Browse Results

Showing 1,051 through 1,075 of 1,427 results

Satyashodhak Samajacha Itihas: सत्यशोधक समाजाचा इतिहास

by Mahesh Joshi

साहित्य संस्कृती मंडळाने “सत्यशोधक समाजाचा इतिहास” लिहिण्याचे काम श्री. महेश जोशी यांच्याकडे सोपवले होते व ते त्यांनी आनंदाने स्वीकारले. त्या इतिहासाचा हा पहिला भाग “आमूलाग्र परिवर्तनाचा काळ [इ.स. १७६० ते १८६०]” या शीर्षकाने प्रसिद्ध होत आहे. या भागात १७६० ते १८६० या शंभर वर्षातील महाराष्ट्रातील व त्याच अनुषंगाने भारतातील व इग्लंडमधील काही घटनांचा परामर्श घेतला आहे. महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला व निधन २८ नोव्हेंबर, १८९० साली झाले. १८४८ साली त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा सुरू केली. या वर्षापासून त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याला सुरुवातझाली. श्री. महेश जोशी यांच्या विवेचनात ज्योतिबांच्या कार्याची पार्श्वभूमी विशद केलेली आहे. या अवधीत ज्या विविध ऐतिहासिक व सामाजिक घडामोडी झाल्या त्यांचे परिणाम ज्योतिबांच्या कार्यावर कसे झाले हे स्पष्ट करण्याचा हेतू श्री. जोशी यांचा आहे. विशेषतः, पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर ज्या घडामोडी झाल्या व जे राजकीय प्रवाह निर्माण झाले त्यामुळे निर्माण झालेली पार्श्वभूमी ही ज्योतिबांच्या कार्याला कशी पोषक झाली, याचे विवेचन या पुस्तकात आहे. त्याचबरोबर, इंग्रजी राजवट आल्याने जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीचे पण विवेचन या पुस्तकात आहे. कारण, या आर्थिक परिस्थितीचा मराठी समाजावर दूरगामी परिणाम झालेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागे ज्योतिरावांची विश्वव्यापी दृष्टी ज्याप्रमाणे कारणीभूत होती, त्याचप्रमाणे जे राजकीय, सामाजिक व आर्थिक बदल १८४० पूर्वी आले तेही कारणीभूत होते. श्री. महेश जोशी यांनी याच हेतूने या इतिहासाचा पहिला भाग लिहिला आहे.

Agarkar Vangamay Khand 3: आगरकर-वाङ्मय खंड ३

by M. G. Natu D. Y. Deshpande

आगरकर-वाङ्मय: खंड १ च्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे या तिसऱ्या खंडात आगरकरांचे 'डोंगरीच्या तुरुंगात आमचे १.१ दिवस' (१८८२), 'विकारविलसित' (१८८३), वाक्यमीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण (१८८८), व विविधविषयसंग्रह (१८९१) हे ग्रंथ आणि केसरीतील निवडक निबंध, भाग १ व २ (१८८७ व १८८८) यांतील निर्विवादपणे आगरकरांचेच असलेले काही निबंध यांचा समावेश केला आहे. आगरकरांच्या वाङ्मयाची विभागणी प्रकाशनकालक्रमानुसार न करता त्यांचे सर्वात शेवटी प्रकाशित झालेले निबंधसंग्रह, भाग १, २ व ३ हे आम्ही खंड १ व २ यात घेतले आणि त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेले सर्व वाङ्मय या शेवटच्या खंडात समाविष्ट केले याचे कारण आम्ही पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेच आहे. त्याचा थोडक्यात पुनरुच्चार करायचा तर आगरकरांचे जीवितकार्य जी सुधारणा तिची मीमांसा सामाग्याने सुधारकातून निवडलेल्या या निबंधांतून झालेली आहे. त्या मानाने त्यांचे ग्रंथ भिन्न भिन्न प्रकारचे आणि त्यांचे विषयही भिन्न असल्यामुळे या खंडाला काहीसे संकीर्ण स्वरूप आले आहे. म्हणून या खंडाला आम्ही 'विविध विषय विभाग' असे नाव दिले आहे.

