Browse Results

Showing 1 through 25 of 1,427 results

Anandadayi Ganit class 2 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता दुसरी - एनसीईआरटी - २३

by National Council of Educational Research and Training

इयत्ता दुसरीसाठी असलेले आनंददायी गणित असे नाव असलेले गणिताचे पाठ्यपुस्तक NEP 2020, NCF-FS 2022 तसेच पायाभरणीच्या टप्प्यासाठीचा अभ्यासक्रम यांच्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे। बालवाटिका 1 ते 3 तसेच पहिली झाल्यावर (3-8 वर्षे वयात) दुसरीत जाणाऱ्या मुलाला अंकांचे ज्ञान झालेले असते, असे यात गृहीत धरले आहे। परंतु, आपल्या देशातील विविधता बघता, कदाचित काही मुलांची एकदम शाळेत पहिलीत गेल्यावरच पहिल्यांदा अंकांची ओळख होत असेल, असेही होऊ शकते। हे क्रमिक पुस्तक तयार करताना अशा परिस्थितीचाही विचार केलेला आहे। वयाच्या या टप्प्यावरील मुले मुक्तपणे खेळणे, खेळणी यात रमतात। हे लक्षात घेऊन, अवकाशीय समज, अंकहाताळणी, गणितीय आणि संगणकीय संकल्पना इ। शिकवण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खेळ, खेळणी यांचा वापर करण्यासाठी पुष्कळ वाव ठेवलेला आहे। यामुळे प्रत्येक नवीन संकल्पना किंवा कौशल्य शिकताना मूर्त वस्तूंकडून चित्रस्वरूपाकडे व त्याकडून अमूर्त कल्पनांपर्यंतचे संक्रमण सहजपणे होऊ शकते। सर्वांगीण विकासासाठी अनुभवातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, इयत्ता दुसरीसाठी असलेल्या आनंददायी गणित या पुस्तकामध्ये, वर्गात आणि वर्गाबाहेर करण्यासारखे अनेक उपक्रम दिले आहेत। यातील सर्व प्रकरणांमध्ये, उपक्रमाधारित कार्यांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचे आकलन करून दिले आहे। सक्तीने, नाखुषीने गणित शिकण्याऐवजी, आपण खेळ खेळत आहोत अशा भावनेने मुलांनी हे उपक्रम करावेत आणि त्याद्वारे गणितीय संकल्पना आपोआप रुजाव्यात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे।

Anolakhi Disha Bhag 1: अनोळखी दिशा भाग 1

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Antararashtriya Sambandh 1 TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध 1 बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत.

The Darker Side: द डार्कर साईड

by Cody McFadyen

अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…

Digital Bharat: डिजिटल भारत

by Dr Deepak Shikarpur

पंचवीस वर्षांनी माहिती तंत्रज्ञानाची गंगा म्हणजेच 'आयटी' भारतात वाहत आहे आणि ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वास्तव बनली आहे. अंगणी येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मुळात ही संगणकीय क्रांती असली तरी, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (किमान साधे मोबाइल फोन) आल्यापासून त्याचा खरा प्रसार (आणि परिणाम) जाणवू लागला आहे. आपली बरीचशी सरकारी कामे ऑनलाइन होऊ लागली आहेत! किमान बिले भरणे, एखाद्या प्रकरणाची माहिती घेणे, तक्रारी दाखल करणे, संबंधित कार्यालयात पोहोचणे आणि तिथल्या विभागाचा शोध घेणे आणि योग्य अधिकाऱ्याची वाट पाहणे यासारख्या मूलभूत कामांसाठी शहरी-निमशहरी भागातही तासनतास वाया जातात. आणि जतन केलेले मानसिक आणि शारीरिक श्रम (सामाजिक, आर्थिक, आत्म-सुधारणा इ.) इतरत्र वापरा. काही हरकत नाही! आणि हे अगदी घरी केले जाऊ शकते. थोडे कौशल्य आत्मसात केले तर अनेकांना त्यात दूरगामी करिअरच्या (कमाईच्या) संधी मिळतील. इंटरनेट, कनेक्टेड कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन आणि स्वत:चे बँक खाते यांच्या मदतीने - अगदी गृहिणी देखील तिच्या घरातील आरामात पैसे कमवू शकते. एकदा तुम्ही डिजिटल कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर, तुम्ही अनेक व्यावहारिक, परस्पर पैलू हाताळण्यास सक्षम असाल. "खरीच कर लो दुनिया मुटका" हे स्वप्न आता सहज शक्य झाले आहे.

Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.

Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.

Majet Shikuya Marathi Class 1 - Maharashtra Board: मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र शासनाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय सन २००९ मध्ये घेतला. 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२' मध्येही याच धोरणानुसार, अनिवार्य मराठी हा विषय इयत्ता पहिलीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या स्तरावर मराठी हा विषय शिक्षकांनी श्रवण, भाषण व संभाषण या कौशल्यांच्या स्वरूपात शिकवावा आणि त्या विषयासाठी 'पाठ्यपुस्तक' असू नये अशी अपेक्षा आहे; म्हणून इयत्ता पहिलीकरिता मराठी विषयाची ही छोटेखानी पूरक साहित्य पुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली आहे. या पूरक पुस्तिकेमध्ये गाणी, गोष्टी दिल्या आहेत. तसेच परिचित, अपरिचित पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फुले, फळे, झाडे यांचा रंगीत चित्रे व शब्दांतून परिचय करून दिलेला आहे. काही सूचना व कृती दिल्या आहेत. शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ जावे यासाठी पुस्तिकेच्या शेवटी 'दिशा अध्ययन-अध्यापनाची' या शीर्षकाखाली मार्गदर्शन केले आहे. मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक व दर्जेदार होण्यासाठी त्याचा उपयोग करावा.

Pacifikchya Betavaril Katha: पॅसिफिकच्या बेटांवरील कथा

by Somerset Maugham

पॅसिफिकच्या बेटांवरील कथा ह्या पुस्तकाचे मूळ लेखक हे सॉमरसेट मॉम असून ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. वृषाली जोशी आहेत. ह्या पुस्तकामध्ये सॉमरसेट मॉम यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे वर्णन करण्यात आलेले आहे.

Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA Second Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-२ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.

Sthool Arthashastra FYBA Second Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्र बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B.L. Jibhakate

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत “स्थूल अर्थशास्त्र" ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्राध्यापक मित्र आणि व विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग १ च्या सेमिस्टर - II च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले असून ते महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. अर्थशास्त्रातील काही संकल्पना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून एकाच संकल्पनेकरिता मराठीतील अनेक पर्यायी नावे दिलेली असून इंग्रजीतील प्रतिशब्दही दिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेत एखादी संकल्पना किंवा सिद्धांत वेगळ्या नावाने विचारण्यात आला तरी विद्यार्थांना त्याचे अचूक उत्तर देता येईल, असा विश्वास आहे.

Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले

by Dr Hrishiskesh Pradeep Bodhe

स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…

Aadhunik Rajkiya Vishleshan 2 Paper 2 TYBA Sixth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण २ पेपर २ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R.G. Varadkar

राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए.भाग-3 साठी आधुनिक राजकीय विश्लेषण 2' हा पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यशास्त्राला अधिक शास्त्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने अमेरिका, जर्मनी अशा देशांतील राजकीय विश्लेषकांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रियेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संकल्पनांचा त्यांनी वापर केला. त्यांच्या या प्रयत्नातून आधुनिक राजकीय विश्लेषण पद्धतीचा उदय झाला. राज्यशास्त्राच्या विकासात या विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.

Antararashtriya Sambandh 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध 2 पेपर 4 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर-4, सत्र-6, DSE-2D साठी 'आंतरराष्ट्रीय संबंध-II' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. सत्र-6 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.

Bhartiya Aarthik Vikas 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. V. Tile Dr S. R. Jawale Dr S. R. Pagar

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र सामान्य स्तर-3 (जी-3) सत्र 5 आणि 6 साठी भारतीय आर्थिक विकास हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवीन सिद्धान्त आणि घटक घेण्यात आले आहेत. त्या सर्व घटकांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज

by Krishnarao Arjun Keluskar

गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

Gramin Vikasacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल 2 पेपर 3 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Pagaar Ashok Maruti Thorat Dr Jyotiram More

