Browse Results

Showing 101 through 125 of 1,427 results

Antararashtriya Sambandh TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत. 'आंतरराष्ट्रीय संबंध' ही राज्यशास्त्राच्या अभ्यासाची नवीन शाखा म्हणता येईल अशी शाखा आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय संबंध व त्यांचे जागतिक राजकारणावर पडणारे प्रभाव यासंबंधी विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तुत विषयावरील पुस्तक प्रथमच लिहिले असल्याने त्यात नवनवीन संकल्पना, समस्या व्यवस्थितपणे सादर केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावेत असा प्रयत्न विद्यापीठाने आखून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून केलेला आहे.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

Anubhavache Bol

by Baba Bhand

There was a large group of flamingo staying on a huge tree and an old and experienced flamingo saw a creeper growing on the tree. He warned the birds about it but they did not listen to him. One day a hunter climbed the tree with the help of the creeper and put his net and all got trapped. Finally, they take advice from the old flamingo and escape.

Anula Kay Kay Diste?

by Lavanya Karthik

अनूला काय काय दिसतं? अनू तिच्या अवतीभवती खूप छानछान गोष्टी बघत असते. त्या गमती-जमती कदाचित तुम्हालाही दिसतील.

Apale Kartutva Aplya Hatat

by Shankar Karhade

One day the creator of the world came to the Earth to see how everything is going on. He finds a hungry destitute man under a tree. He tried to make him rich by writing prosperity on his head and goes away. Again he comes and finds that he is still in the same condition. He understands that a man’s destiny is in man’s hand even God cannot help him become rich if the man wants to remain poor.

Apale Kutumba Hech Apale Sarvasva

by Shankar Karhade

This is a story of a rich man. He heard about a Panditji who predict the future accurately. The predictions of Panditji came true. So people believed in him. Nobody doubted their future. He told the rich man that there will be a robbery in his house and the thief will be an insider. He sends all his people away for a week and gives a chance for a thief to rob easily and there was no one to save him. He did not trust his own family.

Apan Ase Ghadalo Parisar Abhyas Bhag 2 class 5 - Maharashtra Board: आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. इतिहास म्हणजे एक शास्त्र आहे, याची जाणीव प्रथमपासूनच मुलांच्या मनात रुजावी अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. आदिमानव ते आधुनिक मानव ही वाटचाल समजून घेता घेता, त्या वाटचालीत निसर्ग आणि परिसर या दोन घटकांचे अत्यंत महत्त्व आहे. मानवाने त्याच्या गरजेप्रमाणे साधनांची निर्मिती केली. हवामानातील बदलानुसार त्याच्या भोवतीचा परिसर बदलला. त्यामुळे त्याच्या गरजा आणि त्यांना अनुसरून त्याच्या कामांचे स्वरूप बदलले. म्हणून त्याने तयार केलेल्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. 'प्रगत बुद्धीच्या मानवाने' गाठलेला नागरी संस्कृतीचा टप्पा हा प्रागैतिहासिक काळाचा परमोच्च बिंदू. येथून ऐतिहासिक काळाची सुरुवात होते. अशा प्रकारे मानवाच्या वाटचालीची माहिती या पुस्तकातून दिलेली आहे.

Apan Sare Bhau Bhau

by S. R. Devale

Kaurav and Pandav were all brothers and were fighting among themselves. Dharamraj takes the initiative to unite them. Bhima, Kaurav is your brother. They must be redeemed. When we fight among ourselves, it is a not beneficial. If the strangers attack us we can take advantage because we become a hundred fold.