Samajik Thar: सामाजिक थर

by Sau. Sarla Karkhanis

अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे समाजशास्त्रज्ञ मेल्विन एम्‌. ट्युमिन यांच्या ‘सोशल स्ट्रॅटिफिकेशन- द फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इन्इक्वॉलिटी’ या पुस्तकाचा हा अनुवाद ‘सामाजिक थर: विषमतेचे प्रकार व कार्य’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. अनेक समाजसंशोधकांनी तयार केलेल्या प्रबंधाच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात सामाजिक विषमतेचा प्रश्न सविस्तरपणे मांडला आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर या दोन मूलग्राही विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा संयोग सामाजिक घडणीच्या आधुनिक अभ्यासकांच्या भूमिकेत आढळतो, असे लेखकाने प्रतिपादन केले आहे. लेखकाची मांडणी सरळ व सुस्पष्ट आहे आणि ती प्रत्यक्षावर-पहाणी व संशोधने यांवर आधारलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज-अभ्यासकांना आपल्या अनुभवांशी त्यातील प्रतिपादने जोखून पाहणे शक्य होईल. पूर्वापार भारतीय समाजपद्धतीचाही उल्लेख लेखकाने अनेकदा केला आहे. आपल्या आजच्या बदलत्या परिस्थितीत त्यात होणारे फरक का व कसे होत आहेत याचा शोध घेण्यास या पुस्तकाचा मार्गदर्शनपर उपयोग होईल.

Dr. Babasaheb Ambedkar Gauravgranth: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ

by Daya Pawar

क्रियाशील नेता थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलित साहित्याचा प्रेरणास्त्रोत असे ज्यांचे वर्णन केले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत मातेचे थोर सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कृतिशील अभिवादन करावे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक गौरवग्रंथ प्रसिद्ध करण्याचे ठरविले आणि त्यानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्या गौरवग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण परिचय घडावा म्हणून, महाराष्ट्रातील आणि बाहेरीलसुद्धा अनेक अभ्यासकांनी विनंतीला प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार, आर्थिक विचार, धार्मिक चिंतन आणि वाङ्मयीन विचार ह्यावरील वैशिष्ट्यपूर्ण लेख तर येथे आहेतच; पण त्याखेरीज बाबासाहेबांची लेखनशैली, विनोद, पत्रकारिता, दलित साहित्याचे प्रेरणास्त्रोत ह्यासुध्दा विषयांवर लेखन समाविष्ट केले आहे. राखीव जागेचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्वकाळातील दलित चळवळ, कामगार विषयक धोरण, स्वतंत्र मजूर पक्ष, शे. का. फेडरेशन, बाबासाहेबांचे समकालीन, बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार, इत्यादी विविध विषयांवरील लेखनाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानावर, नव्याने शोध घेण्याचे प्रयत्न येथे शब्दबद्ध केले आहेत.

Jaati Udgam: जाति उद्गम

by Prof. Pramod R. Dosi

चार्ल्स डार्विन लिखित “The Origin of Species” या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. प्रमोद रा. दोसी यांनी केला आहे तसेच हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तर्फे प्रकाशित केले गेले आहे. हे पुस्तक चार्ल्स डार्विनचे वैज्ञानिक साहित्य आहे. जो उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचा पाया मानला जातो.

Chiranjiv Manus: चिरंजीव माणूस

by Narayan Desai

सर्व मराठी माणसांनी, नव्हे, सर्व भारतीयांनी वाचावे आणि त्यावर मनन करावे अशी जी काही महत्त्वाची पुस्तके जगात निर्माण झाली त्यात “Eternal Man” या पुस्तकाची गणना करावी लागेल. शेवटी माणसामधल्या माणूसकीची जपणूक केली पाहिजे हे सांगणारे जे तत्त्वज्ञान त्याचाच एका वेगळ्या पद्धतीने या पुस्तकात विचार झालेला आहे. एवगेनी बोगात यांच्या Eternal Man या पुस्तकाचा संक्षिप्त भावानुवाद श्री. नारायण देसाई यांनी केला आहे. माणसातील माणूस हा नेहमीच चिरंजीव असतो. तो अमर असतो, तो कधीच नाश पावत नाही हे या तत्त्वचिंतनाच्या मागील मुख्य सूत्र आहे. आणि या सूत्राचे माणासाला-मराठी माणसाला-आकलन झाले तर त्याच्यामधील निराशावाद नाहीसा झाल्यावाचून राहणार नाही.