'ग्रामीण विकासाचा भूगोल भाग 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच होईल यात शंका नाही. म्हणूनच दुसऱ्या प्रकरणात समस्याप्रधान क्षेत्रांना डोळ्यांसमोर ठेवून विकासाच्या दिशांवर चर्चा केलेली दिसून येते. आपला देश आपल्या राज्यघटनेनुसार समानता मानणारा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण 'कल्याणकारी' राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे. म्हणूनच शासनातर्फे तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तो कशा प्रकारे केला जातो, यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत इत्यादींची सविस्तर माहिती तिसऱ्या प्रकरणात दिसून येते. चौथ्या प्रकरणात ग्रामीण विकासाबाबत झालेल्या किंवा चालू असलेल्या प्रयत्नांचा चिकित्सात्मक अभ्यास स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी 'क्षेत्रीय अभ्यास पद्धती' अवलंबलेली आहे. याचाच अर्थ एखाद्या गावाच्या, गटाच्या किंवा समूहाच्या विकासाचे प्रयत्न अभ्यासणे हा होय. यात योग्य उदाहरणे निवडून त्याबाबत साधकबाधक चर्चा केलेली दिसून येते. सर्व प्रकरणांच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला कितपत ज्ञान प्राप्त झाले आहे हेही पडताळून पाहता येईल.

Lokprashasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: लोकप्रशासन २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Haridas Arjun Jadhav

शैक्षणिक वर्ष 2021-2022, टी. वाय. बी. ए.: सत्र 6 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C(3)+1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विद्याथ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विद्याथ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र सहामध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'नोकरशाही' हे असून यामध्ये आपण नोकरशाहीची भूमिका, नियुक्तीकर्ते- सेवक संबंध, प्रशासकीय न्यायाधीकरण आणि प्रशासकीय निवाडा यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'कर्मचारी प्रशासन' हे असून यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन, प्रशासकीय भरती, प्रशिक्षण आणि बढती या संकल्पना समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'अंदाजपत्रकीय प्रक्रिया'. या प्रकरणात आपण वित्त प्रशासन, अंदाजपत्रकाचे प्रकार आणि अंदाजपत्रकीय प्रक्रिया अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'उत्तरदायित्व आणि नियंत्रण'. यामध्ये आपण उत्तरदायित्व आणि नियंत्रण या संकल्पनांबरोबरच प्रशासनावरील नियंत्रण या बाबी समजून घेणार आहोत.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2 पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Korawale Sachin Sahadu Ghayatdke

'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले राज्यशास्त्र सत्र-6 चे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर सादर केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये 74 व्या घटनादुरुस्तीपूर्वीच्या नागरी संस्था, कलम 243 मधील संवैधानिक बदल तसेच नगर पंचायत या घटकांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व भारतीय संविधानातील 12 वे परिशिष्ट याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीनमध्ये राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग व आयोगासमोरील आव्हाने विस्तृतपणे लिहिली आहेत. चौथ्या प्रकरणामध्ये स्थानिक स्वराज्य शासनावरील नियंत्रण, स्थानिक स्वराज्य शासनावरील मर्यादा व त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

Marathi Aksharbharati class 10 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘अक्षरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे. आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठांमध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्गवर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी, यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू

by Rahul Shinde

या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.

Nazi Bhasmasuracha Udayasta: नाझी भस्मासुराचा उदयास्त

by V. G. Kanitkar

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

Paryatan Bhugol 2 TYBA Sixth Semester - SPPU: पर्यटन भूगोल 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

पर्यटन भूगोल 2 या पुस्तकात प्रकरण एकमध्ये पर्यटनातील निवासस्थानाची भूमिका या प्रकरणात निवासस्थानाचे प्रकार यामध्ये हॉटेल, मोटेल, पथिकाश्रम, खाजगी व शासनमान्य निवासस्थाने तसेच निवासव्यवस्थेची भूमिका या बाबींचा समावेश केलेला आहे. प्रकरण दोनमध्ये पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिणाम यांचे सखोल स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच शाश्वत विकासात पर्यटनाची भूमिका व धोरण याचाही अभ्यास केलेला आहे. प्रकरण तीनमध्ये पर्यटन विकासाचे नियोजन आणि धोरणे यामध्ये जागतिक पर्यटन संघटना (UNWTO), भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या सर्वांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रकरण चारमध्ये पर्यटन स्थळांचे अध्ययन यामध्ये मनाली व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे, ताजमहाल व रायगड किल्ला तसेच काझीरंगा व मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने या सर्व स्थळांचे अध्ययन विस्तृतपणे केलेले आहे. 'पर्यटन भूगोल 2' या पुस्तकात वरील सर्व मुद्द्यांनुसार पर्यटन स्थळांचे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Refine Search

Showing 1 through 25 of 1,427 results