Apatti Vyavasthapanaca Bhugola SY BA Pune University

by Prof. T. V. Jetithor

Apatti Vyavasthapanaca Bhugola Marathi text book for Second year from The Pune University in Marathi.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यावरणीय आपत्तीत वातावरणीय आपत्ती आणि त्याच्या व्यवस्थापनात गारपीट, ढगफुटी, वादळे, आवर्त, दुष्काळ, पूर व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या हवामानस्थितीचा अभ्यास सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Aptavani Shreni-1: आप्तवाणी श्रेणी –१

by Dada Bhagwan

यह संसार किसने बनाया? क्या यह संसार आपके लिए परेशानी का कारण है? क्या आपको आश्चर्य होता है कि यहाँ सबकुछ कैसे होता है? कैसे हम अनगिनित जन्मों में भटक रहे हैं। यह सब करनेवाला कौन है? धर्म क्या है? मोक्ष क्या है? आध्यात्मिकता और धर्म में क्या फर्क है? शुद्ध आत्मा क्या है? मन, शरीर और वाणी के क्या कार्य हैं? लौकिक रिश्तों को कैसे निभाएँ? भाग्य और कर्म का अंतर कैसे समझें? अहंकार क्या है? क्रोध-लोभ-मोह, क्या वे अहंकार के कारण हैं? जिन्हें मोक्ष पाने की इच्छा है या जो मोक्ष चाहते हैं, उनकी ज़िंदगी में ऐसे अनेक प्रश्न व समस्याएँ होगीं। ‘स्वयं’ का ज्ञान या ‘मैं कौन हूँ’ यह सब का अंतिम लक्ष्य है। ‘मैं कौन हूँ’ के ज्ञान बगैर मोक्ष नहीं मिल सकता। यह ज्ञान केवल ज्ञानीपुरुष से ही प्राप्त हो सकता है। इस पुस्तक में ज्ञानीपुरुष परम पूज्य दादाश्री द्वारा दिए गए बहुत सी समस्याओं के उत्तर संकलित हैं। इस दिव्य पुस्तक का ज्ञान उन लोगों के लिए हैं जिनकी वैज्ञानिक सोच है, जिन्हें आत्मिक शांति चाहिए और जो संसार की परेशानियों से मुक्त होना चाहते हैं।

Aptavani Shreni-2: आप्तवाणी-श्रेणी-२

by Dada Bhagwan

जिसे छूटना ही है उसे कोई बाँध नहीं सकता और जिसे बंधना ही है उसे कोई छुड़वा नहीं सकता! - परम पूज्य दादाश्री| यह ज्ञान ग्रंथ या धर्म ग्रंथ नहीं है, लेकिन विज्ञान ग्रंथ है| इसमें आंतरिक विज्ञान का, वीतराग विज्ञान का ज्ञानार्क जो कि परम पूज्य दादाश्री के श्रीमुख से प्रकट हुआ है, उसे प्रस्तुत करने का प्रयत्न किया गया है| यह ज्ञानग्रंथ तत्व चिंतकों, विचारकों तथा सच्चे जिज्ञासुओं के लिए अत्यंत उपयोगी रहेगा| भाषा सादी और एकदम सरल होने के कारण सामान्य जन को भी वह पूरा-पूरा फल दे सकेगी| सुज्ञ पाठक गहराई से इस महान ग्रंथ का चिंतन मनन करेंगे तो अवश्य समकित प्राप्त करेंगे|

Aptavani Shreni-3: आप्तवाणी श्रेणी-३

by Dada Bhagwan

ज़िंदगी में लोगों के बहुत से लक्ष्य और उद्देश होते हैं, लेकिन वे सबसे बुनियादी सवाल का जवाब नहीं दे पाते कि ‘मैं कौन हूँ’। बल्कि हममें से अधिकतर लोग यह नहीं जानते। अनंत समय से लोग संसार के भौतिक साधनों के पीछे भागते रहे हैं। सिर्फ ज्ञानीपुरुष ही आत्म साक्षात्कार करवा सकते हैं और आपको संसार के भौतिक बंधनों से मुक्ति दिलवा सकते हैं। प्रस्तुत पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने आत्मा के गुणों और अन्य अनेकों विषयों जैसे ‘स्वयं’ के ज्ञान, दर्शन तथा शक्तियों के बारे में बताया है। सुख, स्वसत्ता, परसत्ता, स्वपरिणाम, परपरिणाम, व्यवहार आत्मा, निश्चय आत्मा तथा अनेक विषयों के बारे मे भी बताया है। पुस्तक के दुसरे भाग में परम पूज्य दादाश्री ने ‘क्लेश रहित जीवन कैसे जीएँ’ इसकी चाबी दी है तथा यह भी बताया है कि सही सोच से परिवार में बिना दुखी हुए कैसे व्यव्हार करें जैसे-बच्चों से व्यव्हार, दूसरों को सुधारने के बजाय खुद को सुधारना, दूसरों के साथ तालमेल बिठाना, सांसारिक संबंधों को कैसे निभाएँ, परिवार, मेहमान, बड़ों के साथ, अलग-अलग व्यक्तित्ववाले सदस्यों से कैसे व्यवहार करें, रिश्तों को सामान्य कैसे करें इत्यादि... इस पुस्तक का अध्ययन करके जीवन में उतारने से जीवन हमेशा के लिए शांति और आनंदमय हो जाएगा।