Pandit Jawaharlal Nehru: पंडित जवाहरलाल नेहरू: व्यक्ती आणि कार्य

by Prof. B.H. Kalyankar

“पंडित जवाहरलाल नेहरू: व्यक्ती आणि कार्य” या ग्रंथाचे प्रकाशन पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या स्मृतिदिनी दिनांक २७ मे २००२ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. या ग्रंथात एकूण २५ लेख व एक कविता समाविष्ट करण्यात आली आहे. हे लेख विविध क्षेत्रांतल्या अभ्यासू व मान्यवर व्यक्तींनी लिहिले आहेत. हे अभ्यासक राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आदि क्षेत्रांतील जाणकार आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या ग्रंथातून साकार झालेले आहेत. या मान्यवर अभ्यासकांनी जवाहरलालजींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा मोकळेपणाने घेतलेला वेध हा या ग्रंथाचा विशेष आहे. पंडित जवाहरलालजींच्या जीवनाचा व कार्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.

Abbaji Gokhale Ek Anandyatri: आबाजी गोखले एक आनंदयात्री

by Sau. Swamini Vikram Savarkar

श्री. पांडुरंग बळवंत उपाख्य आबाजी गोखले हे नागपूरच्या सार्वजनिक जीवनातील, एक विख्यात व्यक्तिमत्व होते. नाग-विदर्भात ते नर्मदा परिक्रमावासी पदयात्री म्हणून ओळखले जात. कारण त्यांनी श्री नर्मदा नदीची अत्यंत अवघड अशी परिक्रमा, अल्पकाळात पूर्ण केली. केवळ नर्मदा परिक्रमाच नव्हे, तर सर्व भारतभर त्यांनी पद भ्रमण केले. एका व्यक्तिने वर्षानुवर्षे कोणताही राजकीय हेतु किंवा आर्थिक अभिलाषा न बाळगता हजारो मैलांचा प्रवास, लोकनिरीक्षण, निसर्गाशी नाते जोडणे आणि या देशातील दुर्गम आदिवासी जनतेची ओळख करुन घेण्यासाठी करणे, हे क्वचित आढळणारे उदाहरण आहे. पर्यटनातील त्यांच्या विविध अनुभवांचा लाभ मराठी वाचकांना व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आबाजींचे व्यक्तिमत्व व त्यांचे अनुभव हे पुस्तकरूपाने आले तर ते वाचकांना उपयुक्त होईलच पण मराठी साहित्यालाही एक वेगळा आयाम मिळेल. आबाजींच्या व्यक्तिमत्वाचे लेखन आणि त्यांनी केलेल्या शब्दांकनांचे आवश्यक ते संपादन करुन हे पुस्तक तयार केलेले आहे.

Bharatacha Itihas Prarambh Te 650 Paryant FYBA First Semester - SPPU: भारताचा इतिहास प्रारंभ ते ६५० पर्यंत एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. G. Joshi

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (U.G.C.) नूतन अभ्यासक्रमानुसार 'भारताचा इतिहास' (प्राचीन काळ) ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यातून U.G.C. च्या नवीन दृष्टिकोनांची व उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आठवा ग्रंथ कला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हाती देताना विशेष समाधान लाभत आहे. प्राचीन भारतातील धर्म, साहित्य, शास्त्र, कला, समाजजीवन, अर्थव्यवस्था आणि प्रशासन व राजकीय घडामोडींना विवेचनात प्राधान्य दिलेले आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Paryatan Bhugol TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vasudev Sivaji Salunkhe Dr Santosh Jabaji Lagad

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न अवलंबण्यात आला आहे. भूगोल (G-3) (पर्यटन भूगोल -१) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी जून २०२० पासून होत आहे. हे पुस्तक आपत्ती व्यवस्थापनावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला पर्यटन आणि पर्यटक या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहे. पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच भूगोलाघी पर्यटन विकासात असणारी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात पर्यटन विकासास प्रभावित करणाऱ्या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने प्राकृतिक घटक, सामाजिक सांस्कृतिक घटक आणि राजकीय घटक पर्यटनास कशाप्रकारे प्रभावी ठरतात हे जाणून घेण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात पर्यटनाचे व पर्यटकांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रीयत्वानुसार, पर्यटन कालावधीनुसार आणि पर्यटनाच्या उद्देशानुसार पर्यटकांचे असणारे प्रकार स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासंदर्भातील विविध संकल्पनांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने कृषी पर्यटन, पर्यावरण पर्यटन, वन्यजीव पर्यटन, निरोगी पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि क्रीडा पर्यटन या संकल्पना आणून घेण्यात आल्या आहे. पुस्तकाच्या शेवटी पर्यटन विकासात वेगवेगळ्या वाहतूक साधनांची आणि संदेशवहनाची असणारी भूमिका अभ्यासण्यात आली आहे. एकूणच पर्यटन भूगोलातील अभ्यास घटकांची विश्लेषणात्मक माहिती देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.

