Browse Results

Showing 76 through 100 of 1,427 results

Maharashtracha Bhugol 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Ashok Maruti Thorat Dr Arjun Baban Doke Prof. Amit Eknath Sonawane Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास 'महाराष्ट्राचा भूगोल' हा विषय विशेष स्तरावर लागू केला आहे. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Maharashtracha Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A.B. Savadi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) SYBA Geography (S1) Semester - IV साठी महाविद्यालयीन 'महाराष्ट्राचा भूगोल 2' हे पाठ्यपुस्तक प्रकाशित कलेले आहे. या नवीन अभ्यासक्रमात एकूण चार प्रकरणे आहेत: १. कृषी, २. लोकसंख्या आणि वसाहत, ३. ग्रामीण विकास आणि ४. पर्यटन. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Omkar Ankush Korawale Prof. Bhakti Rajendra Patil

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन-1 हा विषय लागू केला आहे. पुस्तकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील निर्मिती, वाटचाल व विकास, पंचायतराज प्रणाली राबविताना विविध समित्यांनी केलेल्या शिफारशी तसेच 78 व्या घटनादुरुस्तीचा विस्तृत आढावा इत्यादी घटक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील.

Maharashtratil Sthanik Swarajya Sanstha TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar

तृतीय वर्ष कला शाखेच्या जनरल राज्यशास्त्र विषयासाठी (जी-३) ‘महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था’ हा नवीन अभ्यासक्रम २०२१ पासून आहे. स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक विकासामध्ये तसेच स्थानिक जनतेला सेवा-सुविधा पुरविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? त्याचा विकास त्यांची रचना, अधिकार व कार्ये, स्थानिक नेतृत्व, विकास, स्थानिक शासनाच्या संदर्भातील शासनाने नेमलेल्या समित्या, स्थानिक शासनासंदर्भात झालेल्या घटनादुरुस्त्या या सर्व मुद्द्यांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील हे अभ्यास साहित्य अत्यंत उपयोगाचे आहे. साध्या, सोप्या व सहजपणे आकलन होईल, अशा पद्धतीने विषयांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Maitri Bankingashi: मैत्री बँकिंगशी

by Vandana Dharmadhikari

सौ. वंदना धर्माधिकारी लिखित “मैत्री बँकिंगशी” या पुस्तकाची बारावी आवृत्ती आहे, २०११मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. सर्वसामान्यांना बँकिंगबाबतची माहिती सहज, सोप्या पद्धतीने या पुस्तकातून होते. बँकिंगची तांत्रिकता असूनही हे पुस्तक वाचकांना विशेष उपयोगी ठरताना दिसत आहे. बँकिंग ही संकल्पना जरी सर्वत्र एकसारखीच असली तरी आजच्या ऑनलाईन पद्धतीमुळे बँकिंगची सगळी परिभाषा बदलून गेली आहे. प्रत्यक्ष बँकांमध्ये जाण्याची गरज आता उरलेली नाही. अशा या स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक युगात बँकिंगची संकल्पना सातत्याने बदलत आहे. त्यामुळे त्यातले बारकावे समजून घेत आवश्यक ती माहिती अपडेट ठेवण्याचीदेखील आज गरज आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी, विदेशी, लघुवित्त (Small Finance) अशा सर्वच प्रकारच्या बँका आणि सहकारी पतसंस्था यांमध्ये मूळ बँकिंग जरी सारखेच असले तरी प्रत्येक प्रकारातील नियम आणि व्यवहारातील बदल हे समजून घेणे आवश्यक आहे, ज्याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. बॅंकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बॅंकिंग करिअर निवडणार्‍या अशा उमेदवारांनादेखील हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे.

Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.

Manavi Hakk Ani Samajik Nyayacha Parichay Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Ashruba Yewle Vinayak Subhash Lashkar Dr Jyoti Suhas Gagangras Vikramaditya Prabhakar Gaikwad

तृतीय वर्ष बी. ए. जनरलचे ‘मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय' हे पुस्तक वाचकांच्या हातात सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सेमिस्टर-6 चे हे पुस्तक आहे. गुन्हा आणि समाज हे पुस्तक लिहिताना गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्ह्यांविषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला होता. या क्रमिक पुस्तकात 'मानवी हक्क आणि सामाजिक न्याय' याच्याशी संबंधित विविध पैलूंची मांडणी केली आहे.