Aptavani Shreni-4: आप्तवाणी श्रेणी -४

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल.ज्ज् दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Aptavani Shreni-5: आप्तवाणी श्रेणी -५

by Dada Bhagwan

व्यवस्थित शक्ति के द्वारा हमारे जीवन का समस्त सांसारिक व्यवहार डिस्चार्ज हो रहा है। हमारी पाँचों इन्द्रियाँ कर्म के अधीन हैं। कर्मों के बंधन का कारण क्या है? यह धारणा की कि ‘मैं चंदुलाल हूँ’ वह कर्म बंधन का मूल कारण है। सिर्फ सच (तथ्य) जानने की आवश्यकता है। यह एक विज्ञान है। इस पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने पाँच ज्ञान इन्द्रियों तथा उनके कार्यों की प्रणाली के बारे में बताया है। मन-बुद्धि-चित्त-अहंकार, यह सब इन्द्रियों के अलग-अलग कार्य हैं। फिर अपना कार्य करने में कौन असफल रहा? ‘स्व’ रहा। ‘स्व’ का कार्य है जानना, देखना और हमेंशा आनंदमय स्थिति में रहना। हर इन्सान ज़िंदगी के बहाव के साथ आगे बह रहा है। यहाँ कोई भी कर्ता नहीं है। अगर कोई स्वतंत्र कर्ता होता तो वह हमेंशा बंधन में ही रहता। जो नैमित्तिक कर्ता है वह कभी भी बंधन में नहीं रहता। संसार प्राकृतिक परिस्थितियों के प्रभाव से उत्त्पन्न परिणाम पर ही चलता है। ऐसी परिस्थिति में ‘मैं कर्ता हूँ’ की गलत धारणा की उत्पत्ति होती है। इस कर्तापन की गलत धारणा की वजह से अगले जन्म के बीज बोए जाते हैं। इस संकलन में परम पूज्य दादाश्री ने कर्म के विज्ञान, कर्तापन, पाँच इन्द्रियों, अहंकार, मनुष्यों का स्वभाव, ज्ञानियों के प्रति विनय, पापों का प्रतिक्रमण, प्रायश्चित इत्यादि विषयों के बारे में बताया है। यह समझ साधकों को स्वयं के बारे में व संसार में दूसरों से कैसे शांतिपूर्वक व्यवहार करें, इस बारे में मदद करती है।

Aristotleche Nitishastra: ॲरिस्टॉटलचे नीतिशास्त्र

by Shree. Vijay Redkar

ॲरिस्टॉटलचे नीतिशास्त्र हे पुस्तक “निकोमॅकिअन एथिक्स”चे मराठीत केलेले भाषांतर आहे. या पुस्तकात अ‍ॅरिस्टॉटलच्या जीवनांत एकूण तीन महत्त्वाचे कालखंड दिसून येतात. (१) इ. स. पू. ३६७ ते ३४७ ह्या वीस वर्षांच्या काळामध्ये अ‍ॅरिस्टॉटल प्लेटोच्या सान्निध्यांत राहात होता. ह्या काळांत त्याने प्रामुख्याने ‘युडेमस’ व पोट्रेप्‍टिकस हे संवाद लिहिले. (२) इ. स. पू. ३४७ ते ३३५ ह्या १२ वर्षांच्या काळाला संक्रमणाचा काळ असे म्हणता येईल. ह्या काळांत त्याने अ‍ॅसस, मिटोलीन व मॅसिडोनियाचा दरबार येथे अध्यापनकार्य केले. या काळांतील त्याच्या विचारांत आणि लेखनांत स्वतःची स्वतंत्र अशी विचारशक्‍ती व बुध्दी व्यक्‍त होतांना दिसते, त्याचे मेटॉफिजिक्स ह्या काळांत तयार होत होते असे म्हणता येईल. (३) इ.स.पू. ३३५ ते ३२२, ह्या काळांत अ‍ॅरिस्टॉटलने लिसियम विद्यापीठाचा प्रमुख म्हणून काम केले. ह्या कालखंडांतील अ‍ॅरिस्टॉटल हा अनुभव व निरीक्षण ह्यावर आधारित असलेल्या वास्तव घटनाविषयी वैज्ञानिकाच्या भूमिकेवरून सामान्य सिध्दान्त तयार करताना दिसतो.