Nyaymandir: न्यायमंदिर

by Narayan Dharap

“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली… पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूरदूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख मागं उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण, मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला; पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्याभोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अति संथ ठोके जाणवत होते. ‘ठक्… ठक्…! ठक्… ठक्...’

Padchhaya: पडछाया

by Narayan Dharap

अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणार्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Swaha: स्वाहा

by Narayan Dharap

‘‘सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट. मग खाली तपशील होता. गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.’’ श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

Kale Pani: काळे पाणी

by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar

सावरकरांची हि तिसरी कादंबरी. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ साली बंदी घाली. ती बंदी उठवावी म्हणून प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी 'काळे पाणी' हि कादंबरी लिहीण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता कि अंदमानातील कष्टकारक, दुःखदायक, क्लेशदायक आणि एकूणच अन्यायकारक जीवन कसे जगावं लागते हे दर्शवण्यासाठी त्यांनी हि कादंबरी लिहिली. प्रेम हि अगदीच कोवळी आणि हळुवार भावना आहे, त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी कणखरपणे तोंड देणाऱ्या योद्ध्याकडून प्रेमावर कादंबरी म्हटली कि भुवया उंचावतातच. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे. सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगलेले असल्याने त्यांनी त्यांच्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अगदीच अप्रतिम मांडले आहे. ज्यांच्या गाठी असे कटू अनुभव असतात आणि त्यावर अनुसरूनच जर कादंबरी असेल तर शक्यतो कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकर मात्र आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना हीच शिक्षा कशी बरोबर आहे हेदेखील सांगितले आहे.

Bahurupi: बहुरूपी

by Narayan Dharap

‘मातापित्यांची शिकवण मनात खोलवर रुजली असली पाहिजे. ती आता वर आली. मी हे आव्हान नाकारूच शकत नव्हतो. भले त्यासाठी मला माझा प्राण गमवावा लागला तरी हरकत नाही! आव्हान मिळूनही मी भ्याडासारखा कातडी बचावण्यासाठी चार भिंतीमागे लपून बसलो असतो तर? तर प्राण वाचवला असता; पण बाकी सर्व गमावलं असतं! जगात उजळ माथ्याने वावरणं अशक्य झालं असतं. किड्यामुंगीसारखं सांदीकोपऱ्यात लपून राहावं लागलं असतं. आज माझा सन्मान करणारे तुम्ही तुम्हीच माझी छी: थू! केली असती. ‘मी गेलो आणि आवश्यक ते सर्व केलं. दैवाची साथ मिळाली असं समजा. दैव शूराचीच सोबत करतं. मी माझ्या कार्यात यशस्वी झालो. गायत्रीदेवी सुखरूप परत आल्या आणि म्हणून आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आनंदाने आलो. आपले सर्वांचे आभार.’

Saitan: सैतान

by Narayan Dharap

“खिडकीच्या काचेबाहेरून दोन मोठे, काळेभोर डोळे तिच्याकडे रोखून पाहत होते. त्या एकाग्र नजरेत अशी काही शक्ती होती की, लताला आपली नजर त्यांच्यावरून काढताच येत नव्हती. ती नजर एखाद्या गिरमिटासारखी तिच्या मेंदूचा, तिच्या मनाचा छेद घेत घेत पार तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचत होती आणि लताला दिसत होतं की, बाहेर होतं ते काही कोणी माणूस नव्हतं, एवढंच नाही, ते जिवंतही नव्हतं. भयाच्या कडेवर मेंदू लटपटत असतानाही ते काय आहे हे तिला समजत होतं.- ती एक बाहुली होती. गारगोट्यांसारख्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची, लाललाल ओठांची, गोबऱ्या गालाची ती बाहुली होती. पण आता चेहऱ्याचा डावीकडचा भाग जळून, होरपळून, वितळून विकृत झाला होता. एक गालही आत बसला होता. पण ते डोळे! ते जिवंत होते! ते तीव्र भावनांनी लवलवत होते! ती नजर तिचा मेंदू जाळत खोलवर पोहोचत होती. पुन्हा एकदा ती कुजबुज आली. भुश्यात पाणी जिरावं तशी ती कुजबुज तिच्या सर्व शरीरात भिनली. पण ते काही शब्द असले तर तिला ते नीट उमगले नाहीत, त्यांचा अर्थही ध्यानात आला नाही.''

