गाचे भारतातील सामान्य जनसमुदायावर फार मोठे वजन आहे ह्याकरिता ह्या ग्रंथाचे संस्कृत भाषेत आणि मराठी भाषेमध्ये भाषांतर केले आहे. “धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे विवेचन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकित्सा करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने पाहिल्यास हा ग्रंथ त्या विषयावरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरूपाचा आहे.

Sybil: सिबिल

by Madhavi Kolhatkar

‘सिबिल’ ही अमेरिकेत घडलेली सत्यकथा. ‘सिबिल’ हे टोपणनाव असलेली ही मुलगी अतिशय बुद्धिमान्, उत्तम चित्रकार. पण शाळा- कॉलेजात असताना तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिचा दिवसा- तासांचा मेळ बसेना. आयुष्यातला बराच काळ हा आपण न जगताच जातो आहे, असं तिला वाटायचं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य काहीतरी वेगळं आहे; कुठेतरी, काहीतरी चुकतं आहे, असं जाणवल्यावर धाडस करून ती मनोविकारतज्ज्ञांकडे गेली. त्यांनी तिचा सर्व इतिहास जाणून घेऊन निदान केलं, ते भग्नव्यक्तित्वाचं. ‘सिबिल’ मध्ये एकूण सोळा व्यक्तित्वं आढळली. त्यातली पेगीसारखी काही व्यक्तित्वं भरपूर खात, हिंडत, उल्हासाने जगत; तर सिबिल ॲन्‌सारखी इतर काही एक पाऊल उचलण्याच्या कल्पनेनंही थकून जात.

Mahan Bhartiya Krantikarak Pratham Parv 1770 te 1900: महान भारतीय क्रांतिकारक प्रथम पर्व (१७७० ते १९००)

by Shree. Sarvottam Dhanaji Zambare

भारतीय स्वातंत्र प्राप्तीला अनेक क्रांतीकारकांचे प्रयत्न कारणीभूत झाले. अक्षरक्षः असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी त्यासाठी देहदंड सोसला, संघर्ष केला. त्यातील अनेक जण हुतात्मा झाले. तसेच अनेक जण अज्ञात व अनामिक राहिले. परंतु सुदैवाने या स्वातंत्र्यसैनिकांपैकी अनेकांची माहिती उपलब्ध आहे. त्या आधारावर ज्ञात असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची माहिती त्यांच्या चरित्र रुपाने प्रकाशित व्हावी असा प्रस्ताव श्री. सर्वोत्तम धनाजी झांबरे यांनी दिला. या प्रस्तावाचे महत्त्व जाणून भावी पिढ्यांसाठी भारताच्या स्वातंत्र्यवीरांची संक्षिप्त चरित्रे ग्रंथरुपाने प्रकाशित करावी असा निर्णय मंडळाने घेतला व आज ‘महान भारतीय क्रांतिकारक’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित होत आहे. श्री. सर्वोत्तम धनाजी झांबरे यांनी आयुष्याच्या उत्तर काळात अतिशय परिश्रम घेऊन स्वातंत्र्यवीरांची माहिती संकलित केली. या चरित्रग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये ९८ क्रांतिकारकांची अल्पचरित्रे समाविष्ट केलेली आहेत.

Aadarsh Rajya: आदर्श राज्य

by Dr J. V. Joshi

‘प्लेटो’ या जगद्‌विख्यात ग्रीक तत्त्वज्ञाच्या ‘रिपब्लिक’ या जगद्‌विख्यात तात्त्विक संवाद ग्रंथाचे हे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित होत आहे. ‘प्लेटोची आदर्श राज्य घटना’ हे श्री. जनार्दन गणेश जोगळेकर यांनी इ. स. १९३९ साली प्रसिद्ध केलेले भाषांतर दुर्मिळ झाले होते. त्यामुळे कॉर्नफोर्ड, जोवेट यांनी केलेली सर्व प्रसिद्ध इंग्रजी भाषांतरे ‘प्लेटो आणि रिपब्लिक’ यावर आधारलेले अभ्यास व संशोधन ग्रंथ समोर ठेवून, तत्त्वज्ञान विषयाचे जिज्ञासू, अभ्यासक यांना उपयुक्त ठरू शकेल अशी सुधारित संपादित आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा हा प्रयत्न. ‘रिपब्लिक’ ग्रंथाची भूमिका, मध्यवर्ती समस्या, त्यामधील तात्त्विक चर्चेत आलेले महत्त्वाचे विषय इत्यादी संबंधीचे विवेचन व रूपरेखा प्रस्तावनेत मांडली आहे. ‘प्लेटोच्या आदर्श राज्यात’ प्रस्थान ठेवण्यापूर्वीचे हे हृद्‌गत, त्याचा अंतरंग परिचय करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे वाटते.

Refine Search

Showing 976 through 1,000 of 1,427 results