Marathi Aksharbharati Class 9 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'अक्षरभारती' मराठी इयत्ता नववीचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख करून दिलेली आहे, ते वाचून मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे, हे लक्षात येईल. भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा, म्हणून या पुस्तकात अनेक भाषिक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतीतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरूची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे व त्याचे फायदेही समजून घ्यायचे आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा.

Marathi Sugambharati Class 8 - Maharashtra Board: मराठी सुगमभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुगमभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Marathi Sulabhabharati class 8 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुलभभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

Marathyancha Itihas (1707-1818) Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Bhosle-Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर 4 सामान्य स्तर पेपर 2 (G2) साठी मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, प्रांतिक इतिहास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या संदर्भात इतिहास केंद्रित झाला आहे. व्यक्तिकेंद्रितता टाळून घटनाप्राधान्य इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Paryatan Bhugol 1 TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल १ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘पर्यटन भूगोल’ विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. ‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख तसेच पर्यटन विकासाचे प्राकृतिक, सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय घटकांचा विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. यामध्ये हवामान, अभयारण्ये, धार्मिक-ऐतिहासिक-क्रीडा स्थळे, पर्यटकांची सुरक्षितता या बाबींचा विचार केलेला आहे. पर्यटन वर्गीकरणामध्ये राष्ट्रीयत्व, प्रवास कालावधी, उद्देश तसेच पर्यटन संकल्पनेमध्ये कृषी पर्यटन, इको टुरिझम, वन्यजीव पर्यटन, आरोग्य पर्यटन, क्रीडा पर्यटन यांचा समावेश केलेला आहे. पर्यटनातील पायाभूत सुविधेमध्ये वाहतुकीच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका, मार्गदर्शकाचे गुण व कर्तव्ये याचे मुद्देसूद वर्णन केलेले आहे. याबरोबरच प्रसारमाध्यमांचाही उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे. ‘पर्यटन भूगोल' या पुस्तकात जागतिक व आपल्या भारत देशातील सर्व पर्यटन स्थळांचे विस्तृतपणे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक तसेच पर्यटन करणाऱ्या सर्व पर्यटकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Paryatan Bhugol TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vasudev Sivaji Salunkhe Dr Santosh Jabaji Lagad

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न अवलंबण्यात आला आहे. भूगोल (G-3) (पर्यटन भूगोल -१) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी जून २०२० पासून होत आहे. हे पुस्तक आपत्ती व्यवस्थापनावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला पर्यटन आणि पर्यटक या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहे. पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच भूगोलाघी पर्यटन विकासात असणारी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात पर्यटन विकासास प्रभावित करणाऱ्या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने प्राकृतिक घटक, सामाजिक सांस्कृतिक घटक आणि राजकीय घटक पर्यटनास कशाप्रकारे प्रभावी ठरतात हे जाणून घेण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात पर्यटनाचे व पर्यटकांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रीयत्वानुसार, पर्यटन कालावधीनुसार आणि पर्यटनाच्या उद्देशानुसार पर्यटकांचे असणारे प्रकार स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासंदर्भातील विविध संकल्पनांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने कृषी पर्यटन, पर्यावरण पर्यटन, वन्यजीव पर्यटन, निरोगी पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि क्रीडा पर्यटन या संकल्पना आणून घेण्यात आल्या आहे. पुस्तकाच्या शेवटी पर्यटन विकासात वेगवेगळ्या वाहतूक साधनांची आणि संदेशवहनाची असणारी भूमिका अभ्यासण्यात आली आहे. एकूणच पर्यटन भूगोलातील अभ्यास घटकांची विश्लेषणात्मक माहिती देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 12 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम रचना २०१० (SCF 2010) ही राष्ट्रीय पाठ्यक्रम रचना २००५ च्या अनुसार तयार करण्यात आली आहे. वर्तमान पुस्तक एस्सीएफ् २०१० नुसार अध्यापन आणि अध्ययनाच्या दृष्टिकोनावर व साहित्यावर आधारून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात संपूर्ण पर्यावरण समजून घेण्यासाठी मदत होईल असे विषय समाविष्ट केले आहेत. भौतिक, जैविक, सामाजिक व आर्थिक प्रणाली या प्रणाली परस्परांशी जोडलेल्या असतात. त्यांचे परस्परांशी व पर्यावरणीय समस्यांशी असलेले संबंध यावर येथे लक्ष केंद्रित केले गेले आहे. या पाठ्यपुस्तकात योग्य अशा पर्यावरणविषयक घटनांची उदाहरणे देण्यात आली आहेत. एखादी घटना ही सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रणालींच्या दृष्टिकोनातून कशी पहावी हे सांगितले गेले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा व्यापक दृष्टिकोन दिलेला आहे. त्यांनी कृतियक्त शिक्षण घ्यावे व कृतियक्त शिक्षण हेच शिकण्याचे माध्यम असावे यावर येथे जोर देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक स्तरावर, पर्यावरणासाठी सातत्याने सक्रिय कृती सुरू ठेवण्यासाठी असलेला अभ्यासक्रम, हा कृती व प्रकल्पावर स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे अनिवार्य पात्रता अभ्यासक्रम मानला आहे.