Palati Zade: पळती झाडे

by Narayan Dharap

मानवाला नेहमी रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा असते याच जिज्ञासा या भावनेत कथा कथा नायकांच गूढ, रहस्यमय अनुभव प्रस्तुत पळती झाडे कथासंग्रहात नारायण धारपांनी आपल्या खास शैलीत अगदी धारप स्टाईलने मांडला आहे. या कथानकातील कथा या भयकथाच आहेत. धारपांची चित्रमय भाषा कथेतील घटना वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करते. प्रस्तुत कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत, त्यापैकी पळती झाडे पाहूया ही कथा भय विज्ञान कथा आहे. "श्रीरंग नावाचा कथा नायकाची सोलापूरला बदली होते व तो आपल्या मामा-मामी कडे राहायला जातो तेथे त्याला चंदी भेटती व एक दिवस ती अचानक गायब होते.” ही कथा वाचताना धारपांच्या सिद्धहस्त लेखणीचे जाणीव आपल्याला होते. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात. धारपांची भाषा चित्रमय आहे वाचकांच्या डोळ्यासमोर घटना प्रत्यक्ष उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. अज्ञात अकल्पनीय आणि अतर्क्सचा मागोवा घेणाऱ्या या कथा निश्चितपणे मराठीतील श्रेष्ठ भयकथा ठरतात. शेवटी पळती झाडे हा कथासंग्रह भयकथा प्रेमींसाठी नक्कीच मेजवानी ठरतो.

Shodh Ek Bhayavah Kadambari: शोध एक भयावह कादंबरी

by Narayan Dharap

जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर वाईट शक्ती जन्म घेतात तेव्हा विधाता त्या शक्तींपासून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी काहितरी सोय करून ठेवत असतो. असाच या कथेतील नायक बळवंत चाफेकर याला ‘शोध’ घेण्यास प्रवृत्त करणारी ही वाईट शक्ती. काही अशा घटना बळवंताच्या आयुष्यात घडतात की ज्यामुळे एक अघोरी शक्ती जन्म घेते आणि बळवंताला घाबरून असते. असे का याचा शोध घेत असताना ही अघोरी शक्ती बळवंताला जे लोक मदत करतात त्यांचा जीव घेते. मग बळवंतमध्ये असे काय असते की त्याच्या जीवाला ही शक्ती काहीच इजा करू शकत नाही. याचा शोध घेणारा बळवंत त्या शक्तीचा नायनाट कसा करतो आणि त्याचा हा प्रवास शोध एक भयावह या कथासंग्रहात दिला आहे.

Ikmai: इक्माई

by Narayan Dharap

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. नारायण धारपांच्या कथा 'भय' या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, कूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको. नारायण धारप या रहस्यमय कादंबरीकाराचं `इक्माई' हे पुस्तकातील निसर्गात असणारं एक चमत्कारिक, गूढगुंजन व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकाची भूक वाढविणारी कथा म्हणजेच `इक्माई' कथासंग्रह होय.

Anolakhi Disha Bhag 3: अनोळखी दिशा भाग ३

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolakhi Disha Bhag 2: अनोळखी दिशा भाग 2

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolakhi Disha Bhag 1: अनोळखी दिशा भाग 1

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Devadnya: देवाज्ञा

by Narayan Dharap

देवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी. मृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे. तसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा!

Pacifikchya Betavaril Katha: पॅसिफिकच्या बेटांवरील कथा

by Somerset Maugham

पॅसिफिकच्या बेटांवरील कथा ह्या पुस्तकाचे मूळ लेखक हे सॉमरसेट मॉम असून ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. वृषाली जोशी आहेत. ह्या पुस्तकामध्ये सॉमरसेट मॉम यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे वर्णन करण्यात आलेले आहे.

Refine Search

Showing 1,051 through 1,075 of 1,427 results