Arogya Manasashastra Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आरोग्य मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

2019-20 शैक्षणिक वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षेसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार 2020-21 पासून द्वितीय वर्षाचा नवा अभ्यासक्रम लागू होईल. यावर्षी 'आरोग्य मानसशास्त्र' या विषयाचा नव्याने अंतर्भाव केला आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि सध्याची गळेकापू स्पर्धा यामुळे काही वर्षांपूर्वी वयस्कांचे समजले जाणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा अगदी संधिवातासारखे आजार तरुणांनासुद्धा होत आहेत. वाढणारे ताण, व्यसनांविषयी वाढणारे आकर्षण, अंगवळणी पडत चाललेला चंगळवाद यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयीन वयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व आणि विविध आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. आरोग्य मानसशास्त्राच्या या पुस्तकातील माहिती केवळ परीक्षेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना तर कायमची उपयोगी पडेलच तसेच आरोग्याविषयी जागृत असणाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक नक्की आवडेल.

The Art Of War: दी आर्ट ऑफ वॉर

by Sun Tzu Vyanktesh Upadhye

‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक इ.स पू. 515 मध्ये लौकिकार्थाने फारशा प्रसिद्ध नसलेल्या, सन त्झु नावाच्या एका चिनी पंडिताने लिहिले आहे. या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे, असे वरकरणी वाटते. खरेतर यात संघर्षाबद्दल केलेल्या चर्चेपेक्षा बुद्धिमत्तेबद्दल जास्त ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात. इतरांशी असलेल्या संघर्षामुळे वा अंतर्द्वद्वामुळे आपले आयुष्य कसे झाकोळले जाणार नाही याचा मार्ग दाखविणारे, आध्यात्मिक बैठक असलेले असे छोटेखानी तेरा धडे या पुस्तकात आहेत. आध्यात्मिकतेचा कोणताही मार्ग तुम्ही अनुसरत असाल किंवा नसाल तरीही सन त्झु याची ही प्राचीन विचारसरणी प्रत्येकास एकसारखीच लागू आहे. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

Arthashastra class 11 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना उदाहरणार्थ, पैसा, आर्थिक वृद्धी व विकास, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन, संख्याशास्त्र इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाची मांडणी ही अर्थशास्त्रीय भाषेशी कोणतीही तडजोड न करता सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून केली आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक तेथे विविध चित्राकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा वापर केला आहे. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना, शब्द यांसाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टही देण्यात आले आहे.

Arthashastra class 12 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांची निर्मिती असलेल्या अर्थशास्त्राच्या ह्या पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन्हींचा परामर्ष घेण्यात आला आहे. उपयोगिता, मागणी, पुरवठा यांचे सिद्धांत, बाजारांचे प्रकार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणेबाजार व भांडवल बाजार, विदेशी व्यापार ह्या स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना या अभ्यासक्रमात प्रथमच विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहोत. महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संख्याशास्त्रातील निर्देशांक मापकाचा ह्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे.

Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

अर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

Arthat

by Achyut Godbole

अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय चूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. खकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक घांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी कलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा हे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून कते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील मवंतांनी रवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत न् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Refine Search

Showing 101 through 125 of 1,427 results