Paryavaraniy Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: पर्यावरणीय भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एस.वाय.बी.ए. सेमिस्टर - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'पर्यावरणीय भूगोल 2' विषय कोड Gg - 210 (B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. पर्यावरणीय भूगोल एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. पर्यावरणीय भूगोल 2 हा पूर्णपणे उपयोजित पर्यावरणीय भूगोलाचा भाग आहे. वर्तमान स्थितीत आपण ज्या पर्यावरणीय समस्यांना/आपत्तींना तोंड देत आहोत त्यांचा ऊहापोह अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्या दृष्टीने पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. या दृष्टीने आपण या 'सेमिस्टरसाठी (1) पर्यावरणीय आपत्ती (2) पर्यावरणीय समस्या (3) पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन (4) पर्यावरणीय धोरणे या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत.

Pashchimatya Rajakiy Vichar 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: पाश्चिमात्य राजकीय विचार २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Pramod Sharda Rajendra Tambe Omkar Nirmala Ankush Koravle Vikas Lalita Tejerao Waghmare

शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या (CBCS) पॅटर्नप्रमाणे एस.वाय.बी.ए. राज्यशास्त्र विशेष स्तरावरील (Discipline Specific Efective Course) (DSE - 1BC3) म्हणून, 'पाश्चिमात्य राजकीय विचार' या विषयाचा सत्र 4 साठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमानुसार सत्र चारमध्ये आपण चार विचारवंत अभ्यासणार आहोत. यात प्रकरण 1 मध्ये रूसो यांच्या राज्याचा स्वभाव, सामूहिक ईहा व सामाजिक कराराचा सिद्धान्त यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 2 मध्ये हेगेल यांच्या आदर्शवाद, राज्यांचा सिद्धान्त आणि स्वातंत्र्यावरील त्यांचे विचार या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 3 मध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांच्या स्वातंत्र्यविषयक विचार, प्रातिनिधिक शासन आणि उपयुक्ततावादावरील विचार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 4 मध्ये कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवाद वर्गसंघर्ष, राज्य आणि क्रांतीचा सिद्धान्त या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत.

Prakrutik Bhugol Paper 1 FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक पद्धती व सेमिस्टर पद्धती जून 2019 पासून प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लागू केल्या आहेत. तसेच प्राकृतिक भूगोल हा पेपर भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची शाखा असून प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र व सागरशास्त्र अशा अनेक शाखांचा समावेश केला गेला आहे. पुस्तकातील पहिल्या प्रकरणात प्राकृतिक भूगोल परिभाषा, प्राकृतिक भूगोल स्वरूप आणि व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा व पृथ्वीप्रणालीबद्दल परिचय अत्यंत सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक मांडल्याने अभ्यासकांना विविध संकल्पना समजण्यास त्याचा फायदा होईल. पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मृदावरण अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग, वेगनरचा भूखंडवहन सिद्धान्त व डेव्हिसची खननचक्र संकल्पना समाविष्ट केली आहे. पुस्तकातील तिसऱ्या वातावरण या प्रकरणात वातावरणाची रचना, उष्णतेचा ताळेबंद, वायुभार पट्टे व वाऱ्याची प्रणाली आणि दृष्टीची रूपे व प्रकार असे घटक घेतले आहेत. पुस्तकातील चौथ्या जलावरण या प्रकरणात जलचक्र, महासागराचे सामान्य स्वरूप, सागरी लाटा व लहरी आणि क्षेत्रभेट (अभ्यास) असे घटक घेतल्याने सागरशास्त्राचा महत्त्वपूर्ण भाग समाविष्ट केलेला दिसून येतो. क्षेत्रभेट (अभ्यास) व क्षेत्रभेटीमुळे विषयाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat Pragaitihasik Kaal Te Mauryakal FYBA First Semester - SPPU: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Pustapalan Ani Lekhakarma class 12 - Maharashtra Board: पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाचे क्रमिक पुस्तक आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने भागिदारी संस्था व नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या लेखांकनाचा समावेश आहे. तसेच प्रमंडळ लेखांकनामध्ये भागांचे लेखांकन, वित्तीय विवरणांचे विश्लेषण, विनिमय विपत्र, लेखांकनात संगणकाचा उपयोग इत्यादींचा समावेश केलेला आहे. विविध संकल्पना व घटकांची माहिती सादर करताना विद्यार्थ्यांना ती सहज, सोप्या पद्धतीने समजेल याची योग्य काळजी घेतलेली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखांची पूर्व पार्श्वभूमी नाही आणि वाणिज्य शाखेत पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनाही हा विषय सहजपणे समजण्यास मदत होईल. कौशल्य व उपयोजनावर आधारित विविध प्रात्यक्षिक उदाहरणांचा समावेश या क्रमिक पुस्तकात करण्यात आलेला आहे.

Rajkiya Patrakarita 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राजकीय पत्रकारिता २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R. Gh. Varadkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी.ए. भाग-2 राज्यशास्त्र या विषयासाठी ‘राजकीय पत्रकारिता' हा नवा पेपर सुरू केला आहे. त्या पेपरसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार हे क्रमिक पुस्तक लिहिलेले आहे. प्रसारमाध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहेत. सर्व प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ही माध्यमे करतात. त्यात अर्थातच राजकीय क्षेत्रासंबंधीच्या माहितीचा समावेश होतो. ही माध्यमे जी माहिती पुरवितात त्या आधारे आपण आपले राजकीय मत बनवित असतो. लोकमत घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहेच; पण देशातील राजकीय प्रक्रियेवरही या माध्यमांचा प्रभाव पडत असतो. या अर्थाने प्रसारमाध्यमे ही राजकीय प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनलेली आहेत. त्यामुळेच राज्यशास्त्राचा अभ्यास करताना प्रसारमाध्यमांची राजकारणातील भूमिका समजून घेणे आवश्यक ठरलेले आहे. ती समजून घेतल्याशिवाय देशातील राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून घेता येणार नाही, एवढे प्रसारमाध्यमांना राजकीय प्रक्रियेत महत्त्व आलेले आहे. त्यामुळेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Rajyashastracha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Koravle Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार द्वितीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर - 2 (G2) CC-1D (3) साठी ‘राज्यशास्त्राचा परिचय' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. सत्र 4 साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे मूलभूत राजकीय मूल्ये हे असून यामध्ये स्वातंत्र्य संकल्पना, स्वातंत्र्याचे प्रकार, स्वातंत्र्याचे संरक्षक घटक 'समता', समतेचे प्रकार, समतेपुढील आव्हाने, न्याय संकल्पना, व्यायाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन हे हक्क/अधिकार हे असून यामध्ये आपण हक्काच्या व्याख्या आणि अर्थ, प्रकार व हक्कांसमोरील आव्हाने अभ्यासणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करणार आहोत यात राष्ट्रवाद, समाजवाद, फॅसिस्टवाद या विचारप्रणाली आहेत. प्रकरण चारमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना, कार्ये आणि आव्हाने, प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये युरोपियन संघ (EU), सार्क, ओपेक, नाटो यांची ओळख करून घेणार आहोत. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या ही राजकीय संकल्पना म्हणून अभ्यासणार आहोत.

Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.

Refine Search

Showing 76 through 100 of 1,427 results